Rain in Maharashtra : तुफान पाऊस, धबधब्यांना रौंद्ररूप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #धबधबा #waterfall #सवतकडा #ओझर्डे #शिवथरघळ
    Rain in Maharashtra : तुफान पाऊस, धबधब्यांना रौंद्ररूप #धबधबा #waterfall | Hello Baliraja
    राज्यात सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसांची संततधार सुरू आहे. यामुळं या भागातील ओढे, नाले, नदी दुथडी भरून वाहू लागले आहेत. तसेच या भागातील धबधबे देखील ओसंडून वाहताना आपल्याला पहायला मिळत आहेत.
    सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसानं जोर धरलाय. यामुळं सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून व्हायला सुरुवात झालीये. सध्या कोयनानगर मधील ओझर्डे धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. तब्बल 350 फूट उंचीवरून हा धबधबा वाहत आहे. हा धबधबा आणि कोयनेचे पावसाळी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोयनानगरला भेट देण्यासाठी येत आहेत.
    रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा प्रवाहित झालाय. येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तर रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ धबधब्याचं तर रौंद्ररूप पहायला मिळत आहे. हा धबधबा ओसंडून वाहत आहे.
    ---------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •