नवरात्रातील चौथा दिवस कुष्माण्डा देवीचा | Navratri 2023 | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2023
  • बंध नात्यांचे...
    रंग ऋणानुबंधांचे...
    नवरात्रातील चौथा दिवस कुष्माण्डा देवीचा.
    देवीच्या उपासकांमध्ये असं मानलं जातं की या जगाची निर्मिती देवीनेच केली आहे. जेव्हा सर्वत्र अंधार होता तेव्हा एक प्रकाश सर्वत्र पसरला, त्या प्रकाशाने नंतर एका देवतेचे रूप घेतलं. तीच ही देवी कुष्माण्डा..
    दुर्गेच्या याच रूपाने नंतर महालक्ष्मी आणि महासरस्वती यांना निर्माण केल. साऱ्या विश्वाची निर्माती म्हणून हिला आदिशक्ती असे म्हणतात.
    झाडाचा कोंब जसं उष्णता, प्रकाश आणि पाणी यामुळे फुटतो... वाढतो, तसं हे ब्रम्हांड विस्तारतं आणि जीवन अस्तित्वात येतं. त्याच प्रमाणे घरात आलेली गृहलक्ष्मी त्या घराची वंशावळ वाढवते आणि तिला या घरात मायेचं पाठबळ असतं ते तिच्या सासूचं.
    सासू म्हणते,
    लेक माझी लाडाची दिली सासूरा धाडोनी ।
    तहान भागवाया सून आनली प्रेमानी ॥
    आणि सून सांगते..
    सासू ग गंगामाई हाये निर्मल चांगली ।
    आईच्या मायेची जणू तहान भागली ॥
    थोडक्यात काय तर दोघीही माऊली आपल्या निळ्या सावळ्या कृष्णाला, रामाला घडवत असतात. निळा रंग म्हणजे आकाश...त्याची लोभस निळाई...
    निळा रंग म्हणजे समुद्र... त्याची अथांगता...
    या रंगातच विशालता आहे. विश्वासाचं,श्रद्धेचं, आत्मियतेचं
    प्रतीक म्हणजे निळा रंग.
    मन आकर्षून घेणारा हा रंग सासू सुनेच्या नात्याला घट्ट विणतो... आणि त्यातला ओलावा वाढवतो.
    नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्माण्डा देवीला मनःपूर्वक वंदन । 🙏🏻
    चौथ नातं : सासू - सून
    अरुणा नरेंद्र हेटे
    मंजिरी अमेय हेटे
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हाईस ओव्हर : योगेश सोहनी
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    छायाचित्र : योगेश रावराणे
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्वेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    रील डिझाईन : राजेंद्र कदम
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus

Комментарии • 2