नवरात्रातील पाचवा दिवस, स्कंदमाता देवीचा | Navratri 2023 | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2023
  • बंध नात्यांचे...
    रंग ऋणानुबंधाचे...
    नवरात्रातील पाचवा दिवस, स्कंदमाता देवीचा.
    स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि त्याची आई म्हणजे पार्वती.
    दुर्गेचं हे पाचवे रूप मोठं लोभस आणि वात्सल्याने परिपूर्ण आहे. कारण कुमार संभवात असे वर्णन आहे की आपल्या मुलाला हातात घेतल्यावर प्रेमाने, वात्सल्याने पार्वतीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या.
    याच दुधावर जेव्हा साय धरते तेंव्हा त्याचा रंग किंचित पिवळसर असतो.
    पिवळा रंग ऐश्वर्याचं आणि बहराचं प्रतीक मानला जातो.
    कृष्णाच्या पितांबराचा रंग पिवळा... आणि नववधूच्या नव्या नात्यात कोमल तनुवर लागणारा हळदीचा रंग ही पिवळा..
    ही हळद लेऊन जेव्हा मुलगी लग्नकरून नव्या घरी जाते, तेंव्हा वेगवेगळ्या नात्यांना आपलंसं करते. यातलचं एक आंबट गोड नातं, नणंद भावजयीचं.
    याच नात्याने संसाराला चव येते. कधी नणंद म्हणून वहिनीची बाजू घ्यावी तर कधी बहीण म्हणून भावाला साथ द्यावी.
    नणंदा भावजया दोघी जणी| घरात नव्हते तिसरे कोणी| शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी?
    मी नाही खाल्लं वाहिनीने खाल्लं.
    आता माझा दादा येईल ग, दादाच्या मांडीवर बसेन ग, वहिनीच्या चहाड्या सांगेन ग...
    असं म्हणत म्हणत ही नणंद तिच्या घरी जाऊन कधी वहिनीची जागा घेते हे तिलाही कळत नाही.
    भोंडल्याच्या गाण्यात या नात्याचं असचं सुरेख प्रतिबिंब पडलेलं दिसतं.
    पाचवं नातं : नणंद -भावजय
    मनीषा केदार हरचेकर
    अश्विनी आनंद बाजपेयी
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हाईस ओव्हर : योगेश सोहनी
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    छायाचित्र : योगेश रावराणे
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्युवेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    रील डिझाईन : राजेंद्र कदम
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus

Комментарии •