देवी महागौरीचं सातवं रूप म्हणजे कालरात्री देवी | Navratri | Merak Events

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2023
  • बंध नात्यांचे... रंग ऋणानुबंधाचे...
    देवी महागौरीचं सातवं
    रूप म्हणजे कालरात्री देवी…
    नावाप्रमाणेच ही देवी काळ्या रंगाची.
    महिषासुराशी युद्ध सुरु असताना अनेक असुरांना या कालरात्रीदेवीने यमसदनाला धाडले. जणू त्या असुरांसाठी तो दिवस काळरात्रीचा ठरला!
    या देवीची आठवण होते आणि तपकिरी रंग आठवतो. हा पृथ्वीचा रंग मानला जातो.कारण तो पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र आढळतो आणि स्थिरता दर्शवतो.
    असचं एक स्थिर नातं
    विहिणी-विहिणीचं…
    या नात्याला पूर्वी एक वेगळा आयाम होता. पण आता मात्र विहिणी या विहिणींपेक्षा मैत्रिणींच्या नात्याने अधिक वागतात. नात्यांमध्ये आलेला मोकळेपणा हे ही त्याचच एक कारण आहे. तसचं हल्ली लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी नोकरीनिमित्ताने परदेशात असतात. अशा वेळेला इकडे विहिणी-विहिणींची छान मैत्री होते. मुला-मुलीच्या संसारात सुनेचं बाळंतपण करायला दोघी जणी अगदी मनापासून एकत्र तयारीला लागतात. त्यामुळे हा मायेचा ओलावा सगळ्या कुटुंबात झिरपतो.
    हळूहळू बदललेलं, मैत्रीच्या पातळीवर गेलेलं हे नातं आज बदलत्या काळाची, भवतालची जाणीव करून देतं.
    नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीला मन:पूर्वक वंदन..!!
    सातवं नातं : विहिणबाईंचं
    शामल संजय बोरकर
    निशा प्रशांत रामनाथकर
    संकल्पना / संयोजन :
    मेराक इव्हेंट्स
    मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, प्रिया साटेलकर
    लेखन : धनश्री लेले
    व्हाईस ओव्हर : कुणाल रेगे
    डिजिटल पार्टनर : स्मृतिगंध
    छायाचित्र : योगेश रावराणे
    रंगभूषा : आसावरी गोखले ,पॅशन - अंधेरी, पूर्व
    दागिने : श्रीकांत बाबुराव हरचेकर ज्युवेलर्स ,विलेपार्ले -पुर्व
    डिझाईन : निर्मिती ग्राफिक्स
    फुलांची सजावट : श्याम पांडुरंग भगत,दादर
    रील डिझाईन : राजेंद्र कदम
    #NavlaiNavratrichi ....
    #MerakEvents
    #EventsByMerak #SmrutiGandhaMarathi
    #JeevanGaniEvents
    #NavratriSpecial #Navratri2023
    #Navratri #Marathi #MarathiStatus

Комментарии •