आजीच्या हातचा पारंपरिक कैरीचा तक्कू || Raw Mango Recipe ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • आजीच्या हातचा पारंपरिक कैरीचा तक्कू || Raw Mango Recipe ||
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    कैरीचा तक्कू साहित्य :
    १ कप कैरीचा किस
    २ टेबलस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
    २ टेबलस्पून तेल
    १ टेबलस्पून गूळ
    १ टीस्पून हळद
    १ टीस्पून हिंग
    १ टीस्पून मोहरी
    मीठ चवीनुसार
    कैरीचा वापर करून आपण अनेक पदार्थ बनवतो. कधी लोणचं, कधी चटणी, कधी पन्हं. अजून अनेक पारंपरिक पदार्थ कैरीचा वापर करून आपण बनवतो.
    आज आपण कैरीचा वापर करून असाच एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे तक्कू. विदर्भ स्पेशल असा हा पदार्थ आहे.
    तक्कू आपल्याला दाखवणार आहेत माझ्या सासूबाई सुमन देशपांडे. या व्हिडिओ मधून आपल्याला तक्कू कसा करायचा याच्या टिप्स सुद्धा मिळणार आहेत.
    चला तर मग बघूया पारंपरिक पद्धतीने तक्कू कसा करायचा ते.
    Raw Mango Takku Ingredients :
    1 cup grated raw mango
    2 tablespoons red chili powder (to taste)
    2 tablespoons oil
    1 tablespoon jaggery
    1 teaspoon turmeric
    1 teaspoon Asafoetida
    1 teaspoon mustard
    Salt to taste
    We make many dishes using raw mango. Sometimes pickles, sometimes chutney, sometimes panha. Many more traditional dishes we make using raw mango.
    Today we are going to make a similar traditional dish using raw mango. It's name is Takku. This dish is Vidarbha Special.
    My mother-in-law Suman Deshpande is going to show you Takku. This video will also give you tips on how to do Takku.
    So let's see how to do takku in the traditional way.
    मेतकूट व्हिडिओ लिंक :
    • पारंपरिक मेतकूट कसे बन...
    किचन टिप्स : भाग १
    • स्वयंपाकात उपयोगी पडणा...
    किचन टिप्स : भाग २
    • स्वयंपाकात उपयोगी पडणा...
    किचन टिप्स : भाग ३
    • स्वयंपाक घरात उपयोगी प...
    किचन टिप्स : भाग ४
    • स्वयंपाकात उपयोगी पडणा...
    किचन टिप्स : भाग ५
    • स्वयंपाकात उपयोगी पडणा...
    किचन टिप्स : भाग ६
    • स्वयंपाकात उपयोगी पडणा...
    Topics Covered :
    कैरीचा तक्कू
    कच्ची कैरी
    टक्कू
    तक्कू
    कच्ची कैरी लोणचे
    कच्ची कैरी पदार्थ
    raw mango chutney
    raw mango takku
    takku
    raw mango recipe
    raw mango recipe in marathi

Комментарии • 625

  • @sampadag08
    @sampadag08 3 месяца назад +1

    वैशाली तुमचा आवाज आणि आजींना बोलतं करण्याची पद्धत खूपच गोड आहे. रेसीपी आवडली. करून पहाते.

  • @rohinipandit469
    @rohinipandit469 3 года назад +2

    मी पण हा पदार्थ करते लोणच्याचा तयार मसाला वापरून छान होतो.
    आजी खूपच छान बोलतात, सांगतात वैशाली ताईही प्रश्न रुपी शंका विचारून त्याला आपलेपणा आणतात. दोघीही खूप छान

  • @sarikathakkar3109
    @sarikathakkar3109 2 года назад +2

    खूप सुंदर,,अशा पूर्वीच्या आपल्या आजी,,आई,, सासू,, आजी सासू ह्यांचे व्हिडिओ बनविले तर आपली मराठी संस्कृती अशीच आबाध राहील आणि समृद्ध होईल,,,
    धन्यवाद वैशाली ताई🙏

  • @rupalibhandarwar1355
    @rupalibhandarwar1355 Год назад +2

    काकू तरुणाईला लाजवेल अशी तुमची बोलण्याची पद्धत आहे खूपच छान सांगितलं👌👌👌👌🙏🙏

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 5 месяцев назад

    आजींना कैरीची साल काढणे आणि किस करणे ह्या प्रक्रिया करायला लावू नयेत .आईंचा आवाज आणि बोलण्याची पद्धत अगदी natural आणि म्हणूनच खूप गोड वाटते.रेसीप तर खूपच छान.

  • @anuradhapethe5367
    @anuradhapethe5367 3 года назад +3

    इतक्या आत्मीयतेने आणि प्रेमाने, आपलेपणाने आजी किती छान सांगताय! हाडाच्या शिक्षिकाच 👍🙏ल खुप छान ,🙏

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 4 месяца назад +1

    मेथी दाणे तळून त्याची पावडर करुन नाही घातली का कारण मग चव छान लागते.

  • @vaishalivaidya3499
    @vaishalivaidya3499 3 года назад +2

    तुमच्या सासुबाई आणि आई खूपच सुंदर पारंपारिक पदार्थ शिकवतात😋👌👌 त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
    त्याच बरोबर तुम्हीही असे पारंपारिक पदार्थ त्यांच्याकडून शिकून आमच्याबरोबर शेअर करतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. तुम्ही प्रेमाने व्हिडिओ बघता, वेळ काढून त्यावर प्रतिक्रिया देता त्यामुळे आम्हालाही नवीन काही करायला छान वाटतं.

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 3 года назад +2

    हो साधना, खरच गोड आहेत. माझ्या आई ची आठवण आली. आणि दुसरे वैशिष्ट्य अगदी प्रोफेशनल असल्यासारखे च बोलतात. म्हणजे उगिच चर्हाट नाही. नाहीतर विडीओ पहाताना कंटाळा येतो. i love to watch.

  • @lakshmichebbi8839
    @lakshmichebbi8839 3 года назад +1

    खूप आत्मीयतेने वर्णन केले आईने. खूप आवडले. मेतकूट पण आवडले.
    कर्नाटक मध्ये आम्ही तोक्कू म्हणतो. वडीलधारी माणसे नैसर्गिकता व काटकसर यांचा वापर आपल्या आहारात राखून चवीष्ट पदार्थ करीत याचे उत्तम उदाहरण. आभार.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आम्हाला नवीन शब्द कळला.

  • @nehamangalwedhekar5129
    @nehamangalwedhekar5129 3 года назад +4

    खूप छान पदार्थ करता आजी. मस्त
    मी उकडपेंडी केले. छान झाली.
    तुमच्या दोघींच संभाषण खूप गोड, समजून घेता. ऐकायला छान वाटतो
    धन्यवाद दोघींना असेच गोड रहा

  • @glacier1418
    @glacier1418 3 года назад +4

    नमस्कार वैशाली ताई मला तुमच्या सर्व रेसिपीज खूप आवडतात आणि तकु पण मस्त झाले आहे

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад +1

      धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @charudeshmukh6991
    @charudeshmukh6991 3 года назад +1

    आजी खूप गोड आहेत,सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🙏🙏🌹

  • @charujuikar3333
    @charujuikar3333 2 года назад +1

    मस्तच! आजीच्या मायेची सयआली आणि ती स्पेशल चव आठवली. मनापासून आभार!

  • @shwetanagnur2403
    @shwetanagnur2403 3 года назад +1

    आजी तुम्ही सांगितले तक्कु मी आज केला... खुप छान झाला होता...घरात सगळ्यांना आवडला.... खुप खुप धन्यवाद आजी....☺️☺️☺️☺️

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा ! सांगते आजींना.

  • @ratnaprabhasonawane7271
    @ratnaprabhasonawane7271 2 года назад +1

    आई खूप छान शिकवला तुम्ही *तक्कु* .मला तर त्या पेक्षा तुमचे बोलण्याची आणि शिकवण्याची गोड पध्दत खुप आवडली. 😊

  • @arpitabal17
    @arpitabal17 Год назад

    Avaj..swar..bhav. . Ya goshti kiti imp ahet. .n tya khup mothi jadu kartat. Tumhi saglya jani itka chan samjavun sangta ki tumhi saglya amhala APLYA vatta. . Tumhi je sangta te neet aikav vatta so lakshat rahata..❤

  • @manasinarvekar2536
    @manasinarvekar2536 Год назад

    takku recipy krun pahili apratim zal hot ..ekdam chavishta.thanks

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 3 года назад

    तक्कूची चटपटीत रेसिपी मनापासुन आवडली. बाजारात आता कैर्‍या मिळतात.. नक्की करुन बघणार.. धन्यवाद.

  • @shubhadamulye8353
    @shubhadamulye8353 3 года назад +1

    आजी, एकदम मस्त रेसिपी 👌👌😋😋
    हो, आम्ही कच्चा कांदा घालून करतो त्याला कांदा कैरी चटणी म्हणतो . ती पण खूपच मस्त लागते
    धन्यवाद वैशाली 🙏🙏🌹

  • @anjalidixit2676
    @anjalidixit2676 3 года назад +1

    Khup chaan distoy takku cha rang.
    Mazya sasubai pan kartaat. Tyaat methya ghaltaat zabardassst lagto

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आजींना नमस्कार.

  • @jayshreegawande8842
    @jayshreegawande8842 2 года назад

    देशपांडे ताई इस खुपचं छान आहे‌ तक्कू आणि कृती‌सुध्दा.

  • @shilpasoman3960
    @shilpasoman3960 3 года назад +1

    तुमची पदार्थ दाखवण्याची पद्धत खूप छान आहे वैशाली मॅडम तुमचा आवाज ही आर्जवी आहे दोघींच्यातला rapo छान वाटतो

  • @RN-ln2lf
    @RN-ln2lf Год назад

    ताई मी फारच सुंदर प्रकारे एक्सप्लेन केलं आम्हालाही लोणचं इत्यादी करण्याची खरी पद्धत कळली त्याबद्दल वैशालीताई आणि तुमच्या सासुबाई दोघींचे खूप खूप आभार लहानपणी मी माझ्या मामीच्या हातचा सुंदर तक्कू खाल्ला आहे आणि केला पण आहे पण आता मला आठवत नव्हतं त्यामुळे तुमच्याकडून ही रेसिपी मिळाली तर बरं वाटलं

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 3 года назад +1

    Karun pahile...khup mast taste.... Thanks... I like

  • @AparnaRajapure
    @AparnaRajapure Год назад

    Aajii tumhi chhan prakare samjaun sangitale mala recipe aavadali mi nakki karun baghanar thanku

  • @nandkumarjoshi9970
    @nandkumarjoshi9970 3 года назад

    लय भारी,तकू,तकू,तकू। जय विदर्भ।

  • @jyotirao1435
    @jyotirao1435 3 года назад +1

    Kitchen mast clean aahe

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 года назад +1

    मावशी तक्कू😋 एकदम झकास, आणि तुमची रेसिपी समजावण्याची पद्धतीहि छान.👌👍

  • @supriyakorgaonkar
    @supriyakorgaonkar 3 года назад

    Aaji khupch chhan sangtat.mala mazya mavshichi aathvan zali.

  • @swapnilmhatre9664
    @swapnilmhatre9664 Год назад

    खूप सुंदर पदार्थ आहे. छान शिकवलात

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Год назад

    Kiti sunder snagitle .mala tar aai naslyane mahiti navte ki phodni garam ghalu naye lagnahi zhale nahi so kon sanganr ajji ne kiti sunder snagitle khupch yummy banala banven tenva tumchi athavan yet rahil mala thank u ajji

  • @sumatishirke270
    @sumatishirke270 3 года назад

    🙏 आजी टक्कू खूप छान झाला मीकरून पाहिला आजी तुम्ही किती सोप्या रीतीने सांगितला त अगदी माझ्या सासुबाईची व आजीची आठवण आली👌👌👌👌💐💐☺️

  • @savitasonsare7774
    @savitasonsare7774 Год назад

    छान आजी.तुम्ही सांगितले तसाच केला.छान झाला.

  • @mastermindmew3061
    @mastermindmew3061 3 года назад

    Aajichi sangnyachi paddht khup chhan tyamule recipe aankhinch aavdte

  • @avinashkale3644
    @avinashkale3644 3 года назад

    खूपच छान ,सोपा अणि पौष्टिक

  • @abhijitkhadilkar2838
    @abhijitkhadilkar2838 3 года назад

    माज़्या मनात असलेली तक्कुची रेसिपी मला सम ज ली .सासू सून च नात किती प्रेमळ.सासुबाईंचा आवाज पण गोड.मीपण लोणचं करण्यची आणि खाण्याची शौकिन आहे.मी पण शाळेत शिक्षिका होते.अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.वय 75.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      आजी नमस्कार,
      खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. आई पण शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. तुम्ही कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @suhasinirane2090
    @suhasinirane2090 3 года назад +1

    छानच झाले आहे

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 3 года назад +1

    पारंपारिक रेसिपी आजींनी फारच छान शिकवली.
    असच छुदा पण शिकवा pl

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 3 года назад

    व्वा वैशाली ताई आजींनी खूपच छान रेसिपी करून दाखवली.मी ही करून पाहते.तुमच्या सर्व रेसिपी छान असतात व त्यासोबत जी माहिती सांगता ना ती ही आवडते.अगदी लहानसहान टिप्स देता.त्यामूळे विदिओ interesting होतो.तुम्हांस खूप खूप शुभेच्छा.👌👍😊

  • @shraddhadixit1646
    @shraddhadixit1646 2 года назад

    खूप च छान रेसिपी वैशाली ताई

  • @vidyajoshi3525
    @vidyajoshi3525 3 года назад

    Mazya aae chi aathvan zali tumchi recipe pahili theva

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. आईच्या कितीतरी आठवणी असतात ज्या कायम स्मरणात राहतात.

  • @gaurigulgule3201
    @gaurigulgule3201 3 года назад

    Khoop must receipe. Suman aaji ne easy ani testy receipe dhakhavali. Khoop testy. Thanks.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      धन्यवाद. तुमचा अभिप्राय आईंना सांगते.

  • @romadighe5293
    @romadighe5293 3 года назад

    Aaji, tumacha takku ekdam khamanga zala ahe. Tondala pani sutale. Ani lagech karun baghitala. Gharachyanna khup avadala. Thanks Aaji.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 года назад

      अरे व्वा ! धन्यवाद. आजींना तुमची कमेंट सांगते.

  • @deepachampanerkar9384
    @deepachampanerkar9384 3 года назад

    नमस्कार. फार छान. तक्कू करतांना जी वेगळी माहिती दिली. त्यामुळे तक्कूची लज्जत फारच वाढली. धन्यवाद.

  • @jyotimagdum5365
    @jyotimagdum5365 3 года назад

    Aajichinchya bolnyath goadwa tasaychh receipe sundar aastat

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 3 года назад +10

    Your mom is law is such a sweetheart 💕....she really explained so systematically 😊

  • @ar-ij9ly
    @ar-ij9ly Год назад

    We get to know all paramparik recipes with all the tips from you and your mother-in-law
    Thank you so much Vaishali !

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 3 года назад

    मी स्वत: मराठवाडयातला असल्यामूळे तक्कू हा प्रकार मला माहित आहे परंतू पद्धत वेगळी. मी तुमच्या रेसिपी प्रमाणे या वर्षी करुन बघणार.

  • @abhijitkhadilkar2838
    @abhijitkhadilkar2838 3 года назад

    काल मी तक्कू केला.अगदी सुमन बाई नी केला तसाच जाळाय.दर वर्षी मी करते.पण अंदाज पंचे.यंदा एकदम बरोबर तुमच्या पद्धती ने.पण मी गुळ मा त्र घातला नाही.मला तिखट च आवडतो .आता आंब्याच लोणच दाखवा.अपर्णा खाडीलकर डोंबिवली.धन्यवाद सुमन ता ई .

  • @yogeshwarideshmukh9539
    @yogeshwarideshmukh9539 3 года назад

    खूपच छान झाला आहे . मी आजचं केला. धन्यवाद आजी आणि ताई.

  • @bhartichaudhari7096
    @bhartichaudhari7096 2 года назад

    Khup chhan sangitale ….Mi karun baghitle khup aavdale Sarvana.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      अरे व्वा ! तुमची कमेंट आईंना सांगते.

  • @makaranddhamdhere1048
    @makaranddhamdhere1048 3 года назад

    तक्कू मस्तच!आणि सासू सुनेचं संभाषण फारच स्वादिष्ट!!

  • @neelammodi19
    @neelammodi19 3 года назад +1

    Wow got nostalgic with just thumbnail of vlog. Bachpan mein bahoot khaya hai. Now i will make once again for my kids.

  • @rupalimujumdar2631
    @rupalimujumdar2631 3 года назад

    Khup chan....kitti chan bolalaat doghigi...atishay sadha pan atyanta aawdicha pataarth vaidrbhiyancha.....khup chan....

  • @ArtiChitalkar
    @ArtiChitalkar 4 месяца назад

    आजी तुम्ही खूप छानच बोलतात पदार्थ पण छान करतात तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे सौ आरती चितळकर पुणतांबा शिर्डी जवळ माझं गाव आहे 🎉

  • @sujatadas8696
    @sujatadas8696 2 года назад

    काकींच्या रेसिपी प्रमाणे मी तक्कू बनवला खुप छान झाला . मेथांबा पण छान झाला अगदी आई जशी बन्वायची तसा . खुप छान सांगतात काकी . माझा नमस्कार सांगा. धन्यवाद

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. मी आईना नक्की सांगते. धन्यवाद.

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 3 года назад

    आजी खूप छान झालाय तक्कू.... मी आताच करणार आहे.... माझ्या सासरी कर्नाटकात असाच प्रकाराने तक्कू करणात. ह. धन्यवाद 🙏

  • @revatimule9281
    @revatimule9281 2 года назад +1

    Very nice recipe thank you so much dear Vaishali tai and Aaji 😊🙏🏼

  • @mangalkotkunde7068
    @mangalkotkunde7068 Год назад +1

    खुप चॅन महिती दिली😊

  • @sukhadakhare9861
    @sukhadakhare9861 3 года назад

    खूप च छान सोप्या पद्धतीने समजून सांगितलं आजी.. कैरीचा साखरांबा पण सांगा ना कसा करायचा वर्षभर टिकणारा🙏

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад

    आज मी कैरीचा तक्कु केला .आजीनी सांगितले प्रमाणे खुपच छान झाला.

  • @ranjanavasave1084
    @ranjanavasave1084 3 года назад

    Khuppach chhan recipe aahe आई .नावाप्रमाणे सुंदर

  • @uvrish4482
    @uvrish4482 6 месяцев назад

    Khupppp Chan ❤ माझ्या आवडीचा तक्कु

  • @sushamamanikeri221
    @sushamamanikeri221 Год назад

    Wonderful. My mother would always do it. Reminded of her. Nice👌👌

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 3 года назад +1

    एकदम मस्त आहे तक्कू, असाच हिरव्या चिंचेचा तक्कूपण दाखवा प्लिज.

  • @pradnyaalone9948
    @pradnyaalone9948 3 года назад

    काकु खुपच छान समजावून सांगता एकदम मस्त तक्कु सांगितले तोंडाला पाणी सुटले काकु

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 2 года назад

    Mi karun baghitale. Khup chaan jhale. Thank aaji.

  • @shrilekharajaput5192
    @shrilekharajaput5192 2 года назад

    Ho aamhi pan takatoy.khup chhan lagatey koy khayala.

  • @vikasshete2122
    @vikasshete2122 3 года назад

    Glass.barni collection khup chan Mrs.shete

  • @vinitadarekar5503
    @vinitadarekar5503 2 года назад

    खूप छान संवाद , रेसिपी आणि तुम्ही दोघीही

  • @sanjayj2695
    @sanjayj2695 2 года назад +4

    Thank you for shearing the recipe. The word Takku reminds me one another word Dakkhu. My grandmother used to prepare this particular type of Aamti (type of Daal). ( I am 69 now). She was from Jalgaon side. please share the recipe if any one knows it.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад

      कोणी माहितगार असेल तर आपण तुम्ही सुचवलेला पदार्थ नक्की करूयात. तुम्ही इतक्या आपुलकीने व्हिडिओ बघता त्यावर कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन देता याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार 🙏

    • @janhaviborwankar453
      @janhaviborwankar453 2 года назад

      ढकू हा आयटीच्या प्रकार आहे . आमच्याकडे सर्रास केला जातो.मी कोकणातील आहे.राजापूर तालुक्यातील कशेळी हे माझं सासर.तूरडाळ आणि भरपूर खोबरं वापरून करतात.तेलात खोबरं,कांदा,लसूण आणि अख्खा गरम मसाला ( लवंग, दालचिनी,मिरी,धणे,जिरं,खसखस,सुक्या मिरच्या,) परतून बारीक वाटायचा. तेलात ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचे तुकडे तळून घ्यावेत.नेहमीप्रमाणे तेलात लसूण घालून फोडणी करून त्यात वाटलेला मसाला घालून परतावा शिजलेली डाळ घालावी.नारळाजं दूध आणि चिंचेचा कोळ घालावा आणि हवा असेल तर चवीला गूळ.ढकू भात ही मेजवानी आहे.

    • @shailajadeshpande7802
      @shailajadeshpande7802 2 года назад

      @@VaishaliDeshpande । ।

  • @rajeevparab4056
    @rajeevparab4056 Год назад

    तुम्ही खूप गोड बोलता .वैशालीताई

  • @chhayabowlekar6062
    @chhayabowlekar6062 2 года назад

    Kiti chhan sambhashan doghincha specially kaku tar chhanach samjavtat😍

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 3 года назад

    धन्यवाद आजी खुपच छान रेसिपी आहे 👌👌👍

    • @priyamalshe4850
      @priyamalshe4850 3 года назад

      खूप छान रेसिपी आहे काकू नक्की करून बघेन

  • @suhasinirane2090
    @suhasinirane2090 3 года назад +1

    छानच

  • @Om_Dahake
    @Om_Dahake 3 года назад +1

    Very nice ajji , me and my mom love it

  • @aradhna1772
    @aradhna1772 5 месяцев назад

    Ajji tumchi Takkuchi Recipe khup awdli nakkich karun pahar ❤❤❤

  • @shamlamoholkar9243
    @shamlamoholkar9243 3 года назад

    आजी तुम्ही खूप छान समजावून सांगता. असं वाटत लगेच पदार्थ करून पाहावा.

  • @jyotiredkar2410
    @jyotiredkar2410 3 года назад

    Aaji chhan padhatini sangtat
    Tyanchi bolnyachii style sundar Aahe

  • @rekhapawar4
    @rekhapawar4 3 года назад +6

    Aaji khup chan boltat.... Receip khup mast aahe....

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 3 года назад

    मस्त आजीकडून नवीन पदार्थ कळला👍. नक्की करुन बघणार आजी thanks 🙏👍👍👍

  • @ggfgfghg8392
    @ggfgfghg8392 3 года назад

    . अभिनंदन .वैशाली आणी आई..
    आवाज..शांत सुखद...भाषा मधुर...
    आणी ..पदार्थ..उत्तम...मनापासून शुभेच्छा...

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 5 месяцев назад

    वैशाली ताई तुम्ही किती छान बोलता मला तुमचं बोलणं खूप खूप आवडतं

  • @manasidange4761
    @manasidange4761 3 года назад

    Aaji khup chan recipe ahe tumhi sangata pan khup chan

  • @rutabagwe816
    @rutabagwe816 3 месяца назад

    👍👌👌👌

  • @diptikulkarni7618
    @diptikulkarni7618 3 года назад +1

    आजी कीती गोड आहात तुम्ही ❤️
    तोंडाला पाणी आलंय तक्कु ची रेसीपी पाहून आजी 😋

  • @sunitawasnik4097
    @sunitawasnik4097 3 года назад

    Kaiche lasun ghalun god lonache
    Ani methamba
    Ani kairiche kadhi
    Ani kairiche chutney
    Ani kairiche aamchur
    Ani kairiche god lonache
    Ani kairiche panhe
    Vaishali kamala lag .... mi karte pan ajjee kadun ...👌
    Mazi aai ☝️ sarv karayachi
    Ani ho kairi ghalun mugodya pan
    Amhi tyala kanda kairi mhanato kanda wala takku to tikhat nahi .
    Mi sasha takku pan fridge madhye thevate ... karan mumbait... bt ukkarpendi barobar takku 👌👌👌
    Ani methi paratha barobar pan

  • @neetachakradeo2194
    @neetachakradeo2194 3 года назад

    आजी ऊकडपण्डि खूप छान जाहली.त क्कू ला आम्ही कैरीची चटणी म्हणतो.आम्हिसुदा नेहमी बनवतो.

  • @madhurakolhapure241
    @madhurakolhapure241 Год назад

    खूप छान समजावता आजी. मस्तच

  • @akankshaladsawangikar3128
    @akankshaladsawangikar3128 3 года назад +1

    Faarach Sundar Video Aaji. Aani Recipe pan masta takku chi. :) Khup chaan samjavlat tumhi, mi nakkich karnare. :)

  • @vidulakulkarni7540
    @vidulakulkarni7540 4 месяца назад

    खुप छान सांगितलं

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 3 года назад

    खुप छान रेसिपी मी नक्की बनवेन थँक्यू

  • @waghmaresandhya9811
    @waghmaresandhya9811 2 года назад

    Aaji cha talk nice

  • @shailachede8885
    @shailachede8885 2 года назад

    😊आपला वैदर्भीय तककु!👌👌👌👌खुप छान पद्धत.
    थोडे मीठ जास्त घातले की वर्षभर टिकतो.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 года назад +1

      आईनी सांगितलं आहे त्याप्रमाणे ठेवला तर फ्रीज मध्ये वर्षभर रहातो.

  • @shubhajoshi7863
    @shubhajoshi7863 Год назад

    व्वा आजी खूप छान बोलतात जाता जाता अनेक टिप्स ही देतात... वैशाली ताई छान प्रश्नात संवाद साधतात...
    तक्कू नाव छान आणि पदार्थ ही मस्त चटकदार 😋

  • @anandisontakke2960
    @anandisontakke2960 3 года назад

    छान केलेला आहे. मी ही करून पाहते

  • @yoginivaidya4064
    @yoginivaidya4064 3 года назад

    Kichen mast,swachcha chan thevale aahe man prasasan zale

  • @meenapawar8213
    @meenapawar8213 3 года назад

    Khup chan. Aajini mastach sam javun sangitla

  • @rajeevkadekar9956
    @rajeevkadekar9956 3 года назад

    Khup chan paddhat ahe sangnyachi