Badlapur School Case : अत्याचार झाल्यानंतर पीडित मुलीचे पुढे काय हाल होतात ?| Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Badlapur School Case : अत्याचार झाल्यानंतर पीडित मुलीचे पुढे काय हाल होतात ?| Vishaych Bhari
    मंडळी कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, उरणचं यशश्री शिंदे हत्याकांड आणि कालची बदलापूरची लाजिरवाणी घटना, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर दिवसेंदिवस आपल्या देशात महिला अत्याचार वाढतच चालल्याच दिसून येतय. या सगळ्या घटनांमध्ये आरोपींना अटक झाली, त्यांच्यावर पुढील कारवाई पण होईल, पण या सगळ्या घटनांमध्ये ज्या पिढीत महिला आहेत, शिवाय त्यांचं जे कुटुंब आहे, या सगळ्यांचं पुढे काय होतं, त्यांच्यासोबत इतका अमानवीय प्रकार होऊन सुद्धा, नंतर त्यांना आपला समाज एक सुरक्षित आणि आदरयुक्त आयुष्य जगण्याची संधी देतो का, शिवाय अशी प्रकरण झाली की, आपण त्या पीडीताबद्दल सहानुभूती व्यक्त करतो, त्यांच्यासाठी लढण्यासाठी जनता रस्त्यावर उतरते, पण हे सगळं असतं फक्त काहीच दिवस, त्यानंतर त्यांचा पुढील प्रवास कसा असतो, त्यांना न्याय मागण्यासाठी कोर्टात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून उलट तपासणीच्या नावाखाली दिली जाणारी लज्जास्पद वागणूक, शिवाय न्याय मिळायला होणारी वर्षोनुवर्षे दिरंगाई, या सगळ्या गोष्टीबद्दल समाज म्हणून आपण कधी विचार करतो का. मंडळी कालच एक निकाल असा आला की की एका लहान मुलीवर अत्याचार झालेल्या प्रकरणाचा निकाल लागला तो तब्बल 32 वर्षानंतर, आता साधा विचार करा, 'Justice Delayed is Justice Denied' अस आपण नेहमी म्हणतो, मग एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निकाल द्यायला जर आपल्या न्यायव्यवस्थेला 32 वर्ष घ्यावी लागत असतील, तर तो त्या मुलीला मिळालेला न्याय आहे का.? त्या 32 वर्षात न्यायासाठी तिने आपल्यावर झालेल्या अन्याय विसरून 32 वर्षे न्यायासाठी संघर्ष करणं हे योग्य आहे का ? मंडळी एका संस्थेच्या रिपोर्टनुसार आपल्याकडे दररोज शेकडो अत्याचारची प्रकरण रजिस्टर केली जातात, त्यापैकी फक्त 25 ते 30 टक्के प्रकरणांचा निकाल लागतो. आपण हे फक्त रजिस्टर झालेल्या केसेसबद्दल बोलतोय, अशा अनेक केसेस आहेत ज्या रजिस्टरच केल्या जात नाहीत, किंवा कधी कधी सामाजिक भीतीमुळे पीडित स्वतः केस रजिस्टर करत नाही, शिवाय पोलिसांचा तर विशेष अनुभव आपल्याला आहेच, कुठलीही अशी पीडित गेली तर तिची केस रजिस्टर करण्यासाठी तिला किती आटापिटा करावा लागतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशावेळी पोलीस शक्यतो गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात, सेटलमेंट करण्यासाठी बोलल जात, घाबरवल जात आणि त्यानंतरही जर पीडित ऐकली नाही तर मग गुन्हा दाखल केला जातो आणि मग तिला अस न्यायासाठी 32 - 32 वर्ष झगडाव लागत, शिवाय या काळात साक्षीदार किंवा तिच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा तिला स्वतःला आपल्या प्राणाला मुकावं लागतं किंवा जर चुकून ती जगलीच यातून, तर लग्न करणं किंवा एक व्यवस्थित सामाजिक आयुष्य जगणं, तिला अशक्यच होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण मंडळी या सगळ्या गोष्टीबद्दल समाज म्हणून आपण आणि आपली भारतीय न्यायव्यवस्था, शिवाय आपलं सरकार कधी काही विचार करणार आहे की नाही, की हे वर्षानुवर्ष असंच चालणार आहे. भयंकर चिड आणणारा हा सगळा प्रकार आहे. मंडळी प्रत्यक्षात हे सगळं कसं घडतं हे समजण्यासाठी आपण आज प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बिल्कीस बानो प्रकरण आणि सेंगर प्रकरण या दोन प्रकरणाची चर्चा करणार आहोत म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की पीडित व्यक्तीसोबत अत्याचार झाल्यानंतर, ते ज्यावेळी न्याय मागण्यासाठी कायद्याकडे आणि समाजाकडे येतात, त्यावेळी त्यांना काय मिळतं, किती भयंकर असतो त्यांचा हा सगळा प्रवास.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #badlapurnews
    #badlapurnewstoday
    #badlapurakshayshindenews
    #kolhapur
    #kolhapurnews
    #kolhapurnewstoday
    #kolhapurrapeandmurdercase
    #kolhapurcasetoday
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,badlapur news,badlapur adarsh school news,badlapur school case,badlapur news today live,badlapur live,badlapur news today,badlapur rap news,badlapur school news,badlapur case,badlapur latest news,marathi news,बदलापूर न्यूज,बदलापूर रेप केस,बदलापूर बातम्या,बदलापूर घटना,बदलापूर प्रकरण,बदलापूर लाईव्ह बातम्या,बदलापूर आंदोलन,बदलापूर शाळा प्रकरण,बदलापूर बातमी,बदलापूर न्यूज live,बदलापूर बंद,बदलापूर न्यूज लाईव्ह,बदलापूर live

Комментарии • 23

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 19 дней назад +10

    प्रथमेश अलीकडे हे निष्पक्ष व्हिडिओ पाहून फार आनंद झाला❤❤❤❤❤❤❤❤❤
    माझ्याकडून तुझ्यासाठी 140 कोटी तोफांची सलामी

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 19 дней назад +1

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😮😢

  • @nehadesai3061
    @nehadesai3061 19 дней назад +8

    भारतातील कायदा आणी न्यायव्यवस्था कधी बदलणार देवच जाणे 😥

    • @nirljjj
      @nirljjj 18 дней назад +1

      हा बरोबर आहे लागेल वेळ पणं होईल सर्व ठीक

    • @parivrajyadancingpractice
      @parivrajyadancingpractice 18 дней назад +2

      एवढ्या तातडीने निर्णय योग्य नाही बाई
      कधी कधी मुख्य गुन्हेगार पडघाआडच असतो .
      जर कोलकत्ता प्रकरणात संजय रॉयला तात्काल फाशी दिली असती तर बाकी नराधम निर्दोषच राहीले असते आणि प्रकरण तिथेच संपले असते.
      त्यासाठी अधिक तपास करणे हीच पहिली पायरी असते

    • @nirljjj
      @nirljjj 18 дней назад

      @@parivrajyadancingpractice बर बर... आणि तुला काय वाटतंय त्या संजय रॉय ला फाशी होईल?

  • @riyajmulla5462
    @riyajmulla5462 19 дней назад +1

    सडेतोड संभाषण केला दादा धन्यवाद 👏👏👏

  • @KPGaikwad
    @KPGaikwad 19 дней назад +3

    प्रथमेश भाऊ आपल्या भारत देशाची न्याय व्यवस्था खूपच कमकुवत आहे.... जे लोक गुन्हे करतात त्यांना खूप चांगला माहिती आहे न्यायव्यवस्था त्यांचं काही करू शकत नाही...... एखाद्या महिलेला मरुन 5 वर्ष झाल्यानंतर तिचा केस ची तारीख आली...... ही आहे भारत देशाची न्याय व्यवस्था...... न्याय हा 24 तास झाला पाहिजे....... त्याला न्याय समजलं जातं....... आणि तो उशिरा न्याय भेटतो तो अन्याय असतो5

    • @nirljjj
      @nirljjj 18 дней назад

      बर बर... कोणताच देश परिपूर्ण नसतो. लोकांना नावं ठेवण्याऐवजी स्वतः मध्ये बदल घडवा

  • @sonalimurlidhar241
    @sonalimurlidhar241 19 дней назад +1

    निःशब्द आहे सगळ.....

  • @vyankateshGadkar
    @vyankateshGadkar 19 дней назад +2

    अश्या प्रकरणात सरकारने त्याचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी सरकारने काही आर्थिक मदत करावी जेणेकरून त्यांना होणारा त्रास त्यांचा कमी होईल

  • @arunabacche2807
    @arunabacche2807 19 дней назад

    खूप छान दिली आहे माहीत 👍👍

  • @hbhindia3291
    @hbhindia3291 19 дней назад +1

    मेहबूब शेख हा खरंच गुन्हेगार आहे का असेल तर त्यावर एक निष्पक्ष व्हिडिओ बनवा

  • @vilasrupawate5871
    @vilasrupawate5871 19 дней назад +1

    10 वर्ष सरकारने फुकट पोसले 😡😡 असे हे न्यायालय

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 18 дней назад

    आपल्या भारताची न्याय व्यवस्था खुप म्हणजे खुप वेगळी आहे मनाला न पटणारी आहे.कधी बदलणारं देव जाणे 😢

  • @samadhannimbalkar4521
    @samadhannimbalkar4521 19 дней назад

    Ye duniya he kala bazar pesa bolta he 😭😭😭😭😭

  • @ajayghadage5180
    @ajayghadage5180 19 дней назад

    म्हणून फडणवीस यांनी बहुमताने निवडून आनाव लागेल.. तेव्हाच न्याय व्यवस्था आणि हिंदू राष्ट्र होईल...

    • @nirljjj
      @nirljjj 18 дней назад +1

      मग आत्ता सत्तेत कोन आहे रे डेंगण्या, आत्ता तो टरबूज्या नाही का सत्तेत??

  • @nileshbhosale9144
    @nileshbhosale9144 19 дней назад +1

    Mitra video banavlas khara .........pn policanna doah deu nko please he sarv mi khup javalun anubhavla aahe..........ha dosh khotya rape cases karnarya striya mulech zaal aahe..........policanna mahit naste kharach zaal aahe ja nhi..........zaal asel tr khup vel n yantranna lavavi lagte n case khoti asli ki yi stree paise gheun jaate samorcha mula kadun........so ata courtane asha khitya cases karnarya mulinna 8 10 lakhs cha dand kela aahe...........95 nalayak khotya baykamule 5 striyanna nyay milat nahiye he khar vastav aahe...........lahan mulivr anyay karnare jail madhe hi martat roj konihi ashanna support karat nhi worldwide, mi hi nhi..........pn ha anyaycha dosh khotya cases cha aahe

    • @nirljjj
      @nirljjj 18 дней назад

      लिहिताना जरा नीट लिहत जा समजत काय झा** आम्हला??