Dr. Ashikesh Mahindrakar | Unbelievable journey of achieving 8 PhDs | With Dr. Anand Nadkarni, IPH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • सर्वात कमी वयात ८ PhD मिळवलेला अशिकेष महिंद्रकर. बालवयातच आलेल्या शारीरिक व्याधींकडे अडचण म्हणून न पाहता संधी म्हणून पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन विलक्षण आहे. लहान वयात त्याला आपण वेगळे आहोत याची जाणीव व्हायला लागली. स्वतःचा शोध घेत त्याने अनेक गोष्टींवर प्रभुत्व मिळवलं.
    शैक्षणिक क्षेत्रात तो अग्रेसर होता. सोबत अवांतर वाचन, लिखाण, विज्ञान विषयांची प्रचंड आवड यातून त्याने स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
    त्याच्या ह्या वळणदार जीवनाची गोष्ट जाणून घेऊया मनोविकासतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. अशिकेष यांच्या गप्पांमधून.
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • Dr. Priyadarsh | एका ध... - Dr. Priyadarsh | एका धडपड्या डॉक्टरची कहाणी
    • Anand Malligavad | Lak... - Anand Malligavad | Lake man of India
    • Prachi Shevgaonkar | C... - Prachi Shevgaonkar | Cool The Globe
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - RUclips - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #ashikeshmahindrakar #doctorate #phd #youngest #scientist #vedh #parbhani

Комментарии • 59

  • @madhudamle9619
    @madhudamle9619 3 месяца назад +17

    अशिकेश हा अत्यंत बुद्धिमान असून खूपच पुढच्या पातळीची त्याची बुद्धी आहे हे आपण घेतलेल्या मुलाखतीतून दिसून आले. त्याचबरोबर अशी रत्ने पारखून ,शोधून ती सर्व सर्वसामान्यांसाठी उजेडात आणण्याचे महत्त्वाचे कार्य ही आपण करीत आहात त्यासाठीही आपणास सलाम .

    • @ThePrkk
      @ThePrkk 3 месяца назад

      😊😊

  • @kundamavlankar6687
    @kundamavlankar6687 3 месяца назад +15

    अफाट बुद्धिमत्ता, अखंड ध्यास ,निरलसता आणि तितकीच निरागसता, सरलपणा...... निरहंकारी किती गुण एकवटले आहेत.... फक्त नतमस्तक होऊ शकतो

  • @sangitakale4967
    @sangitakale4967 3 месяца назад +3

    खरंच अशा बुध्दीमान मुलाला मानाचा मुजरा.मुलाखतीतून अशी नीरनीराळी रत्न पुढच्या पीढीला वाटचाल करायला मार्गदर्शन होण्यासाठी पुढं आणणारे Doctor साहेबांना पण प्रणाम

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 3 месяца назад +1

    भारतात अश्या शिक्षणाला वाव मिळतो हे ऐकून आनंद झाला, असे भन्नाट बुद्धीचे मुलं आपल्या देशात आहेत

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 11 дней назад

    डॉ अशिकेश यांना मानाचा मुजरा!त्यांचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 3 месяца назад +7

    डाॅक्टर, तुम्ही अनोखे भारठ रत्न समोर आणले. त्याचे, त्याचे आईबाबा यांचे यांचे ऋण मानावे लागेल. २३-२४ वयाच्या मुलाला एवढे उच्च ध्येय समाजासाठी गाठायचे आहे!! साष्टांग दण्डवत!!

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 3 месяца назад +5

    ग्रेट सर कुठून शोधून आणता अशी माणसं मानलं पाहिजे तुम्हाला ग्रेट सर शब्दच नाहीत माझ्याकडे

  • @shivdaskottapalle
    @shivdaskottapalle 3 месяца назад +1

    ही मुलाखत शक्य होईल तितक्या भारतीय भाषा आणि आंतरराष्ट्रिय भाषेत भाषांतर व्हायला पाहिजे.

  • @geetadeo4129
    @geetadeo4129 3 месяца назад +1

    आई-वडिलांची पुण्याई असावी कि त्यांच्या पोटी असा रत्न जन्माला आला.
    Great 👍👍

  • @jayendrapatil3821
    @jayendrapatil3821 3 месяца назад +7

    प्रचंड बुद्धिमत्ता, जबरदस्त आत्मविश्वास आणि उत्साही सकारात्मकता असलेल्या प्रामाणिक अशिकेशास मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा!🎉

  • @Shaileshartsms
    @Shaileshartsms 3 месяца назад +3

    असा अफाट माणूस आहे हे जाणून अतिशय आनंद झाला. थक्क झालो. 🙏🙏

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 3 месяца назад +3

    अतिशय प्रेरणादायी मुलाखत. डॉ. साहेब तुम्हीं कुठून कुठून अशी रत्न पारखून आणता आणि आमच्या पर्यंत पोहोचवता खरंच तुम्हाला सलाम आहे . आणि अशिकेश यांच्या प्रचंड बुध्दिमत्ता, प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड जिद्द, आणि प्रचंड ध्यास हे सर्व एकाच ठिकाणी असणं दुर्मळतील दुर्मिळ गोष्ट आहे. सर्वकाही शब्दातीत आहे. अशिकेष हा एक ईश्वरी मानवी चमत्कारच वाटतो मला. साष्टांग नमस्कार त्यांना. दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती . तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूखूप साऱ्या शुभेच्छा.

  • @mrudulashahane3987
    @mrudulashahane3987 3 месяца назад +2

    या मुलाची बुध्दिमत्ता आचंबित तर करतेच, पण त्याबरोबर डॅा. तुमचीपण कमाल वाटते. कशी शोधता अशी अनोखी माणसे, त्या व्यक्तिंबरोबर आपल्यापुढेही नतमस्तक व्हायला हवे.🙏🏻

  • @dr.anilmokashi6811
    @dr.anilmokashi6811 3 месяца назад +3

    Science = Physics + Chemistry + Mathematics of anything. I am in the field of science of childhood.

  • @chinuchyan4040
    @chinuchyan4040 3 месяца назад +3

    भावी नोबेलविजेता. खूप खूप शुभेच्छा.

  • @vandanarabade568
    @vandanarabade568 3 месяца назад +2

    डॉक्टर मनापासून धन्यवाद व श्री. अशिकेष यांना शुभेच्छा

  • @anandamasal163
    @anandamasal163 3 месяца назад +1

    डोळे भरून आले, अभिनंदन करायला शब्द अपुरे पडतायत, असा महान आत्मा पाहून आनंद गगनात मावेना, जगातात मराठी माणसाच अजून एक खूप मोठं योगदान, तुमच्या गुंपित प्रयोगशाळेच स्वप्न लवकर पुर्ण व्होवो, यशस्वी भव:..

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 3 месяца назад +3

    शब्द अपुरे पडतात,अशा बुद्धिमत्तेच कौतुक करायला 🎉

  • @sarahw4574
    @sarahw4574 3 месяца назад +2

    अविश्वसनीय
    माझी नात इयत्ता नववी हि देखील ऐकून प्रभावित झाली

  • @urmilaapte8626
    @urmilaapte8626 3 месяца назад

    अफाट बुद्धिमत्ता आणि अखंड ध्यास त्यासाठी घेतलेले कष्ट ,मनाचा प्रांजळपणा कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता दिलखुलासपणे दिलेली मुलाखत मनाला खूप भावली
    त्यांची स्वप्ने पुरी व्हावित त्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा

  • @asmitakamalwar6263
    @asmitakamalwar6263 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद सर.आपण एका अतिशय अफाट बुद्धिमत्तेच्या मुलाची आमच्याशी ओळख करून दिली.त्याच्यातील विनम्रता भावली. खूप खूप धन्यवाद सर.🙏

  • @prajaktaghanate3173
    @prajaktaghanate3173 3 месяца назад +2

    Thanks Dr. Anand Nadkarni & Ashikesh महिंद्रकर.

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 3 месяца назад

    Amazing!
    All the best for all his future endeavors 👍

  • @rupeshmore5248
    @rupeshmore5248 3 месяца назад +1

    Great motivational story, thanks Anand Nadkarni sir

  • @gothankargopal9593
    @gothankargopal9593 3 месяца назад +2

    प्रकृति का चमत्कार। प्रकृति को नमन।

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 3 месяца назад +1

    Incredible ..!! no words..

  • @dhananjaybhika6345
    @dhananjaybhika6345 3 месяца назад +1

    God gifted unbelievable intelligance.

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 3 месяца назад +3

    अलौकिक बुद्धिमत्ता
    कोणकोणत्या विषयात्त PhD केले ते पण सांगितले असते बरे झाले असते

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 3 месяца назад +2

    Incredible 👌🏻👌🏻👌🏻

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 2 месяца назад

    अप्रतिम 🎉

  • @bharatisatam974
    @bharatisatam974 3 месяца назад +1

    खूपच प्रेरणादायी

  • @latikapotdar8723
    @latikapotdar8723 3 месяца назад +2

    डॉ. साहेब , आम्हाला वेध मध्ये कसे सहभागी होता येईल ते जरूर कळवा. खूपच मनापासूनची इच्छा आहे. कारण गेली अनेक वर्षे मी तुमच्या मुलाखती नेमाने ऐकत असते. कधीतरी सहयोग मंदिर मध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमात मी तुम्हाला पाहिलंय आणि ऐकलंय. वेध मध्ये सहभागी व्यायचे आहे . Pl कळवा.

  • @yogeshkad6928
    @yogeshkad6928 3 месяца назад +1

    Very inspiring story for me

  • @manojwalunj7384
    @manojwalunj7384 3 месяца назад

    Great

  • @tanupatil1727
    @tanupatil1727 3 месяца назад

    डॉ. साहेब कृपया निरामय वेलनेस सेंटर
    डॉ. योगेश चांदोरकर आणि डॉ. अमृता चांदोरकर यांना पण इथे ऐकायला आवडेल आम्हाला

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад

    अशिकेष आणि डॅा. नाडकर्णी 🙏

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 3 месяца назад +1

    अफलातून intelligent 👌👍👍👍👍

  • @sunilbhawsar3997
    @sunilbhawsar3997 3 месяца назад +1

    Really great 👍🏻

  • @deepakmore4107
    @deepakmore4107 3 месяца назад +1

    Sir ❤❤❤❤❤

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 месяца назад +2

    शब्दातीत!

  • @MLTR-1995
    @MLTR-1995 29 дней назад

    8 PhD ची यादी, प्रत्येक PhD चा subject, वर्ष, guide आणि विदयापीठ इथे द्या

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 3 месяца назад

    विलक्षण बुद्धिमत्ता..अभिमानास्पद ..

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 3 месяца назад +1

    महिंद्रेकर 140 /850 कोटिंचे ' राजगुरू ' आहेत.त्यांना जे वाटते; ते प्रत्यक्षात आणणे हे सर्व लोकांचे व शासनाचे ( केंद्र व प्रांत) कर्तव्य आहे.

  • @shamsuryawanshi1893
    @shamsuryawanshi1893 3 месяца назад

    प्रथमतःजो गेस्ट आहे त्याचे बाबत महिती देत जा

  • @OlsenHenry-j8k
    @OlsenHenry-j8k 3 месяца назад +1

    How come there is no information on internet about Mr. Ashikesh. No research paper, no thesis ? How the heck did he get 8 Ph.D.'s? And this guy has 250K YT subscribers ?

  • @sambhajigaikwad1169
    @sambhajigaikwad1169 3 месяца назад +1

    scientist DNA research must done by another scientist
    Sambhaji Gaikwad Goa

  • @tanupatil1727
    @tanupatil1727 3 месяца назад

    👌

  • @revatijog8830
    @revatijog8830 2 месяца назад

    याच्या मेंदूवर phd करायला हवी.

  • @SarojPatil-en7hw
    @SarojPatil-en7hw 3 месяца назад +1

    Ashi personality samajat jast glorify zali pahije ki typasun prarna yetarana milel

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 3 месяца назад

    Chemicalच पिऊन टाकले
    Just beyond imagination😅

  • @ajaychavan4983
    @ajaychavan4983 3 месяца назад +1

    Totally baseless story.......

  • @virajwalse7106
    @virajwalse7106 3 месяца назад +1

    Doctor आहेस काही पण फेकू नका भाऊ Glaucoma कधी वाचला का ?? लोकांना मूर्ख नको समजुस..

    • @nikhilmane5245
      @nikhilmane5245 3 месяца назад

      Nahi, thapa ahet

    • @OlsenHenry-j8k
      @OlsenHenry-j8k 3 месяца назад +1

      How come there is no information on internet about Mr. Ashikesh. No research paper, no thesis ? How the heck did he get 8 Ph.D.'s? And this guy has 250K YT subscribers ? 🤦

    • @nikhilmane5245
      @nikhilmane5245 3 месяца назад

      @@OlsenHenry-j8k true, no scopus id, even no researchgate Or google scholar id

  • @dhirajakmar5879
    @dhirajakmar5879 3 месяца назад

    PhD बद्दल details कळायला पाहिजे , की नुसती फेका फेकी...😂

    • @nikhilmane5245
      @nikhilmane5245 3 месяца назад

      Probably फेकाफेकी आहे, कुठेही याचा पेपर पब्लिश नाही, scopus, google scholar, reasearchgate ला account पण नाही. कुठल्याही विद्यापीठ शी संलग्नता online दिसत नाही