Sarnar Kadhi Ran by Rahul Deshpande

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • Original singer - Lata Mangeshkar
    Music - Hridaynath Mangeshkar
    Lyrics - Kusumagraj

Комментарии • 586

  • @ashutoshchirmule
    @ashutoshchirmule 4 года назад +50

    एक पराक्रमी योद्धा कळकळीने विचारतो आहे. पण घाबरून किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाही. कारण महाराज नको म्हणत असतानाही, हट्टाने बाजीप्रभूंनी त्यांना सांगितले "तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहचणे आम्ही येथे साहेब कामी मरतो" म्हणजे परिस्थिती आणि परिणाम पूर्णपणे माहिती असताना हा योद्धा आणि त्याचे शूर साथीदार पावनखिंडीत निर्धाराने उभे राहिले. महाराज सुखरूप पोचत नाहीत तोपर्यंत शत्रूचा एकही माणूस पूढे जाऊ देणार नाही. आता अगणित घाव झेलून शरीर थकत चाललय पण अजूनही तोफांचे आवाज ऐकू येत नाहीत. महाराजांना दिला शब्द खाली पडतो की काय ही एकच तगमग. आणि म्हणूनच ही व्याकुळ होऊन इश्वराला मारलेली हाक, सरणार कधी रण.
    कुसुमाग्रजांचे काव्य, बाळासाहेब मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदींचा आवाज ही त्रिवेणी. राहुलजी तुम्ही कुठल्याही साथसंगतीशिवाय हे सर्व उत्तम recreation केल आहे. धन्यवाद.
    तिथे त्या रात्री काय घडले असेल ह्या कल्पनेने रोमांच उभे राहिले.
    इतिहासातील त्या आणि वर्तमानातील या सगळ्यांना मानाचा मुजरा करायला पुन्हा एकदा पावनखिंडीला जायला हवं. 🙏🏻🙏🏻

    • @vhtevhte
      @vhtevhte 2 года назад

      Tya ratri Kay zhala hya vicharane raktashru nightat 🙏🙏

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 4 года назад +122

    निःशब्द.... हे गाणे ऐकले आणि नेत्राश्रु नाही आले असा मराठी माणूस नाही. धन्य ते महाराज आणि धन्य ते बाजीप्रभू🙏🙏🙏 तुम्ही सोने केलेत गाण्याचे... शब्द आणि सूर असे की गाताना गळा भरून येईल.. "अजून जळते आंतरज्योति" ह्या ओळीवरचा भाव अप्रतिम... पुरंदरे-कुसुमाग्रज-हृदयनाथ-लताबाई यांच्याकडून ह्या historical लढाईसाठी ही एक हळुवार श्रद्धांजली आणि त्यात आता तुमचेही नाव सामिल झालेय🙏

    • @siddhadham
      @siddhadham 4 года назад +8

      खूप सुंदर विचार मांडलेत....खरंच आश्रु आपोआप आले....धान्य ते सर्व महान आत्मा🙏🙏🙏

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 года назад +6

      Dhanyawad 🙏🏼😊

    • @ppm99
      @ppm99 4 года назад +1

      अप्रतिम.

    • @jayantvadke8900
      @jayantvadke8900 3 года назад

      @@RahulDeshpandeoriginal thank you

    • @amanm5881
      @amanm5881 3 года назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐

  • @siddharthavhad6316
    @siddharthavhad6316 4 года назад +25

    टाळेबंदीनंतर ज्यावेळी तुमचे कार्यक्रम सुरू होतील, तेव्हा हे ३-४ दिवसातून एकदा जे गाणे टाकता ना, तो नेम चुकवू नका🙏. मला हेच जास्त आवडायला लागलं आहे आता❤️.

  • @himalayb6483
    @himalayb6483 4 года назад +34

    अप्रतिम..😳❤️ शब्दच उरले नाहीत माझ्याकडे ..👏 इतक्या वर्षांनी हे सुंदर गाणं ऐकतो आहे.. ही सगळी मराठी गीते कुठेतरी लोप पावल्या सारखीच झाली होती.. राहुल दादा तुझ्यामुळे हे मराठी संगीत पुन्हा जिवंत होत आहे.. याचा मनापासून आनंद होतो..
    Thank you for the recreation of Golden era of Marathi music..👏❤️

  • @asawaripandit2345
    @asawaripandit2345 4 года назад +37

    राहुलजी दिवसाची सुरुवात खूप सुंदर केल्याबद्दल खूप धन्यवाद
    शिवकल्याण राजा या अल्बम ला मनात एक अढळ स्थान आहे 🙏🙏🙏

  • @gopikajahagirdar1760
    @gopikajahagirdar1760 4 года назад +1

    Shivaji Mahraj Shtash Naman. Vdeat dodlaye veer marathe sat.

  • @drbillampellyvivek
    @drbillampellyvivek 4 года назад +4

    मानाचा मुजरा From one Deshpande to another Veer Baji Prabhu Deshpande

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 года назад +1

    एव्हढा शूर सरदार बाजी प्रभू देशपांडे ! आणि त्यांच्या मनात ' सरणार कधी रण ---' सारखे विचार आले असतील असे वाटत नाही. बाबासाहेब पुरंदरे , हृदयनाथ मंगेशकर , कवि श्री वि.वा. शिरवाडकर आणि लतादीदी ह्यांचे बद्दल आदर आहेच .

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 3 года назад +1

    राहूल दादा प्रत्येक शब्दा फेरी नंतर डोळ्यात पाणी येत ......कस गाउ शकलात ......कस रोकल तूम्ही स्वतः. ला........कदाचित तूमच छत्रपती व बाजीप्रभू बद्लच्या प्रमान च तूम्हाला ही शक्ती भगवतीन दिली असेल .......कायच समर्पकताय तूमची या गान्या बद्दल....वा

  • @prashantghanekar6242
    @prashantghanekar6242 4 года назад +16

    Rahul sir simply brilliant liked your commentary post the song and would like to mention a similar book written by late Shree Ranjit Desai Shreeman Yogi once you hear this song feels sad and all the more sad because if you see what’s around you these days efforts and vision of Shivaji Maharaj and his warriors have gone waste great singing though🌹🌹🙏🙏

  • @shrutijoshi3108
    @shrutijoshi3108 4 года назад +2

    Gayan ani shabd donhi Sundar.apratim.shabd apure padtat heche khare.

  • @sanjananagwekar3236
    @sanjananagwekar3236 4 года назад +2

    Omg Rahulji, apratim,ghala ghala ashru vahu lagle,tumchya awajatil jadu manala jaun bhidali
    🙏🙏🌹tumhala manacha mujara

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 4 года назад +16

    सारं काही डोळ्यासमोर उभे राहिले
    माग शाळेत असताना बाबासाहेब पुरंदरेंनी डोळ्यासमोर आणलेला
    धन्य झालो

  • @prasadrajapurkar2166
    @prasadrajapurkar2166 4 года назад +3

    सरणार कधी रण .....याच तीन शब्दात जी आर्तता आली की तुम्ही मला शेवटपर्यंत धुरकट दिसत राहिलात...धन्य ते बाजीप्रभू धन्य ते राजा शिवछत्रपती..... पावनखिंड उभी राहिली ....
    गाणं तुमच्या अणूरेणुत आहेत....
    गात रहा आमच्यासाठी... खरच नि:शब्द अंगावर काटा आणि आर्त साद....
    महाराष्ट्राचे ऋषीमुनीं म्हणूनच स्व. कुसुमाग्रज ,स्व माडगूळकर खळे काका पंडित हृदयनाथ जी ,पंडित भीमसेनजी स्व वसंतराव देशपांडे ही मंडळी या मातीत जन्माला आली आणि आपण सगळे भक्त म्हणून....तुमचे मनापासून आभार संगीताची कवाडे तुम्हीं खऱ्या अर्थाने खुली केलीत रसिकांसाठी....तुमच्या सर्व कुटुंबाचे देव रक्षण करो आणि आजोबांचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असतील...तुम्ही मराठीच्या प्रेमात पाडलत आम्हाला त्रिवार धन्यवाद.....

  • @sushamadeshpande516
    @sushamadeshpande516 4 года назад +1

    Shabda tar manala bhidlech pan swarani kaljala haat ghatla. Apratim gayan.

  • @rushikeshkadam3275
    @rushikeshkadam3275 4 года назад +10

    Morning started with this amazing song..
    Thank you sir❤❤

  • @21131625
    @21131625 3 года назад +2

    राहुल सुंदर …😌😌😌❤️❤️❤️🌹🙏

  • @nilimaprabhu5074
    @nilimaprabhu5074 4 года назад +17

    "Sarnar kadhi......" very touching & extremely relevant to today's times where the " Corona Warriors" family members of those serving & caring for their near & dear once will also find this song cathartic. Brought tears in my eyes and a deep sense of both sadness as well as longing for the benevelonce of the almighty to strengthen us & give us courage to face these difficult times. Thank You so very much for the background notes on these songs. The despair & the courage & feeling of devotion was exquisitely presented by you Rahulji. A profound song & I salute all the stalwarts of music who have made this song so memorable. Trivaar pranam🙏🙏🙏

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 4 года назад +11

    अतिशय भावपूर्ण गायन. होय तनुची चाळण खूप भावनिक. अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. ऐतिहासिक लढाई ची आठवण झाली. बाजीप्रभू यांच्या शौर्याला सलाम. कविची प्रतिभा अतुलनीय. ह्या गीताबद्दल धन्यवाद. गायन छान.

  • @atharvakokaje5818
    @atharvakokaje5818 4 года назад +5

    खूपच सुंदर गाणं आणि त्याहूनही अधिक सुंदर अर्थ असलेले शब्द!👌🏼 इतिहास जिवंत ठेवायचा सर्वोत्तम मार्ग गाणी व गोष्टींमधून आहे हे का ते आजचा गाण्यातून कळले. बाजी प्रभूंचा शौर्याला व अशा निधड्या छातीचा वीरांना घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन 🙏🏼

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 4 года назад +2

    अप्रतिम ....अंगावर काटा आला....

  • @abhijeetsd
    @abhijeetsd 4 года назад +2

    Grown up listening to this. All greats coming together Didi Babsaheb balasaheb and the great Kusumagraj🙏🙏🙏

  • @abhishekkarandikar4543
    @abhishekkarandikar4543 4 года назад +4

    आणि यवेळेस कुसुमाग्रज​!
    बाजीप्रभू देशबपांडेंसारख्या थोर स्वराज्यसेनान्यांस नमन​ 🙏

  • @SUNILSUTAR9
    @SUNILSUTAR9 4 года назад +26

    सरणार कधी रण प्रभू तरी Lyrics (Marathi)
    सरणार कधी रण प्रभु तरी
    हे कुठवर साहू घाव शिरी
    दिसू लागले अभ्र सभोती
    विदीर्ण झाली जरि ही छाती
    अजून जळते आंतरज्योती
    कसा सावरू देह परी
    होय तनूची केवळ चाळण
    प्राण उडाया बघती त्यातुन
    मिटण्या झाले अधीर लोचन
    खङग गळाले भूमिवरी
    पावन खिंडीत पाऊल रोवून
    शरीर पिंजे तो केले रण
    शरणागतीचा अखेर ये क्षण
    बोलवशिल का आता घरी

    • @amanm5881
      @amanm5881 3 года назад +1

      Thanks a lot for the lyrics. Happy Diwali sir

  • @shrikantingalhalikar2223
    @shrikantingalhalikar2223 4 года назад +10

    मूर्तिमंत स्वरानुभव. ही रचना पुरुष आवाजातच हवी होती, ती पूर्तता तू केलीस, धन्यवाद. आता अशा अभिजात रचनांचा वाद्यवृंदाच्या साथीने अल्बम काढावास अशी फर्माईश आहे. अफलातून!

  • @sharvarijadhav5338
    @sharvarijadhav5338 4 года назад +4

    Amazing song, What a lyrics.!! What a composition..great 🙏
    Beautifully sung.. Thank you so much for this song 🙏

  • @aradhyasamant1972
    @aradhyasamant1972 4 года назад +1

    Rahul Deshpande, Kai bolu mi. Nishabd. Hatts of to you. Ek tar te gantar itke emotions aahet aani jya purity ni tu gana gaylays. No words

  • @avinashmudgalkar5222
    @avinashmudgalkar5222 4 года назад +2

    Very nice sir I am your very big fan

  • @juheebhatnagar1736
    @juheebhatnagar1736 4 года назад +3

    Suprabhaat raahat sir may God bless you all

  • @sanket419
    @sanket419 4 года назад +1

    Thanks for introducing this song. Great rendition👍🏻.

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 4 года назад +2

    पोतडीतला खजिना। तो इतिहास त्या जुन्या आठवणी।तुझा गोड हृदय स्पर्शी आवाज।सुंदर सकाळ। छान।देशी किती घेई दो करा ने।

  • @kavitabysavitapatil
    @kavitabysavitapatil 4 года назад +7

    U r always so soothing, amazing.... One of my favourites... Your voice is mirror of your soul l guess... Pure ...

  • @preetijadhav6574
    @preetijadhav6574 4 года назад +1

    Very nice rahul dada.. Eagerly waits for your video.

  • @Jitendrakumar-sq9ly
    @Jitendrakumar-sq9ly 4 года назад +10

    Even without understanding the language also ,your songs give soothing sound to soul ...please keep uploading more songs and prayers like this loved it.😍😍

  • @amber11
    @amber11 4 года назад +2

    Wow! So amazing. Aikatach basava fakt!

  • @pallavidate5906
    @pallavidate5906 3 года назад +2

    Great Work Shree Rahul!

  • @APKoilNSapthagireesanjaya
    @APKoilNSapthagireesanjaya 4 года назад +8

    The music followed by the explanation revealing the heroic deeds of Chhatrapati Shivaji and his followers have enthused the poet to compose the beautiful lyrics and the artiste delienating the expression in suitable raag...is an experience , all its own ! Thanks and best Wishes!!

  • @M.D.M911
    @M.D.M911 4 года назад +1

    Sir you are a living legend

  • @soniyaponkshe114
    @soniyaponkshe114 Год назад +1

    काय अप्रतिम आवाज .....

  • @rajashreedalvi4967
    @rajashreedalvi4967 4 года назад +3

    All good wishes.... Rahulji🙏✳️🎊🎉

  • @ruchilatkar9337
    @ruchilatkar9337 4 года назад +4

    This is one of my most loved songs ❤️

  • @poojakamble6525
    @poojakamble6525 4 года назад +2

    Wow....Thank you sir

  • @Randomkitten7
    @Randomkitten7 3 года назад +2

    Tofe aadhi, na mare baaji,
    Sanga Mrutyula.
    -Veer Savarkar

  • @anjaalijalwadi249
    @anjaalijalwadi249 4 года назад +1

    Rahuldada, you made me cry. It was very touching.

  • @yashnarawade4504
    @yashnarawade4504 4 года назад +2

    सर, मला आपल्याकडे शिकण्याची इच्छा आहे 🙏🙏🙏

  • @mamatapai480
    @mamatapai480 4 года назад +2

    अप्रतिम, .. हे गाणं शिवाजी महाराज च आहेच, तसेच ते आत्ताचे महामारी ला उदेशून आहे... सरणार कधी रण !! हे गाणं घडवण्यासाठी चार दिग्गज कलाकार एकत्र येणं आहे. 👏🙏🙏🌷

  • @shreenathashetty7921
    @shreenathashetty7921 4 года назад +3

    Day start with very good song god bless you and your family jai hindu jai maharashtra

  • @nandininaikmusic3242
    @nandininaikmusic3242 4 года назад +13

    "Music is food to the soul !!" This is wat your dedications are all about.. soothing as always... 🙂 Thank you for this one, Sir.. 🙂

  • @musicallysound9464
    @musicallysound9464 4 года назад +11

    Aha, soulful! Heard this song after long! Music & lyrics are extraordinary of course. The harkat in “ghav” is similar to Ranjish hi sahi’s “aa...phir”

  • @shardagitaye8422
    @shardagitaye8422 4 года назад +3

    No words.. Heart touching.. Excellent..

  • @sushitube1
    @sushitube1 4 года назад +2

    सर्वकाही स्वराज्यासाठी .. !
    आम्ही कृतज्ञ आहोत...🙏🙏🙏
    ..
    अप्रतिम गाणं...👌👌👌

  • @niloferlopes827
    @niloferlopes827 4 года назад +5

    खूप छान वाटले गाणे! आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे.१००० पेक्षा जास्त पानांची आहे ही कादंबरी 'राजा शिवछत्रपती'. मी वाचली आहे. जर कोणाला बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल माहिती घ्यावी असे वाटत असेल, तर 'रणजित देसाई' लिखित 'पावनखिंड' वाचा. स्वामीनिष्ठा काय चीज असते, ते ह्या वीराने दाखवून दिले आहे. केवळ बाजी प्रभूच नव्हे, शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी हे सिद्ध केले आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात'- ऐकवा कधी.
    आम्हाला आवडेल.

  • @bhavanathakur3608
    @bhavanathakur3608 Год назад

    Feel like taking out t & listening once again to he old cassette of Shiv Kalyan Raaja by
    Babasaheb Purandare.

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 4 года назад +2

    दादा प्लीज मिलती है जिंदगी मे मुहब्बत कभी कभी गा ना.......😅❣️

  • @poojapadhiofficial
    @poojapadhiofficial 4 года назад +1

    अप्रतिम सर दिवसाची सुरुवात खूपच सुंदर आणि सुरेल झाली

  • @ananddeshpande3574
    @ananddeshpande3574 2 года назад +1

    शब्दातीत

  • @ketansheth19
    @ketansheth19 4 года назад +4

    Such a great song!! One of my all time favourite song!!!! कुसुमाग्रजांच्या शब्दांमधून पावनखिंड डोळ्यासमोर नेहमी उभी राहाते. खूप छान गायलात राहुलजी तुम्ही 👌👌Thank you so much for singing this one🙏

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 года назад +4

    A befitting song of our current fight! A gem from shivkaltan raja, Bajiprabhu had Shivaray as his sarvasva.
    Nice rendition, emoting and dumsaans test karnare he aatmageet! Thank u always boss.
    As u said, words mute themselves after such poems. Tks.

  • @nikhilpatil3590
    @nikhilpatil3590 4 года назад +4

    This is absolutely stunned me....just one word is "Outstanding"❤️

  • @ShreS
    @ShreS 4 года назад +10

    Words aren't enough to express how grateful we are for ur renditions❤️

  • @sandeepd8374
    @sandeepd8374 4 года назад +4

    बलिदान आणि निष्ठा ह्यांचा समानार्थी शब्द म्हणजे बाजीप्रभू देशपांडे, राहुल साहेब तुम्ही पावन खिंड उभी केलीत,असे वाटते आता बाजी हवे होते मग विचार येतो गलवान मधले आपले सैनिक म्हणजे बाजीच आहेत,धन्यवाद राहुलजी .

  • @vijaygovilkar6715
    @vijaygovilkar6715 3 года назад +3

    Amazinggggg......👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SuperFawkes
    @SuperFawkes 4 года назад +22

    R.D. - Exquisite rendition-keep it up ... but you can’t miss the beautiful story behind this song .. Maharaj escaped from Panhala to reach Vishalgad- The great Baji-Prabhu Deshpande made the ultimate sacrifice to secure passage for Maharaj
    Please tell this story to this audience - especially for our kids (my son is 7 and listens to you religiously now) they need to know ..
    Thank you 🙏

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 года назад +3

      That’s so true !

    • @meghakolhekar
      @meghakolhekar 4 года назад +4

      ते काम (गोष्ट सांगण्याचं) सुबोध भावेंना सांगा😁 सॉरी हं राहुलजी तुम्हीपण खूप छान बोलता पण मुलांच्या गोष्टीसाठी सुबोध दादा😊

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 4 года назад +1

    क्या बात हैं ।। ब ढि या ।।

  • @mithilabarhate712
    @mithilabarhate712 4 года назад +1

    Waaah mast

  • @nampawar2846
    @nampawar2846 4 года назад +7

    सुंदर. आत्ताच्या करोनाच्या पार्श्वभूमी वर आम्हां प्रत्येकाची ही प्रार्थना तुमच्या स्वरातून विध्यात्या पर्यंत नक्कीच पोहोचली असेल. शतश: धन्यवाद

  • @girishkasbekar6480
    @girishkasbekar6480 4 года назад +1

    नि:शब्द

  • @tejashreeshinde7403
    @tejashreeshinde7403 4 года назад +4

    Thank You...thank you so much Rahul Dada...for this song...Every song in Your Divine voice and the crisp and best explanation that You alway give, is always on loop on my playlist...
    Always my Best Regards to You 🙏🙏😇

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 года назад +6

    राहुलदा,
    पहिलीच ओळ ऐकली आणि
    अंगावर काटा आणि डोळयात पाणी आलं.
    आजचा अनुभव अदभुत होता.
    ही गाणी म्हणतानाचा भाव तुमच्या गाण्यात, आवाजात दिसून येतो.
    त्यासाठी सलाम...
    यानिमित्ताने खरच चीन चे आणि कोरोनाचे "आ भा र" नाहीतर ही अशी "श्र व णी य मेजवानी" आम्हाला मिळाली
    असती का?...
    या २०२० पासून शनिवारचे समीकरण बदलले आहे.
    आजपर्यत "मारुती"चा वार शनिवार होता, तोच वार आता "राहुल देशपांडे" यांचा झाला आहे.

  • @aadityamande1563
    @aadityamande1563 3 года назад +4

    Rahul dada 🙏. Everytime i listen to this song I cry. And you made me cry even this time . Tujhya aavajat ek vegalich apulki hoti. Amazing 🙏

  • @atreomkar
    @atreomkar 4 года назад +2

    Absolutely stunning voice.. Best version of the original sung by the Nightingale..

  • @peeyushpathradkar24
    @peeyushpathradkar24 4 года назад +3

    ♥️सुरेख,अनेक अनेक शुभचिंतन!♥️

  • @srikalarengarajan3119
    @srikalarengarajan3119 4 года назад +4

    Rahul ,Thanks a lot for this beautiful song of dedication and sacrifice. It was touching and your explanation made it so much more special🙏🏻.God bless you🙏🏻

  • @nikhilhk
    @nikhilhk 3 года назад +2

    राहुल'जी .. तुमचे डोळेच सगळं काही बोलून जात आहेत!

  • @omkarpatil1191
    @omkarpatil1191 4 года назад +1

    खुप छान दादा

  • @jayrampawar3629
    @jayrampawar3629 4 года назад +4

    Sir you are amazing , kharach shabda nahit
    You are my inspiration.

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 4 года назад +1

    हे गाणे ऐकल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची अवस्था काय झाली असेल हे दिसते आणि डोळ्यात पाणी येते. कुसुमाग्रज, लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर यांना वंदन.
    राहुल धन्यवाद.

  • @ashish2nd
    @ashish2nd 4 года назад +4

    केवळ अप्रतिम!!! अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं. सुरांनी पावनखिंड डोळ्यासमोर जिवंत उभी केलीत राहुल 🙏 .

  • @manjushrinanajkar2527
    @manjushrinanajkar2527 4 года назад +2

    अप्रतिम!!! सुरेख!!!! ,👌👌शुभ सकाळ झाली.🌸🌼

  • @shrikantmahamuni8050
    @shrikantmahamuni8050 4 года назад +2

    Rahul Sir, it is really joyful to hear your music. Thank you very much.
    In future could we expect some western inspired music. Would love to hear Ed Sheeran songs in your voice 🙂

  • @chanduwanage2494
    @chanduwanage2494 3 года назад

    Thanks for great composition by kusumagraj.and also you to Rahulji.

  • @adityajoshi8042
    @adityajoshi8042 4 года назад +4

    अप्रतिम ...👌👌...शब्द, चाल, संगीत, तुमचा आणि लता मंगेशकरांचा आवाज सगळंच दैवी......
    "कसा सावरू देह परी "हे ऐकताना अगदी असच बाजीप्रभू ना वाटलं असेल तेव्हा असं वाटत...

  • @vaishalibhoite5449
    @vaishalibhoite5449 4 года назад +5

    खुप छान राहुलजी.... गाणं तर अप्रतिमच आहे... पण तुम्ही जे बोलता ते सुद्धा खुप मनापासुन असतं... ऐकतच राहावंसं वाटतं... 🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹

  • @Shraddha935
    @Shraddha935 4 года назад +4

    Thank you so much Rahul dada for singing one of my requests... I was waiting eagerly for this... You made my Saturday...😊

  • @thomasdcosta4360
    @thomasdcosta4360 Год назад +2

    Isnt this applicable for even in these times?...With a "ran" called Life..

  • @gayatripantsachiv3808
    @gayatripantsachiv3808 4 года назад +2

    ❤❤❤❤ असाच सुंदर गात रहा, तुला खूप खूप धन्यवाद राहूल..लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या🙏🙏🙏🙏

  • @um2978
    @um2978 4 года назад +2

    अदभूत कमाल केली आहेस, काव्य उत्कृष्ट आहेच तुझ्या स्वरात पुन्हा तोच अमृतानुभव आला 💐💐

  • @omkargodse5726
    @omkargodse5726 4 года назад +4

    As usual, soulful and soothing.. What a voice, what a mic quality! Thanks for the musical treat! 😊

  • @vaishnavi4684
    @vaishnavi4684 4 года назад +1

    काय माणूस होता माझा राजा. ज्याच्यासाठी मोठमोठ्या योध्यांनी हसत हसत प्राण दिले. आणि त्यांच्या गाथा वाचून अनेकदा रडले पण डोळ्यातलं पाणी काही संपत नाही.
    नशीबवान आहोत आपण सर्व. या मातीत जन्मण्यासाठी किती जन्माच पुण्य केलंय माहित नाही. This is called real Deewangi which all these great warriors had. 🙏 This is the romance which our generation must know.
    I keep coming back to this song after every 2-3 days. I can't admire this enough. जय भवानी जय शिवराय!🙏

  • @preetidarbhe3338
    @preetidarbhe3338 4 года назад +1

    राहुलजी...आपल्या भारदस्त आवाजात हे गाणं अप्रतिम वाटतंय!! तुमच्या सुरांमधून व्यक्त होणारी ती गाण्यातील आर्तता नकळतच अश्रूंना वाट मोकळी करून देते!! पावनखिंड लढण्याचा तो प्रसंग आणि पराक्रमी योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांचे आपसूकच स्मरण होते.....

  • @_humans
    @_humans 4 года назад +3

    Just Amazing... I was eagerly waiting for this song with your voice.. Simply superb Rahul ji

  • @sagarmukund
    @sagarmukund 4 года назад +7

    This song is really etched on my heart as well the way you very rightly said. This song is very close to everyone’s heart.. whoever loves Chhatrapati Shivaji Maharaj and the Great Warrior Bajiprabhu Deshpande.
    And the way you sang it, I’m sure your name is also etched on their hearts from today ❤️
    Really Glorious Singing 👍🏻

  • @archana6756
    @archana6756 4 года назад +3

    Brillant👌and your feelings towards RAJE hundred percent true.

  • @drpp1984
    @drpp1984 4 года назад +1

    I heard this song by chance on the day 1 of my friends got diagnosed of stage 4 cancer of lung. Going through his mindset, now I wish that your this song shall be playing while I die, no matter when and how I die. The end will be so soothing and relieving!!

  • @gaurivaidya6986
    @gaurivaidya6986 4 года назад

    Not just dedication. Solid will power.

  • @avinashkulkarni1165
    @avinashkulkarni1165 4 года назад +2

    खूपच सुंदर गाणे आहे... तुमची निवड सुद्धा ...
    शिवकल्याण राजा .. ग्रेट

  • @amitaprabhakar2152
    @amitaprabhakar2152 4 года назад +3

    Sundar Rachana aur sundar gyaan ka adbhut sangam.You sing such beautiful soul touching compositions.❤️❤️🌸🌹

  • @dattagurukd328
    @dattagurukd328 4 года назад +3

    Apratim Rahuldada. Soft smooth voice....👌👌👌

  • @varshapatil1127
    @varshapatil1127 4 года назад

    विशालगच्या वाटेवर घोडखिंडीत शिवाजी महाराज व सेनापति बाजीप्रभु देशपांडे फसलेले असताना हिंदवी स्वराज्याचा राजा सुरक्षित गडावर पोहचवण्यासाठी सुरक्षित रस्ता ( safe passage ) देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजी प्रभू यांची मुगलानी सर कलम केल्यानंतर सुद्धा लढत राहणाऱ्या स्वामीप्रति एकनिष्ट ,कर्तव्यकठोर बाजींच्या प्राणज्योति मालवत आलेल्या असतानाच्या भावना कल्पने आणि शब्दबद्ध करणे येरागबाल्याचे काम नाही ते अवघड काम कवी कुसुमाग्रज करू जाणे आपण पामर अश्रुपूर्ण डोळ्यांनी आणि जड़ अंतकरणाने फक्त नि:शब्द.
    पुढे महाराजांनी घोडखिंडीचे नामकरण बाजीप्रभूच्या स्मरणार्थ पावनखिंड असे केले
    तुमच्या शब्द अणि सुरांबद्दल प्रश्नच नाही पण हि रचना ऐकताना वाद्यामुळे होणाऱ्या वातावरण निर्मितीचा अभाव प्रकर्षाने जाणवला.
    फक्त इंग्रजी वाचणा-यासाठी एका श्रोत्याची प्रतिक्रिया इकडे उद्धृत करत आहे आशा आहे नव्या पिढीला आपल्या इतिहासबद्दल कुतूहल निर्माण होईल
    Saurabh Daftardar
    Bajiprabhu is not JUST tired,. This song starts when he has been BEHEADED by the Mughals. He's still manning the Ghodkhind and making sure they don't surpass him until Shivaji Maharaj reaches the fort safely.
    A SALUTE to the person who conceptualized this song. This needs immense talent and nature's gift to be able to recreate those medley of emotions through words and music. If at any point a person thinks that art is diminishing, look back at this piece of art, IT INSPIRES!

  • @आध्यात्म-ष9ण
    @आध्यात्म-ष9ण 4 года назад +3

    Its great sir.... तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे सर., असं वाटत की ऐकतच रहावं
    एक इच्छा आहे सर... बोलावा विठ्ठल, हे किशोरी अमोणकर यांच गायलेलं हे गीत तुमच्या आवाजात ऐकायचं आहे सर... धन्यवाद ❤🌹