Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Keshavraj Temple Dapoli : केशवराज मंदिर असुद दापोली | गारंबीचा बापू | | Torusit places near dapoli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 фев 2024
  • #KeshavrajTemple #गारंबीचाबापू #केशवराजमंदीरदापोली
    कोकण... परशूरामाने समुद्राला बाणाने हटवून वसवलेली महाराष्ट्रातली देवभूमी...
    सागर आणि सह्याद्रीचा एकत्रित सहवास लाभलेल्या या भूमीत निसर्गाने प्रत्येक गोष्टीत अक्षरश: जीव ओतलाय....
    इथली भाषा, माती, सण संस्कृती, परंपरा, खाद्यपदार्थ प्रत्येकाची स्वत: ओळख आहे.
    याच कोकणभूमीत सत्तर वर्षापुर्वी एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली, फुलली आणि मनाला चटका लावून गेली.
    ही प्रेमकहाणी ज्या परिसरात फुलली ती जागाही अशीच अद्भूत..
    ती जागा ते गाव आजही जगाच्या नकाशावर तसंच आहे. नारळ पोफळीच्या बागा आणि मधून वाहणारी वणंद नदी, डोंगरावर वसलेली विष्णू महेशाची मंदिरं, अरबी समुद्राचा शेजार असं निसर्गाने मुक्तहस्ते दान दिलेल्या गावात आम्ही गेलो होतो.
    आसूदमध्ये वसलेले हे मंदिर अदमासे १००० वर्ष जुनं आहे असं सांगितले जाते.. केशवराज मंदिराचा इतिहास सांगायचा तर पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलं असं म्हणतात.
    मंदिराची रचना जर बघितली तर मूळ मंदिर दगडी असून समोरचा सभामंडप हा पेशवेकालीन दिसतो. मंदिरात एक गोमुख आहे त्यातून बारा महिने स्वच्छ थंडगार पाणी वाहत असते.
    या गोमुखाच्या वर डोंगरावर असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून या मंदिरात पाणी आणलं जातं.
    कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून या मंदिरात उत्सव सुरू होतो, तो त्यानंतर सुमारे ५ दिवस चालू असतो.
    मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा घनदाट झाडांनी वेढलेला आहे आणि याच गर्द वनराजीत केशवराजाचे हे आडवाटेवरचे मंदिर अनादि काळापासून उभे आहे.
    मंदिरातून खाली उतरला की गारंबीचा बापू कादंबरीत वर्णन केलेला साकव लागतो.
    पुर्वीचा लाकडी साकव जाऊन आता नवीन पूल बांधण्यात आला आहे. इथून बारा महिने वाहणारा एक ओढा आहे जो पावसाळ्यात दुथडी भरुन वाहतो.
    या पुलावरुन आसूदचा नारळ पोफळींच्या बागांनी भरलेला समृध्द परिसर दिसतो.
    --------------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 59

  • @swapnilsawant2594
    @swapnilsawant2594 10 дней назад

    Sundar ❤

  • @chinobabhave2242
    @chinobabhave2242 5 месяцев назад +1

    प्रस्तावना खूपच सुरेख.. all the best👍

  • @milindwadalkar5692
    @milindwadalkar5692 5 месяцев назад +1

    खुप छान आहे

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 2 месяца назад

    खूप सुंदर व्हिडिओ आणि वर्णन. दापोली ते आंजर्ला हा परीसर खूप सुंदर आहे. त्याचबरोबर हेदवी वेळणेश्वर गुहागर सुद्धा खूप छान आहे. अनेकदा गेलो आहे. परत एकदा जाऊन आलो तुमच्या बरोबर. जमलं तर पुढच्या खेपेला बुरोंडी येथील परशुराम तीर्थ येथे जाऊन या. माझा पण या आठवड्यात मंडणगड पालगड दपोली असा दौरा आहे...निघायचीच वाट बघत आहे. खूप अभिनंदन शुभेच्छा आणि धन्यवाद

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      कोकणची खूप छान माहिती आणि वेगवेगळी ठिकाणं तुम्हाला इथे बघायला मिळतील...

  • @AeyHero
    @AeyHero 5 месяцев назад +2

    1. जागा सुंदर आणि नवीन.
    2. Vlog चा flow आणि narration छान.
    3. Audiovisuals technically standard 👍🏻
    4. Keep it up 🙏🏻

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 5 месяцев назад +1

    कोकण म्हणजे फारच सुंदर

  • @user-pw6vb2yi5f
    @user-pw6vb2yi5f 5 месяцев назад +1

    छान..कोकण एक मानबिंदू

  • @vishnugadade4409
    @vishnugadade4409 5 месяцев назад

    "अतिशय सुंदर वर्णन आणि त्याचबरोबर मनाला हर्षित करणारे कोकणातील दृश्य...!!!

  • @rameshghadi6326
    @rameshghadi6326 4 месяца назад +1

    खरोखरच खुप खुप सुंदर निसर्ग रम्य गाव मी माझ्या तीन जिवलग मित्रांन सोबत गेल्या वर्षी २०२३ एप्रिल ला पाहील❤

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
      कृपया चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून subscribe करा

  • @sudhirpawar3806
    @sudhirpawar3806 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर मंदिर आहे, आम्ही काही दिवसांपूर्वीच बघून आलो,

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
      कृपया चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून subscribe करा

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 5 месяцев назад +1

    खुप छान जागा आहे आणि तुमचं दोघांचं presentation झक्कास झालंय..दिलेली माहिती authentic आणि मस्त च..

  • @neveanup
    @neveanup 5 месяцев назад +1

    खुप छान !

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 5 месяцев назад

    अप्रतिम छायाचित्रण

  • @prathameshgupte1636
    @prathameshgupte1636 5 месяцев назад +1

    Khup chan....nusta baghun pn Shanta vatla

  • @omcarmane8433
    @omcarmane8433 4 месяца назад

    Khup uttam pane presentation... Suruvat changali ahe... All d best...

  • @shitalshinde5779
    @shitalshinde5779 5 месяцев назад

    Mast mahiti milali chan

  • @ajitdixit1649
    @ajitdixit1649 5 месяцев назад +1

    छान माहिती दिलीत केशवराजाची

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
      कृपया चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून subscribe करा

  • @user-fr5pv8fh3k
    @user-fr5pv8fh3k 5 месяцев назад +1

    खूपच सुंदर !!!!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 месяца назад

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @rajaniabhijitkatore3699
    @rajaniabhijitkatore3699 5 месяцев назад

    Khup chan

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 5 месяцев назад

    Simply beautiful content

  • @galexyaudio187
    @galexyaudio187 5 месяцев назад

    खूपच सुंदर

  • @vinayakulkarni3356
    @vinayakulkarni3356 5 месяцев назад

    सुंदर

  • @shubhadajoshi3587
    @shubhadajoshi3587 5 месяцев назад

    Khup chan guravi

  • @snehalmungi6911
    @snehalmungi6911 5 месяцев назад +1

    Beautiful place 👌

  • @rdwolf2452
    @rdwolf2452 5 месяцев назад

    Wonderful

  • @sonofsahyadris
    @sonofsahyadris 5 месяцев назад

    अरे वा मस्त!!❤❤❤

  • @sarikapawar9751
    @sarikapawar9751 5 месяцев назад

    खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @supriyakamble6092
    @supriyakamble6092 5 месяцев назад

    Khup mast ❤

  • @deepikapatwardhan760
    @deepikapatwardhan760 5 месяцев назад

    Bhaarich

  • @manjirikarambelkar6572
    @manjirikarambelkar6572 5 месяцев назад +1

    मस्तच ❤

  • @Sk_music_111
    @Sk_music_111 5 месяцев назад

    Best best...!!

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 5 месяцев назад

    Nice video

  • @swananddeshmukh4405
    @swananddeshmukh4405 5 месяцев назад

    Amazing , keep it up 🎉

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад

      Thank you! Will do!

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 5 месяцев назад

    👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😍🌹

  • @manjirizende
    @manjirizende 5 месяцев назад

    सुंदर👌

  • @Pri_yan_ka_j
    @Pri_yan_ka_j 5 месяцев назад +1

    Nice place❤

  • @suhasmali0909
    @suhasmali0909 4 месяца назад

    नंबर नाही ज्यांच्याकडे सोय आहे

  • @Kanya56327
    @Kanya56327 5 месяцев назад

    Aamcha gav. Dabke vadi
    Asud bag

  • @akshaykadam77
    @akshaykadam77 4 месяца назад

    Tumhi no. Nahi dila

  • @shashankwagh2885
    @shashankwagh2885 5 месяцев назад +1

    असं च भटकत रहा

    • @Harifi_
      @Harifi_  5 дней назад

      Thank You for Your blessings !!!

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar5400 5 месяцев назад

    अनादी म्हणजे

    • @Harifi_
      @Harifi_  5 месяцев назад +1

      अनादी म्हणजे प्राचीन, खूप जुना

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 4 месяца назад

    केशवराज मंदिराकडे जायला किती पायऱ्या आहेत?

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      अंदाजे 250 ते 300 पायऱ्या आहेत

  • @bhushanpetkar
    @bhushanpetkar 5 месяцев назад

    ..

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 4 месяца назад +1

    Depolkar cha number

    • @Harifi_
      @Harifi_  4 месяца назад

      तुम्हाला हवा आहे का ?