Pawankhind ला जाताना रस्त्यात काय दिसलं | Bajiprabhu Deshpande | Vishalgad | Amba Ghat | History

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • आठवडाभर काम करुन शुक्रवारी घरी आलं की वेध लागतात ते विकेंडचे
    पण भटक्यांना विकेंडला घरात थांबणं निषिध्द असतं कारण शास्त्र असतं ते...
    आजकाल विकेंडलापण भटकंती करण्याची काही पथ्य पाळावी लागतात.
    त्यातलं पहिल पथ्यं म्हणजे पहाटे घराबाहेर पडणं. हिमालयन घरात आल्यापासून तर घरात पायच टिकत नाही. मग एका शनिवारी आम्ही भल्या पहाटेच घराबाहेर पडलो...
    यावेळेस जायचं होतं मराठयांच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अभिमानस्थळी....छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातून समजावून घ्यायचे नसतात तर महाराज जिथे वावरले तो भूगोलही जाऊन धुंडाळायचा असतो.
    महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा जिथं घडली अशाच एका रणभूमीवर आम्ही जाणार होतो ती रणभूमी कोणती हाच तर आपल्या ब्लॉगचा विषय आहे......
    खरं सांगायचं तर हिमालयन घेतल्यानंतर तगडी आणि लांबची अशी राईडच झाली नव्हती. शनिवार रविवार जोडून आला होता. तेव्हा बेत ठरला आणि पहाटेलाच आम्ही हायवेला लागलो. मराठ्याच्या इतिहासात भूगोल फार महत्वाचा आहे. मराठयांचा इतिहास पुस्तकातून वाचता येईळ पण भूगोल जाणून घ्यायचा असेल तर मात्र फिरावं लागेल आणि मराठयांचा इतिहास घडला आहे सह्याद्रीत...त्यामुळे त्यांच्या दऱ्या खोऱ्यात फिरणं आलं...मग काय निघालो आम्ही एका नवीन ठिकाणी... हे नवीन ठिकाण कोणतं हे सांगतोच पण त्याआधी कराडची पोटापाण्याची गोष्ट ऐका..
    कराडला आमचं नाश्तांचं आवडतं ठिकाण म्हणजे गजानन हॉटेल...गेल्या ५०, ६० वर्षापासून कराडच्या शिवाजी चौकात हे छोटेखानी हॉटेल आहे. अत्यंत शिस्तीचा आणि स्वच्छ कारभार हीच या हॉटेलची ओळख आहे. इथं जाऊन काय खायचं तर मिसळ, साबूदाणा वडा, खिचडी, वडा सांबार ही या हॉटेलची ओळख आहे. सकाळी ७ लाच हॉटेल उघडलेले असते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले शेतकरी, दुधवाले अशांसाठी स्वस्तात चविष्ट नाश्ताचे ठिकाण म्हणजे हॉटेल गजानन....
    कधी कराडला गेलात तर ही जागा चुकवु नका...
    पण पावनखिंडींला जायचे कसं तर रस्ता अगदीच सोपा आहे. सह्यांद्रीच्या रांगांमध्ये जिथे बेसुमार पाऊस पडतो त्या आंबा घाट आणि अणुस्कुरा घाटाच्या बेचक्यात पावनखिंड वसलेली आहे.
    पुणे - कराड - मलकापुर - आंबा - पावनखिंड असा रस्ता आहे. पुण्यापासून हे अंतर २३० किलोमीटर आहे.
    पावनखिंडींचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर पन्हाळ्याला सिद्दी जोहरचा वेढा पडला होता तो फोडून शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले तेव्हा मागावर असलेल्या सिंद्दी जौहरच्या सैन्याला बाजीप्रभू देशपाडें यांनी बांदल मावळ्यांसह याच खिंडीत अड़वले. यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोचता आले.
    मराठ्यांच्या इतिहासातला अत्यंत रोमहर्षक आणि अजरामर करणारा प्रसंग जिथे घडला ती जागा म्हणजे पावनखिंड
    #pawankhind #chatrapatishivajimaharaj #vishalgad
    पावनखिंडीच्या जागी आज छोटं स्मारक उभं राहिलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांचे छोटं स्मारक या ठिकाणी आहे. वरुन येणार एक ओढा इथून खाली झेपावतो. सर्वसामान्या माणसांना इथपर्यंत जाता येतं पण इथून पुढच्या वाटेने खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी. पावसाळ्यात तर ही वाट टाळावी.
    पावनखिंडीची नेमकी जागा जिथं आहे तिथं जाण्यासाठी एक रेलिंगचा जिना लावण्यात आला आहे. त्या जिन्यावरुन जवळपास सत्तर ऐंशी फूट खाली उतरुन गेलं की पावनखिंडीच्या नेमक्या जागेत आपण पोचतो.
    पावनखिंडीची जागा मोक्याची आहे. निमुळती आहे. चिंचोळी आहे. रेलिंग आज लावलं असलं तरी त्याआधी वर चढण्यासाठी ८० ९० फूटाचा कडा खोबणीत हात घालून चढावा लागतो.
    या जागेची रचना बघता काही मूठभर मावळे बराच काळ ही जागा लढवू शकतात हे वस्तुस्थिती जाणवते.
    पावनखिंडीत लढाई झाली तेव्हा तर पावसाळा होता १३ जुलैची तारीख होती. या भूप्रदेशातला महामूर पाऊस, जंगल, फुगलेले नद्या नाले हे सगळं बघता आपल्या महाराजांचे आणि मावळ्यांचे धाड़स काय होतं याची जाणीव होती आणि या शौर्यस्थळावर आपण आपसुकच नतमस्तक होतो.
    पावनखिंडीत इतिहासाची उजळणी केली आणि आम्ही पुढे निघालो. पावनखिंडीपासून विशाळगड हे छत्रपतींचा किल्ला हाकेच्या अंतरावर आहे. रस्त्याने हे अंतर १७ किलोमीटर आहे.
    पावनखिंडीतून आम्ही निघालो आणि पुढे एक जबरदस्त अनुभव मला मिळणार होता.
    विशाळगड आता नजरेच्या टप्प्यात आला. तटबंदी दिसायला लागली होती. गडावर नजर ठेवून गाडी सुसाट सोडली, जंगलाच्या एका टप्प्यातून पुढे आलो आणि डाव्या बाजूच्या डोंगरावर एक मोठी हालचाल जाणवली. काळ्या रंगाचे मोठं धूड निवांत उभं होतं....
    गाडी थांबवून आम्ही सावधपणे कानोसा घेतला, सुरक्षित अंतर ठेवून आम्ही दिसलेलं धूड नेमकं काय होतं ते बघायला थांबलो पण तेवढ्यात आमच्या हिमालयनसमोर ७, ८ फूटावर दुसरं धुड अवतरलं.
    हे धूड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रान गव्यांचा एक कळप होता. आम्ही रस्त्यावर उभं होतो आणि दोन्ही बाजूने गवे उतरत होतं.
    काही क्षण हे तणावाचे गेले कारण आता पळायला जागाच नव्हती बेसावधपणे आम्ही गव्यांच्या मध्ये अडकलो होते पण तेवढ्यात मागून एक गाडी आली.
    लाजरे बुजरे असलेले गवे लांब गेले. काही सेकंदाकरता आलेला तो अनुभव थक्क करणारा होता.
    सह्याद्री कधीच नाराज करत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
    आता विशाळगडावर आम्ही गेलो तेव्हा काय घडलं आणि विशाळगडावर काय काय दिसलं हे बघा आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये पण
    पहाटेची हिमालयनची दमदार राईड, पावनखिंडींचा रोमांचक आणि प्रेरणादायी इतिहास आणि विशाळगड़ाच्या पायथ्याला काही फूट अंतरावर दिसलेले गवे आमचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागलेला होता.
    ----------------------------------------------------

Комментарии • 14

  • @swananddeshmukh4405
    @swananddeshmukh4405 3 месяца назад +1

    Best 🎉

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      Thank you very much मित्रा !!!!

  • @livesolapurnews
    @livesolapurnews 3 месяца назад +1

    Very nice... Harifi ji👌👌👌👌

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      Thanks a lot

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 3 месяца назад

    Very nice

  • @nilk22
    @nilk22 3 месяца назад

    Masta ❤❤❤❤

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      Sir धन्यवाद !!!!

  • @shravu13
    @shravu13 3 месяца назад

    Very nice vlog 👌👌

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      Thanks for liking

  • @hlsvk6624
    @hlsvk6624 3 месяца назад

    Video mast aahe chan mahit dilit. Background music naste tr ajun spasht aikayla milale aste 😊

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      Yes there is a technical glitch
      will rectify in next video

  • @anaghadeo7761
    @anaghadeo7761 2 месяца назад

    Video khupach Chan ahe,Abhyaspurna Ani Romanchak.
    Background music naste tarAjun chan watle aste❤🎉

    • @Harifi_
      @Harifi_  2 месяца назад

      खुप धन्यवाद !!!
      बॅकग्राऊंड म्युझिक वर काम केलं जाईल नक्कीच