पदवी वाल्यांना १० हजार डिप्लोमा वाल्यांना ८ हजार १२ वी पास मुलांना ६ हजार मिळणार | Ladka BhauYojana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024
  • #eknathshinde #cmeknathshinde #mukhyamantri_yojana #ladkibahin #ladkabhauyojna #mahayuti #mukhyamantriyojana #devendrafadnavis #mukhyamantriyuvakaryaprashikshan yojana #mahavikasaghadi #ajitpawar
    मंडळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरुणांसाठी एक मानधन योजना सुरू करणार अशी नुकतीच घोषणा केली, त्यामुळे या योजनेबद्दलची उत्सुकता तरुणांना निर्माण झाली आहे. या योजनेमुळे बारावी झालेल्या तरुणांना 6000 रुपये, डिप्लोमा धारक तरुणांना आठ हजार रुपये, तर पदवीधर तरुणांना दहा हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.
    दरम्यान, राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी काही कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर महिला अर्ज करत आहेत.
    मंडळी, तरुणांसाठीच्या या नव्या योजनेबाबतचा अजून तरी कोणताही शासन निर्णय आलेला नाही. त्यामुळे त्यातल्या अटी शर्ती काय असू शकतात याबद्दलही सर्वांनाच कुतूहल निर्माण झालेलं आहे. मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणाले, की ही योजना तरुणांसाठी आहे. आणि बारावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी आहे पदवीधर उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी आहे. मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल देखील शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर नाव नोंदणी करत असताना, नावासोबत पत्ता आणि वय याची देखील नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर या योजनेच्या लाभासाठीची आवश्यक कागदपत्र ज्यामध्ये शिक्षणाचा आणि वयाचा उल्लेख असेल अशी कागदपत्र असणार आहेत. अर्जदाराचा एक फोटो, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अशी सगळी माहिती भरल्यानंतर ही माहिती सबमिट करावी लागणार आहे. त्यानंतर एका समितीकडून अर्जामध्ये भरलेल्या माहितीची पडताळणी होईल, आणि पूर्तता करणाऱ्या अर्जदारांची एक यादी शासनाकडून तयार होईल.
    मंडळी, तरुणांसाठीच्या योजनेसाठी शासनाकडून दहा हजार कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जाणार आहेत.
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 3

  • @AshokSonawane-dw9xu
    @AshokSonawane-dw9xu 3 месяца назад

    लाडका बाबा आणि लाडकी आजी पण आना आणि महाराष्ट्राची विक्री करा राजकारण करावं पण???????????!!¡!!!

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 3 месяца назад

    'मुख्यमंत्री लाडके बाबा योजना ' पण आणा,जाऊ दे झाडून.

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 3 месяца назад

    लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ह्या बोगस योजना आहेत. हा निवडणूक जुम ला आहे. सामान्य जनता यापासून सा व धा न !!!