Winning Habits | Shri. Bhishmaraj Bam sir (IPS) | Chanakya Mandal Pariwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • श्री. भीष्मराज बाम सर
    श्री. भीष्मराज बाम यांचा जन्म हैदराबाद येथे १ ऑक्टोबर, १९३८ साली झाला. श्री. बाम यांनी उस्मानिया विद्यापीठामधून अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटीक्स आणि स्टॅटीस्टीक्स विषयांमध्ये प्रथम श्रेणीची बी.ए. पदवी मिळवली होती. असिस्टन्ट डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर या पदावर उत्तमरीत्या काम करुन ‘जॉइंट डायरेक्टर - इंटेलिजन्स ब्युरो (IB)’ या पदावरुन निवृत्त झाले. बाम सर चाणक्य मंडल परिवारचे विश्वस्त सुद्धा होते. पोलीस खात्यात असतांना सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये श्री बाम यांना विशेष रस होता. महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. कॅप्टन सोलोमन झायकेल या नेमबाजी प्रशिक्षकाने ‘मानसिक प्रशिक्षण’ या विषयावर माहिती तसेच जगाच्या विविध भागांमधून प्रसिद्ध झालेली पुस्तकं त्यांना दिली. श्री. बाम यांनी ती सगळी पुस्तकं वाचून काढलीच पण भारतीय तत्वज्ञानाशी त्याची सांगड घालून स्वत:ची ‘मानसिक प्रशिक्षणाची’ सूत्रं तयार केली. विज्युअलायजेशनची तंत्रे, योग न्यास ही सगळी तंत्रे स्वत:च्या पद्धतीने आणि दुस-याला फायदेशीर ठरतील अशा रीतीने प्रगत केली. बाम सर स्वत: खेळाडू असल्यामुळे त्यांनी क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना ‘योग आणि मन’ एकत्र गुंफवून मानसिक तंत्रज्ञानाचे धडे दिले. त्यातूनच ‘क्रीडा क्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ’ नावारुपाला आले. प्रथम बाम सरांनी भारतीय नेमबाजी संघाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मानसिक दबावाशी झुंज द्यायला त्यांनी खेळाडूंना शिकवलं.
    पुढे बाम सरांनी बिलियडर्स, स्नूकर, बॅटमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट, पोहणे, टेनिस, गोल्फ अशा विविध क्रीडा क्षेत्रातील खेडाळूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. क्रिकेटमध्ये बाम सरांनी राहुल द्रविडला दिलेल्या प्रशिक्षणाने त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल झाला. २००० साली कॉमनवेल्थ स्पर्धांमधून अंजली भागवतने सुवर्णपदक मिळवले. बाम सरांनी सचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरुर, पी गोपीचंद, अशोक पंडित, गगन नारंग, मोनाली गो-हे ह्यांना प्रशिक्षण दिले. फक्त क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर समुपदेशन आणि मार्गदर्शनच नव्हे तर गृहचारिणी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सगळ्यांना त्यांनी अडचणींना तोंड कसं द्यायचं ते शिकवलं. राजकीय क्षेत्रातील विविध नेत्यांनासुद्धा त्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरलं. हे सगळं बाम सर ‘बिनशर्त’ करायचे, अगदी आईचं आपल्या लेकरावर प्रेम असतं तसं !
    #bamsir #excellence #careerguidance #visualisation #psychology #psychological #winningmindset
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Комментарии • 9

  • @roshnashinde37
    @roshnashinde37 6 дней назад +6

    Great sir,thanks Chanakya Mandal Privar, mi ya family cha part aahe.

  • @prashantghodake007
    @prashantghodake007 8 дней назад +4

    👏👏🙏🙏🙏Great mentor...Thank you Chanakya Mandal parivar🙏💐💐

  • @kiranransing
    @kiranransing 4 дня назад +1

    अतिशय प्रेरणादायी विचार. हा ठेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल चाणक्य मंडल परिवाराचे खूप आभार. ❤

  • @shaileshghongade2870
    @shaileshghongade2870 4 дня назад

    Thanks sir

  • @ravindraparihar7593
    @ravindraparihar7593 4 дня назад

    Thank you sir

  • @GaneshPawar-kf3pj
    @GaneshPawar-kf3pj 8 дней назад

    Thank you sir 🙏

  • @shaileshghongade2870
    @shaileshghongade2870 8 дней назад

    Thanks

  • @trainlikeawarrior8963
    @trainlikeawarrior8963 12 часов назад

    Life changing video! 🙏👏

  • @missamazing10x
    @missamazing10x 8 дней назад +2

    धन्यवाद ....❤