PROF. SHARAD BAVISKAR | Writer | Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • धुळ्याजवळील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेला मुलगा. अहिराणी ही त्याची मातृभाषा. बिकट आर्थिक परिस्थिती, सामाजिक विषमतेचे चटके अशी अनेक खडतर आव्हाने पार करत जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतो, कंत्राटी कामगार म्हणून अनेक वर्ष काम करतो, परिस्थितीशी झगडत स्वतःचे शिक्षण सुरु ठेवतो.
    पुढे भारतातील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवतो, स्वतःचा अभ्यास करून फ्रेंच भाषा आणि तत्वज्ञान शिकतो आणि दिल्लीतील JNU मध्ये प्रवेश मिळवतो.
    त्यांनी लिहिलेले 'भुरा' हे आत्मकथन साहित्य विश्वात खूप गाजत आहे. भुराची ४थी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली.
    एखाद्या सिनेमात शोभेल अशी कहाणी आहे प्रा. शरद बाविस्कर यांची.
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    Click the link below to get all updates at one place
    heylink.me/ava...
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    ( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
    #avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #sharadbaviskar #bhura #writer #professor #jnu #philospher #phd #educator

Комментарии • 59

  • @anilkshirsagar702
    @anilkshirsagar702 Год назад +28

    खूप अप्रतिम मुलाखत आहे. ‘भुरा’ हे आत्मकथन आधीच वाचले असल्यामुळे सदरचा संवाद अधिक भावतो. शिक्षणातून केवळ जगता येणे हे साध्य नसावे तर सजग, प्रवाही आणि विचारशील आयुष्य जगता येणे म्हणजे आपण शिकलो आणि घडलो असे म्हणता येऊ शकते हा विचार मनाला भिडतो. खरा बदल तोच जो स्वतःपासून सुरु होत, खूप साधारण गोष्टींना स्पर्शत पुढे जातो आणि अंतिमतः अनेक घटकांना, वस्तूंना, आणि व्यक्तींना दिशा देतो. प्राध्यापक शरद बाविस्कर यांच्या ‘भुरा’ चा शैक्षणिक संघर्ष हा अनेकांना भावतो कारण तो व्यवस्थेकडे बदलाची मागणी करतो, आणि त्याकरिताचे Raison d'etre मांडत व्यवस्थेला अधिक मानवी होण्यासाठी स्वतःला आणि स्वतःच्या लेखणीला झिजवितो. या आत्मकथनातून शिक्षण व्यवस्थेतील सर्वच स्टेक-होल्डर्सना निश्चितच खूप काही शिकण्यासारखे आहे.
    सदरच्या मुलाखतीत प्रा. शरद म्हणतात कि भारतीय शिक्षण व्यवस्थेने तिच्यातील वस्तुनिष्ठ घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अगणीत मानवी संसाधनांना बहरण्याची संधीच मिळत नाही, या बाबीकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेने तात्काळ आणि प्रभावहेतूने लक्ष द्यायला हवे. मुलाखतीतील संपूर्ण संवाद मनाला भावतो. मात्र त्यातील, मी घरी घेऊन जावा असा ठळक विचार म्हणजे; मनुष्य हा त्याला असलेल्या उपयोगितामूल्या पलीकडे जाऊन यशस्वी मनुष्य म्हणून घडायचा असेल (स्वतःचा Relevance Value शाबूत ठेवायचा असेल) तर, शिक्षण, कुटुंब, समाज, आणि राष्ट्र या सर्वांनाच सजगपणे आपले कार्य करावे लागेल, शिक्षणव्यवस्थेवर खूप मोठी जबाबदारी आहे, केवळ नवीन शैक्षणिक धोरण देऊन आपली जबाबदारी संपेल असे वाटणे म्हणजे स्वार्थाची आणि धोक्याची घंटा.
    भाषेबद्दल अनेकांना बोलतांना ऐकतो, मात्र शरद यांचे भाषेबद्दलचे विचार आणि जाण श्रोत्यानां यासंदर्भात अधिक समृद्ध करतात. डॉ. आनंद नाडकर्णी सर, डॉ. ज्योती शिरोडकर, आणि पुणे वेध संयोजन समितीने हि मुलाखत सर्वांसाठी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार

  • @sharadbaviskar7031
    @sharadbaviskar7031 Год назад +35

    डॉ. आनंद नाडकर्णी आणि वेध पुणे यांचे मनापासून आभार.
    Happy festivities to you and your dear ones!

  • @SuhasPatil-h8m
    @SuhasPatil-h8m Год назад +2

    भुरा ही आत्मचरित्र कांदबरी खुप भारी, जबरदस्त, भन्नाट, भारी, वाचनीय आहे... मी सांगलीकर सुहासकुमार...
    धन्यवाद आभारी आहे शरदसर ...

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Год назад +5

    भुरा .. तरबेज बुद्धी .. शरद..स्वतःला व्यापक करत असताना ,इतरांना बरोबर घेऊन जाणे !
    आज दिवाळीच्या संध्याकाळी सगळीकडे दिव्यांची रोषणाई असताना , मिळालेली ही वैचारिक दिवाळी भेट ! खूप,खूप धन्यवाद !!

  • @NamdevKatkar
    @NamdevKatkar Год назад +15

    ही मुलाखत अपलोड केल्याबद्दल खूप आभार. शरद सरांची वैचारिक क्लॅरिटी भावत आलीय.

  • @dr.vidyajadhav7445
    @dr.vidyajadhav7445 Год назад +4

    खूप छान वाटलं. जयहिंद कॉलेज धुळे एक आपल्यासाठी उड्डाणाची धावपट्टी आणि K.B. Patil SIR आपले प्रशिक्षक, खूपदा वाटलं आपणही असच छान आयुष्याचं प्रवास वर्णन करावं. पण शरदला पाहुन आपलंच आयुष्य समोर आलं. कसदार खानदेशात अशी माणिकमोती अगणित आहेत पण त्यांना पैशाच्या तराजूतच तोललं जास्त ही एक खंत आणि अनुभव.... सख्यांकडून जास्त त्रासदायक

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 9 месяцев назад +1

    श्रवणीय मुलाखत आणि डॉ आनंद नाडकर्णी सरांनी छान च शब्दांनी व्यक्त केली आपली भुमिका दोघांचाही संवाद मनापासून आवडला सुंदर च

  • @atul4875
    @atul4875 Год назад +1

    असामान्य प्रतिभा...शरद सर सलाम आपणास...
    मला चव्हाण सर आणी प्राचार्य पाटील sir, अहिरे मॅडम यांना सुद्धा भेटण्याची इच्छा आहे....भुरा पलीकडील शरद सर जाणून घ्यायचे आहे...🎉

  • @gokulmuley6781
    @gokulmuley6781 Год назад +1

    माननीय शरदजी, डाॅक्टर आनंद आणि त्यांची संपूर्ण टिम ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. शब्द आणि भाषा यांचे अनेक नविन आयाम आज शिकायला मिळाले. जे आजपर्यंत लांबून पण ओळखीचे नव्हते. भुरा हे पुस्तक लवकरच विकत घेऊन वाचणारच आहे. शरदजींचे मनापासून आभार. खरे म्हणजे काय बोलावे तेच कळत नाहिये. 🙏🙏

  • @prof.sanjayshekhawat8716
    @prof.sanjayshekhawat8716 Год назад +6

    स्वतःच स्वतः च्या आश्रयास यावे
    स्वतः ने स्वतः ला सावलीत घ्यावे.
    स्वतः चे ते बीज, स्वतः च शिंपावे
    येईल ते पीक, साक्षी न्याहाळावे.
    -dr आनंद नाडकर्णी

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +1

    🙏 सर.अप्रतिम व शिक्षणा विषयी सखोल माहिती,त्याचे विविध पैलूंवर केलेलं भाष्य आणि एकूणच सर्व इतर घटकांचा घेतलेला वेध यामुळे ही मुलाखत समृध्द करणारी आहे.यासाठी डॉ.शरद बावीस्कर व डॉ.नाडकर्णी व शिरोडकर mam यांचे मनापासुन आभार..सर्वांना धन्यवाद.👌👍🙏😊

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 Год назад +5

    अतिशय सुंदर झाली मुलाखत!!! नाडकर्णी सरांचे अभिनंदन प्रा शरद सरांना खूप छान बोलते केले! It was greate experience to hear the author himself talking about his ideas behind the writing the book and sharing his thoughts on education and life
    This is the most brilliant autobiography book in Marathi in recent times. Students and parents must read this book to understand education!

  • @dr.bhagwatshinde2860
    @dr.bhagwatshinde2860 Год назад +3

    सर्वप्रथम प्रा. शरद बाविस्कर व आवाहन टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन ! अनुभव विश्वास समृद्ध करणाऱ्या एका संपन्न मुलाखतीची प्रचिती... शिक्षणाविषयी परखड वास्तव अस्वस्थ करून जातं. खरं शिक्षण कसं असायला हवं ? जीवनातील यश म्हणजे काय? आणि यशस्वी जगणं म्हणजे काय ? या दोन्ही गोष्टींचा खूप अर्थपूर्ण उलगडा अनुभवायला मिळाला. थँक्यू सो मच वन्स अगेन ऑल टीम मेंबर्स....

  • @anuradhanerurkar3392
    @anuradhanerurkar3392 Год назад +1

    अप्रतिम मुलाखत. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उर्जादायी मुलाखत. खूप प्रामाणिक आणि विचारगर्भ अभिव्यक्ती.

  • @vinayabhangay7472
    @vinayabhangay7472 Год назад +2

    अप्रतिम आणि प्रोत्साहन देणारी मुलाखत आणि व्यक्तीमत्व

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 Год назад +4

    अतिशय सुंदर विचार, प्रेरणादायी, खूप काही शिकवून जाणारे

  • @RATNAKARKOLI
    @RATNAKARKOLI Год назад +1

    अतिशय सुंदर सर...व्यक्तीनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती या विषयीचं तत्वज्ञान अंतर्मुख करुन गेलं...

  • @BhashanGuru
    @BhashanGuru Год назад

    प्रा. बाविस्कर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.

  • @parmeshwardeshmane2618
    @parmeshwardeshmane2618 5 месяцев назад

    खुप छान मुलाखत होती ऐकुन बरं वाटलं मी भुरा वाचले तर नाही पण वाचण्याची इच्छा निर्माण झाली

  • @mahen........
    @mahen........ Год назад +2

    यांचे भूरा पुस्तक खूप छान आहे... 👌

  • @prof.sanjayshekhawat8716
    @prof.sanjayshekhawat8716 Год назад +1

    उत्तम पुस्तक, एकदा वाचावेच

  • @santoshshinde8956
    @santoshshinde8956 Год назад +7

    भुरा माझ्या आयुष्यात अचानक आला. आमचं समजण्याजोगे कुठलंही नातं नव्हतं. शाळा नाही, कॉलेज नाही आणि कुठलंही गणगोती संबंध नाही.
    तो एका महिन्यासाठी माझा शेजारी म्हणून आला आणि आयुष्यभरासाठी माझाच एक भाग झाला.
    हा एक महिना भुरासाठी अतिशय नाजूक काळ होता आणि ‘भुरा ते शरद’ हा परिवर्तनाचा टप्पा मी अगदी जवळून पाहिला.
    हे परिवर्तन सामान्य डोळयांना दिसण्यासारखे नव्हते पण मला माहित होते की शरद आतल्या आत झपाटलेला होता आणि त्याच्या जीवनाच्या उद्देशासाठी समर्पित होता.
    12वीच्या पुढे भुरा पुस्तकात वाचणे म्हणजे त्याच्या सामर्थ्य आणि दृढनिश्चयावरील माझ्या आत्मविश्वासाचे पुनर्प्रमाणीकरण होते.
    शरदला ‘वेध’ मध्ये भेटणे हा अतिशय अभिमानाचा क्षण होता आणि त्या निमित्ताने आनंद नाडकर्णी यांना पहिल्यांदा भेटणं हा देखील एक अलभ्य लाभ होता! 😊😊😊

  • @niranjan_blog
    @niranjan_blog Год назад +1

    धन्यवाद वेध या मुलाखतीसाठी

  • @avinashpatil643
    @avinashpatil643 Год назад +1

    Really inspiring Interview Sirji

  • @meenashete5070
    @meenashete5070 Год назад +2

    खुप छान मुलाखत.. Thanks for uploading 🙏

  • @vijayavasave22
    @vijayavasave22 Год назад +1

    खूपच अप्रतिम मुलाखत

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 Год назад +2

    Perfect interview! Book ordered...

  • @smitaraut393
    @smitaraut393 5 месяцев назад

    अद्भुत.

  • @Prajyot90
    @Prajyot90 Год назад

    फार छान आणि विचारप्रवुत्त करणारी मुलाखत 👍🏼

  • @saranggovind
    @saranggovind Год назад +8

    पुस्तक वाचेल शे.. मग कसाले vdo dhakhana.. tyo bee bhalata motha 46 min. ना... dakhi lyu .. bor vayana tar skip karu asa vichar karisan dakhale laganu.. bhasha फिलॉसॉफी how kay aawadi na vishay nahi mhana.. tari bee tu jo kay ek ek मुद्दा tyana magan सौंदर्य.. maandi rayana te bhalate आवड n . Handibhar आशीर्वाद tule bhurya . धुळ्या ना डंका pitana !

  • @mangeshjog4254
    @mangeshjog4254 Год назад +3

    Unbelievably original and inspiring too...!!!

  • @gayatribobade3200
    @gayatribobade3200 Год назад +1

    Apratim vaicharik mulakhat👍🏻👌🏻

  • @kpl1313
    @kpl1313 Год назад

    खुप छान...गिरीश सर धन्यवाद

  • @prajaktadeshpande9110
    @prajaktadeshpande9110 Год назад +2

    खूपच प्रेरणादायी

  • @purushottampatil2417
    @purushottampatil2417 Год назад

    खूप छान मुलाखत👌👌
    सलाम.....

  • @maltiv7426
    @maltiv7426 Год назад +2

    BHURA पुस्तक जरूर वाचण्याजोगे आहे.

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 Год назад +1

    खूपच सुंदर

  • @anitasawale7323
    @anitasawale7323 5 месяцев назад

    छान

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 5 месяцев назад +1

    शंभर टक्के वाचू......❤

  • @shri8131
    @shri8131 Год назад

    छान. विचार करायला लावणार्या अनेक छटा सापडतील हा विडिओ पाहून.

  • @maltiv7426
    @maltiv7426 Год назад

    अप्रतिम

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 Год назад +2

    माझे आवडते लेखक शरद सर आणि माझे आवडते मानसतज्ञ आनंद सर 🙏👍👌😥

  • @finearts399
    @finearts399 Год назад

    Great 👍 no words

  • @vikasborade4170
    @vikasborade4170 Год назад +2

    शरद सर ग्रेट

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 11 месяцев назад +1

    Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim 🙏.

  • @samadhanpatil5187
    @samadhanpatil5187 Год назад +2

    Me attend kel aahe hyana amchya camp made ❤❤

  • @latasarnaik4754
    @latasarnaik4754 Год назад +1

    लई भारी

  • @vishalshinde8466
    @vishalshinde8466 11 месяцев назад

    ❤❤ very nice ❤❤

  • @Rakesh_Bhadane
    @Rakesh_Bhadane Год назад +3

    ❤️

  • @angaraki
    @angaraki 6 месяцев назад

    AFAAT!!!

  • @dr.vikasjadhav9646
    @dr.vikasjadhav9646 Год назад

    🌱🌱👌👌👌👌👌👌👌

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 Год назад

    👏🏻

  • @thewolverine7478
    @thewolverine7478 Год назад +1

    Kiti wannabe faltu manus ahe

    • @seinundschein
      @seinundschein Год назад +1

      Can you say little more about your opinion?

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj Год назад

      Wolverine, kahitari shabda shiktos kuthrtari vapartos, zaatu 00 IQ

    • @krox477
      @krox477 Год назад

      Bolacha bat bolachi kadhi