Homosexuality | Khuspus with Omkar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 445

  • @omkarjoshi6943
    @omkarjoshi6943 Год назад +45

    🏳‍🌈 खुसपुस टीमचे आभार की तुम्ही हा विषय लोकांपर्यंत पोहोचवत आहात, विशाल आणि नंदिता ने पण खूप सोप्या भाषेत सांगितले आहे. धन्यवाद, Happy Pride Month🏳‍🌈

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 Год назад +30

    अश्या प्रकारच्या Podcast ची खुप गरज आहे समाजाला...अशा चर्चा नीच समाज प्रगल्भ होत जाईल..👍🏻💯

  • @anujan5498
    @anujan5498 Год назад +117

    ह्या विषयावर पहिल्यांदा इतकी प्रगल्भ चर्चा ऐकली !👍👏👏

    • @shubhadavidwans3382
      @shubhadavidwans3382 Год назад +1

      It is very important and eyeopening. Being senior citizen lady many youngsters approach me for support. Being lawyer myself I legally guide them but medically and emotionally I was ignorant. Thanks for focusing this subject. Parents actually require counselling.

  • @onkarkarvande
    @onkarkarvande Год назад +7

    या विषयावर प्रगल्भ चर्चा करण ही काळाची गरज आहे हे ह्या समाजातल्या वातावरणावरून लक्षात आलं...विकृती ही नैसर्गिक असू शकते पण त्याला खत पाणी किती घालायचं हे स्वतः ला आणि सोबत समाजाला ही ठरवाव लागेल... वाटणं आणि असणं यात फरक असतो मला वाटत म्हणून हे माझं वाटणं मी किती दिवस स्वत: वर बिंबवत राहण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण वाटण्याच्या ही पलीकडचं असलेलं जग पाहिलं तर कदाचित वाटण बदलू शकेल आणि सामान्य, नैसर्गिक जीवन जगू शकू... मग तस असत तर निसर्गानेच लिंग भेद केला नसता ना सगळ्यांना एकच लिंग दिलं असत मग वेगळं का हा प्रश्न उरतोच ना... लैंगिक कल हा आजू-बाजूच्या वातावरणावरून ठरत असतो आधीच्या काळी पण लहान मुलं जरा घरात बायकांत जास्त रहायला लागले तर त्यांच्यात बायकी गुण यायचे की मग त्यांना नंतर लक्षात घेऊन वातावरणात बदल करून त्याच्यात बदल करायचे न त्याचा परिणाम व्हायचा मग जरा आपण असे बदल करून लैंगिक कल बदलू शकू आणि निसर्गाचे निसर्गत्व जपण्यास हातभार लावू अस मला वाटतं...
    क्षणिक सुखाच्या गोष्टींसाठी संपूर्ण आयुष्य मला अस वाटत म्हणून दुःखात घालण्यापेक्षा ते क्षणिक सुख न उपभोगलेल बर अस मला वाटतं... हे हल्ली फॅड आहे म्हणलं की सगळ झाकलं जातं यात या विषयाची भर पडली इतकच...
    आपले विचारचं आपल्याला घडवत असतात, इतकी ताकत आपल्या विचारात असते...

    • @Piyupran
      @Piyupran 2 месяца назад

      👌👌👌

  • @SumitraAshtikar
    @SumitraAshtikar Год назад +15

    खूप छान विषयाची हाताळणी, सरळ, साधी, सोपी, स्पष्ट भाषा. खुलेपणाने अशी चर्चा वयात येणाऱ्या मुलांसोबत आणि पालकांसोबत व्हायला हवी. दोन्ही वक्त्यांचे अभिनंदन आणि आभार. -- सुमित्रा आष्टीकर

  • @onkarthorat1630
    @onkarthorat1630 Год назад +12

    ज्या विषयावर खुसफुस केली जाते, ज्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत.त्या विषयाला इतक्या प्रकटपणे लोकांसमोर आणल्याबद्दल अभिनंदन.❤

  • @ashutoshjarandikar7779
    @ashutoshjarandikar7779 Год назад +32

    खूप छान झालं आहे conversation.
    When a female speaker said that if she had a child who is homosexual she would feel sorry about him or her because their journey is going to be difficult. It literally hit me.
    We all should try in every possible way to make their journey easier. Kudos to Amuk Tamuk team 🏳️‍🌈

  • @shruti_dee
    @shruti_dee Год назад +39

    So glad that marathi people are discussing about this topic❤ some maharashtrian lgbtqia+ people might have felt like home ✨

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 Год назад +10

    कोणत्याही प्रकारे अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना जसे आपण support करतो तसेच अशा व्यक्तींनाही समजून घेतले पाहिजे.ही समाजाची मानसिकता झाली पाहिजे.

  • @Kshitija1691
    @Kshitija1691 11 месяцев назад +1

    एक नंबर हाताळला आहे हा विषय. टीम चे धन्यवाद आणि कौतुक. देशाबाहेर बसून जेव्हा आजूबाजूला समलैंगिक आणि "खूष" लोकं बघण्यात येतात तेव्हा आपल्या समाजाबद्दल थोडे वाईट वाटते. Acceptance मधूनच सर्व आनंदी राहू शकतात. नशिबाने शाळेत असल्यापासून साहित्य वाचन, दैनंदिन वर्तमानपत्र वाचून विचार आधीच तयार झाल्याने, देशाबाहेर आल्यावर सहजपणे या विचारांचं जड परड वागवता आलं. नाहीतर इथेही काही महाभाग दिसतात जे नावाला "प्रगत" देशात राहत असतात. स्वीकारणे आणि ते ही माणुसकीने ही माझी प्रगत असण्याची व्याख्या या एपिसोड मुले अधोरेखित झाली. मूल हवं असणं नसणं (त्यातूनही एका स्त्री ला) यावर एपिसोड झाला नसेल तर बघायला आवडेल. 58:09

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 Год назад +25

    वाह.. क्या बात...ह्या विषयाची सखोल माहिती समाजासमोर आणलीत...जास्तीत जास्त parents & मुला मुलींनी एपिसोड पाहायला पाहिजे.... Keep It Up... सगळ्यांना धन्यवाद 🙏& Good Luck...!!👍👍👍🤞

  • @Onvolonvo
    @Onvolonvo Год назад +15

    ज्या मुलाला मुलींबद्दल आकर्षण नाही पण मुलांबद्दल आहे तो हीजरा या प्रकारात मोडतो त्यात शरीर सोडले तर सर्व गुण बाईचे असतात सेम प्रकार स्त्रियां मध्ये आहे
    पण आवड म्हणून मारणे किंवा मारून घेणे याला पाश्चात्य लोकांनी प्रोत्साहन दिले आणि ते natural आहे म्हणून प्रसार केला आता भारतीय ही तेच करत आहेत.
    एखादी गोष्ट आवडते म्हणून ती natural च असते असे काही नसते
    ते काही बाह्य गोष्टीनं द्वारे तुमच्या मनावर बिंबवले जाते आणि तुम्हाला ते सत्य वाटू लागते

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад +1

      अगदी बरोबर .. 👍👍, समलैंगिकता हे नैसर्गिक अजिबात नाही, हि अनैसर्गिक आणि विकृत समस्या आहे.

    • @NikhilDevkar-bc3sm
      @NikhilDevkar-bc3sm Год назад +1

      Are pagal लोकांना आम्हाला हे लहानपणी कोणी नव्हत शिकवलं मुळात तुम्ही mansopchar तज्ञ आहात का

    • @prasaddeshpande6090
      @prasaddeshpande6090 10 месяцев назад

      All these things are promoting crime in social life. Because it is unnatural as per my opinion.

  • @sandhyagaikwad8907
    @sandhyagaikwad8907 Год назад +5

    समाजाची गरज आहे अशा विषयावरती अतिशय योग्य पद्धतीने मांडणी केली आहे काम करत असताना अशा मुलांचे मुलींचे विषय समोर येतात कशा पद्धतीने हाताळता यावेत याबाबत छान पद्धतीने सांगितले आहे समाजामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होणे गरजेचे आहे तुमच्या या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा

  • @AnilKawade-tn6by
    @AnilKawade-tn6by Год назад +1

    या विषयावर इतक्या खुल्या पद्धतीने चर्चा घडवून आमचे अज्ञान दूर केल्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद

  • @ShilpaTalwelkar
    @ShilpaTalwelkar 2 месяца назад

    अप्रतिम मुलाखत. अतिशय संवेदनशील पणे हाताळलेला आणि तरीही मोकळा संवाद.

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 Год назад +2

    खूप आवडली चर्चा,अनेक नवीन गोष्टी समजल्या ज्या खरंतर सगळ्यांनाच माहिती असणं खुप गरजेचं आहे.खूप खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा .

  • @riddhikarkare224
    @riddhikarkare224 Год назад +6

    ही सुंदर चर्चा घडवून आणण्यासाठी खुसपुस team चे खूप आभार 🙏

  • @prasad4844
    @prasad4844 Год назад +8

    just checked the comments and surprised to find out there are no toxic comments on this topic! either the toxic coments are removed or our society has become mature to understand and appreciate such a meaningful discussion on a very important topic !
    !

  • @shrutiK12312
    @shrutiK12312 Год назад +20

    हा विषय अतिशय संवेदनशील आहे. पण मला असे वाटले की तुम्ही यातील फक्त एक बाजू दाखवली आणि चर्चा केली. होय, आम्हाला लैंगिक अभिमुखता आणि ट्रान्सजेंडर/पारजेंडर यांच्या वैयक्तिक निवडीचा आदर करणे आवश्यक आहे जे खरोखर आहेत जे सामाजिक आव्हानांना सामोरे जात आहेत. LGBTQA+ मधील खरे लोक समजून घेण्यात आणि ओळखण्यात आपल्याला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल आणि जे फक्त एक असल्याचा आव आणत आहेत. यूएस आणि यूकेमध्ये अशी अनेक प्रकरणे घडली आहेत जिथे पुरुषांनी महिलांसारखे कपडे घातलेले ट्रान्स स्त्रिया असल्याचा दावा केला आहे, महिलांचे स्नानगृह वापरतात आणि सार्वजनिक स्नानगृहांमध्ये मुली आणि महिलांवर बलात्कार करतात. ते भयंकर आहे. तसेच पुरुषांच्या गटात २०० व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूने ट्रान्स वुमन असल्याचा दावा केला आणि पोहण्याच्या महिलांच्या गटात स्पर्धा करून सुवर्णपदक जिंकल्याची घटना घडली आहे. जरी तो हार्मोन्स आणि ऑपरेशनद्वारे संक्रमणातून जात असला तरीही, त्या व्यक्तीकडे अजूनही पुरुषाचे शरीर आणि शक्ती आहे. ( शारीरिक बांधणी खेळावर परिणाम होतो.) जे अनेक वर्षे मेहनत करणाऱ्या महिलांवर खरोखरच अन्यायकारक आहे. आपण या विषयाबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आपण आपल्या मुलांचे संरक्षण करणे आवश्यक आहे कारण यूएस आणि युरोपमध्ये पुन्हा अशी प्रकरणे समोर आली आहेत जिथे लहान मुलांना हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन त्यांचे पुरुष/स्त्रिया (विपरीत लिंग) मध्ये रूपांतर केले गेले. ते योग्य नाही. त्यांना निदान मोठे होऊन ठरवूद्या . इतक्या लहान आणि विकासाच्या वयात त्यांच्यावर प्रभाव टाकू नका. कारण ते पश्चिमेकडील समलैंगिक परेड खूप sexualize kelya आहेत आणि आपल्याला मुलांसाठी याची गरज नाही.

    • @nandita1964
      @nandita1964 Год назад +6

      अगदी बरोबर पण एक तासात कायकाय करणार, आणि मराठी भाषेत यावर फार काही नाहिये, या विषयाचे अनेक पैलू राहून गेले आहेत. त्यावरही बोलायला हवं आहे.

    • @abhijitsane996
      @abhijitsane996 Год назад

      Absolutely perfect and well articulated. We need to differentiate between sexual orientation of person and the perception what a person may be having about his or her identity.
      And to put it plainly these so called trans people are nothing but perverts, because everytime they say they feel like a woman and want to use their toilets . I mean what nonsense is going on, tomorrow I may feel I am a lion, will I be allowed to stay in a zoo inside enclosure of.lion ? The madness is unending and you have to stop this perverted behaviour right now.

    • @malharturabe5236
      @malharturabe5236 Год назад +1

      मला थोड कळ..पण जास्त च डोक्यावरून गेलं .. समजावून सांगाल का...?

    • @iammukta1644
      @iammukta1644 Год назад +1

      खुसपुसच्या टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!!! तुमचं काम अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. आगे बढो.

    • @nidhikhanolkar2744
      @nidhikhanolkar2744 2 месяца назад

      @@shrutiK12312 हे टॉकिंग पॉईंट्स खरे नाही आहेत आणि फक्त समलैंगिक लोकांना अंडरमाईन करण्या साठी वापरले जातात.

  • @sujalkamble1471
    @sujalkamble1471 Год назад +5

    खरचं हा video पाहुन आमची माणसीकता घट्ट झाली आहे....🤗✌️....मला स्वत:ला स्विकारण्यासाठी ही तुमची मुलाखत मला प्रोस्थाईत करते....🏳️‍🌈💯

  • @kaustubhatre18
    @kaustubhatre18 Год назад +4

    कमाल मुलाखत झाली! खूप च महत्वाचा विषय अत्यंत जवाबदारीनं हाताळण्यासाठी अभिनंदन !

  • @subodhkamble-mh3hl
    @subodhkamble-mh3hl Год назад +12

    I personally meet Vishal pinjani sir
    ..he's very nice human being ❤ I supporting humanity 😊

  • @raginiyerande9873
    @raginiyerande9873 2 месяца назад

    Kiti chan vattay bghun ki saglya comments marathi lokanchya ahet most off jya me vachlya .ani saglyancha pratisad khup Chan ahe..proud vattay ki marathi lok hya saglya lokancha sangharsh samju shaktat❤

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 Год назад +4

    खूप छान माहिती चाळीस वर्षापूर्वी माझ्या काकाची दोन लग्न झाली नंतर आजोबांनी स्वीकारलं.पण या गोष्टींचा आमच्याआणि काकाच्या नात्यात काहीच फरक पडला नाही. तो नार्मल आयुष्य जगला.god bless him.

  • @arunadesai8525
    @arunadesai8525 Год назад +14

    Beautiful conversation. You have touched upon all the issues faced by the community. Much needed discussion. Must watch for all 🏳️‍🌈🏳️‍⚧️

  • @Nikita-jm1cv
    @Nikita-jm1cv Год назад +30

    LOVED IT. I am proud of a few of my friends who have courageously taken this journey. ❤❤❤ Shared this episode with them too :) :)

  • @pallavikansara9682
    @pallavikansara9682 Год назад +3

    खूप छान माहितपूर्ण चर्चा ❤
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @prajaktabhatkar5748
    @prajaktabhatkar5748 Год назад +3

    तुमची सर्वच सत्र उत्तम आहेत परंतु आजचा episode विशेष महत्वाचा आणि उपयुक्त आहे.

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 Год назад +2

    मन मोकळे गप्पातून so called धीरगंभीर विष्य उत्तम प्रकारें मांडला आहे, अभिनंदन

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 4 месяца назад

    खुप छान पद्धतीने हा विषय हाताळला इथे ... खुसपुस टीम धन्यवाद

  • @kk002188
    @kk002188 Год назад +1

    उत्तम विषय मांडला, त्यातच podcast मधील पाहुणे मराठी भाषेला धरून राहिले याबद्दल अजून चांगले वाटले. मुलांना समजून घेण्यासाठी पालकांनी करावयाच्या गोष्टी अतिशय योग्य प्रकारे मंडल्यात.
    काही वेळा मुलं/मुली लक्ष्य वेधण्यासाठी अथवा फॅड म्हणून आम्ही अमुक असे आहोत असा आव आणतात, यातील फरक समजून घेण्यासाठी व मुलामुलींनी आत्मपरीक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करावे.

  • @rajashreetaware4899
    @rajashreetaware4899 Год назад +2

    ह्या संभाषणातून माझा LGBT बाबतच दृष्टिकोन बदलला. खूप धन्यवाद

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 Год назад +9

    Excellent discussion on a very sensitive and important topic.
    All of you have contributed a lot and with due respect.
    We @sanvad setu pratishthan, work for adolescent education since 17 yrs. I have shared this conversation on our page and also send to all group members.
    We can't change the society but at least we can try to change attitude of young generation to this issue.

  • @MusicalEras
    @MusicalEras 5 месяцев назад +1

    Sensitive topic! Everyone have rights to live their lives.. they should get legal rights!! Unbelievable Marathi Podcast !!!

  • @ashwinikamble-sf2gk
    @ashwinikamble-sf2gk Год назад +3

    उत्तम विषय मांडणी व समर्पक चर्चा
    खूप छान मॅडम 👍👍💐💐🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +1

    खुप महत्वाचा विषयावर चर्चा...........अशा podcast ची गरज आहे समाजाला

  • @prasadmirasdar
    @prasadmirasdar Год назад +6

    छान झाला आहे एपिसोड. विशाल खूपच मॅच्युअर बोलला. प्रश्नपण संयत होते. गेल्या वीस वर्षांत नव्या पिढीत खूप फरक पडला आहे असे वाटले. स्वतःच्या आंणि इतरांच्या स्वातंत्र्याचा स्विकार आणि आदर किती महत्वाचा आहे ते जाणवले. चांगली चर्चा झाली. अभिनंदन!👌

  • @anujaeklahare1916
    @anujaeklahare1916 11 месяцев назад

    आजूबाजूला सगळेच यांना सपोर्ट करताना पाहिलेत.आणि करायलाच हवे.समाज आज खूप
    सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतो.हे छानच आहे.

  • @It_is_Okay_to_be_Sad
    @It_is_Okay_to_be_Sad Год назад +12

    Ma'am khup bhari bolalat... I am a proud ally 🏳️‍🌈❤️🏳️‍⚧️ Tumhi jyaprakare bolta is just awesome.... The openness and frankness is much needed for the society today.. Thank you so much ❤❤❤❤❤❤

  • @sovanjansarkar2479
    @sovanjansarkar2479 Год назад +3

    विषय खुपच महत्वाचं आहे, आवडलं। लोकांना कळलं पाहिजे, कुठं चुक आणि काय खरं।

  • @piyu27020
    @piyu27020 Год назад +2

    मी LGBTQIA+ या टाॅपिक वर बघितलेला सर्वोत्तम विडीओ आहे हा 👌👌

  • @vidyavapilkar7100
    @vidyavapilkar7100 Год назад +3

    Kharach hya vishayavar lok ughadpne bolat nhit. Tumhi ha vishay evda ughadpne bolat tyasati tumche khup abhar.

  • @vilaspandare
    @vilaspandare Год назад +3

    आम्बिके मॅडम यांनी अतिशय स्पष्टपणे व ठामपणे आपले मुद्दे समजुन येतील अशा पद्धतीने सांगितले . त्यांचा अभ्यास खुप मोठा आहे . स्वभावानेही खुप छान आहे . सध्या मॅडम .. बालकल्याण समिती नं २ ' पुणे येथे ' अध्यक्ष ' म्हणुन कार्यरत आहेत .

    • @nandita1964
      @nandita1964 Год назад

      🙏

    • @Aapli_manas
      @Aapli_manas 7 месяцев назад

      अंबिके मॅडम आपला फोन नंबर द्याना, धन्यवाद मॅडम.

  • @Purvification22
    @Purvification22 Год назад +2

    खरोखर खूप सुंदर विषय निवडलात . खूप गरजेच आहे या विषयावर बोलण

  • @lakhanlovelacky
    @lakhanlovelacky Год назад +2

    Manasokt aani manmokala sanvad aani simple bhashet sampurna mahiti dili nandita tai aani wishal bhau aapan. ❤

  • @deep4630
    @deep4630 Год назад

    विषयाला अनुसरून येणाऱ्या जवळपास सर्व प्रश्नांना चर्चेत हात घातला गेला. मराठीमध्ये (मराठी शब्द वापरून) अशा चर्चा अधिकाधिक होण्याची नितांत गरज आहे. यामध्ये तुम्ही खूप मोठा हातभार लावला याबद्दल धन्यवाद. ❤

  • @Akshara_pujari_583
    @Akshara_pujari_583 Год назад +5

    Mam ne sagitlya pramane maja medical pan bharti vidhyapith made chalu aahe bindu madhav sir ani nandita mam ne khoop help keli aahe just 2 hafte zale aahe ani tya doghan mule mala ghari except kela aahe really thanks mam and sir ❤

    • @nandita1964
      @nandita1964 Год назад +1

      आई बाबांनापण दाखव हा व्हिडीओ

    • @Akshara_pujari_583
      @Akshara_pujari_583 Год назад

      @@nandita1964 ho nakki try karel ajun aahe ghari problems but i will try ❤️

  • @hrushikeshpardhi
    @hrushikeshpardhi Год назад +3

    mala nusat thumbnail bghun ch tumhala appreciate karavas vattatay, i know episode will be great but just tumhi hya topic la discuuss karaych tharvl thanks to that, maybe one of the few marathi language media about this topic and really need this ...

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal2564 Год назад +4

    Very nice discussion. मी ऑस्ट्रेलिया मध्ये राहते. इथे बऱ्यापैकी accetance असला तरी ही थोडी खुस्पुस चालूच असते. Gender preference बाजूला ठेवून कोणाकडेही माणूस म्हणून पहावे एवढीच किमान अपेक्षा आहे.

  • @smitakhode6745
    @smitakhode6745 Год назад +4

    Very informative and useful discussion. Thank you for enlightening on this tabooed subject.

  • @yogesh_med
    @yogesh_med Год назад +23

    Thank you omkar for having podcast on this topic❤️✨

  • @vedvatikilledar6391
    @vedvatikilledar6391 Год назад

    अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा ,फार महत्वाची आहे

  • @sayalirathod4272
    @sayalirathod4272 5 месяцев назад

    तुला पुरुष भान वर ऐकल होत त्या नंतर तुझ्या चॅनल वर visit दिली.. 😊 फार छान टॉपिक निवडलास ❤ kudos man 🎉

  • @sharmilaraje7851
    @sharmilaraje7851 Год назад +12

    Excellent episode. Hope every parent watches it.

  • @jayantpathak4443
    @jayantpathak4443 Год назад +2

    विषयाच्या वाजू ने आणि विरूध्द मत असूच शकते पण आता च्या काळात चर्चा होणे व विषयाच्या सर्व बाजू समजून घेणे गरजेचेच आहे.. सुप्रीम कोर्ट पण यावर चर्चा करत आहे.. कायदेशीर निर्णय होतीलच.. आपली कल्पना अधिक अधिक स्पष्ट व्हायला हवी.. त्याकरिता चर्चा उत्तम.. अभिनंदन

  • @1989mv
    @1989mv Год назад +4

    Kiti cchan ani healthy imp topics var churcha hote ahe. Cchan watate ❤
    Depression and anxiety ya var pan mental health expert var aikayala awdel❤

  • @kanchankatole9874
    @kanchankatole9874 Год назад +2

    खूप छान आणि साध्या सोप्या पद्धतीने सांगितले. 👍

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan Год назад +1

    Loved this episode !
    फारच प्रगल्भ चर्चा. बोलणारे दोघे तर छानच बोलले. पण प्रश्नही फार नेमके आणि अभ्यासपूर्ण विचारले.
    मनापासून अभिनंदन आणि आभार !

  • @bhakti7653
    @bhakti7653 Год назад +10

    Finally someone is talking on this topic that too in Marathi, now it is the time to normalise homosexuality , everyone shld be educated about this especially indians they have lots of misconceptions about homosexuality

  • @shalakat384
    @shalakat384 Год назад +11

    Amuk Tamuk cha faar faar kautuk karayla hava. Such intense topics are being discussed with so much grace, maturity and knowledge. This coming specially for marathi audience is a treat ! Keep up the good work

    • @nilkumarpalnitkar8358
      @nilkumarpalnitkar8358 Год назад

      इंग्रजी शब्दांचा भरणा खूप आहे, त्यामुळे सर्वसामान्य खेड्यातील जनतेपर्यंत हा विषय पोहचणे खूप अवघड आहे.

  • @nimakarlekar9569
    @nimakarlekar9569 Год назад +2

    याविषयी मला थोडं थोड माहीत आहेसमाज कार्य. म्हणून हाविषय अभ्यास पूर्वकहाताळण आवडेल साधारण पणे 50 शी नंतर मोकळा वेळ बराच असतो अशा चर्चा मी जमेल तसं नक्की बघते ऐकते

  • @shanalbeedkar9684
    @shanalbeedkar9684 Год назад +5

    Waa.. kharach khup avadla..mi ek aai ahe ani mala je je Prashan pudhe padnar hote tya saglyachi Uttar milali
    Mana pasun dhanyavad

    • @ujwalanagnoor1347
      @ujwalanagnoor1347 Год назад

      आपला नंबर मिळेल का, मी एक आज्जी आहे, या विषयावर बोलता येईल, नमस्कार

  • @prajaktabhatkar5748
    @prajaktabhatkar5748 Год назад +3

    Apratim चर्चा, a good eye opener for many. Very informative and wonderfully handeled. Thanks for sharing.

  • @jaideeppalsule5522
    @jaideeppalsule5522 Год назад +1

    This video must be shown in schools i feel. People lack knowledge and this will go a long way in at least spreading awareness...

  • @anukatyare
    @anukatyare Год назад +4

    Unlearn करण हे समाजासाठी खूप अवघड आहे हे ही समजून घ्या.

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 месяца назад

    जे शब्द बोलायलाही मोकळीक नाही, त्याची चर्चा घडवुन आणलीत. हे सर्व नॅार्मली स्विकारले जायला कदाचित वेळ लागेल कारण सामान्यतः हे विषय फारसे ठाऊकच नाहीत.
    धन्यवाद.

  • @vedaredkar8183
    @vedaredkar8183 Год назад +2

    खूप काही शिकायला मिळाले. खरच खुप उपयुक्त माहिती दिलीत. 🙏🙏

  • @anukatyare
    @anukatyare Год назад +5

    त्या बाईंना काही manners आहेत की नाहीत? कितीतरी वेळा त्या समोरच्या व्यक्तीच बोलण पूर्ण होऊच देत नाहीत! मला किती माहिती आहे असा attitude! किंचाळून/अती दाबून बोलताहेत.....
    विशाल खूप छान संयत बोलले आहेत.

    • @nandita1964
      @nandita1964 Год назад +1

      ती बाई मीच आहे. तुम्हाला असं वाटलं असेल तर सॉरी, पुढच्या वेळी दुरूस्त करेन.🙏

    • @anukatyare
      @anukatyare Год назад

      @@nandita1964 I didn't mean to be rude. But on topics like these it's better to listen to the views and opinions expressed by the the person who is going through the situation rather than the third party.
      Amuktamuk, I hope you take this feedback into consideration.
      Last time when I was listening to Dr Shukla, the other lady (I think some Bapat) was going overboard. It will be good if you invite subject matter experts separately and other people (social workers, activists) on some other time. Thank you

  • @ashish24t
    @ashish24t Год назад +2

    Itka sundar content aahe. English subtitles suddha have. Mhanje jastit jast lokan paryant share karta yeil. ❤

  • @सुनीतिलिमये

    खूप छान विषय... अतिशय चांगला हाताळला आहे.... 🙏🙏🙏🙏

  • @Marathmola-p5j
    @Marathmola-p5j Год назад +2

    Enlightening conversations & handling it brilliantly bravo please keep it up👏👍👌

  • @PranotiRamteke
    @PranotiRamteke Год назад +1

    खुप छान discussions असतात तुमच्या Chanel वर. Interesting subjects घेता आणि छान बोलणी होतात. Insecurity ही मोठी term आहे पण खुप लोकं असतात आपल्या आजूबाजूला. यांच्या वर पण एखादा episode करा plz.

  • @neelakulkarni9790
    @neelakulkarni9790 Год назад +4

    I know Vishal... He is a dear friend.... He is working so hard for the community... More power to him...

  • @Yashu...2000
    @Yashu...2000 11 месяцев назад

    खरच या विषयावर एवढी माहितीपूर्ण मुलाखत मी आजच बघितली आणि हा किचकट विषय नव्याने समजला...❤
    Thankyou अमुक तमुक....❤

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Год назад +2

    खुप छान चर्चा झाली आम्हाला जी माहिती खुप मोलाची आहे

  • @PralhadMadavi-g2d
    @PralhadMadavi-g2d Год назад +3

    खूप छान अशी चर्चा ,खूप खूप धन्यवाद खुसापुस टीम च...❤ 🌈

  • @virendradeosthalee1793
    @virendradeosthalee1793 Год назад

    खुप महत्वाचा विषय योग्य पद्धतीने चर्चिल्या गेल्या.

  • @artistgauriphape
    @artistgauriphape Год назад +3

    Tumche vishay nd tumchi hi idea kharch chhan aahe but will request you people to provide English subtitles... Jene karun non Marathi frnds sobat share Karu shaku!!! Please take into consideration 🙏

  • @mrbebale
    @mrbebale Год назад +4

    खूप चांगल्या विषयावर चर्चा आहे, माझा प्रश्न असा आहे की, एखादं मूल लहानाच मोठ होत असताना त्याला समाजात किंवा घरात जे वातावरण मिळत, जी वागणूक मिळते आणि त्या वातावरणाचा एखाद्या मुलावर परिणाम होऊन समलैंगिकता निर्माण होते का? का ती नैसर्गिक असते?

    • @malharturabe5236
      @malharturabe5236 Год назад +1

      ती आवर्जून सांगतात ना सर .. नेसर्गिक आहे म्हणून

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      समलैंगिकता हे नैसर्गिक अजिबात नाही, हि अनैसर्गिक आणि विकृत समस्या आहे.

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 Год назад +2

    Khup Sundar! Avrjun forward karava asa podcast ahe.. Lokana ya knowledge chi khup garaj ahe aajchya kalat. because adhichya generationchya parents na kathin jate he samjun ghene barechda. adhichya kay attachya pn kathin jail kadachit!

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Год назад +2

    Atishay uttam vishleshan!

  • @MILINb3E
    @MILINb3E Год назад

    खूप चांगले विषय हाताळताय आपण. कौतुक आपले. आजच दोन व्हिडिओ संपवले. सगळे बघणे अनिवार्य झालंय आता. 🙏🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      खूप आभार! 🙏🏻🙌🏻

  • @ganeshchaudhari172
    @ganeshchaudhari172 Год назад +1

    खुप छान प्रकारे वेगळ्या विषयावर चर्चा केलीये...

  • @Sne0110
    @Sne0110 Год назад +3

    Very beautiful discussion. After watching this episode people can actually try and be more humane towards everyone irrespective of gender and other divides. I would really like to recommend this ep as a guide to people to change or align their perspective about LGBTQ+. Thank you so much.
    Looking forward towards more episodes on less talked but important issues

  • @truptisutar4444
    @truptisutar4444 Год назад +8

    छान विषय मंडळात! Adoption वर सुद्धा एक व्हिडिओ बनवा प्लीज 🙂

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 Год назад +3

    खूपच छान सखोल माहिती

  • @awkwardspirit
    @awkwardspirit Год назад +9

    "What is a woman?" ही Matt Walsh ची documentary बघा please please please. हाच प्रश्न मला पाहुण्यांना सुध्दा आहे. LGBTQIA हे ठीक आहे. पण gender-fluidity मध्ये उद्या उठून कोणीही म्हणेल मी बाई/पुरूष आहे without him/ her having to prove anything is bizarre. मला मनातून वाटतंय मी बाई आहे आणि म्हणून मी बाई आहे आणि मी पुरुष नाही. आणि म्हणून मी women's toilet मध्ये जाऊ शकतो का? Biological बायकांबरोबर wrestling करु शकतो का? Biological बायकांबरोबर race लावू शकतो का? मी biological बायकांच्या changing रूम मध्ये जाऊ शकतो का? मी biological बायकांच्या तुरुंगात जाऊ शकतो का? तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो, अमेरिकेत एका biological पुरूषाला शिक्षा ठोठावली बलात्काराच्या गुन्ह्याखाली. तो म्हणाला "मी बाई आहे. म्हणून मला बायकांच्या तुरुंगात टाका" असं म्हणाल्यावर त्याला लगेच बायकांच्या तुरुंगात टाकलं. आणि बायकांच्या तुरुंगात त्याने अजून २ बलात्कार केले. Please throw some light on this.

    • @abhijitsane996
      @abhijitsane996 Год назад +2

      You have put it plainly and on 🎯. Read my post, I have also been saying the same thing. Hopefully people awaken to this perverted behaviour and stop agenda driven propoganda.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      ह्याचे त्यांच्या कड़े उत्तर नाही, समलैंगिक सम लैंगिकतेचच समर्थन करणार, त्यांच्याकडून भाबडी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही.

    • @awkwardspirit
      @awkwardspirit Год назад

      @@kavishwarmokal124 मला समलैंगिकतेशी काहीच problem नाही. मला problem आहे गोष्टी अती करण्याबद्दल. बाई म्हणजे XX chromosome असलेली व्यक्ती आणि जिला दुसऱ्या माणसाला जन्म देता येतो. पुरुष म्हणजे XY chromosome असलेली व्यक्ती जिला जन्म देता येत नाही. ह्यात मी समजु शकतो समलैंगिकता. पण मी biologically पुरुष आहे आणि मला तरीही जन्म देता येऊ शकतो कारण मला आतून बाई असल्यासारखे वाटत आहे, ही concept मला समजत नाही अजिबात.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      @@awkwardspirit मुर्खांचा बाजार आहे; समलैंगिक एक विकृति आहे हे मानण्यास हे विकृत तयारच नाहीत, समाजाकडून सहानुभूतिची अपेक्षा करणे एक वेळ समजू शकते पण त्याचे बेगडी समर्थन करुन नैसर्गिक असल्याचे उदात्तिकरण करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस झाला.

    • @NikhilDevkar-bc3sm
      @NikhilDevkar-bc3sm Год назад

      Kay problem aahe tujha

  • @sangitasatralkar7788
    @sangitasatralkar7788 Год назад +2

    Khup chan mahiti dilit.
    Thanks

  • @sameeryadav9239
    @sameeryadav9239 Год назад

    अश्यप्रकारच्या चर्चा होणे गरजेचें आहे.त्यामुळे अधिक माहिती समोर येऊन बरेच गैरसमज दूर होतील

  • @vijayk1167
    @vijayk1167 Год назад +1

    Itka gambhir vishay itkya sahajtane charchet aanlyabaddal khup khup dhanyawad. Vishal aani Ambika madam ne itki samarpak uttar dili kharach kautuk aahe. Omkar ne pan vishay khup chaan handle kela. English subtitles dile tar hi charcha pan level var pan pahili jaavi.

  • @rajashridamle6369
    @rajashridamle6369 Год назад +2

    Actually in all laws friend is accepted,in culture wise friend might not accepted.
    Great discussion. All the best to khusphus...❤

  • @girishpardeshi9485
    @girishpardeshi9485 Год назад +3

    What a fantastic episode you all handled the subject brilliantly hats off to all of you 🙏👍👏👏👏👏👏

  • @pradnyakamble3958
    @pradnyakamble3958 Год назад +4

    Khup mast. I got to learn a lot. Vishal is so articulate. I am also glad he didn't criticize SC. They should have discussed a bit more about, gender dysphoria and the crisis of gender identity. Atleast there was a mention 😊
    PS: Mazha ek frnd bolla tyla he sarva avdat nahi, mulga mulgayla kasa like karu shkto and all. So me tyla samjaval itar explms deun, sagitla ki konala konhihi pasant yeu sht. Mala aj mula avdat nntr ek mulgi hi kadachit avdu shte. So let them be, jayna prem karaichai tynna karu dya. Who are we to stop them. So then he said,"Ye tune barabar bola. I agree with you on this now"

  • @Sharvari44
    @Sharvari44 Год назад

    प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..! सुंदर ❤👌

  • @prashantkadam7616
    @prashantkadam7616 Год назад +3

    खूप चांगली माहिती मिळाली ❤👌👍

  • @manceerotithor1317
    @manceerotithor1317 10 месяцев назад

    Extraordinarily commendable episode... omkar i m really mesmerized by the way u have conducted this episode....

  • @sushantdesai5468
    @sushantdesai5468 Год назад +1

    Thank u so much sir ....ha vishay etka chan. Samjavun sangitla....pratyekala prem karycha hakk ahe....❤

  • @HandmadeByDreamer
    @HandmadeByDreamer Год назад +2

    Superb चर्चा आणि विषय 💯

  • @shilpakulkarni8544
    @shilpakulkarni8544 3 месяца назад

    Must needed podcast

  • @PatakhaGuddi09
    @PatakhaGuddi09 Год назад +1

    Discovered this channel few days back, and wow hats off to you Guys talking on such topics which are considered to be TABOO in our society and bringing this perspective from experts that too in our Marathi language . amazing
    👏