५ किलो कैरीचं लोणचं । अचूक प्रमाणासह । एकदाच वर्षभरासाठी लोणचं करून ठेवा । Raw mango pickle of 5 kg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • कैरी लोणचं सर्वांना आवडतं. म्हणूनच उन्हाळ्यात जेव्हा कैर्‍या उपलब्ध असतात, तेव्हा एकदाच वर्षभरासाठी लोणचं करून ठेवलेलं सोयीचं पडतं.
    त्यासाठीच ह्या व्हिडिओमध्ये, ५ किलो कैरीचं लोणचं कसं करायचं, ते अचूक प्रमाणासह दाखवलं आहे.
    तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    🟠🟠🟠🟠🟠
    ५ किलो कैरी' लोणच्यासाठी साहित्य:-
    - ५ किलो कैरीच्या फोडी
    - १ किलो मीठ
    - २५० ग्रॅम लाल तिखट
    - २५० ग्रॅम मेथीडाळ
    - ५०० ग्रॅम मोहरीडाळ
    - ५०० ग्रॅम कैरी लोणचं मसाला
    - २५ ग्रॅम हिरा हिंग ( खडे आणून कुटून मग मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी)
    फोडणीसाठी:-
    - २ लीटर तेल (शक्यतो रिफाईंड शेंगदाणा तेल वापरावं. त्याने चव चांगली येते.)
    - १५० ग्रॅम मोहरी
    - ५० ग्रॅम हिंग
    - १०० ग्रॅम हळद
    🟠🟠🟠🟠🟠
    १ किलो कैरी' लोणच्यासाठी साहित्य:-
    - १ किलो कैरीच्या फोडी
    - २०० ग्रॅम मीठ
    - ५० ग्रॅम लाल तिखट
    - ५० ग्रॅम मेथीडाळ
    - १०० ग्रॅम मोहरीडाळ
    - १०० ग्रॅम कैरी लोणचं मसाला
    - ५ ग्रॅम हिरा हिंग ( खडे आणून कुटून मग मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी)
    फोडणीसाठी:-
    - ४०० मिली तेल (शक्यतो रिफाईंड शेंगदाणा तेल वापरावं. त्याने चव चांगली येते.)
    - ३० ग्रॅम मोहरी
    - १० ग्रॅम हिंग
    - २० ग्रॅम हळद
    🟠🟠🟠🟠🟠
    काही लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे:-
    १) लोणच्याकरता कैरी निवडताना, कैरी हिरवी असावी, कडक असावी आणि आंबट असावी.
    २) कैरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावी आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यावी व नंतर सावलीत वाळवावी. वाळल्यानंतर हव्या त्या आकाराच्या फोडी कराव्यात.
    ३) बरणीतून लोणचं काढताना, चमचा नेहमी स्वच्छ व कोरडा असावा आणि बरणीचं झाकण घट्ट असावं.
    ४) लोणच्याची बरणी नेहमी सावलीत ठेवावी किंवा फ्रीज मध्ये ठेवावी. त्याच्यावर ऊन पडेल आशा जागी ठेऊ नये. ह्यामुळे लोणचं चांगलं टिकतं व फोडी पण कडक राहतात.
    ५) कैरीच्या लोणच्यासाठी शक्यतो शेंगदाण्याचे रिफाइंड तेल वापरावे, त्यामुळे छान चव येते. पण नसल्यास, तुमच्या आवडीच्या दुसर्‍या कुठल्याही रिफाइंड तेलाचा वापर केला तरी चालेल.
    #वर्षभरासाठी #कैरी #लोणचं #अचूक #प्रमाण #raw #mango #pickle #for_a_year #exact #proportion
    कैरी लोणचं कसं करावं, वर्षभरासाठी कैरी लोणचं, कैरी लोणचे रेसिपी मराठी, कैरीचे लोणचे, कैरी लोणचं, कैरी लोणचे, kairi lonche recipe in marathi, kairi loncha, kairi lonche, 1 kg kairi lonche, 5 kg kairi lonche,

Комментарии • 86

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 2 года назад +3

    काकू मी खूप कन्फ्युज होते , लोणचे बनवू की नको , pn तुमचा video पहिला आणि लोणचे बनवायला घेतल ते pn 5 kg ch, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे sagle केल, खरच खूप छान झालाय, माझा माझ्यावर विश्वासच बसत नाही , की मी पन एव्हढ छान लोणच बनवू शकले.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होत तूम्ही चागलेच कराल आता पुढची काळ्जी पणं नक्की घ्या बर का

    • @Sandhyababhalikar1169
      @Sandhyababhalikar1169 2 года назад

      @@AnuradhasChannel नक्कीच , अणि thank you so much.

    • @Sandhyababhalikar1169
      @Sandhyababhalikar1169 2 года назад

      एव्हढे लोणचे फ्रीज मधे ठेऊ का ,????
      की राहील बाहेरही चांगले. ??

    • @Sandhyababhalikar1169
      @Sandhyababhalikar1169 2 года назад

      Plz काकू सांगा ना.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      श्यक्यतो प्रिजं मध्ये घट्ट झाकण लावुन ठेवाव वरून कापड किँवा प्लास्टिक बांधाव दर एक महिन्याने कोरड्या चमच्याने खालीवर लोणचे करावे, साधरण महिनाभर लागेल एवढे लोणचे बाहेर ठेवावे

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Год назад

    मस्त लसूण घातलेलं लोणचं मी नक्की करून बघेन वा खूपचं छान सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Год назад

    खूपच दोन्ही प्रकारची लोणची दाखवलीत
    कैरी लसूण लोणचे मी करुन बघेन .
    खूपच छान माहिती सागितलीत काकू .🙏🙏👌👌😋😋

  • @anuradhamankari2007
    @anuradhamankari2007 2 года назад

    Kaku khupach chan explanation …. Ekdam detail madhe sangitla tyamule loncha chanach honar 100percent…Thank you so much for the efforts you take for us 🙏😊

  • @deepikasalaskar
    @deepikasalaskar 2 года назад +1

    मस्त काकू तोंडाला पाणी सुटलं😋 आणि आईची खूप आठवण आली अशा चिनीमाती, लाल काचेच्या मोठ्या बरण्या कैरी, लिंबू,आवळा भरलेल्या आठवल्या ❤️Thanku

  • @latakulkarni709
    @latakulkarni709 2 года назад

    खूप छान तोंडाला पाणी सुटले तुमची सांगण्याची पद्धत पण छान आहे

  • @umapatil4756
    @umapatil4756 5 месяцев назад

    Khupach chan recipe

  • @bharatiwagh3423
    @bharatiwagh3423 2 года назад

    खूप छान माहिती टिप सांगितले धन्यवाद

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 Год назад

    मस्त चटकदार लोणच

  • @sweetygonsalves2329
    @sweetygonsalves2329 2 года назад +3

    धन्यवाद लोणच्याची रेसिपी छान आहे.गुळ घालून केलेल्या गोड लोणच्याची रेसिपी दाखवा.

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 года назад

    खूपच छान..लहानपणी आई एवढ्या मोठ्या प्रमाणात लोणची बनवायची...

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 2 года назад

    अप्रतिम.. चव आईंच्या हातची ..!!

  • @ratankhochare9471
    @ratankhochare9471 2 года назад

    Khup chan recipe aahe mast..

  • @rajbal8045
    @rajbal8045 2 года назад

    Kaku mast receipe sangitali ahe

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 Год назад

    Khup chan 👍

  • @poojamalshet3714
    @poojamalshet3714 2 года назад

    खुप मस्त👌काकू तोंडाला पाणी सुटतं😋

  • @meerakolambekar1658
    @meerakolambekar1658 2 года назад +1

    खुप छान रेसिपी

  • @alkayadav5973
    @alkayadav5973 2 года назад

    Tai khup chaan Thanks🙏

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 2 года назад

    Thank you. Will try the mango garlic pickle

  • @ankitakhatate1234
    @ankitakhatate1234 2 года назад

    Khupch chan 👌methiche praman jast zale tar lonche kadu hote ka n jar ase zale asel tar tyamadhe punha kirya ghalun mix kele tar chalel ka

  • @krishnakshirsagar3730
    @krishnakshirsagar3730 2 года назад

    Kaku, Mast aahe recipe.

  • @pushpakrishnan6150
    @pushpakrishnan6150 2 года назад

    Thaku kaku mouth watering 👍👍

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 2 года назад

    मस्त, लसूण घातलेले लोणचे नक्की करून बघेन मी 🙏😊

  • @swatikaname9056
    @swatikaname9056 2 года назад

    Kaku, me pardeshat ( germany) rahte, mala tumhala aikayla ani follow karayla khup awadta.. Kaku, garbharpanat ghyaychi kalji, kay khave , kasa vichar karava karan pahile 3 mahine Khup tras hoto.. Manat negative vichar yetat khup ekata vatata.. Ani nantar pan kay kalji ghyavi, garbhsanskar, swatahachi kalji kashi ghyavi ani tumchasarkha samadhani kasa asava.. Yavar ek video series ( 3 trimister) banva na please.. Mala ani mazasarkhya anekana madat hoil.. Love u kaku.. :)

  • @priyankaraut2474
    @priyankaraut2474 2 года назад

    खूपच सुंदर, काकू जी कैरी फक्त मिरची टाकून ठेवलीय त्यात कोणती मिरची टाकली होती व कैरी कोणती घ्यायची.

  • @aparnadeshpande8750
    @aparnadeshpande8750 2 года назад

    माईनमुळ्याचं लोणचं दाखवाल का काकू.
    तुमचे सगळेच पदार्थ खूप सुंदर असतात.

  • @anilsinhrajput1153
    @anilsinhrajput1153 2 года назад +1

    लोणचे मला पण घालायचे आहे, अनुराधाजि . गरम तेलात मसाला टाकावा की गार तेलात. Please mla sanga?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      तेल फोडणी किँवा अगदीं गरम करुन गार करून मग घालावे

  • @pallavipednekar9482
    @pallavipednekar9482 2 года назад

    नमस्कार काकी, तुमच्या सर्व रेसीपी छान असतात. मला माझ्या आईची आठवण येते तुमच्या रेसिपी बघून.
    लोणच्यात तेल कोणतं वापर्याच pl. Sanaga

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      Mi दाण्याचे किँवा तीळाचे वापरते

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 года назад

    Namaskar Kaku. Recipe khupch Mast

  • @vrushalideshmukh3282
    @vrushalideshmukh3282 2 года назад

    प्रिय काकू,सप्रेम नमस्कार.
    लोणचे फारच मस्त
    नम्र विनंती तो जो तिसरा मीठ + लाल मिरची चे recipe सांगाल का?

  • @aparnakamble9700
    @aparnakamble9700 2 года назад

    Kaku tumhi satvichi pooja/ balachi 5th day... plz dakhval ka, ani kahi sahitya nasel tar tya aivji kay vapru shaku, hey dakhval ka... Plz.. Thank you

  • @priyankaraut2474
    @priyankaraut2474 2 года назад

    Mirchi konti ghaychi ani totapuri kairi ghetli tr chalel ka

  • @priyankaraut2474
    @priyankaraut2474 2 года назад

    Kairi sathvtana mirchi nhi takli tr chalel ka

  • @malini7639
    @malini7639 2 года назад

    ताई खुपच छान लोणचे रेसिपी ताई ईतक्या लवकर लोणचे घातले तर ठिकते का . खानदेशात एक पाऊस पडल्यावर म्हणजे जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोणचे घालतात .

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      अगदी बरोबर, पण आमच्या शेतातील झाडाला लवकर येतात त्या झाडाच्या कैऱ्या लोणच्याच्या असतात, म्हणुन लवकर घातले 😄

    • @malini7639
      @malini7639 2 года назад

      हो का . 🙏

  • @sonalpotdar2886
    @sonalpotdar2886 2 года назад

    Mainmula lonche dakhva

  • @shailajak3734
    @shailajak3734 2 года назад

    खडा हिंग तळून घ्यायचा आणि मग मिक्सर मधे बारीक करायचं का?

  • @bhaveshpatil9664
    @bhaveshpatil9664 2 года назад

    मला कळत नाही taiyar masala ka टाकावा. आपण kasmiri mirchi घालून लाल करू शकतो. Taiyar masala Ani aapla masala डबल नाही होणार का?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      लोणच्याला स्वाद येतो तो हिंगाचा , आपल्याला सहज हींग बाजारात मिळतो तो तितका चांगला स्वादाचा नसतो, म्हणून वापरायचा लोणच्याचा तयार मसाला , कंपल्सारी नाही ,आपल्याला चांगला स्वदाचाहींग मिळाला तर मसाला घालू नये , पण सगळ्या गावातून उत्तम दर ज्याचा हिंग मिळतं नाही म्हणूच हा उपाय, मसाले माञ सगली कडे मिळतात, धन्यवाद

  • @malini7639
    @malini7639 2 года назад

    ताई फ्रीजमध्ये का ठेवायचे .लोणचे तर बाहेर छान राहू शकते .फ्रिजमध्ये काय ठेवायचे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      त्यामूळे एक तर बाहेरील हवा मनाचा परिणाम होत नाही व फोडी चांगल्या राहतात

  • @ankitsalve2595
    @ankitsalve2595 2 года назад

    Kaku mala tumchyashi kahi recipes badal bolayche aahe, tumhala kase contact karave ?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      9823335790 la संध्याकाळी कॉल केला तर चालेल

  • @ujwalasamant8442
    @ujwalasamant8442 2 года назад +1

    वाळवणाचे पदार्थ कुठे मिळतील.लोणचे तुमच्या हातचे कुठे मिळेल.

  • @woodconconsultants7655
    @woodconconsultants7655 3 месяца назад

    कैरीला मीठ लावून पाच सहा तास ठेवायचं तर दोन किलो च्या फोडींना किती मीठ चोळायचं जरा सांगाल का ? संध्याकाळी मीठ लावून रात्रभर ठेवावे का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 месяца назад

      साधारण एक किलो कैरीला 180 ते 200 ग्रॅम मीठ लागतं

  • @archana55555
    @archana55555 2 года назад

    Anuradha Tai... तुम्ही व्हिडिओ मध्ये मीठ 200 gm सांगितलं आहे पण desc मध्ये 100 gm लिहिलं आहे 1 kg साठी..5kg साठी पण 500gm लिहिलं आहे पण व्हिडिओत 1kg sangitl ahe...

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      Ho चुकून झले खूप खूप धन्यवाद , दुरुस्त केले आहे धन्यवाद

    • @archana55555
      @archana55555 2 года назад

      @@AnuradhasChannel 🙏

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 года назад

    Lasun ghalun lonache upvasala chalnar nahi ka?

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 2 года назад

      Khupach mast recipe Anuradha tai,varsha bhar sathavaychi gulambyachi recipe dakhaval ka

    • @shailajavaidya4623
      @shailajavaidya4623 2 года назад

      Upasala limbache kiva ambyache god lonache chalate.

    • @PriyankaPatil-ur1ez
      @PriyankaPatil-ur1ez 2 года назад

      chini mathi cha barni mydthe lonche changle rahate ka glass cha barni mydthe please reply

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      नाही चालणार

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      नक्की

  • @anaghavaidya3816
    @anaghavaidya3816 2 года назад

    गूळ घातला तर लोणचं टिकत नाही का काकू?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      हो टिकते पणं गुळ माञ चांगला पाहिजे बर का, ओला नको 🙏🙏

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 2 года назад

    फोडणी कसली केली

    • @dhananjaykale8347
      @dhananjaykale8347 2 года назад

      एका किलोचे प्रमाण प्लीज सांगावे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      एक किलो ला तीनशे ते चारशे ग्राम तेल घ्यावें

  • @suchitrajagtap9186
    @suchitrajagtap9186 2 года назад

    इतक्या लवकर लोणचे कसे घातले?

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад +1

      लोणच्याचा कैरीचे झाड आहे, आणी कैरी आंबट असेल व आतील कोय चांगलीं धरली म्हणजे पक्व झाली असेल तर लोणचे घालायला हरकात नाही हा आपला माझा अनुभव बर का 🙏🙏

  • @thakurgavit2045
    @thakurgavit2045 2 года назад +1

    👎👎

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      धन्यवाद तुमची खास रेसिपी plz सांगाल म्हणजे आम्हाला पणं कळेल

  • @bhaveshpatil9664
    @bhaveshpatil9664 2 года назад

    हे तुमची पद्धत एकदम चुकी ची आहे. पूर्वी काय फ्रिज मध्ये नाही ठेवायचो. तरी दोन वर्ष टिकायच.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      अगदीं बरोबर तुमचे म्हणणे पुर्वी फ्रिज नव्हते, तरी लोणचे टिकत होतें, पणं मी सांगितलेली पद्धत चुकीची आहे असे नाही म्हणता येत, कारण पूर्वी लोणचे घातल्यावर जी काळजी घेतली जायची ती आता घेतली जात नाहीं, शिवाय पूर्वीचे हवामान, थंडावा ,आता या सिमेंटच्या जंगलात कूठे राहिला आहे, लोंण च्या करता वेगळा कोनाडा किंवा जागा असायची हे आता आहे का, शिवाशिव नसायची हे सगळे पूर्वी होतें आता हे शक्य नाही, म्हणूनच हा उपाय, कैऱ्या मध्ये सुध्दा फरक आहे आपण वापरतो त्या मसाल्यात पण फरक पडला आहे मग इतकी मेहनत करुन केलेले लोणचे खराब होते म्हणून हा मार्ग म्हणा किंवा उपाय म्हणा, आपल्या अभिप्राय बद्दल खूप धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      शिवशिव होत नव्हती म्हणजे खरकटा हात, ओला चमचा, आंघोळ न करता लोणचे काढणे असा अर्थ आहे