श्री नरसिंव्ह सरस्वती मठ आळंदी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2020
  • श्री नरसिंव्ह सरस्वती मठ आळंदी
    सव्वीस वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यानंतर श्रीगुरुंच्या शोधार्थ महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरत फिरत मी श्री क्षेत्र आळंदी येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधी ठिकाणावर पोचलो. मन रमल्यामुळे मी इथे पंधरा दिवस राहिलो आणि चक्क श्री गुरुंशी संवाद साधला गेला. याच ठिकाणी माझ्या आयुष्याचे कल्याण आणि सार्थक झाले. त्यामुळे या ठिकाणचा परिचय करून देण्यात मला अतिशय आनंद होत आहे.
    श्री स्वामी महाराज दत्तगुरुंचे अवतार समजले जातात. त्यामुळे दर गुरुवारी त्यांचा मुखवटा श्री दत्तगुरूंचा त्रिमुखी असतो.इथे येण्याआधी ते पंढरपूरला बारा वर्षे होते. श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचा वज्रलेप त्यांच्याकडूनच झाला आहे. त्या काळात त्यांनी पंढरपूरला लक्ष भोजन घातले. तेथील व्यास मंदिरात ते राहत असत . आजही त्या ठिकाणी तळघरात संगमरवरी बांधलेले ध्यान मंदिर आहे. आणि त्यानंतर ते बारा वर्षे आळंदी क्षेत्रात राहिले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचे उत्थापन केले. ते स्वतः दरवर्षी देहूला तुकारामांची वारी करत असत.
    स्वत:च्या देखरेखीखाली आपले समाधिस्थान बांधून याठिकाणी त्यांनी समाधि घेतली. हा मठ अत्यंत शांत असून वैराग्यपूर्ण आहे. पौष पौर्णिमेला तेथे मोठा उत्सव होतो आणि हजारो लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात. इंद्रायणी काठी गोपाळपुर्‍यात हा मठ आहे.

Комментарии • 10

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Год назад +1

    सद्गुरू श्री नरसिंव्ह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🌹

  • @prashantgalande2352
    @prashantgalande2352 2 месяца назад +1

    अप्रतिम!🙏

  • @ketkidavari4561
    @ketkidavari4561 3 года назад +4

    श्री सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज🙏🌹🌹

  • @ameyabhide9450
    @ameyabhide9450 3 года назад +2

    नरसिंह सरस्वती सद्गुरू नाथ नारायण श्री दत्त जनार्दन एकनाथ

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 3 года назад +3

    जय श्री नरसिंव्ह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः 🙏🙏
    जय गुरुदेव 🙏🙏

  • @Ssr71083
    @Ssr71083 4 года назад +3

    Are wah amchya Aaiekade cha math 🙏

  • @manasic6013
    @manasic6013 2 месяца назад +1

    Ya matha baddal ani Swami maharaj n baddal mahiti pan Sangawi
    Dhanyawad

    • @arvindathalye
      @arvindathalye  2 месяца назад

      Please refer to" alandicheswami.org"

  • @snehaldeshmukh440
    @snehaldeshmukh440 3 года назад +2

    मला या संस्थान चा संपर्क करणे साठी कृपया नंबर मिळेल का ? मी परदेशात आहे