LAHUJI BOLA JOTILA | लहुजी बोलं जोतीला | SHITAL SATHE | MADHUR SHINDE | SACHIN MALI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • Production - Navayan Mahajalsa
    Song - Lahuji Boln Jotila....
    Lyrics- Sachin Mali
    Composer- Shital Sathe /Aniket Mohite
    Music Arrenger - Aniket Mohite
    Singer- Madhur Milind Shinde | Shahir Shital Sathe
    Indian Percussion- Rohan Pawar | Aniket Mohite
    Melody / Kyebord - Akash Salokhe
    Shehanai / Sundry- Kedar Jadhav
    Chorus - Kumar Jadhav | Tushar Sutar | Aishvarya Jadhav | Shivani Kadam | Babasaheb Atakhile | Vishal Parde | Aniket Mohite
    Recordist -Mr.Abhijit Saraf
    Recording /Mix-Master | Mr.Abhijit Saraf
    Lyrics :
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला
    हाय मी तुझ्या साथीला रं जागव ह्या मातीला...धृ
    मी जातीचा रं मांग
    फेडतो मातीचा ह्या पांग
    काय करू जोती सांग
    लाही लाही झालं आंग
    मी त्याल रं~
    त्याल हाय तुझ्या वातीला...
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला...१
    वरातीतला अपमान
    न्हाई इसरलो रं जोती
    तू शिक्षणाचं दिलं दान
    शब्दांच झालं मोती
    तू विद्येचं दिलं दान शब्दांचं रं मोती
    शब्दांचं झालं मोती
    आलं डोळ रं~
    डोळं आंधळ्या रातीला....
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला....२
    जवा शिकलं माझी लेक
    करील सवाल अनेक
    जाती धर्माची रं मेख
    म्हणलं उपटूनिया फेक
    भान येईल~
    येईल माझ्या जातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...३
    साऊच्या आडव्या कुंकवाला
    कोण घालतो आडकाठी
    हाय गाठ लहू मांगाशी
    दिमतीला फौज मोठी, हाय दिमतीला फौज मोठी
    कोण आलाया~
    आलाया बघतो कातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...४
    अंधाराचा काळ जोती, अंधाराचा काळ रं
    मुक्तीचं आभाळ जोती, मुक्तीचं आभाळ
    पिरमाची फुलमाळ जोती, पिरमाची फुलमाळ रं
    मायेची वाकाळ जोती, मायेची वाकाळ...
    तू रं समतेचा कैवारी
    दिशा मुक्त केल्या चारी
    ज्ञान सूर्य आला दारी
    मनूला पडला भारी
    केलं नमन~
    नमन साऊ जोतीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...५
    गीतकार : सचिन माळी
    ----------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत RUclips Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    ---------------------------------------------------
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official RUclips channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa.
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali

Комментарии • 2,5 тыс.