Raja Lalakri | Suresh Wadkar | Sayali Kamble |Shashank Kalyankar | Ek Sangeet Sandhya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 июл 2020
  • ‘Ek Sangeet Sandhya’ dream work of Shashank Kalyankar a passionate percussionist, hosts music concerts. This songs was performed at Mahalaxmi Saras 2020, Mumbai Event by Hon. Suresh
    Wadkarji and Sayali Kamble.
    गीतकार : जगदीश खेबुडकर, गायक : अनुराधा पौडवाल - सुरेश वाडकर, संगीतकार : अनिल-अरुण, गीत संग्रह / चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)
    राजा ललकारी अशी घे
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घे
    हो हो हो हो
    कुंकवाचा माझा धनी
    बळ वाघाचं आलंया
    भरलेल्या मोटंवानी
    मन भरून गेलंया
    कुंकवाचा माझा धनी
    बळ वाघाचं आलंया
    भरलेल्या मोटंवानी
    मन भरून गेलंया
    ओढ फुलाला वाऱ्याची
    तशी खूण इशाऱ्याची
    माझ्या सजनाला कळू देss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेsss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेssss
    ओss सूर भेटला सूराला
    गानं आलं तालावर
    सूर भेटला सूराला
    गानं आलं तालावर
    खुळ्या आनंदाचं माझ्या
    हसू तुझ्या गालावर
    भरजरीचा हिरवा
    शेला पांघरून नवा
    भरजरीचा हिरवा
    शेला पांघरून नवा
    शिवार हे सारं फुलू देssss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेsss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेsss
    थेंब नव्हं हे घामाचं
    त्याचं बनतील मोती
    घास देईल सुखाचा
    लई मायाळू ही माती
    थेंब नव्हं हे घामाचं
    त्याचं बनतील मोती
    घास देईल सुखाचा
    लई मायाळू ही माती
    न्याहारीच्या वखुताला
    घडीभर ईसाव्याला
    सावली ही संग मिळू देsss
    हाक दिली साद मला देsss
    ओss राजा ललकारी अशी घेsss
    हाक दिली साद मला दे ओss
    राजा ललकारी अशी घेsss
    हो हो हो हो
    हो हो हो हो
    हो हो हो हो
    हो हो हो हो
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 1,9 тыс.

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 2 месяца назад +53

    वाजंत्री कलाकारांसाठी एक लाईक तर बनतोच 😊

  • @rjcreations7042
    @rjcreations7042 3 года назад +278

    वय 65 मात्र आवाज 30 वर्षाच्या तरूणालाही लाजवेल #Legend Suresh wadkar ji.

    • @bhalchandranagavekar3829
      @bhalchandranagavekar3829 2 года назад +2

      5 years

    • @abhijitpawar2343
      @abhijitpawar2343 15 дней назад

      केसांची काय गरज आहे 😅

    • @namrata9218
      @namrata9218 9 дней назад

      ​@@abhijitpawar2343 त्यांच्या बायकोला टक्कल बघण्याचा कंटाळा आला असेल .. लोकांना काय जातं बोलायला ..

  • @maheshmandavkar4317
    @maheshmandavkar4317 2 года назад +113

    हा आवाज जर नेहमीच कानावर पडला तर शेतात राबताना - काम करताना अजिबात थकवा जाणवणार नाही....खूपच मस्त आवाज....आणि त्याहू न शेतकरी गीत मस्तच आणि तेही सुरेश वाडकर सोबत गायन केलात.....आई भवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो....⛳️⛳️⛳️

    • @anilnagkirti3691
      @anilnagkirti3691 10 месяцев назад +2

      Karach ataynt god Ani sumadur
      As awaj man prasann hote

    • @apsara8763
      @apsara8763 9 месяцев назад

      ​@@anilnagkirti3691❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @Pavanu_01
      @Pavanu_01 3 месяца назад +2

      2:12 2:12 2:12 2:12

    • @user-nb2bd8mm9j
      @user-nb2bd8mm9j 2 месяца назад

      Right bhau ❤

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Год назад +39

    सायली आज प्रथमच तुझं गाणं ऐकलं .तेही दिग्गज गायक सुरेश वाडकरांबरोबर...मनापासून आवडलं..गोड आवाज आहे तुझा .दैवी देणंच..अशीच छान गात राहा सायली..तुला खूप शुभेच्छा... पूर्ण वाद्यवृंद चमूचंही कौतुक...

  • @laxmanshardul9074
    @laxmanshardul9074 3 года назад +985

    एक लाईक वाजंत्रीवाल्यांसाठी खुपच छान 👌👌👍👍💖💖

  • @sanjanawalekar1034
    @sanjanawalekar1034 3 года назад +417

    सुरेश वाडकर यांच्या बरोबर उभे राहून गाणे ... 🙏🙏
    अभिनंदन सायली...खूप शुभेच्छा

    • @rajeshgawali2090
      @rajeshgawali2090 2 года назад +5

      अशी गायक या देशाला मिळाली हे आपल भाग्य

    • @rajeshgawali2090
      @rajeshgawali2090 2 года назад +3

      काय आवाज़ आहे तुझा तु आजची आशा ताई आहे!

    • @balajisangrapwar3052
      @balajisangrapwar3052 2 года назад +2

      सायली खुप भारी आवाज

    • @subswithoutVDO
      @subswithoutVDO Год назад +2

      Sayali nice voice and Suresh wadkar is great

  • @vidyarajput6546
    @vidyarajput6546 3 года назад +28

    सायली तु किती नशीबवान आहे सुरेश वाडकर सोबत तूला गायाला भेटल तेही सुपरहिट गान आजुन काय खुशी पाहीजे जे हे सगळेच छान संगीत वाजवतात तुम्हालाही नमस्कार खूप खूप 👌💚👌 तु मोठी गायीका होणारच 💓

  • @pradipnavale6492
    @pradipnavale6492 3 года назад +294

    सायलीला सुरेश वाडकर यांच्या सोबत गायला भेटले हे तीचे भाग्य म्हणायचे, सायली सुद्धा कुठेही कमी नाही.
    सायलीचा आवाज खुप गोड आहे.

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 3 года назад +6

      Ti Suresh Wadkar yanchyakdech shikali ahe

    • @rajeshgawali2090
      @rajeshgawali2090 2 года назад

      सायली जिंकली

    • @tejalgaikar1673
      @tejalgaikar1673 2 года назад

      @@rajeshgawali2090 that's really good

    • @sulbhazarande3800
      @sulbhazarande3800 2 года назад

      @@tejalgaikar1673 ⁰⁰⁰

    • @jaydeepmansingh3810
      @jaydeepmansingh3810 2 года назад

      Suresh Wadkar yanchya sobat gayla bhetle karan sayali Kamble hi Suresh Wadkar yanchi Student ahe ti tyanchya Academy madhe Singing shikli ahe so tyamulech tila Indian Idol n ase barech show bhetle.Karan Suresh Wadkar yanchi Student mahnun.Baki story sagli fake hoti tichi Je channel karte kayam saglya show madhe fake

  • @sudhir270
    @sudhir270 2 года назад +225

    सायली, किती गोड आवाजाची गुणवत्ता आहे तुझ्यात. महान सुरेश वाडेकर जी सोबत हे सुंदर गाणे ऐकताना खरोखरच खूप आनंद होत आहे🙏🙏

    • @rajeshgawali2090
      @rajeshgawali2090 2 года назад +2

      खरोखर गोड आवाज आहे

    • @sunitaraut6720
      @sunitaraut6720 2 года назад

      Bjbcc

    • @ashokmore4737
      @ashokmore4737 2 года назад +1

      लताजी

    • @VijayJadhav-th2qc
      @VijayJadhav-th2qc Год назад

      गुणवता आहे पन.. भावना जोडून गाणं नहीं ना म्हणता येत.

    • @madhukarkamble2884
      @madhukarkamble2884 Год назад +1

      खुपच सुंदर

  • @chitrajoshi6432
    @chitrajoshi6432 3 года назад +66

    सगळे वादक कलाकारांचे खूप खूप अभिनंदन, सायली छान गायलीस, शुभेच्छा 🌺👍💐💐💐👍🌺🌺🌺

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x 2 года назад +38

    साधारण कुटुंबातील लेक.. सुराची ईश्वरी देण आहे... सायली👍

  • @DattaOak
    @DattaOak 3 месяца назад +25

    मला मोहम्मद रफी नंतर सुरेश वाडकर आवडतात

  • @Kmandar84
    @Kmandar84 3 года назад +667

    सगळे बोलतात की indian idol show fake आहे पण त्यातले कलाकार तुमचे निखळ मनोरंजन करतात. किमान Big Boss show सारखी फालतूगिरी तरी नसते किमान आपल्या मराठी मुलाना चांगल्या कामाचा मोबदला तरी देतात. सायली कांबळे, नचिकेत लेले, आशिष कुलकर्णी, अंजली गायकवाड यांना किमान नाव कमावण्याची संधी तरी देतात

    • @pratikaiwale6830
      @pratikaiwale6830 3 года назад +2

      Brobar aahe.........👍

    • @bestone3686
      @bestone3686 3 года назад +2

      Yes. Very true 👍

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 года назад +10

      असेल पण जे जिंकत नाहीत तेच स्टार गायक बनतात 👍👍👍

    • @voiceofyoung6064
      @voiceofyoung6064 3 года назад +9

      बिग बॉस निपट चूतियापा वाला शो है. हमारी संस्कृति और सभ्यता के विपरीत और बहुत आपत्ति जनक है.

    • @SG-ip1ee
      @SG-ip1ee 3 года назад +7

      Ho pan khot bolun??

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 3 года назад +231

    खूप छान सायली.... सुरेश सरांच्या सोबत उभे राहणेच एक अभिमानाची गोष्ट आहे... तू खूप गोड व सहज गाते .... तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.....

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 3 года назад +6

      खूप छान प्रतिक्रिया

    • @vaibhavsurve5974
      @vaibhavsurve5974 3 года назад +3

      Khupac chan voice ahe

    • @nanasahebwaghmode2097
      @nanasahebwaghmode2097 Год назад

      Apratim

    • @DipakKhanzode
      @DipakKhanzode 5 месяцев назад

      मराठी भाषेची बोलु कौतुके अमृतातही पैजा जेंके

  • @uttamtarkase7108
    @uttamtarkase7108 Год назад +9

    सायलीजी यांनी असेच आणखीन कांही गाणी वाडकरजी यांच्या बरोबरच गाऊन लोकांना चकीत करून सोडावे.आणि आपण ही हिऱ्याच्या खणीत राहुन मी ही किती चमकु शकते हे ही लोकांना दाखवून द्यावे.सुभरात्री.धम्मरात्री.

  • @rameshwardinde8549
    @rameshwardinde8549 3 года назад +36

    खरंच सायली ताई तुझं कसं कौतुक करावं माझ्याकडे शब्दच नाही महाराष्ट्राचं नाव सह्याद्रीच्या पर्वतावर नेऊन ठेवलं❤️❤️🙏🙏
    🔥🔥❤️जय महाराष्ट्र ❤️ 🔥🔥

  • @nileshsuryawanshi70
    @nileshsuryawanshi70 3 года назад +36

    भारतीय संस्कृती जपणार सॉंग 💎👌👌

  • @dinanathjaiswal1866
    @dinanathjaiswal1866 2 года назад +16

    आदरणीय सुरेश वाडकर जी आप अद्भुत प्रतिभा के स्वामी हैं मुझे विश्वास है कि सायली किशोर कांम्बले को आपका आशीर्वाद सदैव मिलेगा और वह भी प्रसिद्ध गायिका बनेगी। आपको सादर प्रणाम और सायली को बहुत-बहुत आशीर्वाद 🙏🙏

  • @girishkobal4457
    @girishkobal4457 2 года назад +23

    ताई साहेब नतमस्तक होतो तुमच्या आवाजाला माझा महाराष्ट्र माझा अभिमान

  • @sunildarade7066
    @sunildarade7066 2 года назад +6

    सायली ताई खरोखर खूप अप्रतिम आवाज आहे तुमचा आणि वाडकर साहेबान सोबत गाणं म्हणजे खूप रियाज आणि तयारी ती तर तुमची आहेच सायली ताई तुम्ही खूप मोठया सिंगर व्हा हीच विठू माऊली चरणी प्रार्थना ,,,,आपलाच सुनील दराडे 🙏

  • @sameersayyad4537
    @sameersayyad4537 3 года назад +81

    सुरेश जी सर को सुनते वक्त मैं बहोत ही अदब से बैठकर सुनता हुं, उनके हर अल्फाज् इतने पाक होते हैं की माय goose bumps 🙏

    • @yuvrajmali7552
      @yuvrajmali7552 2 года назад +1

      L

    • @suvarnashah6015
      @suvarnashah6015 Год назад

      @@yuvrajmali7552 ह्ज्ज्च्ज ज्च्चुव्ज्व्जुच्च्वच उफ य,फ्य चुफ7

  • @rupeshsubhedar1969
    @rupeshsubhedar1969 3 года назад +10

    खूप छान सायली.. खरच खूप छान गायलीस तू. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 🙏

  • @swapnilumare8259
    @swapnilumare8259 3 года назад +55

    सायली कांबळे एकदम रुदायला लागणारा तुमचा आवाज आहे. मला वाटते तुमचा आवाज ऐकत रहाव. कस मन खूप हलक होते .खूपच छान सायली कांबळे...🙏🙏

  • @sanjay41000
    @sanjay41000 3 года назад +77

    सायली तुला शुभेच्छा।
    सर्वाना विनती करतो इंडियन आइडल मध्ये सायली ला विजेते करा ति आपल्या महाराष्ट्र ची मुलगी आहे.

  • @satishkorde5425
    @satishkorde5425 3 года назад +6

    सुरेशदादा तर कमालीचेच, सायलीने पण कमाल केली आहे या गीतामधुन

  • @vaishalitayade1365
    @vaishalitayade1365 3 года назад +6

    वाह सायली खूपच सुंदर गीत गायले सरांनच्या सोबत 👌

  • @vaibhavgurav4241
    @vaibhavgurav4241 3 года назад +3

    ह्या वयात सुद्धा सुरेश वाडकरांचा काय आवाज लागला आहे.....खूप छान.... सायली तुला शुभेच्छा.....

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 2 года назад +8

    खूप छान सायली.. मधुर आवाज.. आणि सुरेशजी तुमचा तर सवालंच नाही 👌👌👍

    • @sureshsomavate8593
      @sureshsomavate8593 Год назад

      ़़लखैखगलैहघहघलाहैैलबललवठा,

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 3 года назад +9

    खूप छान
    सायली ताईचा गाताना अत्म विश्वास अप्रतिम
    सुरेश वाडकर सरा बरोबर गायला मिळणे हिच भाग्याची गोष्ट

  • @samadhangore4942
    @samadhangore4942 6 месяцев назад +3

    सायली कांबळे तुझा आवाज खूप मधुर आहे...सर्व वादक किती अचूक आणि परफेक्ट वादन..सुरेश वाडकर आपण तर महान आहात

  • @user-fv5se5dm5c
    @user-fv5se5dm5c 9 месяцев назад +7

    अप्रतिम खूप च छान❤❤❤❤ मन अस प्रसन्न झालं 💯☺️☺️☺️☺️

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 3 года назад +6

    खरचं काय जादू आहे माहीत नाही काही गाण्यात...त्यातील हे एक ❤️

  • @pramodjimaharajofficial3042
    @pramodjimaharajofficial3042 3 года назад +10

    खूप छान सायली जी. क्या गाया हैं.... मन शांत हो गया ......
    अप्रतिम
    जितनी तारीफ करो उतनी कम हैं....

  • @dnaneswariholambe152
    @dnaneswariholambe152 11 месяцев назад +6

    खूपच छान कालार साठी एक लाईक

  • @zeemantherobinhood
    @zeemantherobinhood 2 года назад +33

    I am not familiar with the language, but when it’s Suresh Wadekar, it’s all about Melody.. He has the most sweet and soothing voice. Listening to him doesn’t need to understand the words. His voice is what matters.
    Love and respect from Pakistani fan….

    • @shilpaambhore7249
      @shilpaambhore7249 Год назад +2

      Right! Listening to him doesn't need to understand the words.

    • @ashokkadam9206
      @ashokkadam9206 Год назад +2

      My.dear.daughter.Saily.Kamble
      Jai.Bhim.wonderful.voice.and
      sung.I.am.proud.of.you.keep.on
      including.Wadkar.saheb

  • @dipakbagade1068
    @dipakbagade1068 5 месяцев назад +4

    हे गाणं ऐकल्यावर खरच शेतकरी असल्याचा गर्व वाटतो ❤

  • @allabakshamullabambavade5108
    @allabakshamullabambavade5108 2 года назад +5

    सायली आणि सुरेश वाडकर सर ,,,,, खुप छान वाटले हे गाणे ऐकताना ,,,,,, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 года назад +3

    सायली तू वाडकर सरांबरोबर इतकी आत्मविश्वासाने गायलीस. खूप खूप छान वाटलं ऐकताना. ऊर भरून आला. Indian idol साठी तुला खूप खूप शुभेच्छा .अशीच गोड गात रहा. God bless you.

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 20 дней назад

    मी लहानपणापासून हे गाण ऐकतेय मला खूप आवडत आणि पावसाळ्यात तर खुपच,सुरेश जी अजुन ही त्याच ताकदीने गात आहेत 👌👌👍👍

  • @shekharsurkar690
    @shekharsurkar690 2 года назад +2

    सुरेश वाडकर यांच्या सोबत गान गायला खुप नशीब लागते आणि ते तुला मिळालं सायली.खुप नशिबवान आहे तु.बेस्ट ऑफ लक भावी जीवनासाठी.सुरेश वाडकर हे माझे खूपच आवडते मराठी गायक आहे.

  • @Jigar4221
    @Jigar4221 3 года назад +17

    Sayli Kamble....Already Established Singer......Singing With Legend Suresh Wadkar😊😊😊😊

  • @prashantnevase8625
    @prashantnevase8625 3 года назад +3

    सुरेशजी चा व सायली कांबळे चा आवाज खुप मस्त आहे सुरेशजी चे गाणी अमर आहेत किती दिवसातून ऐकली तरी ऐकावेच वाटतात
    सुरेश जी व सायली दिदि आजुन नविन गाणी तयार करुन आपल्या महाराष्ट्राची मातृभाषेतील गाण्याची आवड निर्माण हाेईल व सगळ्यांना मराठी गाण्यात रस येईल , सुरेशजी वाङकर म्हणजे मराठी गायनातील अष्टपैलू गायकार आहे
    जय महाराष्ट्र जय बारामती

  • @vpcreation5959
    @vpcreation5959 2 года назад +2

    मराठी song फक्त सुरेश सरांच्या आवाजातच चांगले वाटतात आणि सायली नशीबवान आहे ,,जे की एवढे महान गायक सुरेश सर यांच्या सोबत गायनाचा प्रसंग आला

  • @swaraliwahurwagh6286
    @swaraliwahurwagh6286 2 года назад +10

    Sayali sung the song better than original.Very nice voice. Freshness and different type of joy sprays her voice.. Good luck Sayali for your bright future..

  • @dayanndkale473
    @dayanndkale473 3 года назад +3

    सायली फार सुंदर गायलीस ....
    सुरेशजींसोबत गाणे गायला मिळने हेच फार मोठं आहे ...पण तू legend सोबत गाताना पाहून आंनंद झाला ...
    god bless you

  • @bhupalbisht8672
    @bhupalbisht8672 3 года назад +17

    Ye toh pahle se hi champion hai sayli.. Indian idol se pahle se hi

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI Месяц назад +1

    सायलीचे मस्त गायन आहे. सुरेश सर नेहमीप्रमाणे चिरतरुण गायक. आमच्या कोल्हापूरचे एक रत्न.

  • @yogeshinamdar6414
    @yogeshinamdar6414 10 месяцев назад +1

    गळा मोकळा कर तायडे! कुठं जायला पाहिजे आवाज तुझा !

  • @sudarshandurge8238
    @sudarshandurge8238 2 года назад +5

    खुपच अतिशय गोड आवाज आहे. गाणं अयकल तर मण अगदी भरून आलं 👌👌👌

  • @shraddhadevrukhkar4318
    @shraddhadevrukhkar4318 Год назад +3

    वाडकर सहेबांसोबत गाणं गायच म्हणजे हिम्मत पहिजे आणि सायली ताईने ती हिम्मत केली खुप छान आणि वाजंत्रीमंडळी खूप छान गजवल तुम्ही 👌🏻

  • @rajujadhav4655
    @rajujadhav4655 2 года назад +11

    वाह! मस्तच...
    स्टुडिओत गाणं आणि लाईव्ह गायच फरक असतो, दोघेही अप्रतिम..
    सायली खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळात तुझी सुंदर गाणी रसिकांना ऐकवत रहा.

  • @madhurijadhav7484
    @madhurijadhav7484 Год назад +13

    Excellent...superb.... Fantastic.... Mind-blowing.... Khup ch chhan presentation.... Sayli is my favorite singer.....but Suresh ji is the best😊 ...orchestra all team very good job 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @bhikajidhone4093
    @bhikajidhone4093 3 года назад +6

    सायली हे तुझे मोठे भाग्य हाये, की तुला सुरेजी सोबत गाणं गायला मिळालं. माझ्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @harishshenoy5951
    @harishshenoy5951 3 года назад +16

    Sayali happy to see singing Marathi song, with legend Wadkar . Very lucky . Superb singing . God bless you.

  • @haridesai998
    @haridesai998 9 дней назад

    शेतात काम करताना फक्त सुरेश वाडकर आणि लता मंगेश करांची गाणे ऐकायची कधीच थकवा जाणवणार नाही. नेहमी फ्रेश वाटत गाणी एकल्यावर❤😊

  • @sukumardutta9260
    @sukumardutta9260 Год назад +6

    Sayli Kamble is singing with best singer Suresh Wadkar which is lovely and reach the heart of all listeners

  • @vasupradhan954
    @vasupradhan954 3 года назад +10

    सुरेश जी वाडकर सर आपण खुप खुप छान सुंदर अप्रतिम लयभारी गायक आहेत मनापासून धन्यवाद आभार

  • @ganeshjatale9686
    @ganeshjatale9686 Год назад +1

    मि आईकल होत की सुरेश जी सर च गाण साक्षात भगवंत उभा राहुन आईकत असलं मला आज कळलं हे गाणं आईकुन वा सरस्वती मातेचि कृपा आहे

  • @mahadevdesai2437
    @mahadevdesai2437 3 года назад +54

    खूप खूप गोड आवाज आहे बोलकं डोळे छान वाटले गाणं त्या मुळेच मला खूप आवडते खुप आशीर्वाद पोरी खूप खूप शुभेच्छा

  • @parbatiramessar3854
    @parbatiramessar3854 2 года назад +11

    Marvelous. Sayli the Most Brilliant singer. Also Suresh Saab the Most Outstanding artist. The two voices matched so well together. Sayli is the singer for the next generation to come. Magnificent singing. Super super great. Performance. Thank you everyone for this wonderful moment.

  • @nitinnakade1014
    @nitinnakade1014 3 года назад +5

    सायली कांबळे यांचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन गेले

  • @nagoraogawali1142
    @nagoraogawali1142 14 дней назад

    माझं हे गाणं अतिशय अतिशय आनंदाचं आहे. मला हे कित्येक वेळा ऐकावसं वाटतं.

  • @HareKrishna9397
    @HareKrishna9397 9 месяцев назад +1

    आज ही महाराष्ट्राच्या माझ्या ग्रामीण भागात हे गीत कुठं ना कुठं वाजत असतच असतं... कधी नांगरणाऱ्या ट्रॅक्टर वरती, कधी उसाच्या ट्रॅक्टर वरती... कधी कुणा शेतकऱ्याच्या मोबाईल वरती... स्व. खेबुडकर, सुरेश जी आणि सर्वांना च लाख धन्यवाद ह्या गीताबद्दल

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 3 года назад +4

    वाडकर सर आमचे गाव वाले आवाज अदभुत, आहेच पंचगंगेची आणी अंबाबाई चा आशीर्वाद् आहे त्यांच्या पाठी मागे , पण सायली तूझा आवाज फार मधूर आहे

  • @sanjaykamble668
    @sanjaykamble668 3 года назад +19

    सायली बेटा तुझी youtub वरची गाणी नेहमी ऐकत असतो तुझा आम्हा कांबळे परिवाराला प्रचंड अभिमान वाटतो. उत्तरोत्तर काळात तुझ्या कंठातून सरस्वती अशीच बरसत राहो ही सदिच्छा.

    • @diptikasbe7776
      @diptikasbe7776 3 года назад

      मग खोटं कशाला बोलायचं घरी tv नाही ते ....indian idol मधे सगळं fix असतं एवढ्या मोठ्या कलाकारासोबत गाणं गाते न गरीब म्हणते स्वतःला shame on u

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf Месяц назад

    सत्यम शिवम सुन्दरम ❤❤❤ सायली तू नशीबवान आहेस मोठ्या गायक बरोबर धन आहेस ❤❤❤❤

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Месяц назад

    वाजंत्री वाजवतात ना त्यांची कमालच आहे हो,
    अप्रतिम आणि सुमधुर सुंदर आहे हो

  • @ashokjadhav7684
    @ashokjadhav7684 3 года назад +4

    Shashanji, saileela सर्वात वरच्या शिकखरावरती नेउन ठेवा. ग्रेट आशा भोसले'च्या बाजूला हीच साधना.

  • @vinitasingh2625
    @vinitasingh2625 2 года назад +30

    Sayli is beautiful, her voice is very sweet. I love all her songs. ❤

  • @Motivation.711
    @Motivation.711 Год назад +2

    Sayali ur so lucky yar, aapne suresh ji ke sath gaya hai yar kash hum bhi gaa pate

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад +2

    जुने गाणे असूनही त्याची मधुरता ऐकून प्रसन्न होते.. गायकी छान.. ऑर्केस्ट्रा बेस्ट..

  • @mahendradusane6615
    @mahendradusane6615 Год назад +5

    ग्रेट🙏🙏🙏👍👍 सायली खुप सुंदर आवाज .

  • @DipMotivation
    @DipMotivation 2 года назад +5

    Suresh watkar is most iconic sound in Marathi songs industry 🌹🥰

  • @akashmadke1503
    @akashmadke1503 2 месяца назад

    सुरेश वाडकर सर अरे बापरे आवाज ऐकून एवढं सुख भेटल खूपच....❤❤❤❤

  • @jamirkhanpathan2096
    @jamirkhanpathan2096 Месяц назад

    खूप खूप शुभेच्छा. सायली तू फारच चांगली गायली. सुरेश वाडकर सोबत उभी म्हणजे तू खूप पुढे जाशील .

  • @govindsharma1262
    @govindsharma1262 2 года назад +6

    संगीत की आन बान शान है साईली .🙏🎧🇮🇳✍️

  • @vijaykumarkadam8630
    @vijaykumarkadam8630 7 месяцев назад +3

    छान.............

  • @djbhoslesaund3201
    @djbhoslesaund3201 26 дней назад

    सुरेश सर यांच्या बरोबर गायला मिळाला म्हणजे आयुषाचे सोन झाले

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 10 месяцев назад +2

    खुपच छान अप्रतीम सर्व ग्रुप. विषेश
    वाजंत्री अप्रतीप 💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @amitganguly6279
    @amitganguly6279 2 года назад +10

    With Great Anuradha Paudwalji and Suresh wadkarji sweet voice timber 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yashpatil765
    @yashpatil765 3 года назад +6

    Sayali khup chan Gayle's .Maharashtra cha abhiman ,ani shaan ahe tu. Kya baat hai khupach sundar

    • @anjumattou7541
      @anjumattou7541 3 года назад

      Sayile👌👌👌👌👌💃💃💃

  • @theorder1548
    @theorder1548 Год назад +2

    👍👍!👌👌!💐💐जय हो आपकी सुरेशजी सायलीजी

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 2 года назад +6

    व्वा अप्रतिम सादरीकरण!

  • @jaypalmule1408
    @jaypalmule1408 3 года назад +25

    Sayli your voice quality is amazing . I know for sure that you will be a successful playback singer . God bless you and all the best .

  • @Rkreddy8811
    @Rkreddy8811 3 года назад +9

    Sudesh Wadkar sir great singer

  • @umeshSable-nf6yr
    @umeshSable-nf6yr Месяц назад +2

    Vadak hyanchya sathi ❤sey ek like 😊

  • @smrutisagarsinha896
    @smrutisagarsinha896 3 года назад +86

    I don't know Marathi language but it's beautiful composition..I love it

    • @mastiwithsharvil2987
      @mastiwithsharvil2987 2 года назад +3

      That means you know what is the music
      Real music lover

    • @smrutisagarsinha896
      @smrutisagarsinha896 2 года назад

      @@mastiwithsharvil2987 yes ...music have no language devidation .it's only for feel of song and music .

  • @jaspaldeedarsinghsandhu2596
    @jaspaldeedarsinghsandhu2596 3 года назад +5

    The Legend Sureshji Aapka kya kehna😊😊😊🙏🙏🙏
    And sayli superb singing😊😊👍👍👍

  • @sanjaysinha3936
    @sanjaysinha3936 2 года назад +10

    Syali , lucky playing with Great Singer Suresh jee. Your voice is incomparable with any one. Crack the world.

  • @alpanaphanse7805
    @alpanaphanse7805 2 года назад +3

    सायली तू खूप छान गाते त्यातुन तू सुरेशजी बरोबर गायलीस अप्रतिम। आम्हाला वाटत तू मराठी शो मध्ये पण गावास

    • @rajeshgawali2090
      @rajeshgawali2090 2 года назад

      मराठी फिल्म मधे गावस
      असे वाटते

  • @harshalmahajan5851
    @harshalmahajan5851 Год назад

    सगळ्या माय बाप जनतेनी खूप कष्ट घेतल आहे , खूप छान

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 3 года назад +10

    सुरेल आवाजाचे उत्तम द्वंद्व गीत..! God bless Suresh & Sayali..!

  • @siddheshwarpatil633
    @siddheshwarpatil633 2 года назад +3

    Maharastrachi shan ahet suresh badakar sir 🚩🚩🚩🚩

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 года назад

    वा वा सायली छान. महाराष्ट्र रत्नाची खान आहे हे परत एकदा सिद्ध केलंस.

  • @siddharthmuneshwar679
    @siddharthmuneshwar679 2 года назад +1

    Wadekar saheb aani sayali pavarful singing khupach God aavaj Aahe beta tuza.

  • @vijaynitnavare667
    @vijaynitnavare667 2 года назад +4

    Jay Bhim Namo Buddhay ,,, sayli

  • @bhagoravkamble8750
    @bhagoravkamble8750 3 года назад +24

    Both are singer's great in future सायली खूप चांगली सिंगर होईल तिच्या भावी वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @amolsabhadinde5079
    @amolsabhadinde5079 2 года назад +21

    Sayali your voice is so beautiful and you sing song with Suresh Wadkar sir it's great pleasure to you ❤️👍 Congratulations sister ❤️

  • @tejaswikumar9100
    @tejaswikumar9100 2 года назад +1

    Kya bat hai sayli .tumhe legend ke sath stage share kr chuki ho .tum already champion ho .Indian idol vale kya judge krenge tumhe .

  • @shwetabawane5852
    @shwetabawane5852 2 года назад +5

    खुप मन हलक झाल गाणं ऐकून 👍🏻👍🏻👍🏻