Forgiveness, Ego & Acceptance | Hema Honwad | Khuspus with Omkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • माफ करणं अवघड का आहे? Forgiveness आणि forgetfulness एकच आहे का? माफ करायचं म्हणजे दरवेळी let go करायचं का? माफी मागण्यात कमीपणा का वाटतो? माफीचे टप्पे काय असू शकतात? माफी मागण्याची वेळ असते का? क्षमा केल्यानंतर काय होतं? स्वतःला माफ करणं का महत्वाचं आहे आणि ते शक्य आहे का? या सगळ्यावर आपण हेमा होनवाड (शिक्षिका, Educationist) यांच्याशी खुसपुस केली आहे.
    Why is forgiveness so difficult? Are forgiveness and forgetfulness the same? Does forgiving always mean letting go? Why does apologizing sometimes feel like a loss of dignity? What are the different stages of forgiveness? Is there a right time to apologize? What happens after we forgive? And most importantly, why is self-forgiveness essential, and is it truly possible?
    We explored all these questions in a heartfelt conversation with Hema Honawad (Teacher and educationist). Stay tuned for an insightful discussion!
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Guests: Hema Honawad (Teacher and educationist).
    Host: Omkar Jadhav.
    Creative Producer: Shardul Kadam.
    Editors: Madhuwanti Vaidya, Rohit Landge.
    Edit Assistant: Ranjit Kasar.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savani Vaze.
    Business Development Executive: Sai Kher.
    Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: Khuspus
    #AmukTamuk #MarathiPodcasts #khuspus
    02:08 - What is forgiveness?
    12:07 - How does it help in overcoming negativity and boost growth.
    24:12 - Open communication strengthens relationships.
    36:23 - Self-forgiveness aids healing and resolution.
    48:32 - Mindfulness & trust building

Комментарии • 167

  • @aparnas5823
    @aparnas5823 День назад +5

    आवाज किती soothing आहे यांचा ,,ऐकताना खूप जाणवतोय

  • @ashish2nd
    @ashish2nd День назад +3

    ओंकार आणि team, तुम्ही अप्रतिम काम करताय. एकापेक्षा एक विषयांवर बोलत आहात. लगे रहो.
    या ही विषयावर एपिसोड होऊ शकतो असं मला वाटलं पण नव्हतं. खुप आवडला.

  • @chandrashekharmoghe3649
    @chandrashekharmoghe3649 14 часов назад +1

    सुंदर पॉडकास्ट 👍👍👍टीम ओंकार अभिनंदन

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 23 часа назад +5

    मला वाटतं माफ करून पुन्हा त्या वाटेला न जाणे ज्यामुळे दु:ख वाट्याला येईल.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 4 дня назад +58

    आपण माफ करून आपण कमीपणा घेऊन सुद्धा समोरचा माणूस आपल्याशी बोलत नसेल, तेच ते धरून ठेवत असेल, संवाद करत नसेल तर काय करायचं 🤔 फक्त आपल्यावर नसतं ना ते अवलंबून 😢😢

    • @pgogte
      @pgogte 4 дня назад +3

      Tyaana tumchyashi hya pudhe sambandh nasel thevaycha, he tyancha choice ahe. Tumhi mafi magun swatah varun te ojha kami karu shakta pan samorchya la nata adhi sarkha karnya sathi kahi karu shakat nahi.

    • @anjalibhardwaj5757
      @anjalibhardwaj5757 4 дня назад +4

      अगदीच तुम्ही योग्य मांडला आहे विचार.
      ह्याच स्थिती मधून मी पण सतत जातीये

    • @KartikSangle-uq9gi
      @KartikSangle-uq9gi 3 дня назад +7

      काही चुका अक्षम्य असतात

    • @sachinraut7041
      @sachinraut7041 3 дня назад

      @@shitaloak4362 त्यांना हा व्हिडिओ शेअर करून पहा.

    • @futurol4177
      @futurol4177 2 дня назад

      बरोब्बर

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 5 дней назад +13

    हा पॅाडकास्ट ऐकून - वपुंच्या ‘आपण सारे अर्जुन’ मधली अर्जुनाची अवस्था झाली.
    तसंच ‘डोर’ नावाचा हिंदी सिनेमातला शेवटचा प्रसंग आठवला. नायिका म्हणते - मैं माफी देके भगवान् नहीं बनना चाहती !!’ आणि तिची सासू तिला उत्तर देते, भगवान् के नसीब में ये भाग्य कहाँ की वो किसी को माफ कर सके!!!’
    खूप छान विषय निवडला. वक्त्री स्वतःच इतक्या शांत स्वभावाच्या दिसतात की तेच एक गुण त्यांच्याकडून घ्यावा.

  • @mandakhandare621
    @mandakhandare621 3 дня назад +4

    हा विषय खरंच खूप गरजेचा होता. कारण आजकाल प्रत्येकाचा इगो खूप मोठा झालेला आहे की या इगो मुळे नाती दुरवताय हे ही लक्षात येत नाहीये. माफ करणे आणि माफी मागणे या गोष्टींमुळे आयुष्य किती सुरळीत होऊ शकत हे हेमा ताईंनी खूप छान सांगितले. Thank u ओंकार. तुझे सर्वच पॉडकास्ट केलेले एपिसोड मी बघते, ऐकते आणि स्वतःमध्ये positive असे बदलही करून घेते. Thank u.😊

  • @rekhagovind168
    @rekhagovind168 2 дня назад +1

    ओंकार तूझ खूप कौतुक, इतका क्लिष्ट विषय तु घेतला पण तितकाच सोपा करून हेमा मॅडम ने
    सांगितलं ❤मि स्वतः अश्या प्रसंगातुन गेली कि स्वतः ला पण माफ करता येतं नव्हतं व समोरच्या व्यक्तीला ला तर नाही च नाही 😢 हेमा मॅडम सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करत आहे,सतत तो प्रसंग आठवून मगं सतत माफ करत जा वे ❤❤

  • @ankitabhitkar8951
    @ankitabhitkar8951 11 часов назад

    Khupnkhup thank you so much Dada Tumchya Channel chya subject mule Manshik Health better better bnvta yet thanks alot🎉

  • @kanchannene
    @kanchannene 5 дней назад +13

    खूप गरज होती या संवादाची मला... खूप आभार 🙏

  • @kalyanithatte256
    @kalyanithatte256 4 дня назад +2

    खूप आवश्यक विषय.... ह्यावर एकदा गुलज़ारांचा शेर वाचला... अन् जगणं सोप झालं.... तो असा...."* हमने हमारा जीना आसान कर दिया,.....
    बहोतोसे माफी मांग ली... बहोतोको माफ कर दिया*" ... 🍀

  • @shailamohanpurkar191
    @shailamohanpurkar191 День назад +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेत, नक्कीच अवलंब करुन.मनापासून धन्यवाद.

  • @SuperSowani
    @SuperSowani 20 часов назад

    किती सुंदर विषय विवेचन केलंय !
    भारावून ऐकलें , जणू माझ्या मनातील भावना आहेत असें जाणवतें, अर्थात सगळ्यांना हे अनुभव येतातच...
    त्यांना माफ करायचें म्हणजे स्वतःच्या हृदयाची काळजी घेतली जाते आहें !
    धन्यवाद मॅडम व ओंकार तुम्हा दोघांचें 🙏💐

  • @kalpanabhosale3250
    @kalpanabhosale3250 4 дня назад +2

    खूप खूप धन्यवाद 🙏ह्या पॉडकास्टची खरंच गरज होती. खूप काही अजून माहिती ऍड झाली माझ्या अभ्यासात. ऑलरेडी let go चा अभ्यास चालू आहे आणि ते कसं करावं हे लोकांना शेअर करते. Thankyou once again for this important & valuable session. 🙏

  • @vinayakkulkarni4785
    @vinayakkulkarni4785 3 дня назад +1

    फारच छान विषय घेतला आहे,क्षमा तिथे शांती.

  • @rkulk1
    @rkulk1 2 дня назад

    अतिशय महत्वाचा आणि आत्ताच्या आधुनिक काळात अत्यंत गरजेचा विषय. होनवाड बाईंनी किती सोप्या शब्दात समजावलं आणि ओंकारने देखिल योग्य प्रश्ण विचारले. Great podcast! Well done!

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 День назад

    खूप सुंदर विषय 🎉
    Forgiveness खूप आवश्यक आहे, आपल्या स्वतः साठी 🙏🙏
    Thank you very much.

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 5 дней назад +5

    खुपचं छान आणि गरजेचा विषय घेतला ❤Thank you

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v 4 дня назад +2

    खूप छान झालाय हा एपिसोड..
    पती पत्नीचं नातं आणि त्यात एका जोडीदाराने वारंवार केलेली प्रतारणा ,विवाहबाह्य संबंध व त्यातून निष्ठावान जोडीदाराला झालेले विश्वासघाताचे दु:ख
    यामुळे नातं उध्वस्त होतं.यातून बाहेर येणं जड जातं.यावर एखादा एपिसोड करावा.

  • @MrudulaShahana
    @MrudulaShahana День назад

    खूप छान एपिसोड ,माफी एक एवढी process असते हे प्रथमच जाणवले . आपला शोध आपण घ्यावा हा विचार खूप आवडला. धन्यवाद विषय निवडण्याबद्दल आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल 🙏🏼

  • @shraddhalimaye7108
    @shraddhalimaye7108 3 дня назад +3

    अप्रतिम podcost as usual 👍🏻👌🏻.... मी तुमचे सगळे पॉडकास्ट पाहते आणि अतिशयोक्ती नाही पण मी literally स्वतःला rebuilt करतेय....खूप चांगले बदल मी करू शकले स्वतः मध्ये.... थँक्स शार्दूल आणि ओंमकार.... Lots of blessings to u.... खूप पुण्य कामावताय तुम्ही... 🙏🏻

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 дня назад

      आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, खूप खूप धन्यवाद ❤ लोभ असावा!

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 5 дней назад +2

    अतिशय सुंदर, खूप मोठा आणि संवेदनशील विषय निवडला, धन्यवाद 🙏.

  • @ujwalakarmalkar3529
    @ujwalakarmalkar3529 4 дня назад +1

    चर्चा छान झाली.मला वाटतं माफी मागणं आणि माफ करणं ही अध्यात्माची पहिली पायरी...

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 дня назад +1

    समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक मध्ये सांगितले आहे… जग हे दिल्या घेतल्याचे….
    …बा अंतकाळीचे कोणी नाही… हे लक्षात ठेवल तर…सगळा प्रवासच सहज सुखकर होईल.🙏🙏🙏🙏🙏

  • @AvinashYadav-d8u
    @AvinashYadav-d8u 5 дней назад +2

    Tumache vishaya khup chan asatat khup shikayala milat khup khup dhnyavad

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 5 дней назад +1

    जिवन जगत असताना मनात आजचा विषय तग धरून होता....तो असह्य करीत होता....या एपिसोड मुळे मन अगदी मोकळे झाले एका चुकी तून व्यक्त होऊन ....
    मुक्त झाल्या सारखे वाटते. 👌👍🙏🙏

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 4 дня назад +2

    ❤ओंकार आलेल्या पाहुण्यांनी विषयाबद्दल चर्चा होताना त्या बाबतीतली उदाहरणे देऊन स्पष्ट केलं तर जास्त चांगलं वाटेल. निरनिराळ्या वयोगटातील माणसांचे खरे अनुभव ऐकून तो विषय जास्त relate karata येईल.❤❤ नवरा-बायकोचे हेल्दी रिलेशन यावर एक व्हिडिओ प्लीज. ओंकार आणि अमुक तमुक खूप लोभ आहे आणि राहणार .

  • @kalpanasancheti9608
    @kalpanasancheti9608 5 дней назад +1

    खूप छान आणि महत्त्वाचा विषय निवडला.
    हेमाताई नी तितक्याच सहजपणे सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर छान लक्ष वेधले.
    प्रामाणिक ,प्रांजळ ,समग्र निवेदन वाटले..खूप छान

  • @vijayakadam5573
    @vijayakadam5573 4 дня назад

    अप्रतिम ओंकार सर आणि हेमा मॅम 🙏 माझ्या सहीत प्रत्येक माणसाला आवश्यक आणि परिपूर्ण माहिती ऐकली या पॉडकास्ट मधे , मन संतुष्ट झालं . हेमा मॅम ने गांगुली कुटुंबाचा जो अनुभव सांगितला तो प्रसंग स्वतः माझ्या आयुष्यात घडला आहे फक्त 2 वर्षे झाली आहेत. हेमा ताई मी ही माझ्या मुलाच्या मित्राला असंच समजावलं, अतिशय उत्तम पॉडकास्ट 🙏 मार्मिक प्रश्न आणि ओघवती भाषेत उत्तर ओंकार सर आणि हेमा मॅम दोघांचेही मनापासून धन्यवाद.🙏🙏🌹 30:25

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 4 дня назад +1

    फार सुंदर एपिसोड 🙏 हेमा ताईंकडून या विषयावर ऐकणे फार प्रेरणादायी👍👍

  • @Rutumun
    @Rutumun 4 дня назад +1

    अचूक प्रश्न, मुद्देसूद संभाषण, अप्रतिम! Clickbait च्या जमान्यात खरोखरीच उपयोगी content creation करताय खूप खूप शुभेच्छा!

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 День назад

    विद्या ताई पटवर्धन यांच्या ओळी छान!
    पाहुण्या ताई खूप सौम्य, शांत व उदाहरणे देऊन त्यांनी तिला समजावून सांगितले...

  • @ankitakarle8295
    @ankitakarle8295 День назад

    खूपच छान चर्चा ❤
    अगदी महत्त्वाचा विषय आहे. 👍

  • @manishanimbalkar5008
    @manishanimbalkar5008 4 дня назад +1

    खूप सुंदर विषय हाताळात खुप आवडला हा विषय यामुळे नक्कीच स्वतः मध्ये बदल घडू शकतो 👌👌👍

  • @radhikachavan891
    @radhikachavan891 5 дней назад +3

    ओंकार खूपच लवचिक विषय हाताळलाय झाडाचं आणि नदीचं उदाहरण परफेक्ट आपण कोणी संत महात्मा नाही साधी माणसं आहोत परंतु प्रयत्न नक्कीच करता येईल आणि स्वापरिवर्तन होईल... समोरचास आपण बदलू शकत नाही पण स्वतःला बदलू शकतो उत्तम पॉडकास्ट...

  • @florydmonte4297
    @florydmonte4297 День назад

    Excellent…. Forgiveness is base of Christianity….thats the reason it has confession process……very essential for peaceful life…. Thank you for this topic

  • @ranjanabarve5205
    @ranjanabarve5205 4 дня назад +1

    मॅडम किती शांत स्वरात बोलत आहेत. त्यातूनच सर्व भिडत आहे

  • @parry9842
    @parry9842 3 дня назад

    Thanks for another banger episode!

  • @rajendramore1683
    @rajendramore1683 3 дня назад

    स्वतःच स्वतःला,,, स्वतःच दुसऱ्याला,, माफ केल्यानं आयुष्यातील बऱ्याच कठीण, अवघड,, आणि जटील समस्या बऱ्याच अंशी, सहज, सोप्या आणि अगदीच सोप्या वाटू लागतात... हे आपण खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे.. चुकीला माफी नाही,,, असं न म्हणता चुकीला माफी असायलाच हवी,,, आणि मगच नवीन येणारा दिवस हा,, पुढील आयुष्याचा खऱ्या अर्थाने पहिला दिवस असेल 🙏🙏🙏धन्यवाद

  • @Yogawithmedha
    @Yogawithmedha 4 дня назад

    अमुक तमुक चे खूप आभार आणि अभिनंदन. आजचा विषय तर सगळ्या विषयांचा शिरोमणी आहे. Thank you mam ना पण ,👍🙏

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 4 дня назад +1

    Khoop sunder charcha khoop shikaila milale❤❤❤😊

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 5 дней назад +2

    मनातला अढीचा, इगोचा बोळा काढून टाकून क्षमेचं आणि निरोगी संवादाचं निर्मळ पाणी वाहतं करायला लावणारा एपिसोड... किती सुंदर! फार छान झालाय हा भाग...किती वेगवेगळे आणि आवश्यक विषय घेऊन येता तुम्ही!! तुम्हाला भरपूर शुभेच्छा!!

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 дня назад

      लोभ असावा ❤

  • @shalaka6200
    @shalaka6200 4 дня назад

    विषय उत्तम आहे. जर चाकोरीबद्ध आयुष्य असेल तर ह्या सर्व उपायांचा खूप फायदा होईल. पण.......कधी कधी अशा घटना घडतात की माफ करण्याऐवजी जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. आपल्या हतबलतेमुळे जर माफ करावे लागले तर मन कायम अस्वस्थच राहील.

  • @jyotsnarajurkar6777
    @jyotsnarajurkar6777 3 дня назад

    Sarvat pratham vishay khupch chhan nivadala aani Mala sagle prashna pan khup yogya vatale.sagli clarity aali mam tar khupch apratim aahet.
    Thanks alot for this session.

  • @bhuvneshmore7859
    @bhuvneshmore7859 2 дня назад

    खूप छान विषय ,प्रामाणिकपणे छान मत मांडणी ❤❤

  • @gayatrivasant
    @gayatrivasant 3 дня назад

    अप्रतिम संवाद, अत्यंत गरजेचा…हा सुद्धा विषय असू शकतो हे कधी लक्षात आलेच नाही. हेमा मॅडम अगदी सहज बोलत होत्या, त्यानी नक्कीच वैयक्तिक आयुष्यात या गोष्टीचा विचार आणि उपयोजन( theory and practical application) दोन्ही अनेक वेळ केले असणार!!

  • @sunitadeshpande2195
    @sunitadeshpande2195 4 дня назад

    नेहमीप्रमाणेच सुंदर एपिसोड. अमुक तमुकच्या वारंवार प्रेमात पडायला होतय.❤

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 5 дней назад +1

    अत्यंत छान विषय घेतला..❤😊🙏👍🏻

  • @manaliparulekar5779
    @manaliparulekar5779 День назад

    विचारवंत प्रश्न आणि उत्तरे.. सॉलिड ❤

  • @swapnilbachal7756
    @swapnilbachal7756 4 дня назад

    अतिशय अप्रतिम मार्गदर्शन !👌
    मनात चालेलेलं द्वंद्व शांत झालं ❤️

  • @PrashantDeokar-l8l
    @PrashantDeokar-l8l День назад +1

    खूप छान! कृपया narcissism, narcissist,narcissistic या विषयावर डाॅ.नंदू मुलमुले सरांबरोबर एक छान एपिसोड करा!

  • @sumitradeodhar108
    @sumitradeodhar108 4 дня назад

    आचरण्यास अत्यंत अवघड,अशक्य वाटणाऱ्या, पण, ठरवलं तर सहज शक्य होणाऱ्या आणि आयुष्य सोप्पं, हलकं करणाऱ्या ,महत्त्वाच्या विषयाची मार्गदर्शक चर्चा.धन्यवाद अमुक तमुक टीम.सर्वात आवडलेली बाब...प्रश्न खूपच छान विचारलेत ओंकार.
    Mam च्या व्यक्तिमत्त्वातील शांतपणा खूप भावला.

  • @Sk-zp4mo
    @Sk-zp4mo 5 дней назад +2

    खूप सुंदर हा विषय समजवून सांगितले thanku you अमुक तमुक

  • @neelimadeshpande2536
    @neelimadeshpande2536 3 дня назад

    Very very nice and very useful information shared. Thank you so much to madam and you

  • @maithileeapte9838
    @maithileeapte9838 5 дней назад

    Khup sundaar charcha aahe. Aprateem vichaar mandalet tumhi!

  • @ranjana624
    @ranjana624 3 дня назад

    ओंकार तुझं मनापासून कौतुक आणि आभार! तू खू.... प विविध विषयांवर चर्चा घडवून आणतोस. आणि आमचे डोळे उघडतोस. आजचा विषय सुद्धा ज्वलंत 😂आहे. हेमा ताईंनी फार सुंदर विचार मांडले आहेत. खूप धन्यवाद!

  • @smitamalpure9669
    @smitamalpure9669 2 дня назад

    अतिशय सुंदर विधान आहे

  • @sharayukulkarni4421
    @sharayukulkarni4421 День назад

    खूप सुंदर podcast.. विषय देखील खूप अवघड होता

  • @meghanajoglekar7387
    @meghanajoglekar7387 4 дня назад

    ,अतिशय उत्तम विचार.मला आवडत असे वागायला.

  • @Arch-138
    @Arch-138 3 дня назад

    खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 дней назад

    नेहमीप्रमाणे एकदम हटके विषय. Thank you अमुक तमुक❤

  • @gourilicious
    @gourilicious 8 часов назад

    Beautiful.

  • @truptinadkarni3179
    @truptinadkarni3179 4 дня назад

    Khup chan vishay ... dhanyavaad 🙏

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 День назад

    छान विषय , छान मुलाखत...

  • @summer090306
    @summer090306 4 дня назад

    खूप सुंदर एपिसोड...खूप उपयुक्त.
    खूप खूप धन्यवाद🙏

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 5 дней назад +1

    खूप भारी ...छान....धन्यवाद

  • @sheetalsingarwadi5215
    @sheetalsingarwadi5215 4 дня назад

    या विचारांची खुप गरज आहे सग़ल्यांसाठी

  • @__S_J_
    @__S_J_ 5 дней назад

    Such a complex topic explained in a simple manner. 👌🏻👌🏻. Thanks a lot. That said Hema Ma'am has such a soft soothing voice. ❤

  • @sandhyabarke4377
    @sandhyabarke4377 5 дней назад +1

    Needed video.... Thank u much team

  • @shitalbhosale9577
    @shitalbhosale9577 5 дней назад +1

    Thank you🙏 for this podcast❤

  • @jyotidhakulkar7251
    @jyotidhakulkar7251 День назад

    खुप छान विषय

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 5 дней назад

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 4 дня назад

    Khup Chan vishalashane❤

  • @KavitaPatil-h1c
    @KavitaPatil-h1c 5 дней назад

    Khup chan episode...thanku team

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt 2 дня назад

    उत्तम चर्चा, खूप छान insights मिळाल्या. अमूक तमूक टीमला फक्त एक सुचवावसं वाटतं की जाहिरातींची संख्या आणि वारंवारता खूप असल्यामुळे फार डिस्टर्ब व्हायला झालं. जाहिराती महत्त्वाच्या आहेत, उत्पन्नाचं साधन आहेत, यूट्यूब प्रीमियम घेण्याचा पर्याय प्रेक्षकांना आहे वगैरे मुद्दे समजू शकतो पण पॉडकास्ट ऐकताना लोक बाकी कामंही करत असतात त्यामुळे जास्त त्रास होतो. ह्या बाबतीत काही करता आलं तर पूर्ण पॉडकास्ट नीट ऐकता येईल.

  • @prajaktachitre2870
    @prajaktachitre2870 4 дня назад

    खूप छान चर्चा झाली

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 4 дня назад

    Apratim episode 👌👌❤️

  • @sparklinglotus
    @sparklinglotus 4 дня назад

    Great questions, Amuk Tamuk ❤

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 4 дня назад

    खूपच छान होता हा एपिसोड

  • @JaeeParulkar
    @JaeeParulkar 5 дней назад

    Really excellent topic most needed ❤

  • @deepikachavan2010
    @deepikachavan2010 4 дня назад

    Khup chan....manatil prashn agdi sahaj sodvat Amuk Tamuk...Thank you so much ❤

    • @kishorlattoo5102
      @kishorlattoo5102 3 дня назад +1

      खूप छान संवाद. माफी च्या सर्व बाजू चर्चे मधे आणल्या. दोघांचेही हार्दिक अभिनंदन.

  • @swatirane7795
    @swatirane7795 3 дня назад

    ओंकार, आभारी आहे , चांगला विषय घेतला , एक taken for granted, again त्याबद्दल no guilt , ते carry on होते असे प्रसंग येतात ते कसे handle करायचे यावर तुमचे काही podcast आहे का

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 3 дня назад

    khup chan topic , oankar , khup navin eikayala milale apkya thought madhye nakki farak padto.
    asech navin topic ghet ja

  • @gayatrikhaire8674
    @gayatrikhaire8674 5 дней назад

    खूप छान 👌👍

  • @smitawaghchaure6611
    @smitawaghchaure6611 День назад

    मी १५ वर्ष झाले माझी चूक नसताना माफी मागत संसार करत आले पण आता मुल मोठी झाली , मुलांसमोर नको ते बोलेल जात मी विरोध करून बोलले तर नातच नको म्हणून मी माहेरी आहे....मला आता अस वाटत की माझी चूक नसताना मी पहिल्यांदा माफी मागितली नसते तर ही वेळ आली नसते

  • @shailamohanpurkar191
    @shailamohanpurkar191 День назад

    कधी कधी एखादी व्यक्ती कशाचा राग धरून बसते हे देखील कळत नाही तरीही आपण क्षमा मागतो, जाणूनबुजून आपण चुक केली नसते,पण तरीही आपण क्षमा मागतो.ती व्यक्ती साधी दखलही घेत नाही.अशा वेळेस काय करावे.वारंवार त्रास देखील देत नाही,कारण आपण तिच्या कायम सहवासात नसतो.स्वतास

  • @HarshadaWaghmare
    @HarshadaWaghmare 2 дня назад

    Ek episode Dr Bhooshan barobar please about childhood trauma due to physically and verbally abusive parents and how to heal from it. Thank you 🙏🏽

  • @sujatapophale6192
    @sujatapophale6192 День назад

    Khup mast episode hota...
    Maf na karu shaknaryani pudhe ayushyala kase direction dyavi hyavar pn ek episode karava ashi vinanti ..

  • @chhayajadhav6758
    @chhayajadhav6758 4 дня назад

    खुपच छान मलापण खुप गरज होती

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 4 дня назад

    खूप छान नमस्कार दोघांना

  • @PrajaktaDilpak
    @PrajaktaDilpak 5 дней назад +1

    Your videos are such a helpful thanks ❤

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 5 дней назад +4

    ओम सर मराठी cc नाही येत, ते बघा जरा
    बाकी विषय खूप च खोल आहे
    खरतर माफी, ego etc ,,, विचार फार मोठा आहे सगळ्यांनी स्त्री पुरुष दोघांनीही अमलात आणयला हवा ,पण कधी कधी हे करूनही नाती पहिल्या सारखी नाही होत कारण माहित नाही, बहुदा ते मनात सलत राहत,
    माझा अनुभव असा आहे मी 1000 % सॉरी ,माफी ,पुढाकार घेतला पण अस केल्यावर समोर माणसने माझी कमजोरी, किंवा नात्याची गरज म्हणून मी केलं अस समज झाला आहे ,,, असो
    प्रत्येकाचं अनुभव वेगळा नाती , माणस वेगळी असू शकतात, 😊😊
    पुरुष ह्या जाती बाबतीत मला जास्त अनुभव आला आहे ,बाबा, भाऊ, मैत्र etc असो ....😊😊

  • @sunilabhise3014
    @sunilabhise3014 5 дней назад

    Thank you

  • @ShivajiBhapkar-m5p
    @ShivajiBhapkar-m5p 4 дня назад

    Khucha Chan

  • @pratibhaphalak5718
    @pratibhaphalak5718 4 дня назад +2

    खूपच सुंदर विषय घेऊन छान चर्चा झाली आहे मॅडम किती शांतपणे बोलतात ते अगदी मनाला पटत जाते. खरच खुप सुंदर वाटले.

  • @rupalijoglekar6409
    @rupalijoglekar6409 5 дней назад +3

    Video आवडला.. भावला .. कारण आयुष्यात मी स्वतःला माफ केलय, दुसऱ्याला माफ केलय आणि दुसऱ्याकडे माफी मागितली पण आहे..

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 5 дней назад +8

    कुटूंबातील काही व्यक्ती बेजबाबदार पणे वागतात त्याना कशाप्रकारे रोज माफी करायचं का?

    • @ruchainamdar748
      @ruchainamdar748 4 дня назад +6

      खरं आहे...भारतीय कुटुंब व्यवस्थेचा जरी आपण फार अभिमान वगैरे बाळगत असलो तरी इतरांच्या जबाबदारी टाळल्याने एकावरच जबाबदारी येते...घरोघरी कुटुंबाने डावलल्याची, मनात कडवटपणा असल्याची उदाहरणे दिसतात...

    • @sanhitakelkar3691
      @sanhitakelkar3691 4 дня назад +5

      खरतर पुरुष बऱ्याच वेळा चुकीचं वागतात, माफी मागत नाहित, स्त्रियांना गृहीत धरले जते ही वस्तुस्थिती आहे. त्याबद्दल चर्चा कोणीच करत नाही. माफ करून काहीं उपयोग नसतो, समोरचा माणूस त्याचा ही गैरफायदा घेतो

    • @shalakasarpotdar5716
      @shalakasarpotdar5716 3 дня назад +1

      Agadi barobar........Ati sodun dilya goshti ki lok dokyavar bastat ani tyacha tras mahabhayankar hoto kimbahuna khup tras aaplyala vhyava Ashish samorchya chi ichha aste, mag Asha lokana maaf karat rahaych ani parat parat apmanaspad vagvun ghyayche? Tyapeksha sambandh n thevne ch Yogya

    • @mazeweb1
      @mazeweb1 22 часа назад

      Ti limit jyane tyane tharvavi. Kinva maaf Karun baher padav. Karan kiti divas tumhi toxic environment madhe rahanar? Mala mahiti ahe bolane soppa ahe pan agadi cha ashakya nahi

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 4 дня назад +1

    एक खुसपुस साठी विषय सुचवासा वाटतो तो म्हणजे "षुरूष नसबंदी"यावर चर्चा व्हावी असे वाटते

  • @PriyankaPatil-ce2kh
    @PriyankaPatil-ce2kh 4 дня назад

    Manat Kay aplay challay te hay vedio madhe samor disun ala. Ki kharacha apan Tay topic madhu baher padla pahije.. thanks for this vedio...

  • @Parisinmyview
    @Parisinmyview 4 дня назад +1

    I would suggest one thing: if possible, take a single emotion and create two or three different episodes with different experts to see how each interprets it and shares their lessons.