King Khandoba’s Hunting Expedition Documentary(1992) - Guenther Sontheimer | Ahilya Film
HTML-код
- Опубликовано: 18 ноя 2024
- A film by Guenther Sontheimer and Henning Stegmueller (82 min, colour, 1992). This film uses a kind of magic realism to transport the viewer from contemporary Jejuri, a small pilgrim town near Pune that has a fortress-like temple of the God-king Khandoba, through scenes of the Somavati Amavasya (New Moon Monday) festival that celebrates the marriage of Khandoba with the beautiful Dhangar shepherdess, Banu or Banai. It tells the story of Khandoba seeing Banu in a dream and getting smitten by her. Under the pretext of a hunt, he goes in search of Banu and woos her for several years in the guise of an old man. After twelve years, Khandoba rides back to Jejuri with Banu and his subjects cheer the couple and carry them to the King’s temple-palace.
सोमवती अमावस्या - कृष्ण पक्षातील अखेरची तिथी अर्थात अमावस्या सोमवारी आल्यास त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात,हिंदू धर्मामध्ये या तिथीला अनन्य साधारण महत्व आहे व हि एक पर्वणी असल्याने संपूर्ण हिंदूस्थानातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या पर्वणी निमित्ताने देवतांना नदी स्नानासाठी नेले जाते. परंतु या सर्व तीर्थ क्षेत्रांमध्ये जेजुरीचा सोमवती पर्वणी सोहळा विलोभनीय असा असतो. या पर्वणी विषयी धार्मिक संदर्भ असे आहेत कि खंडोबाला शिवाचा अवतार समजले जाते व शंकराच्या डोक्यावर चंद्रकला सततच असते, अमावस्येला चंद्र जरी दिसत नसला तरी तो शंकराच्या डोक्यावर सततच विराजमान असतो, या समजुतीने व सोमवार हा शंकराचा वार म्हणून सोमवती अमावस्या ही खंडोबाच्या भक्तांना प्रिय आहे.
या संबंधातील कथा अशी सांगितलीजाते - देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले व त्यातून चौदा रत्ने निघाली. त्यात रंभा नावाची एक अप्सरा होती. तिच्या मनात अशी इच्छा होती, शंकराने आपणास वरावे. परंतु रंभा इंद्राच्या वाटेला आली त्यामुळे रंभेच्या मनातील इच्छा अपूर्ण राहिली. नारदाच्या सांगण्यानुसार तिने शिवाचा जप केला व शंकर महादेव प्रसन्न झाले.'मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईन त्यावेळी तू माझी पत्नी होशील' असा वर शंकराने तिला दिला. त्यानुसार सोमवती अमावास्येला त्याने रंभेची मनोकामना पूर्ण केली. म्हणून श्री खंडोबा म्हाळसादेवीसह पर्वणी स्नानाचे वेळी क-हा नदीवर रंभाई मंदिरात जातात. पर्वणी स्नानासाठी श्रीखंडोबा-म्हाळसा मूर्ती मंदिरातून पालखीमध्ये ठेवून नेल्या जातात.महाद्वारातून पालखी बाहेर पडते व बाणाई मंदिराकडून नंदी चौकामध्ये येते, त्यावेळी पालखी पुढे देवाचा घोडा सामील होतो. नंदी चौकातून पालखी डावीकडे वळून अहिल्यादेवी चौक मार्गे गोसावी मठाकडून मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर येथे विसाव्यासाठी थांबते. त्यानंतर होळकर संस्थानची मानाची छोटी पालखी सोबत घेऊन हा पालखी सोहळा लेंडी ओढामार्गे मशिदीकडून मराठीशाळा, शिवाजी चौकातून पुढे मरीआई मंदिराजवळ विसाव्यासाठी जातो.या ठिकाणी लंगर तोडला जातो.मरीआई मंदिराच्या उजव्या बाजूने पालखी धालेवाडी कडे प्रस्थान ठेवते.मध्ये ठरलेल्या ठिकाणी विसावे घेत पालखी सोहळा क-हा तीरावर रंभाई मंदिरामध्ये येतो. त्यानंतर श्रीं चे मूर्तींना पर्वणी स्नानासाठी पालखीतून बाहेर काढले जाते तेव्हा देवाला स्नान घालण्यासाठी भाविकांची झुंबड उडते.पर्वणी स्नानानंतर पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला निघतो, धालेवाडी येथे बाबीरबुवा मंदिराला शिडाची भेट देवून चौकामध्ये विसावतो.तेथून पुढे फुलाई माळीनीच्या विसाव्यावर थांबल्यानानंतर पुढे निघताना मूर्तींचा ओलांडा केला जातो. (ओलांडा म्हणजे श्रींच्या मूर्ती मोठ्या पालखीतून काढून होळकर संस्थानच्या मानाच्या पालखीमध्ये ठराविक अंतरासाठी ठेवल्या जातात.) तेथून पावूतका मार्गे जानुबाई मंदिरामध्ये उशिरापर्यंत पालखी थांब पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या प्रहरात जानुबाई मंदिरातून हलतो व गायमुख मार्गे मारुती मंदिराजवळ नगर पेठेमध्ये दाखल होतो.त्यावेळी पेठेतील व्यापारी व ग्रामस्थ दिवटी बुधली घेऊन पालखी सोहळा प्रकाशमय करतात. नंदी चौकातून पायरी मार्गाला लागून पालखी वीरभद्र हेगडी प्रधान गणेश मंदिर मार्गे महाद्वारातून गडावर प्रवेश करते. भंडार गृहामध्ये मूर्ती स्थापित केल्यानंतर खांदेकरी मानकरी मंडळींना देवाच्या शेतामध्ये पिकलेले मुठभर धान्य रोजमुरा (रोजगार) म्हणून दिले जाते व सोमवती पालखी सोहळ्याची सांगता होते.
Thanks: Jejuri.in
Follow us: / ahilyafilm
Contact us: ahilyabaiholka...
#Khandoba | #Documentary | #Guenther Sontheimer
I was searching this documentory of gunther sontheimer... I heared he use to attend Pandharpur wari every year ... It is very unfortunate that he left this world at 58..... His love for marathi, Khandoba and vithoba will be in our hearts..
Many many thanks to Gunther sir for his incredible work...lord Shiva bless you sir .. wherever you are
Thanks for the sharing🙏🏻
I am surprised to see only 1k views for such nice documentary..
जय मल्हार देवा
*जय खंडोबा - जय मल्हार*
*धनगर अजयपालसिंह होलकर*
Guntur is very nice beautiful movies
Great documentary great work 👍
Yelkot yelkot jai malhar
Jay malhar raje holkar
Jay Malhar