तलासरी तालुक्यातील चिकन कंपनी मुळे नागरिक हैराण! आमदार विनोद निकोले आपण गप्प ? न्याय मिळवून द्या!
HTML-код
- Опубликовано: 5 янв 2025
- तलासरी तालुक्यात तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब कारभार!
आर्थिक अंडी देणारी कोंबडी असल्यामुळे कंपनीकडे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
, अनेक लेखी तक्रारी करून सुद्धा दुर्गंधीयुक्त वास जमीन पाणी प्रदूषित करणाऱ्या चिकन कंपनीवर कारवाई होत नसल्यामुळे अखेर गावकऱ्याने या कंपनीवर मोर्चा काढला होता.
आमदार विनोद निकोले साहेब आमच्याकडे लक्ष कधी देणार ! वडवली मधील नागरिक त्रस्त आमदार साहेब आता तरी लक्ष द्या ग्रामस्थांचे शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधी विनोद निकोले यांना साकडे.
. जाणून घेऊया सविस्तर बातमीपत्र.
तलासरी तालुक्यातील वडवली नवापाडा येथे असलेल्या सेटवाला फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या मांसाहारी खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीत चिकन पासून निरनिराळे पदार्थ तयार केले जातात. कंपनीत दरोरोज पोल्ट्री फार्म मधून येणाऱ्या हजारो कोंबड्यांची स्वयंचलित यंत्रावर कत्तल करुन खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरले जातात. स्वयंचलित यंत्रावर कापलेल्या कोंबड्याची साफसफाई करताना निघणारे सांडपाणी व रक्त कंपनीतील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प (ई.टी.पी) मध्ये साठवण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येते. परंतु कंपनीतून कोंबड्यांची निघणारी घाण आणि सांडपाणी यामुळे गावपाड्यात दुर्गंधी पसरली असून कंपनी लगत असलेल्या ओहळ तसेच बोलवेल विहारीतील पिण्याचे पाणी दुषित झाल्याने पाड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची ग्रामस्थांनी सांगितले .या परिसरात घाण दुर्गंधी मुळे जगणे असह्य झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असून दुषित पाण्यामुळे महिला, मुलांना त्वचा रोग, कावीळ इत्यादीचा रोगाची लागण होत आहे. या मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले याकडे लक्ष कधी देणार अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केले आहे
योग्य तो निर्णय घेऊन. योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
प्रशासन को तुरंत कार्यवाही करनी चाहिए
अशा लोकानमुले कारभारा मुले पृथ्वीची आयु कमी होत चालली,आहे,आदिवासी आहे तोपर्यंत पृथ्वी आहे, आदिवासीना सरकार नस्ट करेल त्या दिवसि पृथ्वी नस्ट होईल
जय जोहार जय आदिवासी
आपल्या आदिवासी बांधवाना मला एकच सांगायचे आहे कि या कंपनी चे मालकाला धडा शिकवला पाहिजे जय आदिवासी जय जोहर
Band.band.kara
Talasari Madhe Track bharun aanatat
5 varse भोगली काही कामे नाही नाही आता परत 5 वर्षे अजून तीच परिस्थीती असणार
Vinod Nikole aatha ka nay yeyun bhet det zople ka aatha
Netyana haptaa bhart ashtil manun karvai hot nahi
Ka
BJP chann vatat asel tr mg Gujarati lokana bolva ek minitani kam hot assel tr Nikole sirancha ky kam.... Adivasi Ektecha Vijay zalay thodda samman kara..milun mislun ladhar tr solution hoil.... Mudda ekdam khara ahe dada Chiken mule khup Adivasi lokanchi tabet kharab hot ah
TV 9 Marathi Wale aale hote pn news takli nahi
लाडके आमदारांना बोलवा
हे सगड बीजेपी चा आमदार ना आल्यामुडे नाटक 🤣🤣
Nki na r😂😂
तुमचे घराशी कुबट पाणी सोडायचा होवा त सांग....मस्त गंधाय...😂😂😂एकदा यीन त नांग.....कोटपण राजकारण घुसवत!तीथले लोकांची भेट तरी घ्या....सगळी लालबावट्याचीच माणसं आहेत!