मनापासून आलेलं आणि कळवळीनं वाटलेलं ft. Leena Bhagwat | भाग ८३ | Whyfal Gappa Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024

Комментарии • 529

  • @sumedhdeshpande3420
    @sumedhdeshpande3420 День назад +27

    लीना ताई ह्यांची vibe खूपच comforting आहे, असं वाटतं की एकमेकांना ओळखत नसून सुध्दा आम्ही खूप गप्पा मारू शकतो

    • @urmilasheode
      @urmilasheode День назад +4

      Yes correct !

    • @kaju.0030
      @kaju.0030 День назад +1

      Khrch khup chan vatat

    • @suvarnagaoli9730
      @suvarnagaoli9730 19 часов назад +2

      अत्यंत ताकदीची आणि नैसर्गिक अभिनय करणारी आणि गोड खळी पडणारी आवडती अभिनेत्री....रंगमंच

    • @suchitahenry344
      @suchitahenry344 3 часа назад

      So much refreshing interview

  • @smitadani3523
    @smitadani3523 День назад +18

    दोन तास गप्पा सुद्धा खूप कमी वाटल्या आज. खूपच छान लीना ताई. रंगमंच!!

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 День назад +20

    एक नाटक करण्या मागे इतका विचार असतो हे आज नव्याने कळलं. लीना ताई "धबधब्या सारखी बोलत होती. आणि सुयोग प्रथमच तू "स्पीचलेस "झालास हे जाणवत होतं. एरवी तुझं संवाद जोडणं सहज असतं आज तुझी तारांबळ उडत होती..
    अप्रतिम झाली मुलाखत

  • @ashurj
    @ashurj День назад +9

    खूप सुंदर मुलाखत. लीना भागवत इतकं छान बोलतात. की गुंतून जायला होतं. इतके प्रगल्भ विचार त्यांनी मांडले. आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर मराठी. आणि खरचं काही शब्द म्हणजे झुडूप, परीस,रंगमंच वापरले नाही जात आता. सुयोग खूपच मस्त रंगली मुलाखत.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 День назад +9

    कॅमेरा, मुलाखत असं कुठलंही ओझं न घेता मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा, खूप आवडल्या.💐👍👌

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 День назад +8

    लीनाताई खूपच प्रतिभा वंत आहे आणि अशाच रहा साध्या आणि प्रामाणिक

  • @rashmipatil4348
    @rashmipatil4348 День назад +6

    खूप सुरेख मुलाखत. संकर्षण नंतर मनाला भावलेली मुलाखत ही लीनाजींची. धन्यवाद ह्या अनमोल क्षणांसाठी 🙏🙏

  • @neeshapatlekar246
    @neeshapatlekar246 6 часов назад +4

    ऐकतच राहावी अशी मुलाखत झाली.. अप्रतिम!! लीना भागवत.. कमाल अभिनेत्री आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व🙌
    रंगमंच ❤

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 14 часов назад +6

    खूप सुंदर बोलल्या लीनाताई ! सुयोग बाकी कुठेही न ऐकलेल्या गोष्टी कलकारांकडून तू या माध्यमातून काढून घेतोस. त्यांना बोलते करतोस. तुझे आणि प्राचीचे खूप खूप कौतुक. जीयो !

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 День назад +6

    सुयोग सर episode 2,3 तास चालला असता तरी आम्ही पहिला असता, इतकं सुंदर आणि मुद्देसूद मांडणी केली सगळ्या विषासंदर्भात, फार सुंदर माणूस अभिनेत्री , काम एक नंबर करतात त्यांच्या कामाची फॅन तर आहे पण आता विचार कळले खूप आभार सुयोग प्राची 😊😊😊❤❤❤
    रंगमंच ❤❤❤❤❤

  • @NividhaSawant
    @NividhaSawant День назад +9

    सहज सुंदर खिळवून ठेवणारी मुलाखत.मला व्हायफळ च्या बाबतीत सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे की कुठेही तोच तोच पणा नसतो फार intresting प्रश्न असतात त्या मुळे ऐकायला माझा येत ❤ आणि जसा लीना ताई घरी मुलाखत घेयच्या तसा मी ही करते 😂😂

    • @akshatatamhankar1973
      @akshatatamhankar1973 День назад

      खूपच सुंदर एपिसोड धन्यवाद

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 День назад +9

    लिना❤भागवत एकदम भन्नाट अभिनेत्री .माझी आवडती

  • @parth-77-ra
    @parth-77-ra 17 часов назад +2

    मला लिनाताई खूप म्हणजे खूप आवडते ती कुठल्याही प्रोग्राम मध्ये असेल तर मी ते बघते म्हणजे बघतेच रंगमंच खूप छान शब्द❤ लव्ह यू लिनाताई

  • @sanas3011
    @sanas3011 5 часов назад +3

    अप्रतिम अप्रतिम 🎉लीना ताईंच्या गप्पा..माहिती खूपच छान होत्या.👏👏👏👏 पण सुयोग कडे बघून लईच भारी वाटलं..एखादा छोटुसा मुलगा कसा एकटक आश्चर्याने बघत, हलत हलत ...डोळे - मन लावून ऐकतो....तसा क्यूट दिसत होता..आणि त्याची बोलती बंद होती...अगदी मोजक बोलला....😂

  • @varshamore6663
    @varshamore6663 День назад +4

    Please do one with LALIT PRABHAKAR 😊

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 День назад +10

    नोगी ची माकड छाप काळी टुथपावडर आम्ही वापरली आहे...फारच प्रसिद्ध होती....
    दिलखुलास चर्चा 😊😊😊😊😊

  • @ManasiDabke-w5r
    @ManasiDabke-w5r 13 часов назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत....नाटक जीचा श्वास आहे ,ध्यास आहे अशा एका गुणी अभिनेत्रीची मुलाखत ऐकताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. सुयोगजी मुलाखत खूप छान घेता. धन्यवाद

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 День назад +1

    किती सहज सुलभ गप्पांचा धबधबा 👏🏻👏🏻👏🏻 घडलंय बिघडलंय पासून आवडती अभिनेत्री

  • @deepalinanegaonkar2630
    @deepalinanegaonkar2630 15 часов назад +1

    खूप छान विचार वाटले ❤ लिना भागवत माझ्या आवडत्या आभिनेत्री आहेत. त्या नाटक अविरत पणे जगत आहेत असे वाटते. रंगमंच झकास 🎉

  • @rupalishinde2851
    @rupalishinde2851 20 часов назад +1

    नाटकातील छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान सांगितल्यात ताई नी कि आता नाटक बघताना वेगळी मज्जा येईल 🎉❤...अप्रतिम व्यक्तिमत्व 👌🏻मला आठवते ती छोटी आई - होणार सुंदर मी या घरची 🥰खुप सुंदर अभिनय...आत्ता पर्यंत जेवढं काम पाहिलंय तुमचं तेवढं खुप कमी पाहिलंय असं वाटतंय. यापुढे जास्तीत जास्त नाटक बघायला आवडेल 🥰thank you so much 🥰रंगमंच

  • @thanekar256
    @thanekar256 День назад +3

    लीना ताईंना कितीही ऐकलं तरी कमीच आहे.❤❤❤दिल के करीब चा interview पण मी परत परत ऐकत असते.

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 7 часов назад +3

    संकर्षण नंतर कोणता podcast Kamal superduper asel to with लीना भागवत

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 День назад +1

    लीना भागवत. अत्यंत उत्तम अभिनेत्री. स्पष्ट विचार, अणि अतिशय स्पष्ट प्रगटीकरण.
    अत्यन्त प्रगल्भ व्यक्तिमत्त्व. Great.....

  • @nandkumarwalimbe
    @nandkumarwalimbe День назад +1

    लिना जी केवळ अप्रतिम . मी तुमच्या पेक्षा वयाने खूप मोठा असून देखील माझ्याही न कळत तुमच्या नावाबरोबर जी लिहिले गेले या वरूनच किती अप्रतिम हे तुमच्या पर्यंत पोहचले असेल 🎉

  • @supriyapj
    @supriyapj День назад +1

    OMG what an episode. Such indepth discussion about theatre. I am executive leadership coach and mentor and I learnt so much to give to my executives from this discussion. Amazing!!

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 День назад +1

    रंगमंच😍👍रंगमंच म्हणजे श्वास …आणि …ध्यास असलेल्या गुणी अभिनेत्री लीना ताई…किती छान बोलल्या …तुम्ही आणि मंगेश दादा नाटक जगणारी आणि जागवणारी माणस आहात …खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कलाकृती साठी …😍💐👍
    सुयोगप्राची maaasstttaaa😍👍

  • @AnuA-se2qc
    @AnuA-se2qc День назад +2

    रंगमंच ... काय सुंदर मुलाखत ! एकदम दिलखुलास. धमाल.

  • @vinayakkulkarni2396
    @vinayakkulkarni2396 9 часов назад

    लीना खरंच तू किती सर्जनशील आहेस ते तुझ्या प्रामाणिक बोलण्यातून कळलं! मुलाखत अप्रतिम! चांगली अभिनेत्री आहेसच. पण तू चांगली माणूस म्हणून किती मोकळेपणाने व्यक्त होते ते मनाला खूप भावलं. तू लिहिलेली नाटकं रंगभूमीवर लवकरच येऊ देत ही शुभेच्छा 💐

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 День назад +5

    मंकी ब्रॅण्ड न म्हणता हे दंतमंजन "माकड छाप काळी टूथ पावडर" या नावाने प्रसिद्ध होते.

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 День назад +1

    लीना ताईंच प्रत्येक बोलणं अत्यंत सुंदर आणि विचारपूर्वक वाटतं. त्यांचं प्रत्येक विवेचन स्वतःला प्रामाणिक म्हणून सिध्द होतं आहे.

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 День назад

    नाटक.. नाटक आणि फक्त नाटक. किती स्वच्छ, आपले मत स्पष्ट मांडणे. त्या मितभाषी आहेत पण सुरेख झालं व्हाय फळ 👌👌

  • @nileshphadke7949
    @nileshphadke7949 9 часов назад

    लीना ताई तुमचा रंगमंचावरचा वावर आणि मुलाखत अतिशय प्रेक्षणिय , नजर आणि कानाला मेजवानी होती

  • @KrantiDhage-h7e
    @KrantiDhage-h7e День назад +1

    हो लीना ताई अगदी मला पण हीच सवय आहे. काही गोष्टी मनातल्या कल्पना विचार खूप खूप बरंच काहीतरी लिहिते. मी गृहिणी आहे.😊

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 День назад +1

    खूपच मस्त झाला हा podcast. माझी आवडती अभिनेत्री. काय ती ओघवती भाषा, निरनिराळे प्रसंग सांगण्याची.कला. मला लिना भाडीपा मध्ये सुध्दा आवडते. मी केवळ तिच्यासाठी बघते. रंगमंच

  • @neenakamal1
    @neenakamal1 10 часов назад

    प्रत्येक माणसाचा त्याच्या आयुष्याकडे बघायचा एक सुंदर आणि वैयक्तिक असा दृष्टिकोन असतो. पूर्वी घराघरात गप्पांचे मस्त अड्डे जमायचे. त्यात तो ऐकायला चर्चा करायला मिळायचा. हल्ली हे जमत नाही. पण ते व्हायफळ मधे जमवून आणतात! मला या गप्पा मनापासून आवडतात. लीन भागवत एक अत्यंत उत्साही आणि मनस्वी व्यक्तिमत्त्व! गप्पही तशाच रंगल्या आहेत.

  • @snehals8078
    @snehals8078 11 часов назад

    रंगमंच..खुपच सुंदर मुलाखत, लीनाची सहजसुंदर ओघवती शब्दकळा,ऐकतच रहावी अशी.लीना माझी आवडती अभिनेत्री, बिटकोची माकड छाप काळी टूथपावडर आम्हीपण लहानपणी वापरली आहे,लीना तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤

  • @YashashriMalshe
    @YashashriMalshe День назад

    खूपच सुंदर मुलाखत. लीना भागवत माझ्या आवडीच्या असलेल्या अभिनेत्रींपैकी एक. परत एकदा निवांत मुलाखत ऐकणार.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 3 часа назад

    क्या बात है ...... एक नंबर झाला आजचा भाग . लीना ताई , एकदम आवडती अभिनेत्री आहे . खूप सुंदर विचार मांडले त्यांनी . रंगमंचावरील त्यांचे काम पाहणे , हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ..... लीना ताई , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . मस्त रंगला आजचा भाग , सुयोग आणि प्राची , मन : पूर्वक धन्यवाद लीना ताईंना बोलावलं म्हणून .... 🙏🙏🙏

  • @artibiramane1671
    @artibiramane1671 День назад +2

    रविवारची सकाळ लीना संगे❤मस्त एपिसोड

  • @shyamgokhale9416
    @shyamgokhale9416 8 часов назад

    लीनाताई खूप छान मुलाखत. आम्हाला तुम्ही *रंगमंचावरील* सेलिब्रिटी न वाटता घरातीलच एक व्यक्ती वाटता. नाटकामागचा विचार, संपूर्ण प्रोसेस याची छान माहिती मिळाली.

  • @jyotikudalkar6476
    @jyotikudalkar6476 4 часа назад

    एकदम मनमोकळी मुलाखत!! रंगमंचावरची अभिशीक्त राणी , रंगमंच तुमचाच💕💕👌🙏

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 17 часов назад

    जवळपास दोन तासांचा एपिसोड म्हंटल्यावर थोडं टेन्शन आलं, पण मुलाखत ईतकी ओघवती झाली…सुंदर. रंगमंच👌🏻👌🏻👌🏻

  • @NeetaRamtirth
    @NeetaRamtirth 9 часов назад

    लीना ताई खुपच सुंदर, खुप दिलखुलास कुठलीही गोष्ट न लपवता सांगितलं
    अभिनंदन आणि तुमच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @nitapathak9926
    @nitapathak9926 День назад +1

    खूप छान लीना भागवत great aahe.आम्ही नाटक आवडीने पाहतो...

  • @AnaghaNawathe
    @AnaghaNawathe 4 часа назад

    फार सुंदर गप्पा. माझी अतीशय आवडती अभिनेत्री लीना भागवत🤗

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 День назад +9

    तुमचं बालपण ऐकून आणि ताई विषयी ऐकून अगदी माझं च बालपण सांगताय की काय असं वाटतं...आणि मंजन बद्दल कालच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होते...खुपचं भारी... सुयोग तुझे खूप आभार लीना भागवत ताईंना बोलवलं ❤❤❤❤❤

  • @PriyaIsave
    @PriyaIsave День назад

    रंगमंच आणि गप्पा गोष्टी एकून समजून घ्यायला खूप खूप आवडले मी नाटक बघायला खूप उत्सुक आहे. ❤

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 9 часов назад

    खूपच प्रगल्भ मुलाखत. विचारप्रवर्तक. नाटकाचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रेक्षकाची भूमिका काय असावी हेही नव्याने कळले. खूप धन्यवाद!!!

  • @amrutaandore8796
    @amrutaandore8796 День назад

    खूपच सुंदर.... लीना ताई आणि मंगेश सर खूप छान आहेत.. कलाकार म्हणुन आणि माणूस म्हणुन सुद्धा... त्यांनी सांगितलेल्या माकड छाप दंतमंजन आम्हालाही आठवले.. त्याचबरोबर मीही बालपणात गेले.. फुलांच्या पाकळ्या, मोरपीस, पिंपळ पान याबरोबरच आमच्या बंगल्याच्या आवारात झाडे खुप असल्याने विविध पक्षांची रंगीबेरंगी पिसे मीही साठवत असे..

  • @vasundharagalande2648
    @vasundharagalande2648 День назад

    रंगमंच !लिनाची खूप सुंदर मुलाखत. मला लिया खूप आवडते.छान काम करते.दिलखुलास हसते.नेहमी एकदम फ्रेश असते❤❤🎉🎉

  • @pranotishirgave5870
    @pranotishirgave5870 День назад +2

    Mast... Mazya favourite actress ahet Leena mam❤

  • @avanisarurkar-jg6re
    @avanisarurkar-jg6re 3 часа назад

    खूप सुंदर ❤ अद्वितीय असा podcast झालाय हा. 'रंगमंच' आणि त्याच्या छटा लीना ताईंच्या प्रत्येक अनुभवातून आम्हा प्रेक्षक वर्गाला अनुभवता आल्या. मस्तच!!!

  • @shashankdivekar7664
    @shashankdivekar7664 День назад

    नाटक या विषयाची गोडी, त्याचा अप्रतिम प्रवास आणि अंतरंगात भरलेलं नाटक या गप्पा खूप सुंदर होत्या..❤
    रंगमंच 😊

  • @aishwaryakane7459
    @aishwaryakane7459 6 часов назад +1

    माझी खूप लाडकी अभिनेत्री... खूप छान episode झाला.
    कालच सूर्याची पिल्ले बघितलं ऑपेरा हाऊस ला.
    नाटक हे विलक्षणच असत. मला खूप आवडलं असत हे करायला... असो. मनापासून बघते.😊

  • @madhuripadhye7659
    @madhuripadhye7659 11 часов назад

    लीनाताई खरंच सुंदर
    तुमचे बोलणे एकतच राहावे वाटते
    पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 День назад

    Rangamancha. प्रचंड मजा आली. अप्रतिम झाला. लीना भागवत आवडत्या अभिनेत्री आहेत. परत एकदा त्यांचं नाटक बघायला जायला आवडेल. 👌👌🌹❤️

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 День назад

    As I was listening to Leenaji, about situations and today's reality and the theatre today...I remembered the heart wrenching and impactful play 'Purush'! It would be as relevent or more right now!

  • @divyaninikam6491
    @divyaninikam6491 День назад +2

    केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा.. ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा..!! अगदी माझ्या जिल्हा परिषद च्या शाळेत नेऊन सोडलंत तुम्ही ताई 😊

  • @vaishalishirke5757
    @vaishalishirke5757 9 часов назад

    रंगमंच..,
    खूप छान झाला बरं podcast.
    मनापासून धन्यवाद, दोघांचेही 💐💐💐

  • @savitajoshi9729
    @savitajoshi9729 День назад

    माझ्या आवडत्या अभिनेत्रीचा हा भाग खूप आवडला. आणि हि अभिनेत्री माझ्या माहेरची अर्थात बोरीवलीची आहे, माझ्या गोखले शाळेच्याच महाविद्यालयाची आहे, हे समजल्यावर तर अजूनच छान वाटले. भाग नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघितला आहेच. लीनाताईंनी दिलेला शब्द 'रंगमंच'

  • @MsDESTINY999
    @MsDESTINY999 День назад

    Leena tai is superstar... aple marathi actors khupach chan ahet..technically, down to earth and have so much depth..

  • @vaibhavprabhukhanolkar
    @vaibhavprabhukhanolkar День назад

    रंगमंच...
    खुप छान मुलाखत आणि एक गोष्ट मनात आलो ती शेअर करावी वाटली मुलाखत ऐकता असताना मी देवाकडे प्रार्थना केली की जर मला पुढचा जन्म देणार असलास ( कारण तो आह की नशी हे कुणालाच माहीत नाही ) जर पुढचा जन्म देणार असलास तर अशा एका उत्तम अभिनेत्याचा किंवा अभिनेत्री चा दे आणि तो अशा अजरामर कल्कृती साकारण्याची शक्ती बुद्धी दे कारण मलाही अभिनेता व्हायचं होत माझी स्व्नं हे स्वप्नच राहिले कदाचित ते पुढच्या जन्मात साकार होऊ शकत खुप धन्यवाद खूप आभार ❤❤

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 11 часов назад

    लीना भागवत यांची नाटकाची जाण invovement शब्दां शब्दातून जाणवली उत्तम संवाद

  • @amrutalele3573
    @amrutalele3573 15 часов назад

    अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या लीना ताईने.. खूप छान झालाय भाग. लीना ताई best च आहे, खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 День назад +1

    छान मुलाखत.... मज्जा आली. परत बालपण आठवलं...

  • @luckyabhik
    @luckyabhik 17 часов назад

    खूप सुंदर खूप छान कोणी तरी आपलं माणूस बोलत आहे असं वाटल. ❤❤

  • @prashantjoshi3529
    @prashantjoshi3529 9 часов назад

    लीना ताई,खूप सुंदर अभिनय करता.. आणि वायफळ पण छान बोललात...

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 День назад

    रंगमंच.....
    खूप छान झाला हा भाग!
    खूप खूप अभिनंदन आणि आभार!
    🎉👍🌹👍🙏🎉

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 День назад

    लीना ताई खुप छान काम करतात आमनेसामने अप्रतिम नाटक आहे खूप आवडले इवलेसे रोप नक्की बघणार

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 День назад

    लीनाताई भरभरून बोलल्या. ऐकताना आनंद वाटला. ❤

  • @shilpanashikkar4631
    @shilpanashikkar4631 День назад

    लीना भगवत ही अभिनेत्री माझी खूपच लाडकी अभिनेत्री आहे ❤ त्यांचे विचार खूपच छान आहेत

  • @varshajoshi1081
    @varshajoshi1081 День назад

    मस्त interview. “फिल्ममध्ये कॅमेरा दाखवतो काय बघायचे तर नाटकामध्ये तसे नाही” हे पटलं

  • @manishadandekar1431
    @manishadandekar1431 День назад +1

    रंगमंच . वायफळ नेहमी छानच होतो तसाच आजपण मस्त

  • @sukanyagodbole4111
    @sukanyagodbole4111 День назад +1

    मस्त झाली मुलाखत ,एकदम सहज ❤

  • @madhurakulkarni1761
    @madhurakulkarni1761 День назад

    मस्तच आहे हा भाग आवडला रंगमंचावर सादर होणारे सगळे कळत पण मागे काय चाललंय हे पण समजले आभारी आहोत ❤

  • @Hemantbhalekar7146
    @Hemantbhalekar7146 7 часов назад

    लिनाजी,
    आपण समर्थ अभिनेत्री अहातच,आपल्या कडून रंगभूमीवर अशाच विविध भूमिका सादर होवोत आणि रसिकांना भरभरुन आनंद मिळत रहो!
    👍

  • @mandakiniatre8934
    @mandakiniatre8934 День назад +2

    आवडती अभिनेत्री❤ रंगमंच

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 День назад

    लीना भागवत खूप खूप आवडती अभिनेत्री
    सर्वांगसुंदर, सहज अभिनय करणारी, गुणी अभिनेत्री
    तिच्या गालाच्या खळ्या तर फारच मोहक

  • @nm0901
    @nm0901 5 часов назад

    आज एकंदरीत सुयोग ला संधी नाही मिळाली बोलायला .....😅आवडल हेही
    लीना ताई खूप मस्त ....किती गोष्टी,किती छान विचार...किती विचार....खूप वेगळा अनुभव होता.... भारी episode होता.....❤
    "रंगमंच❤"

  • @anujadamle1521
    @anujadamle1521 19 часов назад

    लीना जी खूप सुंदर मुलाखत झाली. मला नेहेमी हा विचार यायचा की जी पात्र तुम्ही रंगावता त्याचे त्या कलाकारा वर मानसिक परिणाम होत असणार. आणि ते उत्तर मला आज मिळाल. टीव्ही वर जे कलाकार वारंवार त्याच भूमिका म्हणजे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह त्याचे त्याच्यावर किती परिणाम होत असतील. हा विचार सतत मनाला भेडसावतो. ह्यातून तुम्ही सगळे बाहेर कसे पडता. त्यासाठी तुम्हा सगळ्या कलाकार मंडळींना मनापासून नमस्कार. आमच मनोरंजन होत पण तुमचे यत्न किती असतात ते मला आज समजलं. कलाकार पडद्या सॊमोर किंवा मागचा तुम्हाला चहा आणून देणार असो. सगळेच किती मोठे आहात हॆ समजलं. तुमच्या बदलापूर च्या कात्रप शाळेंत मुलांशी मारलेल्या गप्पा आठवल्या. मूल देखील खुश होती तुमच्यावर. तस आज वाटल. धन्यवाद त्यासाठी.

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 День назад

    खुपच सुंदर मुलाखत ❤ भाडीपा मध्ये पण लीना ताईंना बघायला आवडते.सहज अभिनय कला .ताईंन कडून शिकण्या सारखे आहे.❤❤

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 День назад

    मलाही लिनाताई खुपच आवडते ,गालावरची खळी ,सुंदर अभिनेत्री ऐकतच रहावस वाटल वेळ कधी संपला हे कळलेच नाही .श्रीची छोटीआई❤😊दमदार अभिनेत्री .🎉🎉🎉🎉🎉रंगमंच 🎉🎉

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 11 часов назад

    नाटकासंबंधी फार विचारपूर्वक गंभीर चिंतन लीना भागवत यांनी केले आहे.

  • @reshmanair8240
    @reshmanair8240 14 часов назад

    खूप सुंदर मुलाखत...मी जास्त नाटक नाही पाहिलेत पण हे मुलाखत ऐकल्यावर रंगमंचाला भेट दिली पाहिजे असा वाटलं 😊

  • @sparklinglotus
    @sparklinglotus День назад

    Rangamancha! ❤ a Brilliant, Abhyaasu and Highly Creative mind!

  • @suchitraparab5654
    @suchitraparab5654 День назад

    तुम्हीचे रंगमंचावरील नाटक नेहमी प्रेरणादायी आहे

  • @salluinmumbai
    @salluinmumbai 17 часов назад

    रंगमंच! माकड छाप ब्रँड होता त्याची काळी दात घासायची पावडर मिळायची. माझ्या आजोळचा आजोबांचा आवडता ब्रँड! लीना ताई म्हणजे विद्यापीठ! वाचिक अंगिक अभिनय, भाषा, पाठांतर, हावभाव सर्व बाजूने परिपूर्ण! तिने रंगवलेली एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली सुप्रिया लक्षात आहे. लिसन लीना ताई 😂❤❤❤इतकी समृद्ध माणस असताना कशाला बॉलिवूड ची कौतुक आपण करतो?
    निखिल - ठाणे ❤

  • @sangitahuddar1804
    @sangitahuddar1804 9 часов назад

    कार्यक्रमातील शेवटचा शब्द -रंगमंच.
    लीना भागवत, अतिशय छान मराठी बोलणारी, हरहुन्नरी नटी, मला काम फार आवडते...... नाटकाविषयी अंतर्बाह्य बोलल्या, मस्त. ❤❤
    सुयोग ने खर्या अर्थाने गप्पांच्या माध्यमातून बोलते केले. छान.

  • @sanyuktapimputkar4377
    @sanyuktapimputkar4377 День назад

    रंगमंच❤❤ लीना ताईंच्या गप्पांचा हा रंगमंच कधीच संपू नये अस वाटत होत... सुयोग तुझे खूप खूप आभार अशा प्रतिभावंत कलाकाराला आमंत्रित केले त्याबद्दल 🙏🙏
    आता दर महिन्याला किमान एक तरी नाटक बघायलचच.... अस मी आणि माझ्या मुलीने ठरवूनच टाकलय 👍👍

  • @sanskruti_shinde17
    @sanskruti_shinde17 День назад +1

    Mangesh na attack yeil was epic 😂😂❤

  • @mandhareavinash
    @mandhareavinash 9 часов назад

    अद्भूत दरवाजा वेळी background लां चिमण्यांचा आवाज ❤ टायमिंग 👌

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 День назад

    रंगमंचावर लिलया वावराणाऱ्या लीनाताई... तुम्हाला बोलताना ऐकणं ही सुद्धा एक पर्वणीच असते. व्हायफळ... प्रत्येक एपिसोड मधे नं थांबता बघावा, असाच असतो....❤

  • @kavitakulkarni9426
    @kavitakulkarni9426 День назад

    लीनाताई तुम्ही जे स्वतः बद्दल बोलत होता ते सगळ मला लागू होतय😂
    नाटकांच्या बद्दल खूपच छान बोललात. मस्त मुलाखत

  • @vv-gh3qf
    @vv-gh3qf День назад +1

    Wooohhhhhh
    My favourite Leena tai...
    Lagech बघायला घेते🥳🥳🥳🥳

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 День назад

    रंगपंढरी नावाच्या युट्यूब चॅनेलवर मधुराणी प्रभुलकर मुलाखती घ्यायच्या, अतीशय सुंदर, काही तांत्रिक प्रश्नही विचारायच्या, आजची मुलाखत मला त्या तोडीची वाटतेय!! अप्रतिम 👍🏻 अशा मुलाखती घ्या !! अशांना बोलवा 👍🏻

  • @devyani9375
    @devyani9375 День назад

    रंगमंच .....नाशकात कधी आणतात सुतारफेणी
    सुयोग दादा .......? आजची मुलाखत खुप सुंदर झाली....

  • @AnuradhaKulkarni-yv5lp
    @AnuradhaKulkarni-yv5lp 9 минут назад

    Ranga Mancha, excellent talk, I love Leena Bhagwat’s acting, last year we watched her Aamne Samne Natak, in Houston!

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 15 часов назад

    Vah vah aani vah Lina tai na aikayla milale thankyou so much vhayfal…..khup aabhlbhar shubheccha 😊

  • @meenavyavahare
    @meenavyavahare 21 час назад

    Great वायफळ with Leena Bhagvat! I really like Leena and her acting. Next India visit - definitely going to watch at least one Marathi Natak.
    Word- Rangmamch ; रंगमंच

  • @swatigokhale4767
    @swatigokhale4767 День назад

    लीना भागवत माझ्या खुप आवडत्या अभिनेत्री आहेत, सहज अभिनय करतात, interview म्हणण्या पेक्षा खुप छान गप्पा झाल्या, खुप आवडल्या रंगमंच