मनापासून आलेलं आणि कळवळीनं वाटलेलं ft. Leena Bhagwat | भाग ८३ | Whyfal Gappa Marathi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @rashmipatil4348
    @rashmipatil4348 Месяц назад +38

    खूप सुरेख मुलाखत. संकर्षण नंतर मनाला भावलेली मुलाखत ही लीनाजींची. धन्यवाद ह्या अनमोल क्षणांसाठी 🙏🙏

  • @neeshapatlekar246
    @neeshapatlekar246 Месяц назад +38

    ऐकतच राहावी अशी मुलाखत झाली.. अप्रतिम!! लीना भागवत.. कमाल अभिनेत्री आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व🙌
    रंगमंच ❤

  • @sanas3011
    @sanas3011 Месяц назад +27

    अप्रतिम अप्रतिम 🎉लीना ताईंच्या गप्पा..माहिती खूपच छान होत्या.👏👏👏👏 पण सुयोग कडे बघून लईच भारी वाटलं..एखादा छोटुसा मुलगा कसा एकटक आश्चर्याने बघत, हलत हलत ...डोळे - मन लावून ऐकतो....तसा क्यूट दिसत होता..आणि त्याची बोलती बंद होती...अगदी मोजक बोलला....😂

  • @aparnapangare6547
    @aparnapangare6547 Месяц назад +35

    खूप सुंदर बोलल्या लीनाताई ! सुयोग बाकी कुठेही न ऐकलेल्या गोष्टी कलकारांकडून तू या माध्यमातून काढून घेतोस. त्यांना बोलते करतोस. तुझे आणि प्राचीचे खूप खूप कौतुक. जीयो !

  • @smitadani3523
    @smitadani3523 Месяц назад +33

    दोन तास गप्पा सुद्धा खूप कमी वाटल्या आज. खूपच छान लीना ताई. रंगमंच!!

  • @csanushreesatpute7055
    @csanushreesatpute7055 Месяц назад +17

    कित्ती ओघवते बोललात लीना ताई... बघत असताना कित्येक वेळा मी मनापासून वाह वाह म्हणाले... अगदी चपखल बसतील असे विचार, नवीन पिढीचे निरीक्षण आणि योग्य शब्दात पेरलेली वाक्ये.... छानच... मराठी वरील प्रभुत्व पण अगदी लीलया सिद्ध केले... माझ्या आवडत्या आहात च... आज अजून जास्त जवळच्या झालात...

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 Месяц назад +6

    लीना भागवत हिची मुलाखत म्हणजे अभिनय आणि नाटक म्हणजे काय याची कार्यशाळा होती.... अप्रतिम.... सुंदर आणि साधी पण तितकीच सशक्त अभिनेत्री आहे लीना.... लीना तुला आणि सुयोग तुलाही खुप खुप शुभेच्छा... आणि सुयोग तुझे आभार... इतक्या गोड अभिनेत्रीची मुलाखत घेतलीस 🙏🏻🙏🏻

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 Месяц назад +32

    संकर्षण नंतर कोणता podcast Kamal superduper asel to with लीना भागवत

    • @vidhyaprabhu860
      @vidhyaprabhu860 Месяц назад +2

      Was listening to this podcast while driving.. And I had this exact same thought.. संकर्षण नंतर खरच कोणी भारावून ठेवलं ते लीना भागवत हिने..

    • @ritabarad
      @ritabarad Месяц назад

      खरंय

  • @sumedhdeshpande3420
    @sumedhdeshpande3420 Месяц назад +93

    लीना ताई ह्यांची vibe खूपच comforting आहे, असं वाटतं की एकमेकांना ओळखत नसून सुध्दा आम्ही खूप गप्पा मारू शकतो

    • @urmilasheode
      @urmilasheode Месяц назад +6

      Yes correct !

    • @kaju.0030
      @kaju.0030 Месяц назад +1

      Khrch khup chan vatat

    • @suvarnagaoli9730
      @suvarnagaoli9730 Месяц назад +5

      अत्यंत ताकदीची आणि नैसर्गिक अभिनय करणारी आणि गोड खळी पडणारी आवडती अभिनेत्री....रंगमंच

    • @suchitahenry344
      @suchitahenry344 Месяц назад +1

      So much refreshing interview

    • @nehagogate3609
      @nehagogate3609 Месяц назад +2

      अप्रतिम मुलाखत झाली. खूप छान माहिती मिळाली. लीना ताई माझी आवडती अभिनेत्री आहे❤ तिचं नाटकाबद्दल असलेलं प्रेम पाहून मी भारावून गेले.

  • @anusule9904
    @anusule9904 Месяц назад +3

    खूप खुश झाली मी
    हे असं एकून माझे विचार जुळतील कोणा बरोबर
    आपण रमतो बऱ्याच पुस्तकात
    खूप खूप धन्यवाद लीना जी

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 Месяц назад +81

    एक नाटक करण्या मागे इतका विचार असतो हे आज नव्याने कळलं. लीना ताई "धबधब्या सारखी बोलत होती. आणि सुयोग प्रथमच तू "स्पीचलेस "झालास हे जाणवत होतं. एरवी तुझं संवाद जोडणं सहज असतं आज तुझी तारांबळ उडत होती..
    अप्रतिम झाली मुलाखत

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 Месяц назад +14

    She is extremely sweet and down to earth person...her vibes are very positive and pure

  • @leenatasane3934
    @leenatasane3934 Месяц назад +5

    खूपच सुंदर ओघवती भाषा,प्रगल्भ विचार...अगदी रंगून जाऊन किती वेगवेगळे विचार,माहिती देत बोलल्या.भाग २ हवाच आहे.

  • @snehals8078
    @snehals8078 Месяц назад +9

    रंगमंच..खुपच सुंदर मुलाखत, लीनाची सहजसुंदर ओघवती शब्दकळा,ऐकतच रहावी अशी.लीना माझी आवडती अभिनेत्री, बिटकोची माकड छाप काळी टूथपावडर आम्हीपण लहानपणी वापरली आहे,लीना तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणी शुभाशीर्वाद ❤❤

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 Месяц назад +14

    सुयोग सर episode 2,3 तास चालला असता तरी आम्ही पहिला असता, इतकं सुंदर आणि मुद्देसूद मांडणी केली सगळ्या विषासंदर्भात, फार सुंदर माणूस अभिनेत्री , काम एक नंबर करतात त्यांच्या कामाची फॅन तर आहे पण आता विचार कळले खूप आभार सुयोग प्राची 😊😊😊❤❤❤
    रंगमंच ❤❤❤❤❤

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 Месяц назад +3

    लीना भागवत... एक नं.. 😀 फार फार आवडतात मला.
    सर्व एपिसोड मस्तच आहे. संपूर्ण एपिसोड हेडफोन मध्ये ऐकला त्यामुळे एक गोष्ट जाणवली आणि आवडली ती म्हणजे लीना ताईचं voice modulation.. 👌🏻
    Thank you suyog खूप thank you.
    आणि लवकरच पुन्हा नाटक पाहायला हजेरी लावेन. 👍🏻🙏🏻🙏🏻
    खूप शुभेच्छा व्हायफळ ला आणि लीना ताई ना.

  • @HemangiBoralkar
    @HemangiBoralkar Месяц назад +6

    रंगमंच !! भान हरपून ऐकत बसलो होतो !! किती नविन गोष्टी कळल्या नाटकाच्या प्रक्रियेबद्दल! धन्यवाद लिनाताई, सुयोग आणि प्राची!❤️❤️👍👍

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Месяц назад +3

    क्या बात है ...... एक नंबर झाला आजचा भाग . लीना ताई , एकदम आवडती अभिनेत्री आहे . खूप सुंदर विचार मांडले त्यांनी . रंगमंचावरील त्यांचे काम पाहणे , हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ..... लीना ताई , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . मस्त रंगला आजचा भाग , सुयोग आणि प्राची , मन : पूर्वक धन्यवाद लीना ताईंना बोलावलं म्हणून .... 🙏🙏🙏

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Месяц назад +12

    कॅमेरा, मुलाखत असं कुठलंही ओझं न घेता मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा, खूप आवडल्या.💐👍👌

  • @adhipparab5370
    @adhipparab5370 Месяц назад +2

    रंगमंच, लीना ताई तुम्ही अतिशय सुंदरपणे नाटकासंबंधी विस्तृतपणे माहिती दिली. हा कार्यक्रम वायफळ नव्हे जायफळ सारखा आहे एक नशा आहे.

  • @divyaninikam6491
    @divyaninikam6491 Месяц назад +30

    केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा.. ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा..!! अगदी माझ्या जिल्हा परिषद च्या शाळेत नेऊन सोडलंत तुम्ही ताई 😊

  • @vijay192400
    @vijay192400 Месяц назад +2

    रंगमंच
    खूप छान झाली मुलाख़ात,लीना ताईंबद्दल पहिल्यांदच इतक्या गोष्टि समजल्या.
    खूप नवीन नवीन शब्द आमच्या “शब्द कोषात” हया एपिसोड निमित्ताने नव्याने दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार.
    संकर्षण नंतर मी हया एपिसोड ला एका Different Zone मधे गेलो.
    सुयोग यार कसला भारी झोन बनवतोस तू….नक्कीच नवनवीन नाटकं बघायचा आमचा प्रयत्न असनार आहे.
    धन्यवाद 🙏🏻

  • @ashurj
    @ashurj Месяц назад +19

    खूप सुंदर मुलाखत. लीना भागवत इतकं छान बोलतात. की गुंतून जायला होतं. इतके प्रगल्भ विचार त्यांनी मांडले. आणि इतकं स्वच्छ आणि सुंदर मराठी. आणि खरचं काही शब्द म्हणजे झुडूप, परीस,रंगमंच वापरले नाही जात आता. सुयोग खूपच मस्त रंगली मुलाखत.

  • @avinashjoshi3991
    @avinashjoshi3991 Месяц назад +6

    लीनाताई यांची मुलाखत आम्ही संपूर्ण पाहिली. मुलाखत उत्तम झाली. लीनाताईनी मुलाखतीत एकही शब्द इंग्लिश वापरला नाही. त्या बद्धल विशेष अभिनंदन.

  • @NividhaSawant
    @NividhaSawant Месяц назад +13

    सहज सुंदर खिळवून ठेवणारी मुलाखत.मला व्हायफळ च्या बाबतीत सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे की कुठेही तोच तोच पणा नसतो फार intresting प्रश्न असतात त्या मुळे ऐकायला माझा येत ❤ आणि जसा लीना ताई घरी मुलाखत घेयच्या तसा मी ही करते 😂😂

    • @akshatatamhankar1973
      @akshatatamhankar1973 Месяц назад

      खूपच सुंदर एपिसोड धन्यवाद

  • @Shree_Ganesha_Investments
    @Shree_Ganesha_Investments Месяц назад +2

    रंगमंच.....
    खूप छान झाल्या गप्पा......
    अद्भुत दरवाजा...... फ्रेम अजून छान set करता आली असती सुयोग.....
    पण लीना ताई नि दिलेलं उत्तर निव्वळ अप्रतिम ❤
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
    सुयोग अणि प्राची

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 Месяц назад +11

    लीनाताई खूपच प्रतिभा वंत आहे आणि अशाच रहा साध्या आणि प्रामाणिक

  • @suvidhalokhande1906
    @suvidhalokhande1906 22 дня назад +1

    या सर्व मुलाखतींमधून एका पडद्यावरच्या कलाकाराचे खऱ्या आयुष्यातील अंतरंग उलगडत जातात. ती व्यक्ती नकळत बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. एखादं व्यक्तिमत्व किती खोल असू शकते याचा अनुभव संकर्षण दादा, पर्ण आणि लीनाताईंच्या सहज ओघवत्या बोलीतून आला. निव्वळ अप्रतिम ❤

  • @ManasiBhide-k5s
    @ManasiBhide-k5s Месяц назад +6

    खूप सुंदर...यांत्रिक मुलाखत न होता छान नैसर्गिक शैलीत गप्पा मारल्या आहेत लीनाताईंनी.

  • @tanushreerane4230
    @tanushreerane4230 5 дней назад

    रंगमंच!! खूप छान मुलाखत. लीनाताई नाटक या विषयावर भरभरून बोलताना, अगदी ऐकत राहावं असं वाटत होतं. एक "नाटक" या विषयाचे कितीतरी पैलू तुम्ही उलगडून दाखवले. मस्तच. आता शक्य तेंव्हा नाटकं पाहण्याचा प्रयत्न करेन. तुम्हां दोघांचे आभार.

  • @SUBHASHIKULKARNI
    @SUBHASHIKULKARNI Месяц назад +6

    कधी संपला interview कळलंच नाही.. part 2 पण चालेल.. tv serial बद्दल ऐकायचं राहिलं

  • @lofimusic2095
    @lofimusic2095 Месяц назад +2

    रंगमंच
    रंगमच्यावरची लीना भागवत दिलखुलास व्यक्तिमत्व, लीना ताईच बोलणं ऐकत राहावं नाटकाविषयीचं तीच बोलण, तीच खळखळून हसन आणि सुयोग यांचं निशब्द होऊन ऐकत रहाणं
    हे रंगमंचवरच होऊ शकत 👍🏻👌🏻👌🏻अप्रतिम एपिसोड लीना भागवत ❤️❤️

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +17

    नोगी ची माकड छाप काळी टुथपावडर आम्ही वापरली आहे...फारच प्रसिद्ध होती....
    दिलखुलास चर्चा 😊😊😊😊😊

  • @snehapalav4547
    @snehapalav4547 Месяц назад +1

    खूप सुंदर मुलाखत होतीस सुयोग. मला सुद्धा असं वाटत होतं की आज खरच खूप दिवस झाले खूप वर्ष झाले एकही नाटक नाही बघितलं.. पण आता ठरवलं आहे पुढच्या एक दोन महिन्यात तरी एक तरी नाटक बघायचं. धन्यवाद तुझ्या या अशा मुलाखतीने मधून खूप इन्स्पिरेशन मिळतं

  • @thanekar256
    @thanekar256 Месяц назад +7

    लीना ताईंना कितीही ऐकलं तरी कमीच आहे.❤❤❤दिल के करीब चा interview पण मी परत परत ऐकत असते.

  • @ketakeeavinashdeodhar8591
    @ketakeeavinashdeodhar8591 Месяц назад

    अतिशय सुंदर मुलाखत होती. आणि एका नाटक वेड्या कलाकाराची इतकी सुंदर मुलाखत ऐकताना त्या व्यक्तीचे इतके सखोल विचार ऐकताना खूप छान वाटले. रंगमंच ही एक मोठी जबाबदारी आहे ही गोष्ट लीना भागवत ह्यांनी इतक्या सखोलपणे सांगितली त्यांच्या अनुभवातून. वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आजच्या podcast ने. Thank you for such wonderful podcast. संकर्षण कऱ्हाडे नंतर सगळ्यात भावलेला आणखी एक हा podcast.

  • @nilimajoshi55
    @nilimajoshi55 Месяц назад +5

    रंगमंच - शेवटचा शब्द
    लीना भागवत -- आवडती अभिनेत्री. खूप मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. वैचारिक प्रगल्भता दिसली. छान झाला कार्यक्रम.

    • @sunitapalsule1610
      @sunitapalsule1610 Месяц назад

      लीना भागवत म्हंटल्यावर च लाईक करून मोकळी झाले. याचा दुसरा भाग बघायला आवडेल. लहानपणीचे सगळे कांदेपोहे, लगोरी, डबा ऐसपैस खेळ आठवले आणि हो लिना ताईने सांगितलेली ती दात घासायची काळी राखुंडी ही आमच्याकडे कायम होती. आता राखूंडी हा शब्द ही माहित नसावा काही जणांना. अतिशय साधी राहणी, कुठेही गर्व नाही, हसतमुख ,खुप मस्त खूप जवळच्या वाटतात लीना ताई.

  • @RunaliDhamnaskar
    @RunaliDhamnaskar 18 дней назад

    संकर्षण दादा नंतर प्रचंड आवडलेली मुलाखत. लीना ताईंच मराठी भाषेवरचं इतकं अशक्यसुंदर प्रभुत्व व्वा❤ मराठी ऐकून कान तृप्त झाले. रंगमंच 😊

  • @artibiramane1671
    @artibiramane1671 Месяц назад +5

    रविवारची सकाळ लीना संगे❤मस्त एपिसोड

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane Месяц назад

    किती छान, तुम्ही लोकांनी लहान पणाच्या ज्या-ज्या आठवणी सांगितल्या ते ऐकून मला माझं बालपण आठवलं. सगळे खेळ, शाळेतले आणि कॉलेजचे दिवस, मित्र-मैत्रिणी सगळं डोळ्यासमोर उभे राहिलेत. "रंगमंच" आणि नाटकांबद्दलचे छानसे किस्से ऐकून छान वाटलं. खूप मस्त podcast. धन्यवाद!

  • @varshamore6663
    @varshamore6663 Месяц назад +7

    Please do one with LALIT PRABHAKAR 😊

  • @sagar1hadge
    @sagar1hadge Месяц назад

    Leena ma'am and her command on her language is impeccable....so inspiring... podcast.....guys pls do watch plays.....it's an amazing wholesome experience

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 Месяц назад +5

    रंगमंच😍👍रंगमंच म्हणजे श्वास …आणि …ध्यास असलेल्या गुणी अभिनेत्री लीना ताई…किती छान बोलल्या …तुम्ही आणि मंगेश दादा नाटक जगणारी आणि जागवणारी माणस आहात …खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या प्रत्येक कलाकृती साठी …😍💐👍
    सुयोगप्राची maaasstttaaa😍👍

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 Месяц назад +2

    वायफळ चे कौतुक करावे तेवढे कमी....
    ही मुलाखत दिलखुलास अप्रतिम..
    सुयोग. . मी subscribe केले बर का.. वायफळ= दर्जेदार
    हे तुम्ही कायम ठेवली आहे अभिनंदन..
    And feel so happy to follow your channel
    From very long time... Mrs. Ashwini Kulkarni...
    All the best..
    Waiting fir many more...
    Leena awadti abhinetri... Great..
    .

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 Месяц назад +8

    मंकी ब्रॅण्ड न म्हणता हे दंतमंजन "माकड छाप काळी टूथ पावडर" या नावाने प्रसिद्ध होते.

  • @reshmalawate7672
    @reshmalawate7672 Месяц назад

    खूप सुंदर मुलाखत.ऐकताना मजाही आली आणि अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.लीनाताई बोरीवली त्यातून माझ्या घराजवळच असणाऱ्या गोविंद नगरला रहाणाऱ्या आणि सगळ्यात मुख्य माझ्या शाळेच्या म्हणजे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण गोखले मध्ये झालं मी त्या शाळेत बारावी पर्यंत होते 1:56:25 .त्यावेळी पूर्ण काॅलेज झालं नव्हतं.मुलाखत देणारे आणि घेणारे दोन्ही बाजू उत्तम असल्याने रंगत वाढली.रंगमंच

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 Месяц назад +13

    लिना❤भागवत एकदम भन्नाट अभिनेत्री .माझी आवडती

  • @devanandbhat9085
    @devanandbhat9085 Месяц назад +1

    Nearly 2 hrs easy free flowing discussion on Natak, entertaining and informative thanks ! Very lively!
    Leena Bhagwat is indeed super star!

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 Месяц назад +12

    तुमचं बालपण ऐकून आणि ताई विषयी ऐकून अगदी माझं च बालपण सांगताय की काय असं वाटतं...आणि मंजन बद्दल कालच मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत होते...खुपचं भारी... सुयोग तुझे खूप आभार लीना भागवत ताईंना बोलवलं ❤❤❤❤❤

  • @AkshataZarekar
    @AkshataZarekar Месяц назад +1

    Rangmanch. Khup chan episode hota. Khup maja Ali ani Khup shikale. Thank you for such great experience ani Khup Khup prem❤

  • @pranalideobhakta5186
    @pranalideobhakta5186 Месяц назад

    फारच सुरेख गप्पा आणि छान विचार .रंगमंच खरंच रंगला.नुकतेच इवलेसे रोप हे नाटक पाहिलं.अतिशय सुरेख.

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 Месяц назад

    खूप च सुंदर मुलाखत आणि सादरीकरण.
    लीना भागवत आणि मंगेश सरांची सर्व नाटकं आम्ही पाहिलेली आहेत.
    लीना भागवत च्या भूमिकेत कुठं तरी मी स्वतः ला अजमाविण्याचा यत्न करते.
    त्यांचे दिलं अभी भरा नही हे मला खूपच आवडले नाटकं.
    त्यातील वंदना,जे माझे नाव आहे, अगदी माझ्या स्वभावाला अनुरूप आहे तिची भूमिका.
    गोष्ट गमतीची,dil भरा नाही, आमने सामने,आणि ह्या महिन्यात इवलेसे रोप पण पाहिले.
    मनाला चटका लावणारी भूमिका आहे उभयतांनी..
    लीना तर काम चांगले करतेच पण इवलेसे रोप मंगेश सरांनी अगदी बाजी मारली आहे अभिनय करण्यात..रडायला येते शेवटी.
    खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि सुयोग ला..
    आम्ही संकर्षण आणि लीना मंगेश कदम सर्व नाटकं पहातोच

  • @rohinimoghe833
    @rohinimoghe833 28 дней назад

    अप्रतिम मुलाखत , खूप दिवसांनी अभ्यासपूर्ण मुलाखत ऐकायला मिळाली .वायफळचे आभार .

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 Месяц назад

    खूपच सुंदर, माहितीपूर्ण मुलाखत ... संकर्षण कऱ्हाडे मुलाखत जशी भावली, तशीच ही पण .... आपल्याला पण रंगमंचावर घडणाऱ्या गोष्टी सुंदर प्रकारे उलगडून दाखवणारी ... लीना भागवत खरोखरच हरहुन्नरी, चतुरस्त्र व हसतमुख कलाकार आहेत ... त्यांना मनापासून शुभेच्छा !

  • @neenakamal1
    @neenakamal1 Месяц назад +2

    प्रत्येक माणसाचा त्याच्या आयुष्याकडे बघायचा एक सुंदर आणि वैयक्तिक असा दृष्टिकोन असतो. पूर्वी घराघरात गप्पांचे मस्त अड्डे जमायचे. त्यात तो ऐकायला चर्चा करायला मिळायचा. हल्ली हे जमत नाही. पण ते व्हायफळ मधे जमवून आणतात! मला या गप्पा मनापासून आवडतात. लीन भागवत एक अत्यंत उत्साही आणि मनस्वी व्यक्तिमत्त्व! गप्पही तशाच रंगल्या आहेत.

  • @TheAkelkar
    @TheAkelkar Месяц назад

    Rangamnch
    What an episode.! I was watching it transfixed the whole two hour broadcast. Every moment was so interesting and gave a totally new dimension to plays, acting and life in general. I have watched Leena for many years but knowing the person behind all that was very fascinating. My respect for people involved in producing a play rose manyfold. This format of Whyfal is proving to be very good specially with your skill in making the guest talk instead of expressing your opinions as a interviewer. It makes the whole experience so worth while. Lots of Love and Best Wishes to you and Prachi. May you both continue to bring more and more interesting personalities for us on your show. Arvind Kelkar

  • @varshadeodhar5282
    @varshadeodhar5282 Месяц назад

    मुलखत खूप छान आणि माहितीपूर्ण होती!!! प्रश्न मुद्देसुद विचारले जातात त्या मुळे ऐकायला मजा येते. रंगमंच!!

  • @manishachafe499
    @manishachafe499 Месяц назад

    रंगमंच
    अतिशय जबरदस्त मुलाखत
    लहान मुलांनी नाटकाकडे का वळावे याचे सुद्धा अतिशय सुंदर विवेचन

  • @ManasiDabke-w5r
    @ManasiDabke-w5r Месяц назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत....नाटक जीचा श्वास आहे ,ध्यास आहे अशा एका गुणी अभिनेत्रीची मुलाखत ऐकताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. सुयोगजी मुलाखत खूप छान घेता. धन्यवाद

  • @YashviPatil
    @YashviPatil Месяц назад +2

    Leena Tai is always a charm and when i watched was little bit happily teared I love your podcast and Leena Tai ❤❤💓😘💗🎀

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Месяц назад

    अप्रतिम दिलखुलास मुलाखत आमच्या आवडत्या अभिनेत्री लीना भागवत यांनी दिली.❤❤❤❤
    अनेक नाटक गोष्ट तशी गमतीची पाहताना त्यांचे " रंगमंचावरील " उत्कृष्ट काम आम्हाला आवडते. लीना भागवत यांना खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉
    वायफळ गप्पा कार्यक्रम खूपच चांगला आहे.
    नवनवीन मुलाखती ऐकायला मिळतात.

  • @namratadeo9900
    @namratadeo9900 Месяц назад

    Leenatai mazi atyant awadati abhinetri....ticha lahanpan mazya Mirajetlya lahanpanasarakhach hota he aikun khup anand zala...Tabbasumchi me pan fan....ani sarwat awadalela shabda tuza'100 pani wahi ghataleli'....mazi bharpur tar khechali jayachi ya shabdamule...pan ata purwyane shabit😂khup chan mulakhat....agadi dilkhulas....khup thanks❤

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 21 день назад

    निःशब्द... भान हरपून ऐकलेली मुलाखत 👍🏻लीना किती सुंदर बोलतेस..... खुपच सुंदर 👍🏻

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Месяц назад

    अतिशय सुंदर गप्पा ची मुलाखत.... खूप सुंदर मनमोकळे पणाने बोललात. तुमचा हा कार्यक्रम आम्हा घरातल्यांना खूप आवडतो. मनापासून आम्ही पाहतो. गप्पा मारताना तुम्ही त्यांना रिलॅक्स करता... त्यामुळे गप्पांना छान रंगत येते❤❤❤ खूप सुंदर विचार मांडले आहेत लीना भागवत यांनी ❤ अतिशय साधी आणि गोड व्यक्तिमत्व आहे..... खूप चांगले काम करतात म्हणून देव त्यांना चांगली माणसं भेटवतो आणि चांगली कामे त्यांच्या पर्यंत येतात आणि आशीर्वाद खूप खूप मिळतात.त्यांच्या आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐 रंगमंच ❤

  • @AshwiniThorat1212
    @AshwiniThorat1212 Месяц назад

    रंगमंच...
    निखळ-निस्सीम प्रेम...
    कामप्रति असणारी तुमची एकनिष्ठता...
    🙏😍👌👌👌👏👏👏👏

  • @swatims2010
    @swatims2010 Месяц назад

    रंगमंच ....अतिशय सुंदर एपिसोड....लीना भागवतांचा सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनय पहाणं ही पर्वणीच असते ...इतक्या छान लोकांना बोलवून त्यांना बोलतं करण्यासाठी सुयोग-प्राची तुमचं खूप कौतुक आणि शुभेच्छा

  • @geetaj7075
    @geetaj7075 Месяц назад

    खूपच सुंदर मुलाखत...बोलण्यात अगदी सहज पणा आहे...आणि सुयोग तुम्ही पण खूप छान बोलतं करता .... खूप सुंदर👌👌

  • @seemagad7265
    @seemagad7265 Месяц назад +1

    Mast Interview leena bhagwat,u r awesome,kitti Chan bolata ,parat parat aikawase watate,suyog speechless 🙊

  • @mahendrapatil-ov2te
    @mahendrapatil-ov2te Месяц назад

    मी माझ्या आयष्यातील पाहिलेली सर्वात अप्रतिम मुलाखत , अर्थात ह्यात लीना ताईचा मोठा वाटा , की त्यांनी सारे भरभरून उलगडत सांगीतले, थॅन्क्स सुयोग अँड प्रार्ची

  • @yoginisagade1715
    @yoginisagade1715 Месяц назад

    'रंगमंच' लीना भागवत ही खूप आपली वाटते आणि तिचे विचारही त्यामुळे आपलेसे वाटतात. अप्रतिम मुलाखत ❤❤ धन्यवाद!

  • @veena7vaidya
    @veena7vaidya Месяц назад

    रंगमंच .. लीना भागवत was too good ... सहज सुंदर अभिनय .... She is one of my favourite artists!! खूप छान झाली मुलाखत!!❤👌👍👍

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Месяц назад

    Leena Bhagwat is an amazing versatile actor ! Her simplicity and the way she carries herself in every role assigned to her is fabulous. I have never ever missed any of her plays comedy shows movies . The ease with which she gets into the shoes of the character is unbelievable! Wish her long happy lifespan! 🙏

  • @nandinijoglekar1666
    @nandinijoglekar1666 Месяц назад

    अप्रतिम! खुप छान एकदम ओघवती मुलाखत. मस्त वाटल ऐकून. ❤ एक वेगळी च दृष्टी दिलीत

  • @dipaksawant4329
    @dipaksawant4329 Месяц назад

    अप्रतिम शब्द भांडार आहे यांच्याकडे.. असं वाटलं की खूप वर्ष कोणाशी मनमोकळ बोलता आलं नाही आणि आता संधी मिळाली तर घेते बोलून..पण फारच ओघवती वाणी उच्चार स्पष्ट आणि रंगभूमीवर तयार झालेली व्यक्ती लगेच समजून येते..❤

  • @brilliantclassofmathssonal5741
    @brilliantclassofmathssonal5741 6 дней назад

    अतिशय सुंदर मुलाखत... कोणताही कृत्रिमपणा नाही अगदी नैसर्गिक

  • @ketakighanekar4217
    @ketakighanekar4217 Месяц назад

    लीना ताई मला तू,तुझी भाषा आणि तुझे विचार खुपचं आवडतात. तू खरंच खुप उत्तम अभिनेत्री आहेस 😊

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 Месяц назад +2

    काय सुंदर भाग या सगळ्याचे documentation होणे जरुरी आहे सुयोग प्राची पुस्तक काढा खूप छान होईल परत परत वाचता येतं ❤ रंगमंच

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 Месяц назад +2

    त्या राखुंडीचे नाव- माकड छाप काळी टुथ पावडर असे होते.
    आम्ही बऱ्याच वेळा ती वापरायचो. विशेष करून पाहुणे आले की वापरायचो. नंतर नंतर टुथपेस्ट सगळ्यांना परवडायला लागली.

  • @AnaghaNawathe
    @AnaghaNawathe Месяц назад +1

    फार सुंदर गप्पा. माझी अतीशय आवडती अभिनेत्री लीना भागवत🤗

  • @gaurimohadarkar7125
    @gaurimohadarkar7125 Месяц назад

    लीना ताई : एक खूप सुंदर व्यक्तिमत्त्व आणि आपण सहज त्यांच्याशी जुळवून घेतो. मला आवडतात त्या.

  • @varshahardikar3969
    @varshahardikar3969 Месяц назад

    रंगमंच, सुंदर झाली मुलाखत, खूप छान माहिती मिळाली लीना ताई नाटकाविषयी.❤

  • @sakhidevesh
    @sakhidevesh Месяц назад

    रंगमंच! नाटकाचे आणि त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक यांचे वेगवेगळे कंगोरे अनुभवता आले. धन्यवाद 🙏

  • @deepalinanegaonkar2630
    @deepalinanegaonkar2630 Месяц назад +1

    खूप छान विचार वाटले ❤ लिना भागवत माझ्या आवडत्या आभिनेत्री आहेत. त्या नाटक अविरत पणे जगत आहेत असे वाटते. रंगमंच झकास 🎉

  • @veenamore2774
    @veenamore2774 6 дней назад

    रंगमंच ....... वाहवा श्रवणीय 2वेळा ऐकले किती छान सांगितले लीना ताई ने❤प्रेक्षक म्हणून शिकता आले नव्याने
    नाटक बघण्याची नवी दृष्टी मिळाली
    धन्यवाद सुयोग

  • @harshalmalegaonkar5402
    @harshalmalegaonkar5402 Месяц назад

    अजून एक खूप सुंदर podcast, रंगमंच 🫠 ही तुझी शब्दाची concept फार कमाल आहे.

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 Месяц назад

    ॓॑ रंगमंच ,अप्रतिम खुपचं छान झाल्या लीना ताईंशी गप्पा . दिलखुलास, मनमोकळी , आणि खुप छान विचार आणि दिशा देणारी मुलाखत.

  • @sheetalrege24
    @sheetalrege24 16 дней назад

    Kitti bhari aahe he sarva... Khup Shubhechchha tumha sarvanna... Leena Tai kiti chan explains kelay he sarva... ❤

  • @manishateke909
    @manishateke909 Месяц назад

    खुपच सुंदर लीना ताई अगदी ना नाटकमय मुलाखत मनापासून बोललात सगळं छान 👌👌🥰 माझ्या आवडत्या अभिनेत्री आहात व्हायफळ ची मुलाखत ऐकून आणखीन आदर वाढला 🙏🙏 सुयोग ने आमच्या मनातले सगळे विचार मांडले आणि तुम्हाला व्यक्त केलं त्याबद्दल सयोग चे कौतुक खूप मस्त 👌👌🥳🌹 पूर्ण मुलाखत पहिली अगदी ' रंगमंच ' येईपर्यंत 👍😍 सुंदर मुलाखत आणि मनापासून आभार ❤❤

  • @nandini7873
    @nandini7873 Месяц назад

    पहिलाच भाग आज पहिला आणि खूप खूप आवडला. लीना आवडती अभिनेत्री होतीच, आता जास्त प्रिय झाली! अगदी जुन्या मत्रिणीच्या गप्पा ऐकल्या सारखं वाटलं. नटकांबद्दल बरीच माहिती ही मिळाली.
    फारच छान मुलाखत.
    रंगमंच 🎉

  • @artisohoni5349
    @artisohoni5349 Месяц назад

    खूप छान मुलाखत.लीना भागवताना ऐकताना खूप आनंद मिळतो.

  • @shyamgokhale9416
    @shyamgokhale9416 Месяц назад +1

    लीनाताई खूप छान मुलाखत. आम्हाला तुम्ही *रंगमंचावरील* सेलिब्रिटी न वाटता घरातीलच एक व्यक्ती वाटता. नाटकामागचा विचार, संपूर्ण प्रोसेस याची छान माहिती मिळाली.

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Месяц назад

    खूप सुंदर गप्पा.हुशार पण साधं,दिलखुलास व्यक्तिमत्त्व. सुयोग,तू पण छान बोलतं केलंस .मनःपूर्वक धन्यवाद ❤

  • @kaumuditoal6715
    @kaumuditoal6715 Месяц назад

    रंगमंचावर ची कला अबाधित राहो, लीना ताईंनी खुप सुंदर रित्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, धन्यवाद ❤

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Месяц назад

    खूपच प्रगल्भ मुलाखत. विचारप्रवर्तक. नाटकाचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला. प्रेक्षकाची भूमिका काय असावी हेही नव्याने कळले. खूप धन्यवाद!!!

  • @sangitahuddar1804
    @sangitahuddar1804 Месяц назад +1

    कार्यक्रमातील शेवटचा शब्द -रंगमंच.
    लीना भागवत, अतिशय छान मराठी बोलणारी, हरहुन्नरी नटी, मला काम फार आवडते...... नाटकाविषयी अंतर्बाह्य बोलल्या, मस्त. ❤❤
    सुयोग ने खर्या अर्थाने गप्पांच्या माध्यमातून बोलते केले. छान.

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 17 дней назад

    रंगमंचा बद्दल आपोआपच प्रेम निर्माण करण्यात हा episode यशस्वी झालाय.

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Месяц назад +1

    रंगमंच हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे पण अर्थात प्रेक्षक म्हणून. लीना भागवत अतिशय आवडती कलाकार आहे माझी त्यामुळे गप्पा ऐकताना खूप मजा आली. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप रंगला कार्यक्रम.

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Месяц назад

    रंगमंचावरील एखादं नाटक जसं खिळवून ठेवतं तशी खिळवून ठेवणारी मुलाखत झाली आणि खूप आवडली. धन्यवाद

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 Месяц назад

    खुपच मनमोकळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या. “आमने सामने” मस्त नाटक.
    लिना भागवत लक्षात आहेत ते दुरदर्शनवर दीसायच्या तेव्हापासुन. मोकळं हसु, छान अभिनय आणि लांबसडक केस या वैशिष्ठांमुळे छान लक्षात राहील्यात.
    वायफळ तुम्हांला धन्यवाद!!

  • @smitabaravkar500
    @smitabaravkar500 Месяц назад +1

    रंगमंच…
    हा एपिसोड या गप्पा मी पाच दिवस थोडया थोडया करून ऐकल्या 😊❤❤❤