गांडूळखत निर्मिती प्रकल्प | खत कसे काढायचे | वर्मीवॉश | गांडूळअंडे | vermiwash | vermicomposting

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • गांडूळखत निर्मिती प्रकल्प | खत कसे काढायचे | वर्मीवॉश | गांडूळअंडे | vermiwash | vermicompost
    गांडूळ खत निर्मिती गांडूळ खत कसे बनवावे व त्यासाठी कोणती काळजी घ्यावी
    गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात.गांडूळ हा शेतातील जमीन भुसभुशीत करतो.गांडूळला उन्हापासून त्रास होतो. हा उभयलिंगी प्राणी आहे.
    गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी.
    जमिनीचा पोत सुधारतो.
    मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
    गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
    जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
    जमिनीची धूप कमी होते.
    बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
    जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
    गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
    गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
    जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
    ओला कचरा व्यावास्तापन पण होते
    मातीचा कस टिकून राहतो
    या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात
    नमस्कार मित्रांनो
    जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की पाठवा.
    जय जवान! जय किसान!
    Organic Farming,
    Agro,
    गांडूळ खत कसे तयार करतात,
    सेंद्रिय शेती,
    Gandul khat,Vermi,
    Vermi compost,
    Gandul khat nirmiti,
    गांडूळ खत निर्मिती,
    गांडूळ खत,
    केंचुवा खाद,
    Gandul khat kase banvatat,
    Earthworm
    #गांडूळखत #rajvardhanpawar #YSU

Комментарии • 16