Pratibha Aani Pratima | Sudhir Phadke | Part 01 | प्रतिभा आणि प्रतिमा | सुधीर फडके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2022
  • सहभाग - सुधीर फडके (संगीतकार - गायक)
    प्रतिभा आणि प्रतिमा...
    काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू
    शकला नसाल तर जरुर पहा....
    PRATIBHA AANI PRATIMA - प्रतिभा आणि प्रतिमा
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : प्रतिभा आणि प्रतिमा
    Artist : सुधीर फडके (संगीतकार - गायक)
    Anchor : शंकर वैद्य
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer : दिपक शेडगे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 162

  • @bhalchandratagare226
    @bhalchandratagare226 19 дней назад +9

    स्वर गंधर्व सुधीर फडके सिनेमा पहिला. इंटर्व्हल पर्यंत त्यांचा जो स्ट्रगल दाखवला आहे तो डोळे सतत पाणावणारा आहे. पण नंतर धीराने आणि नेटाने संगीतात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत स्वतःचं आणि तुमचं आमचं जीवन आनंदी केलं. कान, मन आणि अंतरात्मा सुखावला, सुखावत राहील. त्यांना कोटी कोटी प्रणाम, नमन आणि वंदन.

  • @leenanaik5397
    @leenanaik5397 Год назад +81

    ह्यांच्या पाया पडायला मिळालं नाही ही खंत मला नेहमी वाटते. बाबुजींच पुस्तक मी वाचलं आहे. इतके वाईट दिवस पाहुन सुद्धा नेकी सोडली नाही. फुकट काही अपेक्षा धरली नाही, अगदी भुक लागली असताना खाणं देखील मागितलं नाही. आई वडिलांनी उच्च संस्कार केलेले आहेत आणि ते थोर असावेत. गरिबीमुळे माणसांचे बरे वाईट अनुभव आले तरी बोलताना कधीही आकस, कटुता नाही. होती ती परिस्थिती तशीच सांगत आहेत, ऐकताना दुख होत आहे.

    • @shrikantmogal5649
      @shrikantmogal5649 Месяц назад +3

      महान थोर विभूती❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤असे गितकार आणि गायक पुन्हा होणे अशक्य, ग.दि.मा.आणि बाबूजींना शतशत प्रणाम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @chintamanipurohit2265
      @chintamanipurohit2265 Месяц назад +7

      ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. मी भाग्यवान आहे की डोंबिवली करानी १९९४ मधे जो कार्यक्रम केला होता ज्यात त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपट साठी एक लाख रु मदत केली होती त्या कार्यक्रमात मी बाल गीत उठा राष्ट्र वीर हो हे गाणं म्हटले होते. मला त्यावेळी बाबुजी नचा आशीर्वाद मिळाला. ❤

    • @sunilmahajan3040
      @sunilmahajan3040 Месяц назад +2

      Mahan Vibhuti 🙌🙌

    • @charushilabehere2594
      @charushilabehere2594 Месяц назад

      ​@@shrikantmogal5649😅

    • @sharadsalphale3612
      @sharadsalphale3612 Месяц назад +1

      आमची पिढी भाग्यवान
      .

  • @gajananranade8284
    @gajananranade8284 Месяц назад +9

    माझ्या परमभाग्याने तीर्थ रुप बाबूजींच्या दर्शनाचा आणी चरणस्पर्श करण्याचा योग आला तोही एका दवाखान्यात आणि त्यांच्या साध्या निगर्वी स्वभावाचे जवळून दर्शन घडले आणि स्वतःला धन्य वाटले.याच्या साठी की आपण बाबूजी ना भेटलो.

  • @devashreehardas4734
    @devashreehardas4734 2 дня назад

    बाबूजीं चा खडतर प्रवास सिनेमात बघून अतिशय वाईट वाटले... अत्यंत अपमान गरीबीमुळे लहानपणी सोसूनही धीर सोडला नाही, तत्वांशी कधीही तडजोड केली नाही... आणि देशभक्ती तर पराकोटीची.... एक आदर्श व्यक्तीमत्व... पण अशा थोर व्यक्तीच्या भेटीचा योग मात्र आला नाही... त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. 👏

  • @dilipmehra2026
    @dilipmehra2026 Год назад +22

    सुधीर फड़के महान गायक, संगीतकार थे ।अनेकानेक मराठी एवं हिन्दी गाने गाये और मधुर धुने बनाई।

    • @udaybapat6818
      @udaybapat6818 Год назад +1

      बहुत सही कहा apne।गीत रामायण apne सुना ही hoga।।

  • @vijaygovekar4341
    @vijaygovekar4341 21 день назад +4

    स्वर गंधर्व सुधीर फडके १ मे रोजी पहिला..आणि आज अचानक प्रतिभा आणि प्रतिमा त्यात कवी शंकर वैद्य आणि बापूजी म्हणजे सुधीर फडके यांना पाहण्याचा योग आला ही एक पर्वणी आहे..🎉🎉❤❤❤

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 Год назад +21

    निगर्वी,साधे पण दर्जेदार कोमल व्यक्तिमत्व सह्रदयी शांत सुस्वभावी उत्तम गायक संगीतकार यासारखा उत्तम व्यक्ती परत होणे नाही त्रीवार दंडवत अशा थोर गायकाला.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +12

    🌹💫🌹👌मा. शंकर वैद्यांनी महान गायकाला बोलत करून “महान माणूस कसा उलगडतो हे सहज दाखविले. “अप्रतिम”. ❤🌿❤🌿❤🌿🌟❤🌿❤⭐️🌿❤🌟🌿❤🌹🌟🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌿🌟🌿

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +20

    खूप प्रतिभावंत गायक आणि संगीत निर्देशक माननीय बाबूजी

  • @user-do5ll4in8e
    @user-do5ll4in8e 29 дней назад +3

    मुलाखत घेणारे आणि देणारे, दोघेही त्या त्या क्षेत्रातील दिग्गज. हा कार्यक्रम कधी प्रसारित झाला, त्याची तारीख व साल कळाले, तर बरे होईल, त्यावेळी शाळकरी वयात प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमाचे मोल कळाले न्हवते. धन्यवाद सह्याद्री वाहिनी. 🙏🙏

  • @user-fj9uu6jq2y
    @user-fj9uu6jq2y Месяц назад +8

    हा कार्यक्रम पाहून अतिशय आनंद झाला
    प्रतिभा आणि प्रतिमाचे शतशः आभार. त्या काळात त्यांच्या पदनमस्करची अपेक्षा होती.त्यांची ती शब्दफेक,सवरांमधली जादू,या जदुगरला आणि माझ्या गुरुस्थानी असलेल्या बाबूजींनी कोटिकोटी प्रणाम.

  • @udaybapat6818
    @udaybapat6818 Год назад +15

    खूप छान मुलाखत👌 बाबुजी,,,,प्रत्येक मराठी व्यक्ती च्या मनावर राज्य केलेला संगीत सम्राट 🙏

  • @madhurivilas5273
    @madhurivilas5273 17 часов назад

    अप्रतिम गायक व संगीतकार. असा पुन्हा होणे नाही. ❤

  • @devendratambe3298
    @devendratambe3298 Год назад +6

    खुप छान सह्याद्री वाहिनी!
    बाबुजी!महान गायक, संगितकार,तसेच एवढ्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकर वैद्य.

  • @rahulmanekar1420
    @rahulmanekar1420 Год назад +17

    महान गायक महान संगीतकार, मुलाखात ऐकून भरून पावलो...
    मानाचा मुजरा या महान व्यक्तीला..
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakthakur4693
    @vinayakthakur4693 Год назад +17

    अतीव सुंदर! अप्रतिम बाबू जी, विलक्षण जीवनयात्रा, मधुर-सुमधुर-मधाळ असं त्यांचं अलौकिक सांगीतिक योगदान...वाह‌ वा!! क्या बात है..... बहुत खूब!👌👌👌👌👌👌👌
    मनापासून धन्यवाद सह्याद्री 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 Год назад +17

    बाबुजी मुलाखत ऐकून खूप आनंद झाला. दुरदर्शन आणि युट्यूब चे मनःपूर्वक आभार! 🌹💐🌹

  • @sanjaysabnawis1872
    @sanjaysabnawis1872 4 месяца назад +8

    बाबूजी म्हणजे स्वरगंधर्व. बाबूजींना भेटायची खूप तळमळ होती. पण पूर्ण होऊ शकली नाही. ते स्वरांमधून सतत भेटत असतात हेही नसे थोडके.

  • @manojdani5264
    @manojdani5264 Год назад +26

    अत्यन्त दर्जेदार प्रतिभावान कलाकारांची परंपरा खंडित झाली याची खंत आहे...
    अतिशय उत्कृष्ट मुलाखत.... बाबुजींना विन्रम नमस्कार 🙏🏽

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 Год назад +17

    खरं खोटं माहीत नाही पण महमद रफींना बाबुजींविषयी एव्हढा आदर होता की त्यांच्या लग्नात रफी साहेबांनी मंगलाष्टकं म्हटली होती.

    • @VivekSusladkar
      @VivekSusladkar Месяц назад +2

      खर आहे

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 20 дней назад

      Kindly believe, Babuji was a giant musician. Although I loved the gesture by our beloved Rafisahab, I don’t feel surprised at all. A true artist can understand a true artist. Not people like us. Tc.

    • @sarangpande843
      @sarangpande843 8 дней назад

      चित्रपटामध्ये दाखवले आहे त्याबद्दल...

  • @urmilakulkarni9711
    @urmilakulkarni9711 Год назад +8

    खूपच सुंदर मुलाखत. मी बाबुजींची चाहती आहे. मी पण त्यांना माझे गुरू मानते. एकलव्याप्रमाणे. त्यांची गाणी ऐकून त्यांच्याप्रमाणेच गाण्याचा प्रयत्न करते. त्यांना भेटण्याचाही योग आला होता. म्हणून मी मला भाग्यवान समजते.

  • @mithungawad3324
    @mithungawad3324 Год назад +23

    मराठी संगीताचे स्वरसम्राट तसेच महान गायक बाबुंजीचे एक जुन्या मुलाखतीद्वारे दर्शन घडवल्या बद्दल सह्याद्री चॅनल चे खूप खूप धन्यवाद तसेच या महागायकाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏

    • @chintamankulkarnikulkarni9855
      @chintamankulkarnikulkarni9855 3 месяца назад +1

      स्व सुधीर फड़के एक अति उत्तम गायक,1940 च्या आसपास महू च्या महाराष्ट्र समाज भवनांत त्यांचा गायनांचा कार्यक्रम झाला होता,व नंतर अनेक वर्षानी त्यांनी पुन्हा भेंट दीली होती .

    • @manojmokashi6642
      @manojmokashi6642 11 дней назад

      सत्यावर प्रकाश घातला आहे. हि मुलाखत दाखवणा-यांना शतश: धन्यवाद

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 Год назад +12

    महान संगीतकार सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन .... 🙏

  • @madhavjanvekar4572
    @madhavjanvekar4572 Месяц назад +1

    ग दि मा म्हणजे आधुनिक वाल्मिकी व बाबूजी म्हणजे स्वरगंधर्व....ही जोडी अगदी सार्थ आहे....अजरामर आहे ❤

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Год назад +5

    असे दर्जेदार कार्यक्रम परत दूर दर्शन चॅनेल वर प्रसारित करावेत म्हणजे आज्च्या युवा वर्गाला आपल्या प्रतिभावन्त् कलाकार ह्यन्चि प्रगती किती हाल् अपेश्ता सहन केल्यावर झाली ह्यचि कल्पना येईल.

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg Год назад +13

    मराठी भावगीत आणि पार्श्वसंगीत मधील एक सोनेरी पान!!

  • @nandakulkarni6050
    @nandakulkarni6050 Год назад +6

    अत्यंत सुंदर मुलाखत आपले आदर्श म्हणावेत अशा सज्जनांचा थोडासा सहवास लाभला.दोघांनाही मनापासून अभिवादन

  • @mahavirmadhvraosonawane759
    @mahavirmadhvraosonawane759 5 месяцев назад +3

    जय हो ! बाबुजी , अविस्मरणीय अशी हि जिवन संघर्ष यात्रा . स्वर्गियगंधर्व भूमिवर कलियुगात प्रकट होऊन आम्हांस गायनातून संतुष्टि देत गेलेत . अतृप्त असे आम्ही पुन्हा पुन्हा असावे सानिंध्य आपले हवे हवेसे जय हो !❤

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 Год назад +3

    स्व . बाबूजीनी मा .आशाताईंना खऱ्या अर्थाने तयार केले ह्यातच त्यांची महती ह्या पिढीलाही समजेल !
    स्व . नौशादजीही त्यांना मानत असत आणि आपणही त्यांची निर्दोष, मधुर गाणी आजही अनुभवतोच । 🙏🙏

  • @rajubhandare6625
    @rajubhandare6625 10 месяцев назад +4

    बाबुजी म्हणजे परत होने नाही अप्रतिम माझे दैवत आहेत खुप छान

  • @anuradhanaik7293
    @anuradhanaik7293 Год назад +3

    सलाम‌ असे दरमीळ सगीतकार आमला लाभले हे आमच भाग्य त्या महान व्यक्ति मत्वाला शि सा, न, ❤🙏❤🙏❤🙏❤👍👍❤🙏🌹💐🙏💐❤💐🙏❤🙏👍👌👍👋👋👋

  • @vinayak251180
    @vinayak251180 Год назад +3

    Last che १५ min majhya dolyatale ashru thambena.Eklavyapramne gurusthani aslele babuji koti koti pranaam.

  • @abhaygodse8794
    @abhaygodse8794 Год назад +3

    सुधीर फड़के बहुत अच्छे गायक हैं.. हिन्दी फ़िल्मों में इतने लोकप्रिय क्यों नहीं हैं?? जैसे किशोर कुमार, रफी आदि।

  • @vasudhaayare5570
    @vasudhaayare5570 Год назад +3

    अशा प्रकारचे मुलाखतकार आता घडतील काय?अर्थात समोरचे कलाकार पण अलौकीक,अजोड आहेतच. दोघांनाही नम्र नमन.

  • @user-zx3vp8mw7d
    @user-zx3vp8mw7d Год назад +5

    उत्तुंग प्रतिभावंत.
    नमन

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 10 месяцев назад +3

    खूप छान मुलाखत महान संगीतकार सुधीर फडके यांना विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Год назад +9

    आदरणीय गायक श्री सुधीर फडके साहेबांना विनम्र अभिवादन.......! 💐💐💐💐💐💐💐

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 13 дней назад

    Kavi Shankar Vaidya Aani Babuji doghana hi pratykash pahanyacha aani aikanyacha yog aala hota. Aaj Malakhat pahatana tya smruti jagya zalya.ya Sarv uttamotam vyakati ni aaple jeevan Aanandi,Surel,Surekh,Sukhi kele.tya baddal bolne shabadatit aahe . Namaskaar. Sahyadri Vahini ne ase Anek uttam karykram Sadar kele aahet. Aapan tyacha aasvad ghyacha.

  • @abhijeetnandgaonkarofficia640
    @abhijeetnandgaonkarofficia640 Год назад +6

    माझे दैवत..🙏🙏🙏🌺🎼

  • @dilipmehra2026
    @dilipmehra2026 Год назад +5

    मन करता था कि यह कार्य कर्म समाप्त ही ना हो ।शत-शत नमन।

  • @aniltikle4178
    @aniltikle4178 15 дней назад

    सुधीर जी नी त्या वेळेला जो मोठा इश्यू सुरू होता भारतावर पूर्व साईड laa त्या साठी त्याच्य घरी पुर्वेतील मुलांना मुंबई शिक्षण दिलं त्या मुळे आज पण पूर्वे मध्ये मराठी हिंदी गाणे v देश भक्ती रुजवली. ग्रेट इंडियन आयडॉल ❤

  • @VandanaDhamdhere
    @VandanaDhamdhere 3 месяца назад +4

    अतिशय संवेदनशील मुलाखत झाली बाबूजींच्या आवाजाने कान तृप्त झाले

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 месяца назад +1

    बाबूजी आपली गायन कला अद्वितीय आहे, आपणांस सलाम.

  • @chandrashekharbagul6114
    @chandrashekharbagul6114 21 день назад

    अखंड महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि मराठी स्वरांचे महामहिम आदरणीय बाबुजी सुधीर फडके साहेब म्हणजे समस्त महाराष्ट्राला लाभलेलं बावनकशी सोनं 😊🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +3

    🌹🙏🌹👌नियती माणसाला प्रतिकूलतेचे धडे देवून मा. पू. सुधीर फडके यांच्या सारखा स्वरज्ञानी,स्वर लेखक आम्हा रसिकांना प्रदान करते. धन्य योगायोग!!!❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸🌼💫✨🌟🌸🌼🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Год назад +4

    महान दर्जेदार उत्तुंग ही विशेषणे थोटकी पडतात..

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Год назад +5

    प्रतिभा आणि प्रतिमा हा दूर दर्शन वरील प्रत्येक रविवारी सादर केला जाणारा हा लोकप्रिय कार्यक्रम होता.ह्या कर्यक्रमाद्वरे अनेक प्रतिभावन्त् कलकरान्चि मुलाखत आम्हाला बघता आली.खरंच आम्ही नशीबवान आहोत कारण आता दूर दर्शन चॅनल हे हल्लिच्या शो-बाज् चॅनेल मुळे फारच् दूर चे झाले ह्यचि खंत आहे.

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 20 дней назад

      Totally agree sir.

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 20 дней назад

      Interviewers like Suhasini Mulgaonkarji,Dr Ashokji Ranade made sure the quality of Pratibha ani Pratima remained always above the clouds ,as they were equally great… Miss such great productions. This interview of our beloved Babuji is a great example. Sincere Pranam to Shankarji too.

  • @yogitajuikar8763
    @yogitajuikar8763 16 дней назад

    सुधीर फडके जी तूम्हाला त्रिवार वंदन.असे गायक परत होणे नाही.🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +5

    खूप छान कार्यक्रम

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 Год назад +2

    बाबुजी..आपणास शतं..शतं प्रणाम...शब्द आपुरे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +4

    खूप छान मुलाखत ! 👌 धन्यवाद !! 🙏

  • @yashwantbartake6201
    @yashwantbartake6201 6 месяцев назад

    Maharashtra che Gitkar, Sangitkar, Chitrapat Nirmate,Gayak... Astpailu Vyaktimatv... Nikhalas, Premal Vyaktimatv.. Is only ❤❤🎉🎉🎉

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад +2

    रामराम
    प्रतिभावंत सुरेल कलाकारास वंदन नमन
    मैफिल मुलाखत आवडली
    आभार धन्यवाद

  • @madhukarphadke5952
    @madhukarphadke5952 17 дней назад

    फारच सुंदर मुलाखत एका अद्वितीय गायक-सङ्गीतकाराची एअविस्मरणीय मुलाखत ऐकवल्याबद्दल दूरदर्शनचे अनन्त आभार!!!नमस्कार !

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Год назад +1

    बाबुजी म्हणजे सुधीर फडके हे उत्तम गायक, उत्तम संगीत दिग्दर्शक आणि विनम्र निर्मळ मनाची व्यक्ती, त्यांना साष्टांग दंडवत, मुलाखतकार हेही जाणते व्यक्तीमत्व त्यामुळे अनेक वर्षानंतरही पुर्वी पाहिलेला छान कार्यक्रम पाहण्याचा योग आला.

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 5 месяцев назад +1

    जबरदस्त मुलाखत.जय हो बाबूजी.
    सदैव अंतःकरणत राहनार. किती साली प्रशपित ही मुलाखत झाली होती

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Месяц назад +1

    पुण्यातील दगडुशेठ गणपती मंडळाचे गाण्याचे कार्यक्रम दसरा ते रामनवमी पर्यंत होत असत त्यात बाबुजींचे गाणे ऐकायचा योग यायचा

  • @user-wo9ep6hy5f
    @user-wo9ep6hy5f Месяц назад

    बाबुजींचे गाण ऐकणे म्हणजे,स्वर्गीय आनंद. गीतरामायण ऐकतांना फार खुशी व आनंद मिळतो.सुधीर जी ना विनम्र नमस्कार.

  • @udaybapat6818
    @udaybapat6818 Год назад +5

    कृपया मुलाखत दीवस, साल स्थान देत जावे,,discription मधे .

  • @cvd10
    @cvd10 27 дней назад +2

    आज स्वरगन्धर्व सुधीर फडके चित्रपट बघताना या मुलाखतीचे अंश बघून पुन्हा खूप छान वाटले

  • @uniquerecipies843
    @uniquerecipies843 Год назад +2

    अमूल्य खजिना🙏🏻

  • @TheShashin
    @TheShashin Месяц назад

    पृथ्वी वरील स्वराधिष्टित आविष्कार म्हणजे आदरणीय बाबूजी. आपणांस गीत रामायण गाताना प्रत्यक्ष ऐकले हे माझे भाग्यच. दंडवत.

  • @suhas7594
    @suhas7594 12 дней назад

    श्री सुधीर फडके यांना शतशः प्रणाम❤🙏🙏🙏🙏💐

  • @ShaambhaviParab-tr3vl
    @ShaambhaviParab-tr3vl 10 дней назад

    God's gifted human❤❤❤

  • @mrspratibhapathak2411
    @mrspratibhapathak2411 10 месяцев назад +1

    Aati sunder babuji shat shat naman🙏🙏

  • @SwarTaalSadhana
    @SwarTaalSadhana Год назад +2

    प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या प्रसारणाची तारीख देणे आवश्यक आहे.

  • @sagarmande5543
    @sagarmande5543 Год назад +3

    खुप छान

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Год назад +2

    Khup Chan अनमोल

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 Месяц назад

    ऐकत राहावे असे काही...❤
    दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार.

  • @vijayawakde4330
    @vijayawakde4330 Год назад +2

    मुलाखत ऐकुन मन प्रसन्न झाले

    • @vijayawakde4330
      @vijayawakde4330 Год назад

      सह्याद्री वहिनी चे खुप खुप आभार मानते

  • @madhusudansathe4240
    @madhusudansathe4240 Год назад +6

    मी email I D धारकाची पत्नी लिहित आहे, शंकर वॆद्यांना पहाणं हेच एक gift असतं आपल्यासाठी,ते इकते साक्षेपी प्राध्यापक आहेत......त्यांच्यां सोबतची बाबूजींची मुलाखत ही 'मेजवानी'च असणार....

  • @alkajoshi7497
    @alkajoshi7497 23 дня назад

    Asa sangitkar gayak hone nahi. Great humanbeing.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Год назад +2

    बाबु जी, Great!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +5

    सी रामचंद्र यांचे व्हिडिओ असले तर share करा प्लीज

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 Год назад +2

    Chhan

  • @kumarpatankar8772
    @kumarpatankar8772 3 месяца назад

    खूप खूप छान छान मुलाखत Babuji मन तृप्त झाले.

  • @dgkan
    @dgkan 6 месяцев назад +1

    It is interesting to know that homeopathy worked for Babuji. That too for critical condition created by antibiotic overdose. He acknowledged this at the end of the interview.

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 11 дней назад

    बाबुजींना आदरपुर्वक नमस्कार

  • @sagarmaladkar8995
    @sagarmaladkar8995 26 дней назад +1

    आज सकाळीच "स्वरगंधर्व सुधीर फडके" या चित्रपटाचा पहिल्या दिवशीचा, पहिला खेळ पाहिला, त्यावेळी या मुलाखतीची आठवण झाली 👌🏻🎹🎶🎵🎤🎥

  • @prafullabidkar2568
    @prafullabidkar2568 Месяц назад

    महान गायक बाबुजींना त्रिवार नमन,

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH Год назад +5

    🙏🙏अप्रतिम

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 Месяц назад

    Man Helavoon Taaknari Mulakhat. Vishesh Mhanje Ya Donhi Vyaktina Bhetnyache Bhagya Mala Milale Aahe.

  • @sanjivanimarathe7838
    @sanjivanimarathe7838 8 часов назад

    🙏🙏🙏💐💐

  • @jayantkulkarni3795
    @jayantkulkarni3795 19 дней назад

    दैवताच्या मुखीचे अमृत आहे ही मुलाखत

  • @shrikantmogal5649
    @shrikantmogal5649 21 день назад

    बाबूजींना शतशत नमन❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Месяц назад

    ग्रेट ग्रेट ग्रेट बापूजी 👌

  • @neelimayengul6087
    @neelimayengul6087 Год назад +1

    अप्रतिम

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 Месяц назад

    आसे आजुन व्हिडिओ द्खवा खरच 😢❤

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 4 месяца назад

    खूप छान मुलाखत, धन्यवाद दूरदर्शन.

  • @sapnabole3865
    @sapnabole3865 4 месяца назад

    नमस्कार , जून्या आठवणी खूपच छान आहेत.

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 10 месяцев назад +1

    छान

  • @tintin97803
    @tintin97803 Год назад +3

    doordarshan shd mention year this show was recorded in the description!!!

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +2

    कधी भेट नाही झाली मुलाखतीत भेट दिली छान वाटले नमस्कार

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Год назад +15

    पूर्वी न ऐकलेली पण आता ऐकली ही अनमोल मुलाखत. खूप संतोष जाहला.

    • @drdilipwatane1129
      @drdilipwatane1129 Год назад

      खूप श्रावणीय मुलाखत

  • @angaddixit4608
    @angaddixit4608 Год назад +2

    🙏🏽💐Babujee

  • @rekhashukla9241
    @rekhashukla9241 18 дней назад

    स्वरगंधर्व चित्रपट अप्रतिम

  • @sanket833
    @sanket833 Месяц назад

    Kiti sunder marathi mulakat aahe kutlahi ugach made english shabd nahi vaparla bapuji tumala naman

  • @pratikpawar7682
    @pratikpawar7682 Год назад +2

    24:56 wow

  • @manishabhogade2012
    @manishabhogade2012 Год назад +3

    🙏🙏

  • @arunvichare4459
    @arunvichare4459 Месяц назад

    विनम्र अभिवादन