तुकाराम महाराज अभंग कथा करोनियां द्रव्य देती घेती | Tukaram Maharaj Abhang | ब्रह्मचैतन्य वाणी
HTML-код
- Опубликовано: 17 ноя 2024
- तुकाराम महाराज अभंग
कथा करोनियां द्रव्य देती घेती ll
तया अधोगती नरकवास ll1l|
रवरव कुंभपाक भोगिती यातना ll
नये नारायणा करुणा त्याची ll2ll
असिखड्गधारा छेदिती सर्वांग ll
तप्तभुमी अंग लोळविती ll3l|
तुका म्हणे नरक न चुकती ll
सांपडले हाती यमाचिये ll4l
अर्थ:- महाराज म्हणतात की,जे भगवंताची कथा, किर्तनकार आहेत,व जे या कथा किर्तनकार यांना पैसे देतात,व जे घेतात,ते दोघेही अधोगतीला व नरकवास भोगतात. या दोघाणा यम काय करतो तर,लाव्हारस झालेल्या लालबुंद पाकामध्ये ठाकुन देतो,जसे तेलात तळून निघावे,तसी यातना कथा करणाराला, कथेला पैसे देणाराला भोगावी लागते,तर याची थोडी शुद्धा करुणा त्या नारायणाला येत नाही, मग यमाचे दुत धारदार खड्गाने त्याच्या सार्या शरीराचे छेदन करतात,व त्यांना लालबुंद झालेल्या भुमिवर लोळवतात, महाराज शेवटच्या चरणात म्हणतात,या कथा करणाराला कथेला दान देणाराला काही केल्या नरकवास हा चुकत नाही,कारण त्या यमाला दया, मया, आजिबात नसते,
ते अत्यंत कठोर आसतात, जे त्यांच्या हाती सापडले, त्यांची मग धडगत राहात नाही.
#tukaram #abhang #varkari
खूपच छान विवेचन 🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
एकदम मस्त अभंग सोडविला माउली
सत्य परिस्थिती आहे
छान साहेब
खर आहे🙏
Best saheb
जय हरी माऊली
Sundar
Best mama
जय श्रीराम,
अभंग....
"अभिमानु न संडी स्वजातीचा...."
- संत ज्ञानेश्वरांचा अभंग विषयी माहीती असणारे श्री.ह.भ.प. महाराज यांनी भक्तांना सांगावी
Very nice
महाराजानी व तुम्ही भोंदु साधुचे आंगावरील कपडेच काढले आहे,
Very nice
Very nice
Very nice