तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • तुजविण कोणा । शरण जाऊ नारायणा ।।
    ऐसा न देखे मी कोणी । दुजा तीही त्रिभुवनी ।।
    पाहिली पुराणे । धांडोळीली दरुषणे ।।
    तुका म्हणे ठायी । जडून ठेलो तुझे पायी ।।
    तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी तुझ्या शिवाय ह्या जगात कोणाला शरण जाऊ कारण ह्या जगात, या विश्वात तुझ्यासारखा कोणीही नाही. असा कोणीही नाही जो तुझी जागा घेईल किंवा तुझी बरोबरी करेल. ते म्हणतात मी सर्व अठरा पुराणे आणि सहा शास्त्रे धांडोळीली परंतु कशालाही तुझी सर येतच नाही.
    तुकोबाराय म्हणतात म्हणूनच देवा मी तुझ्या पायाशी आलो आहे आणि तुझ्या पायाशी एकरूप झालो आहे कारण ह्या व्यतिरिक्त मला दुसरीकडे कोठेही समाधान लाभत नाही.

Комментарии • 5