प्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो Kirtan Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024
  • प्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो ||१||ऐसें करी गा पांंडुरंंगा | शुध्द रंगवावें रंगा ||२||पुरें पुरें आतां | नको दुजियाची सत्ता ||३||लटकें तेंं फेडा | तुका म्हणे जाय पीडा ||४||भावार्थ -देवा , माझ्या मनातील प्रपंच दिवसेंदिवस कमी कमी होवो ; आणि तुझ्या पायाच्या ठिकाणी ते मन तल्लीन होवो .||१||पांंडुरंंगा , आता असेच कर की , मला तुझ्या शुध्द रंगाने रंगवून टाक - तन्मय करुन टाक .||२||आता हा संसार , हे जन्ममरण पुरे झाले. माझ्यावर आता दुस-यांची अविद्या , वासना , कर्म यांची सत्ता नको आहे .||३||तुकाराम महाराज म्हणतात , या खोट्या संसाराला घालवा ; आणि माझ्या पाठीमागे लागलेली जन्ममरणाची पीडा जाईल , असे करा. ||४||||🚩जय श्री विठ्ठल || जय तुकोबाराय🙏 ||

Комментарии • 8