ऐ सनम आंखों को मेरी खूबसूरत साज दे | Marathi Gazal | Ilahi Jamadar | Gazal Nawaz Bhimrao Panchale
HTML-код
- Опубликовано: 16 янв 2025
- भाषा भगिनींचा खूबसूरत साज ...
दोस्तहो ... आदाब , प्रणाम !
लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुसकुराती है
गज़ल मराठी में कहता हूँ ,उर्दू खुश हो जाती है
' भाषा भगिनी ' ... या नात्याची थोरवी आणि त्यातील गोडवा हा 'अमृताते पैजा जिंके ' असाच आहे .
भगिनी असल्या तरी , कोणत्याही दोन भाषांमधील शब्दसंभार , लिपी , त्यांचं व्याकरण , लिहिण्या-बोलण्याची पद्धत इत्यादी भिन्न असणं स्वाभाविकच आहे .
असं असूनही एखादा अवलिया त्यांना एकाच वेळी आपल्या रचनेत गुंफण्याची किमया करत असेल तर तो एक अजूबाच म्हणावा लागेल , खरं ना ?
हजारेक वर्षांपूर्वी हे शक्य करून दाखवलं एका अद्वितीय कलावंतानं - महान कवी आणि संगीतकार असलेल्या अमीर खुसरोनं .
अल्लाउद्दीन खिलजीच्या सल्तनतीत खूप मोठ्या ओहद्यावर कार्यरत असलेल्या या बहूआयामी फनकाराचं कवीमन हेच म्हणत असेल की ,
फार्सी जर माझी आई असेल तर खडी हिंदी माझी मावशी आहे . हे केवळ बोलून तो थांबला नाही तर या दोघींना त्यानं आपल्या एकाच रचनेत अगदी सहज आणि बेमालूमपणे एकत्र आणलं . ना कुठे शब्द अडखळले , ना व्याकरण आडवं आलं ना काफिया-रदीफची अडचण भासली ... एक अजरामर रचना जन्माला आली -
जेहाले मिस्किन मकुन तगाफुल ,
दराये नैना बनाये बतियां
न ताबे-हिजरां नदारम ऐ जां
न काहे लेवो लगाये छतियां ...
हा असा भाषा समन्वयाचा अनोखा प्रयोग इतक्या प्रचंड कालावधीनंतर आपल्या मराठी भाषेत झाला . ही खरं तर केवढी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ! पण , माझी मैफिल आणि दाद देणारे रसिक सोडले तर साहित्य क्षेत्रात याकडे कानाडोळाच झाल्याचं अनुभवास आलं . असो !
( गज़ल मराठी भाषेत रुजताना सुद्धा हीच वृत्ती दिसली होती )
जेष्ठ गज़लकार इलाही जमादार यांनी हा प्रयोग केला आणि एक मिसाल कायम केली .
शेराचा पहिला मिसरा उर्दू भाषेत तर दुसरा मराठीत -
ऐ सनम आंखों को मेरी खूबसूरत साज दे
येउनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे ...
इलाहीच्या पावलांवर पाऊल टाकत दीपक अंगेवार , राजीव कदम हे नवीन गज़लकार देखिल पुढे सरसावले आणि हा प्रयोग सुरांच्या माध्यमातून रसिकांसमोर पेश करण्याची संधी मी साधली .
मित्रांनो , आज तीच रचना तुमच्यासाठी घेऊन आलो आहे - मुलाहिजा हो !
उम्र अब ढलने लगी है,कर लू कुछ पहरे-खुदा
टाळ चिपळ्या दे 'इलाही' आणखी पखवाज दे
आपकी दाद का मोहताज ,
स्नेहांकित ,
गज़लनवाज़ भीमराव पांचाळे
Gazal Nawaz #BhimraoPanchale
For More Updates Follow Me At -
______________________________________________________________
★ Facebook bit.ly/Bhimrao...
★ Twitter bit.ly/Bhimrao...
★ Instagram bit.ly/Bhimrao...
Subscribe To My RUclips Channel -- @gazalnawazbhimraopanchale6816
कितीतरी वर्षापूर्वी टीव्ही वर ऐकली होती. मी खुपदा RUclips ला शोधत होतो. आज मिळाली खूपच आनंद झाला....
या साठी मरावे लागत नाही… भिमराव भाऊंना सहज भेटता येते…!!!
ही ओरिजनल ऐकायची होती... जीव धन्य झाला...
दादा अप्रतिम !वाह क्या बात है! खूप वर्षांनी ही गज़ल ऐकली. ## भावना दे तयाला अन थोडीशी लाज दे ## खरच किती गरजेचे आहे आहे आजच्या युगात.
निसर्ग दत्त आवाज. अप्रतिम शब्दरचना. अतिशय सुंदर गजल....
वाह वाह दादा क्या जबरदस्त कंपोझिशन...
बेहतरीन, लाजवाब 👌🙏👌
दादा, 1990-91 सावली शिवाजी महाविद्यालय अकोला येथील रात्रभर आपल्या महफिललीची धुंदी होती. आणि खरं सांगायचं म्हणजे अद्याप ती धुंदी ताजी आहे. काही शब्द विस्मरणात गेले असतील पण स्वर कायम आहे. जिवन धन्य झाले
Gelya 20 varsha pasun bhimrao Sarana ekat aaloy, aaj chi mehfil kahi vegalich vaatli. Apratim Shabd rachna ani andaj gaynacha!!!
ही ग़ज़ल तर अप्रतिम आहेच यातील नवीन गझलकारांनी लिहिलेले शेरही अप्रतिमच. परंतू दादा जेव्हा तुम्ही ही गझल मैफिल मधे आपल्या जादुई आवाजात पेश करता तेव्हा स्वर्गीय सुखाची अनुभुती मिळते . आजच्या निवेदनाने तर गझलेतील गोडवा अधिक जाणवला आहे!
लाजवाब दादा!
.
गझल कोणाची ही असो पण तुम्ही म्हणत असाल तर ती एकदा एकूण मन शांत होत नाही सर great sir👍👍🙏🙏🙏
साहेब मरता मरता एकदा तरी भेटावे तुम्हाला ही ईच्छा आहे
Bheta 30 march La Amravati la
भेटा कीं मग
Kon marata marata..??
माझी आपणास प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आमच्या गावातील ( गडचिरोली) कार्यक्रमात पूर्ण झाली........ धन्यवाद दादा
@@jadhavrupeshster😂😂
खुप खुप सुंदर इलाही जामदर ह्यांची गझल आणि गायलात पण खूप सुंदर दादा 👌👌👌
गंध दे मजला फुलांचा आसवे निर्व्याज दे...ऐ सनम..🙏🌹 दिलं के मरीज की दवा है यह गजल.🌴🌹 माणुसकी
अप्रतिम गझल आहे सर मन प्रसन्न होऊन गेले
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️
अप्रतिम..... आज पहिल्यांदाच ऐकलं सर जी... लै भारी... 😘😘😘😘👏👏👏
वा सर खुपच सुंदर, अप्रतिम 🙏❤️💚
I am a big fan of Bhimrao Pachale ji. Aawaj Ani meaning is mind blowing
लाजवाब...क्या बात है...बेहतरीन शेर...और पेशकश
ही गझल पहिल्यांदा गझल नवाजांच्या आवाजात दीक्षाभूमी नागपूर ला ऐकली होती. तेव्हापासून परत ऐकण्याची वाट बघत होतो.
Mi 2 diwasani roj aikto
bahot behtreen aawaz andaz e Tarannum behtreen lafzo ki adaaygi... Bade suljhe hue gayak hai aaap.. laakh laakh shubh kamnaye aap ko.❤
वाह....
अप्रतिम प्रयोग ...
प्रत्येक शेर जबरदस्त... सुंदर संगम.
आणि दादा आपल्या आवजात ती अजून अप्रतिम झाली.
खुप वर्षे वाट पाहिली तुमच्या आवाजातील हि गझल ऐकायला..!!👏👏👏☺️
खूप छान आहे... रचना आणि सादरीकरण ...
kya bat hai 👌Shabdanchi jabbar dust jugalbandi impression voice👈 la jawaab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
क्या गजल क्या आवाज
हर लब्ज रईस
हर Saaj रईस
खूपच सुंदर..
भाषेचा सुंदर मिलाप...
Wahhhhh...... इलाही जमादार आणि..भीमराव दादा...अजब मिश्रण....
फारच सुंदर.. गझल आणि पंडितजींनी नेहेमीच अप्रतिम गायली..
Highly underrated superstar👌👍🙏💐💐💐
Love you sir💔❤️💔
Bhau I am not lucky yet to attend any of your gazal programmes but whatever i am listening 🎧 you online and personaly luckily got chance to hear you twice on our 10days trip..wow that was miracle..to Hear your miraculous magical voice and gajal..also impressed by your simplicity and ground to earth..your impressive words and personality
Wah bohot badhiya sher ka andaj hai
Tarif e kabil 💐💐👌👌👍👍
The greatest artists of Maharashtra. Proud of Maharashtrian
दंडवत भाऊ
खूप छान
Vah khup Chan sir
वा अप्रतिम सादरीकरण दादा
बाप माणूस...👌
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉🎉 धन्यवाद सरश्री वनवनववनवन बहुत धन्यवाद 🎉🎉🎉
खुपच छान गजल
अप्रतिम आवाज 🙏
बहोत बढिया गझल सर.
Maharashtra t kuthehi programme asel tar sanga please..please
Ok
या गुणी गायकावर मिडियाने अन्यथा केला तरीही रसिकांनी डोक्यावर घेऊन कौतुक केले! प्रत्येक गद्य शब्दाचे पद्यात, सुरेल पद्यात परिवर्तन करण्याचे सांगितीक सामर्थ्य भीमरावांकडे आहे!
अगदी बरोबर आहे.
रसिकांचे धन्यवाद
Kal pasun continue aiykat ahe sir khu p chaan 🙏🙏🙏
एक नंबर 👍👌
खूपच सुंदर दादा...👌👌💐💐💐
क्या बात है सर,
दिल खुश हो गया मान्यवर!
Dil Bag Bag Ho Gaya...Mast
क्या बात है 👌👍
तीर्थयात्रा आत कर वाह
गझल नवाज भिमराव पांचाळे सर, नमस्कार
आपण युटूबवर नवनवीन गझल टाकताय प्रत्यक्ष कार्यक्रम असल्याचे वाटते,ता.लोहा जि. नांदेड येथे आपणास मी प्रत्यक्ष पाहिले अनुभवले गायकी च्या कार्यक्रम, माध्यमातून.... नवनवीन गझल प्रयोग करत आहात याचा खूप आनंद होतो, माझी एक इच्छा आहे की आपणही माझी एक स्वलिखित गझल सादरीकरण करावी... आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली तर याचे खूप समाधान मिळेल आणि अधिक प्रेरणा ही....
No word's..
Love for Next Best...
Superb sir
बहोत खूब
खुप सुंदर स्वर आणि सादरीकरण 👌👌🙏🙏
Me khamgaon cha ahe. Akola ethe bhetnyachi eccha ahe. Kay awaj aahe rao
वा ऽऽ क्या बात है
गझल
मृदु हास्य बालकाचे, आनंद ईश्वराचा
आयुष्य सप्तरंगी, आनंद जीवनाचा
ती भैरवी सकाळी,सारंग तो दुपारी
रात्रीस मालकौंस,आनंद संगिताचा
अंगाइ बालकाला,तरुणास प्रेमगीते
वृद्धास भजन संध्या, आनंद तो गितांचा
तो गंध मोगऱ्याचा, सौंदर्य गुलाबाचे
झेंडू सजावटीला, आनंद तो फुलांचा
फागून रंगिला तो,श्रावण निसर्ग राजा
अश्विन सणासुदिंचा, आनंद विविधतेचा
दिन लाभले सुखाचे, होतेच नशीबाचे
सोसून हास्य फुलले,स्वानंद तो यशाचा
किशोर तातेकर
9075260043
तबला वादक अप्रतिम
Dada thane Kdmc khup vrsh zale. Asel ka show
वाहवा क्या बात है.
हाताचा पंजाने सूर्य झाकन्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय मनुवादी मिडीया ला
माहीत नाही, प्रज्ञासूर्याची आम्ही लेकर
Waah waah
सुंदर👌
Very Good singer no word's for him to prase
वाह! दादा खूपछान आप ल्या gzl ला जोडचं नाही वा अप्रतिम;
Khupach chan
वाह वाह वाह..!!!!
बहोत बढीया💐 🙏
अप्रतिम....
खूप खूप छान 🎉दादा
दादा , कितीही वेळा ऐकली तरी ही गझल नेहमी ऐकाविशी वाटते , पुन्हा नव्याने
Waah!!!
अप्रतिम
मस्त 💞👌🏻
वाह क्या बात
I am proud of you Sir ❤️
अप्रतिम ........
अप्रतिम सर जी 💯🎵👌👍🎤💖
बहोत खूब गझल ❤️❤️
खूप खूप सुंदर....
Kya andaj pesh Karneka lajavab
grt
आफ्रि👌👌👌👌👌
मराठी गझल सम्राट आदरणीय दादा आपल्या या सादरीकरणाने सर्व सांगितीक रेकॉर्ड ब्रेक केले. मानाचा मुजरा 🙏
I met Ilahi sir in Pune..Spend two days with and had discussion on poetry, gazals etc.Was inborn poet..He was Kalidas of modern India..Very few poets try this , he was one of the best..And Panchale sir has glorified his words ..great..
वाह
Apratim...
दादा🙏🙏🙏🙏
एवढा जबरदस्त कलाकाराला प्रसिद्धी का मिळाली नाही यार????
बऱ्याच लोकांना भीमराव पांचाळ माहीत नाहीय...
सुंदर
Wah
🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤
Very good
Apratim
❤
माला गुरुजींचा नंबर भेटेल का किंवा त्यांच निवास ठिकान कुठे हे कळेल का कृपया करुन कोणाला माहीत असेल तर सांगा 🙏🏻
🌹جناب بھیم راو جی بہت ہی خوبصورت سندر آواز بھی کلام بھی ۔🌹20
व्वाह...
1 नंबर ❤
👌👌👍