Guhagar Shimaga | Trailer | संकासुर I गुहागरचं सांस्कृतिक वैभव जगासमोर ठेवणारा मालिकापट I Shankasur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • भगवान परशुरामानी निर्माण केलेली अपरांत भूमी कोकण आपल्या निसर्गाविष्कारासाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती इथल्या चालीरीती,रूढी,परंपरा, सण-उत्सवांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. इथल्या गणेशउत्सव आणि शिमग्यासाठी लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात. गुहागर तालुक्यातील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे तो इथल्या देवखेळ्यासाठी
    स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिढी दर पिढी चालत आलेली ही लोककलेची परंपरा आजही त्याच जोशात साजरी केली जाते. गुहागरच्या गावागावात शिमग्यात शंकासुर आणि खेळी भोवनीसाठी अनवाणी फिरतात ती प्रथा नक्की काय आहे का साजरी केली जाते त्यामागे नक्की काय कथा प्रचलित आहे.
    इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पडली समुद्राच्या निळाईची, ताज्या माश्याच्या मेजवानीची, नारळीपोफपळी च्या ऐसपैस बागांची, एकांतात वसलेल्या पुरातन देवळांची. इथल्या मातीच्या कणाकणात जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जपलाय तो कोकणातील जिव्हाळा. शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिव्हाळ्याचं प्रतीक आहे.
    मग येताय ना शिमग्याला.....!

Комментарии • 41