रायलिंग पठार | महाड, पाने = बोराट्याची नाळेतील प्रवास आणि थरारक अनुभव | Rayling pathar | lingana |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • रायलिंग पठारावर उभं राहिल्यावर कुठेतरी गडकोटांची स्पंदनं जाणवू लागतात. सह्य़ाद्रीचे रौद्र पुढय़ात उभे राहते. लिंगाण्याचे अलौकिक रूप आणि रायगडाचे दर्शन इथूनच घडते. हे सारे पाहताना भान हरपायला होते. इथला भन्नाट वाऱ्याचा झोत अंगावर घेताना स्वत:च्याही अंतरीची खूण पटत जाते.
    महाराष्ट्राचे दोन मानबिंदू असणाऱ्या तोरणा-राजगडाच्या मावळतीला असलेला एक अभेद्य कडा. पुणे अन् रायगड जिल्ह्याच्या सीमेवर. सीमा कसली, ही तर सह्याद्रीच्या असामान्य रौद्रत्वाची परिसीमाच! या कडय़ावर उभं राहिलं की पुढय़ात उभं असतं सह्याद्रीचं शिविलग! त्याच्याच मागे आपल्याला नकळतपणे नतमस्तक व्हायला लावणारं एक ‘शिवमंदिर’! गिर्यारोहक नवखा असो वा कसलेला, निसर्गप्रेमी असो व निसर्गाशी अपरिचित, कोणत्याही मराठी मनाची तार क्षणार्धात झंकारावी आणि या रांगडय़ा सह्याद्रीशी त्याचं नातं कायमचं जुळावं, असं हे ठिकाण, म्हणजेच रायलिंग पठार!
    देश आणि कोकणला जोडणाऱ्या अनेक घाटवाटा आहेत. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्याच्या पश्चिमेलाही अशाच दोन घाटवाटा रायगड जिल्ह्यात उतरतात. सिंगापूर आणि बोराटा अशी या नाळेंची अगदी लोभस नावं
    #mahadkarmehulsawant
    #lingana
    #raylingpathar
    #mahad
    #pane
    #raigad

Комментарии • 19