बुद्धाची ज्ञानप्राप्ती: एक महाकाव्य (उत्तम कांबळे यांचे चिंतन)- अभिवाचन डॉ. आलोक जत्राटकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • आ'लोकशाही प्रस्तुत बुद्ध जयंती ऑनलाईन व्याख्यानमाला महोत्सव या उपक्रमांतर्गत बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार, संपादक व साहित्यिक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आयु. उत्तम कांबळे यांनी लिहीलेल्या 'बुद्धाची ज्ञानप्राप्ती: एक महाकाव्य' या मुक्तचिंतनाचे अभिवाचन डॉ. आलोक जत्राटकर यांनी सदर व्हिडिओमध्ये केले आहे.
    ज्ञानप्राप्तीच्या क्षणाबरोबर बुद्धाच्या अंतरंगात, बाह्यरंगात काय घडलं असेल, हे जाणून घेण्याचं कुतूहल, उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिलेली असते. समस्त मारांचा नाश म्हणजे बुद्धाचा उदय, असं एक सुंदर सूत्र या क्षणी जुळून आलेलं होतं. बुद्ध म्हणजे कोणी व्यक्ती नव्हती. व्यक्ती असलेला सिद्धार्थ नाहीसा झाला होता. त्याची भूमिका संपली होती. बुद्ध म्हणजे नवा माणूस, जो असा कधीच जन्माला आलाच नव्हता. बुद्ध म्हणजे जागृती. अशी जागृती कधी झालीच नव्हती. बुद्ध म्हणजे ज्ञान. असं ज्ञान पृथ्वीच्या पाठीवर उगवलेलंच नव्हतं. बुद्ध म्हणजे निसर्ग. असा निसर्ग माणसानं हजारो वर्षांत कधी पाहिलाच नव्हता. बुद्ध म्हणजे काय, हे आणखीही हजारो, लाखो विशेषणांत सांगता येईल. ते एक असं महाकाव्य होतं, जे जगातल्या अन्य कोणत्याच महापुरूषाच्या जीवनावस्थेत तयार झालेलं नसावं. त्याचं कारण तिथं व्यक्तीतून व्यक्तीच जन्माला आली आणि इथं ज्ञान...
    आयु. उत्तम कांबळे सरांचं हे मुक्तचिंतन मुळातूनच ऐकावं असं झालं आहे. सरांच्या सहजसोप्या पण भावनांना आवाहन करणाऱ्या शब्दांमुळं तर ते अधिकच श्रवणीय आणि रोमांचित करणारं झालं आहे. बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या क्षणासंदर्भात सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं असं हे एक महत्त्वाचं मुक्तचिंतन...
    (Disclaimer:- 1. The views and opinions expressed in the video are solely of the concerned subject expert. 2. The pictures/posters/artistic creations used in the video, are for representational and purely non-commercial purpose only. The channel does not claim any copyright on that material and those are remained with the respective artists and websites. We respect and thank for their kind cooperation.)

Комментарии • 18

  • @pritamsavle4782
    @pritamsavle4782 10 месяцев назад +1

    अप्रतिम प्रस्तुती सर 🙏🏻🙏🏻

  • @vachtavachtaaiktaaikta
    @vachtavachtaaiktaaikta 3 года назад +6

    उत्तम कांबळे गुरुजींनी लेख पाठवला तेव्हा लगेचच वाचला होता. परंतु या व्हिडिओमधून जी वातावरण निर्मिती झाली आहे ती हृदयद्रावक आहे. मनःपूर्वक शुभेच्छा! 👍🙏💐🌹

  • @PrabudhaRangari
    @PrabudhaRangari 11 месяцев назад +1

    khup Apratim Sir

  • @balajibharde1352
    @balajibharde1352 2 года назад

    उत्तम नव्हे अतीत्तम।

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Год назад

    जय भीम 👍👌💐

  • @ravidhanwate2404
    @ravidhanwate2404 Год назад

    Thanks sir.. For presenting in new way

  • @Discovery7066
    @Discovery7066 Год назад

    Kharch surekh sir❤

  • @sanjivanikamble8952
    @sanjivanikamble8952 2 года назад

    Very nice

  • @prof.ashalatakamble3546
    @prof.ashalatakamble3546 3 года назад +1

    खुप सुंदर !लालित्याचा उत्तम आविष्कार!

  • @kabirkamble4165
    @kabirkamble4165 3 года назад +1

    Namo Budhay sir very nice.I proudof you. Jai bhim.

  • @namdevwalke3479
    @namdevwalke3479 Год назад

    खुप खुप सुंदर.छान उपक्रम

    • @Alokshahi
      @Alokshahi  Год назад

      धन्यवाद सर

  • @kailashzinea
    @kailashzinea Год назад

    apratim lekh.aani vachan hi tevdhacha apratim.

    • @Alokshahi
      @Alokshahi  Год назад

      Dhanywad Sir... Keep watching.

  • @चलाशिकूया-फ9ज
    @चलाशिकूया-फ9ज 3 года назад +2

    अप्रतिम !!! लेख💐💐💐 व सुंदर अभिवाचन 👌

  • @ajmchannel
    @ajmchannel 3 года назад +1

    Very nice !!! Khupach chan lekh..💐💐💐

  • @prof.ashalatakamble3546
    @prof.ashalatakamble3546 3 года назад +1

    वाचनही उत्तम!

    • @Alokshahi
      @Alokshahi  3 года назад

      धन्यवाद