मित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • मित्रांसोबत रानात बनवला चिकन रस्सा 😍 | पावसाळ्यात जखणीच्या ढवात पोहलो - Umbarshet, Dapoli (Konkan) पावसाळ्यात कोकणात ढवात पोहायला जाम मजा येते. दरवर्षी आम्ही पावसाळ्यात आमच्या गावच्या जवळ असलेल्या जखणीच्या ढवात पोहायला जातो. यावेळेस आम्ही रानात जाऊन चिकन रस्सा घटसर बनवला होता. जंगलात जाऊन जेवण बनवून खायची मजा भारी असते. रानात जाऊन आम्ही चिकन सुक्का आणि रस्सा बनवला. घरातून सर्व साहित्य घेऊन गेलो होतो. पाच किलो चिकन कापून नेले होते. जिरा राईस आम्ही रानातच बनवला. जेवण बनवायला या वेळेस दिन्या होता सोबत सर्व मित्र हातभार लावत होते. गेल्यावर्षी आम्ही चिकन दम बिर्याणी नेली होती. रिमझिम पाऊस चालू होता. पाऊस लागत असल्यामुळे आम्हाला जेवण बनवायला उशीर होत होता. सर्व मित्रांनी मिळून आम्ही रानात जेवण तयार केले. सर्व मित्रांनी मिळून आपल्या चॅनलचे दिड लाख सबस्क्राईबर झाले म्हणून केक आणला होता. सोबत दिन्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा केक आणला होता. आम्ही जेवायच्या अगोदर केक कापला खूप मजा आली. आम्ही पंगतीने जेवायला बसलो. जेवण खूपच चविष्ट झाले होते. सर्वांनी अगदी पोटभर जेवण केले. जेवण झाल्यावर आम्ही सगळेजण जखणीच्या ढवात पोहायला गेलो. मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला. मित्रांनी उंचावरून ढवात उड्या मारल्या. बरोबर एक वर्षाने आम्ही यावेळेस या ठिकाणी पोहायला आलो होतो. दोन तास पोहून झाल्यावर आम्ही सर्व मित्र पुन्हा ढवाच्या वरच्या बाजूस जाऊन उरलेलं जेवण खाल्ले. पोहून झाल्यावर खूप भूक लागते. आमचा दिवस खूपच मजेशीर गेला. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही सगळेजण केळशीमधून आलो होतो. अगदी जवळच हे ठिकाण आहे. हा जखणीचा ढव उंबरशेत गावच्या रानात आहे. हे गाव दापोली तालुक्यातील डोंगरावर वसलेलं छोटंसं सुंदर गाव आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही रानात चिकन रस्सा बनवला ते दाखवले आहे. रानात जाऊन आम्ही जेवण कसे केले ते दाखवले आहे. जखणीच्या ढवात जाऊन आम्ही पोहण्याची मजा केली ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChickenSukkaRecipe #RanataliParty #JakhanichaDhav #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 430

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 года назад +4

    आयुष्यात अशी धम्माल करणे गरजेचे आहे..👌👌
    #SamreshVlogs

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 3 года назад +15

    खूप मज्जा आली ❤️

  • @amitmandelkar9905
    @amitmandelkar9905 3 года назад +1

    Hi maza fakt gavich...ek no.video.mitra khup changale aahet.jungle party masstch,👍👍

  • @sanjaydhupe3920
    @sanjaydhupe3920 2 года назад +1

    मित्रा सर्वात अगोदर तुम्हा सर्वांच्या मैत्री ला व ऐकी ला सलाम हा आनंद व सुख जगात कुठेही ही मिळणार नाही किती ही पैसा खर्च केला तरी हा आनंद गावातील मित्र व त्यांच्या सहवासात च मिळेल खूप छान

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 3 года назад +6

    खुप छान विडीओ आणि धन्यवाद तु माझ्या घरी आलास आणि मित्रांसोबत मजा केली सर्वांना माझ गाव,ढव दाखवलं खुप मज्जा आली धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा🙏

  • @moreshwarmohite7169
    @moreshwarmohite7169 3 года назад

    मस्तच एक नंबर आहे धबधबा आणि तुमचे मित्र पण खूप एंजाय करतात👌👌👌

  • @kharkande
    @kharkande 3 года назад +5

    अतिशय सुंदर नियोजन. झकास मेजवानी. पार्टी आणि एन्जॉय एक नंबर. सतिशराव, तुमचं खास अभिनंदन. पुढील वाटचाल अशीच यशस्वी होवो. शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад

    (चला जाऊया माझ गाव बघायला )हा विडीओ
    खूप छान झाला एक नंबर👍सुंदर सीन 👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    असे मित्र भेटायला भाग्य लागते. तुम्ही भाग्यवान आहात 🙏🙏🙏🙏 डोह अनुभवायचा आहे.

  • @villagelover5815
    @villagelover5815 3 года назад +1

    सतीश भाऊ खूप छान व्हिडिओ असतात तुमचे.आणि मी तुम्हाला कधी भेटलो नाही.परंतु वहिनीला एकवेळा भेटलो आहे.त्यावेळी तुमचं लग्न सुद्धा झालं नव्हत.जेव्हा फर्स्ट टाईम मी केळशी मध्ये आलो होतो.म्हणजे मला साखरी गावाला जायचं होत.पोलीस पाटलांच्या मुलीचं लग्न होत.ती येऊ शकली नाही.म्हणून तिने वर्षा आणि श्वेता या तिच्या दोन मैत्रीणीना मला आणायला पाठवलं होत.तेव्हा तिची आणि माझी ओलख झाली.खूप साधा आणि प्रेमळ स्वभाव आहे तिचा.साखरी गावात खूप वेळा गेलो आहे मी.पण वर्षाची पुन्हा कधी भेट झाली नाही.या व्हिडिओ मुळे आज तिला बघता आल.तुम्ही कमेंट बघितलीत माझी तर वर्षाला नक्की सांगा. पूजाचा मित्र.आणि तुम्ही एकदा आमच्या गावी नक्की या पोलादपूर ला.किव्हा तुमचं काही contact असेल तर द्या.मी वाट पाहीन तुमच्या रिप्लाय ची.

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 года назад

    खूप छान सीन आणि मजा आली

  • @balajironge4738
    @balajironge4738 3 года назад +1

    जीवनाचा खरा आनंद तुम्ही घेतात दादा, मित्र परिवार 👌👌

  • @rohandeshmukh807
    @rohandeshmukh807 3 года назад +2

    jay sadguru mitran barobar keleli masti nehami lakshat raahate

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад +1

    छान झाली पार्टी अविनाश व संदेश हवे होते

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy tyancha gav lamb aahe

  • @AK-rf5lm
    @AK-rf5lm 3 года назад +5

    Awesome 💗 fantastic osm ❤️ post 💝👌💓 Satish bhau 👍❤️❤️❤️❤️

  • @ganeshsawant1278
    @ganeshsawant1278 3 года назад

    खूप छान. माजा आली असेल थोडा पाऊस असता तर आणि मजा आली असती so खुप छान enjoy जीवनात हीच माजा असते बाकी काही नाही👍👍👌

  • @ams25041988
    @ams25041988 3 года назад

    अशी मजा कुठेच भेटणार नाही आणि मित्र सोबत असतील तर वेगळीच मज्जा ( आमच्या मामाच्या गावाची आठवण झाली लहानपणीची हा व्हिडिओ पाहून) मस्त सतीश ❤️

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 года назад +25

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏

  • @chetnakashelkar594
    @chetnakashelkar594 2 года назад

    Khup chan nature ahe gavcha 👌🏻

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 3 года назад +1

    मस्त.

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 года назад +1

    Superb bhavu
    रानात जेवण्यासारखं सुख कशातच नाही

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 года назад +1

    खुप छान भावा सतीश 👍 खुप मुलांनी धमाल केली 👌 चिकन पार्टी मस्त पैकी झाली आहे 👍 पावसाळ्यात व्हिडिओ मस्त धबधबा मस्त होता 👌 फूल मस्ती फूल धमाल केली आहे 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 3 года назад +1

    Gavachi maza pharach chan
    Same program amhi khandalyala karaycho 👍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад +3

    वाह , हे च असते खरी मझझा गांवात
    तरी पण पाणी त थोडी कालजी ध्या 🙏 बाकी विडीयो फार छान । पाटी् जोरदार ऐंनजोय 👍👌👌✌️💐🎉👏

  • @bhimsinghdabhade4980
    @bhimsinghdabhade4980 3 года назад

    Very nice खुप सुंदर हे सर्व निसर्ग सौदर्य लाव्ह दाखवल्या बद्दल सतिश भाऊ धन्यवाद !👍🖕🙏🌹

  • @kirtichaudhari266
    @kirtichaudhari266 3 года назад

    नमस्कार सतिश दादा ,
    सगळ्यात पहिले तर खूप खूप अभिनंदन.
    आजचा विडिओ तर अप्रतिम. मित्रांबरोबरचा फुल धमाल विडिओ. सगळ्यांनी मिळून केलेले जेवण तर १नंबरच आणि मित्रांबरोबर पोहण्याचा आनंद काही वेगळाच आहे .दादा ,तुम्ही पण एवढ्या वरून उडी मारलीत !उडी माराल असं अजिबातच वाटल नव्हत. हि मजा फक्त गावाकडेच अनुभवता येवू शकते आणि तिही जिवाभावाच्या मित्रांबरोबर.

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад +1

    Vaa lay bhari picnic baghun koop masta vatala jevan sudha chhan masta ruchkar banavale ani sagale friends sudha koop changale ahet asich friendship rahu de dhabdhaba sudha chhan masta ahe video koop avadala sagala friends na maze ashirvad God bless all friends

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 3 года назад

    चिकन पार्टी लय भारी आणि डोहातील मजा मस्ती पाहण्यासारखी मित्र मंडळ खुप छान आहे

  • @prashantgaurav4297
    @prashantgaurav4297 3 года назад +1

    1 नंबर दादा मित्रा बरोबर पार्टी करण्यात
    काही और मजा असते.

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад +1

    खूप भारी जाम मजा आली आणि शेवटीला निखिल ची comedy ने हसवलं 😊👌 Chiken party khup mast Hoti

  • @charliegamingsquad4275
    @charliegamingsquad4275 3 года назад +1

    Nice celibresion

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 3 года назад +1

    खूप खूप सुंदर 🔥

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 3 года назад +1

    Mast mast khup bhari video, tempting yummy jevan, best friends ekdum . Superb.

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад +1

    मस्त

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 года назад

    Khupch छान भाऊ. आम्हाला विडिओ बघून वाटतं आहे की. आता आमच्या गावाला जावे वा श्रावण महिना चालू व्हायच्या आत मस्त मटण बनवावे वा मस्त ताव मारावा. 👌👌👌

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 2 года назад

    Dada this is the best of collection of your videos .... Mast dives

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 года назад +1

    Mast ....enjoy ur party with lovely friends ...ani khup khup abhinandan💐💐💐💐💐💐💐💐god bless u dada

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 года назад +1

    1no enjoy

  • @pratapyeolekar6439
    @pratapyeolekar6439 3 года назад

    खूप छान... असेच नेहमी आनंदी रहा सर्वांनी.👍

  • @amitghadigaonkar2813
    @amitghadigaonkar2813 3 года назад

    Full mhanje full enjoy kartay. Khup Khup shubhechchha

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    खूप छान👏✊👍 मस्त🎉🎊 धमाल वीडियो👏✊👍 बापरे काय सगळ्यांनी ऊड्या मारल्या ढवात... एक नंबर सगळ्यांना... चीकन टेस्टी, मस्त🎉🎊... आम्ही पण पाेहताे आहाेत असे वाटले🎉🎊 stay blessed🙏

  • @vinodnandviskar8616
    @vinodnandviskar8616 3 года назад +1

    Chan

  • @sunilbirwadkar6580
    @sunilbirwadkar6580 3 года назад +2

    तुमची डोहातली मज्जा 👍
    मला वाटलं मि पण तुमच्या
    सोबतच आहे डोहात 🥞

  • @patilskitchenvlog
    @patilskitchenvlog 3 года назад +1

    ऐक नंबर 👍🏻👌

  • @anandbhangle2758
    @anandbhangle2758 3 года назад

    एकदम मस्त!
    पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @visharantimali484
    @visharantimali484 3 года назад +1

    Dada kokanatal culture khup Chan aahe , 👍tumche all videos khup Chan astat

  • @mit368
    @mit368 3 года назад +1

    Wahh jabbardast picnic wahh satish bhau wahhh😀😀😀😀

  • @somnathtangade6136
    @somnathtangade6136 3 года назад +2

    वा क्या बात है....सतीश सर अस feel होत होतं की मी video बघत नाहीये तर या spot वर तुमच्या सोबत enjoy करतोय....खूप खूप खूपच मस्त.....👍👍👍👍👍

  • @madhavvanarse8680
    @madhavvanarse8680 2 года назад +1

    Ok 👌

  • @Vishakha_phaterpekar
    @Vishakha_phaterpekar 3 года назад +1

    Mast!

  • @ajitkalekar1550
    @ajitkalekar1550 3 года назад +1

    मस्त enjoy भावा. छानच Video होता.

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 года назад +1

    हा खडीक्रशरच्याच व्हिडिओ तला डोह आहे का सतिश ?
    मस्त निसर्गाच्या सानाध्यातली पार्टी अशा जंगलातल्या पार्ट्यांचे अजून व्हिडियो बघायला आवडतील 👌👌👌

  • @bhagyashreepatil8796
    @bhagyashreepatil8796 3 года назад +1

    Mast video...khup avdli😍😍 nikil chi khup majjya aali 😂

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад

    Congratulations🎉🎉🥳Dada 150k jhale baddhal👍👍

  • @sjvlogs6763
    @sjvlogs6763 3 года назад +2

    मजा आली विडिओ बघून ....निखिल झो जाम गाराठला वाट्टो😂😂😂

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 3 года назад

    अप्रतिम लय भारी

  • @sudhirpowar6549
    @sudhirpowar6549 3 года назад +2

    Best celebrations of 150k family members and birthday . Nikhil is full enjoy of waterfall and swimming..

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 года назад +2

    जबरदस्त

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 года назад

    निसर्ग रम्य वातावरण आणि चिकनची पार्टी खूप छान झाली सतिश दादा. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 3 года назад +1

    खुप भारी आहे दादा छान पार्टी आयोजित केली आहे तुम्ही 👌👍👌👍😀😘

  • @siddhinaik9557
    @siddhinaik9557 3 года назад +1

    आम्हाला पण मज्जा करायला आवडेल तुमच्या गावी येऊन....

  • @pansare9941
    @pansare9941 3 года назад

    👌👌👌👌अभिनंदन 💐💐💐
    वीडिओ नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌👌👌सुपर

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 2 года назад

    Khup chhan dada. Ashich eki theva. 👌👍

  • @ajitmodak7713
    @ajitmodak7713 3 года назад +1

    Nice 1no🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 года назад

    खूप छान... सुंदर निसर्ग.....

  • @pradeepsonavane6011
    @pradeepsonavane6011 3 года назад

    Tumche khoop khoop abhar video baghun khoop majhya Ali...asa vatta mi hoto tumchya barobar ani tumche mitra majhe mitra pramane vatta hote..khoop enjoy keli tumhi dhamal keli wah wah mitra God Bless you..

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 3 года назад +3

    टोप न्यायचेत टोप ☺️☺️☺️

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 3 года назад +1

    Mast dhav ahe yar Dada ek no enjoy amcha pn man kartoy gavi yach yar ...ky sangu tula....

  • @shamchavan4571
    @shamchavan4571 3 года назад +1

    CONGRATULATIONS SATISH FOR 155K. KHUP CHAN EXCELLENT VIDEO THANKS FOR SHARING.VERY HAPPY TO SEE YOU ALL HAPPY.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +3

    Lai bhari 👌👌👌👌 Satish

  • @aashavinikajarekar2527
    @aashavinikajarekar2527 3 года назад +1

    Nice

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 года назад

    Are मस्त मजा करता बघून लय भारी वाटते

  • @sarveshgovekar1854
    @sarveshgovekar1854 3 года назад +1

    Dada un sab kashe karychya

  • @ganeshkognole1665
    @ganeshkognole1665 3 года назад +1

    Nice video

  • @shubhamyewale9141
    @shubhamyewale9141 3 года назад +1

    विडिओ चि प्रतीक्षा 😍

  • @chandrashakershinde1155
    @chandrashakershinde1155 3 года назад +1

    खूप मस्त, मजा आली, मी पण येतो एकदा एन्जॉय करायला 👌🙏

  • @sanjaybachhav8718
    @sanjaybachhav8718 3 года назад

    खूप धमाल सतिष आणि मित्रपरिवार !
    👌👌👌👍👍👍

  • @pratikshakaravde4980
    @pratikshakaravde4980 3 года назад

    खुप छान

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 3 года назад +1

    पाण्याची आवड सर्वांना असते परंतु आपल्या उत्साहाला आवर घातला पाहिजे. नागपूर येथील एक मुलगा प्रथमेश नांव असाच पाण्यात उडी मारुन २-३ वेळा व्यवस्थीत आला परंतु नंतर दगडावर आपल्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी अपंग झालाय व प्रचंड खर्च करून देखील व्यवस्थीत झाला नाही. तेव्हा संयमाने वागा.

  • @vilassakate9898
    @vilassakate9898 3 года назад +1

    Mast party'

  • @prathameshshinghare3279
    @prathameshshinghare3279 3 года назад

    भरपूर मजा दादा

  • @erajyoti5493
    @erajyoti5493 3 года назад +1

    Wow satish chan

  • @ashwinikadam
    @ashwinikadam 3 года назад +1

    Video khup awdla👌

  • @sudhanshujadhav3922
    @sudhanshujadhav3922 3 года назад +4

    Congratulations for 155k , Keep Growing 200k soon ❤️

  • @kiranrasal8929
    @kiranrasal8929 3 года назад +1

    Sukh!!!!

  • @ruchiraul2164
    @ruchiraul2164 3 года назад +1

    Ek Number video 👌❤️

  • @pankaazful
    @pankaazful 3 года назад +1

    Satish please Thermacol chi plate nako waprus, specially garam serve karnya sathi please

  • @pankajmarathe4858
    @pankajmarathe4858 3 года назад +1

    खूप छान गावाकडची आठवण करून दिली 👍🙏

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 3 года назад +1

    Wow.... Feeling as Dream.... Best episode

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    मस्त मजा केली. छान. व्हिडीओ आवडला.

  • @swapnilmore1979
    @swapnilmore1979 3 года назад +1

    1 no. Mr satish nice vlog

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 3 года назад

    Hi Satish jevan mastch Good I ashi maja havi karayalach

  • @madhurishinde7874
    @madhurishinde7874 3 года назад +3

    Khupach mast ❤️

  • @sagarmohite9710
    @sagarmohite9710 3 года назад

    दादा छान विडिओ आहे तुमची धमाल बघून खुप मजा वाटली

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад

    जबरदस्त पावसाळी पिकनिक. खूपच छान भाजी बनवली. तुमच्या गावाला नक्कीच भेट देऊ.

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 2 года назад

    Lovely place and lovely people ur. Thanks for sharing yummy chicken . Grt team work. Pls take care.

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 года назад +1

    यापेक्षा तुमच्या घरच्या member बरोबर चे व्हिडिओ जास्त छान असतात

  • @umeshgalande8763
    @umeshgalande8763 3 года назад

    लय. भारी

  • @shrutikhochare4129
    @shrutikhochare4129 3 года назад

    Mast enjoy .Amachya Dinesh Bhaila savay ahe jevan banvaychi Hotel mady

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 3 года назад +1

    Mast mitra, juni aathvan aali, mi suddha aamchy ghari vasaila asech jaycho