बार्शी येथे खजुराची यशस्वी लागवड...२ एकरमध्ये २२५ झाडे...दीड लाखांचा निव्वळ नफा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2021
  • #YesNewsmarathi #SolapurNews
    बार्शी : येथील राजेंद्र प्रताप देशमुख यांनी लाल आणि पिवळ्या रंगाच्या खजुराची झाडे लावून फायदेशीर आणि शाश्वत शेतीचा प्रयोग राबविला आहे. दोन एकरा मध्ये देशमुख यांनी दोनशे ते सव्वादोनशे खजुराची झाडे लावली आहेत. बीयांपासून रोपे तयार करून त्यांनी ही खजुराची बाग फुलविली आहे. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात या झाडांना फुले येतात . फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत म्हणजे तीन ते चार महिने झाडांना पाणी द्यावे लागते. त्यानंतर आठ महिने झाडांना पाणी अजिबात लागत नाही. या झाडांपासून साधारणपणे दीड ते दोन वर्षांनी उत्पादन सुरू होते खजूराच्या फळांना पुणे आणि मुंबईमध्ये १०० रुपये प्रति किलो दर मिळत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. खजुराची बाग ही साधारणपणे ३० ते ३५ वर्ष सहजपणे टिकते. व्यवस्थित देखभाल केल्यास खजुराच्या झाडांचे आयुष्य शंभर वर्षापर्यंत असल्याचे राजेंद्र देशमुख यांनी स्पष्ट केले. " जळत नाही आणि मोडत नाही" म्हणून खजुराची शेती अतिशय फायदेशीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांतर्गत ' आत्मा ' या योजनेनुसार त्यांनी मार्गदर्शन घेतले. प्रतिवर्षी खजुराच्या शेतीमधून एक ते दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
    *
    दुष्काळी भागासाठी खजूर शेती योग्य....
    सोलापूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यासाठी अत्यंत कमी पण्यावर जगणारी खजुराची झाडे लावणे योग्य असल्याचे बार्शी येथील प्राध्यापक राजकुमार शिंदे यांनी सांगितले . प्रत्येक झाडा पाठीमागे दररोज पन्नास लिटर पाणी तीन महिने दिले तर या झाडांना पुन्हा वर्षभर पाणी द्यावे लागत नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पाणी कमी असेल आणि जमीन खडकाळ असल्यास खजुराची शेती करण्यास काहीच हरकत नसल्याचे रेश्मा शिंदे यांनी स्पष्ट केले.
    ★Follow us, Share, Support★
    Website:- yesnewsmarathi.com
    Facebook:- / yesnewsmarathi
    Twitter:- / yesnewsmarathi
    shivaji survase 9881748329
    ★Contact us★
    mobile- 9881748329
    Email:- yesnewsmarathi@gmail.com
    येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии • 9

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 7 дней назад

    उत्तम

  • @shrikantdeshmukh1947
    @shrikantdeshmukh1947 2 года назад

    अभिनंदन साहेब

  • @NagnathGanje-tf3fg
    @NagnathGanje-tf3fg Год назад

    खुप छान

  • @balanathpawane3098
    @balanathpawane3098 2 месяца назад +1

    रोपे कुठे मिळतील

  • @Kalidas-poul9096
    @Kalidas-poul9096 2 месяца назад

    रोपे कुठे भेटतील

  • @nivruttibudhnar9114
    @nivruttibudhnar9114 10 месяцев назад

    सराचा नंबर मिळेल का

  • @pramodghodake9106
    @pramodghodake9106 3 года назад

    देशमुख सराचा फोन नंबर तसेच पत्ता बाबत कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @pandurangsathe428
    @pandurangsathe428 3 года назад +4

    देशमुख सरां कडील खजूर मी खाल्ले सुंदर आणि स्वादिष्ट आहे सोलापूर बार्शी रोडलाच एक आज्जी विकत होत्या 👌👌👌👌