#nagar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • अहमदनगर तृतीयपंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्या मार्गदर्शनाने आषाढ महिन्या निमित्ताने केडगाव देवी मोहिनी नगर काळेश्वरी मंदिर येथील गुरुवर्य आक्कु नगरकर आराधी जोगती यांच्यावतीने आणि गुरुवर्य संतोष सानप यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी लखाबाई देवी मिरवणूक यात्रा काढली होती यावेळी देवीच्या गाभाऱ्याला विविध फुलांची सजावट करण्यात आली होती... यावेळी देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य ठेवण्यात आला होता. यावेळी परिसरातील महिला डोक्यावर कलश घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. देवीला विविध दागिन्यांनी मढवण्यात आले होते ही मिरवणूक मोहिनी नगर केडगाव देवी रोड केडगाव वेस मार्गे लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवण्यात आला. या यात्रेमध्ये ठीक ठिकाणी पोतराजांनी त्यांचा खेळ सादर केला. मध्ये घोडे देखील सहभागी झाले असून त्यांना देखील हलगीच्या तालावर नाचवण्यात आले, तसेच गुरुवर्य संतोष सानप आणि गुरुवर्य आकु नगरकर यांनी तिची मूर्ती डोक्यावर घेऊन मृत्य सादर केले... त्यावेळी केडगावकरांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती... लक्ष्मी मातेला गेल्या सात ते आठ वर्षांपासून वाजत गाजत देवीची मिरवणूक काढून नैवेद्य ठेवला जातो हा नैवेद्य शेतकरी बळीराजाला सुख समाधानी व्हा, तसेच राज्यामध्ये मेघराजा चांगल्या प्रमाणात बरसावा, देशावर कोणतेही संकट येऊ नये, सर्व नागरिक सुखा समाधानाने एक दिलाने नांदावे असं देवीकडे साकडं गुरुवर्य संतोष सानप आणि गुरुवर्य अक्कु नगरकर यांनी घातले असल्याचे सांगितले आहे
    यावेळी केडगाव परिसरातील महिला भक्त जण या लक्ष्मी माता यात्रा उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Комментарии •