टकमक टोकाजवळील धबधब्यातून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #बळीराजा #heavyrain #rain #mansoon #cyclone #rain#strom #flashflood #cloudburst #rain #पाऊस
    टकमक टोकाजवळील धबधब्यातून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडला | Hello Baliraja
    कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी पाण्याशी खेळ नको, असं म्हटलं जातं. पण अलीकडं रिल्सच्या वेडापाई अनेक तरूण नको ते धाडस करतात. अनेक घटनामध्ये धाडसं जीवावर बेतल्याचं पहायला मिळालं. असाच आणखी एक प्रकार समोर आलाय. एक तरूण जोरदार वाहणाऱ्या धबधब्यामध्ये पोहण्याचा प्रयत्नात वाहून गेला. त्या तरूणाचा मृतदेह ४ दिवसांनी सापडलाय.
    सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.
    रविवारी रायगडावरून ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसानं तेथील धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलं होतं. आपण या घटनेचे व्हिडिओ पाहिला असालचं. यादरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील एक तरुण मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वाहून गेला. मनोज खोपकर असे या तरुणाचं नाव आहे.
    मनोज खोपकर आपल्या मित्रांसह टकमक टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. तेव्हा एनडीआरएफच्या पथकाकडून मनोज खोपकरचा शोध सुरु होता. ४ दिवसानंतर मनोजचा मृतदेह आढळून आला. यामुळं शोधमोहीम आता थांबवण्यात आलीये. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    ----------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •