सावरकरांवर मालिका पाहायला निश्चित आवडेल...कारण चित्रपटाला वेळेच्या मर्यादा असतात त्यामुळे सगळे काही दाखवता येत नाही..पण मालिकेत ते दाखवले तर त्यांचे हे पैलू ही दाखवता येतील...आपण कराल का प्रयत्न..जशी लोकमान्य टिळकांची मालिका गाजली तसेच ही पण सर्वदूर पोचेल.. शिवाय आपला प्रयत्न स्तुत्य आहे तरीही सावरकर असे तुकड्या तुकड्यात समजणे कठीण जाते
तुम्ही दोघांनी अत्यंत महत्वाचा असा विषय हाती घेतला आहे. तुमचे मनापासून आभार! हा विषय थांबवू नका. दरोरोज किमान २० शब्दांचे मराठी पर्याय तुम्ही सांगितले, तर तो सर्वोत्कृष्ठ उपक्रम होईल. कारण तुम्ही दोघी आम्हा सर्वांना तुमच्या कार्यामुळे आवडता. तुम्हाला सर्वच ओळखतात. तुमचा चांगला प्रभाव सर्वांवर आहे. कारण उपक्रम कोण राबवत आहे ? याचाही परिणाम जनतेवर होत असतो. म्हणून ही विनंती केली. धन्यवाद!
लोकमान्य टिळकांनी लिहीलेल्या गीतारहस्य ह्या ग्रंथात फक्त मराठी भाषेचा वापर केला आहे.जवळजवळ १२०० पानांचा हा ग्रंथ आहे, ह्यावरून मराठी भाषेचे वैभव लक्षात येईल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खूप प्रतिशब्द दिलेले आहेत. काही शब्द मात्र प्रत्यक्षात आणता येत नाहीत. STATION अग्निरथ विश्रामधाम . SIGNAL -अग्निरथ गमनागमनदर्शक लोहताम्रपट्टी. आपण जे अवघड व्रत म्हणालात त्याला त्यांनी " असिधाराव्रत " असे नाव दिलेले आहे. असो. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस पुन्हा आपल्या देशाला मिळो, जसे मोदीजी आहेत तसे, हीच ईशचरणी प्रार्थना ।।। धन्यवाद ।।।
छान episode होता. लिंक download करून पुस्तक मिळाले, त्या बद्दल मी आभारी आहे🙏🏾. माझ्या सारखे , जे उत्तर भारतात राहिले आणि मराठी शी संपर्क कमी होत गेला त्यांच्या साठी ही माहिती व पुस्तक रोचक आहे. असेच कार्यक्रम करत रहा.
सावरकर हे जगातील एकमेव क्रांत्रीकारक सूर्य होते की जे महाकवी, साहित्यिक, समाजसुधारक, नाटककार, लेखक, प्रभावशली वक्ते,दूरधूष्टी लाभलेला नेता … किती वेगवेगळया विषयांत प्रभाव, निपुणता ,आपले द्यान सढळ देण्याची वृती..शतःश नमन
सर्व भाषांचा ऊगम मुळातच ॐह्या एकाच अक्षराने झालेला आहे, आपला भारत देश मुळातच वसुदेव कुटुंब अर्थात सर्व विश्वाला कुटुंब मानणारा आहे, भाषा आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे, जर आपले विचार व्यक्त करताना जर इतर भाषेचे शब्द येतात तर कृपया त्याचे कोणीही अवडंबर करु नये ,नाहीतर मन बोझड होईल, आपल्या मनाला हल्क ठेवा व निरोगी रहा अस आम्हास मनापासून वाटते 🕉❤️🙏
तुम्ही मला तमिळ किंवा कन्ंनड लोक दाखवा जे त्यांची भाषा अस्खलित बोलू शकत नाहीत. हिन्दी बोलणारी किंवा बोलणारा सुदधा अस्खलित बोलू शकत नाहीत. पण मराठी माणूस असा बहुदा एकमेव असेल जो “मला मराठी नीट येत नाही” ह्याचाच अभिमान बाळगतो.
हो... समीरा ताई चे सूत्रसंचालन नेहमी छान असते. मला आवडते. मधुराताई तू मराठी भाषेचा प्रवास हा रंगमंचावर नृत्यनाट्य कार्यक्रम केला होतास.. तुझ्याबरोबर दोन सहकारी होते. तो कार्यक्रम मस्त होता.त्याचे नाव आठवत नाही.
खुपच छान विचार मांडले आहेत...... आणि आप आपल्या घरातील मुलांना.... भाचे/भाची... ... पुतणे/पुतणी.... आणि नातवंडे यांनाही सांगा... म्हणायला. लावा....... धन्यवाद.
प्रत्येक प्रांता नुसार, शहरा नुसार, आपल्या कड विपुल म्हणींचा वापर व्हायचा, आपल्या आज्जी आजोबांच्या तोंडी भरपूर म्हणी असायच्या, आपली पिढी त्या थोड्या प्रमाणात वापरते आहे. मराठी म्हणी , पुढची पिढी विसरत चालली आहे. या विषयावर एक भाग कृपया बनवा 🙏
खूपच सुंदर आणि विचारपूर्वक कार्यक्रम आहे. विचारपूर्वक यासाठी,की थोरांचं मोठेपण आणि मराठी भाषेचे मोठेपण हातातून निसटत असताना योग्य वेळी कार्यक्रम/उपक्रम आणलात ताई!! धन्यवाद! इ. नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातून स्वा. सावरकरांचे हे 'भाषाशुद्धी चळवळी' चे प्रतिशब्द शिकवताना आपला हा व्हिडीओ नक्कीच उपयोगी पडेल!
आपला उपक्रम स्तुत्य आहे आणि आवश्यक आहे. शुद्ध मराठी टंकलिखित करताना, भ्रमणध्वनीवर शब्दलेखन योग्य करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे शुद्ध मराठी बोलण्यासाठी मेंदू आणि जीभ यांचा एकमेकांशी ताळमेळ आवश्यक आहे.
मराठी ची खरी सेवा व समृद्धी करणाऱ्यान मधे वि. सावरकरांच आणि त्यांची कमी आज फार जाणत आहे . खर तर मराठी नवनवे शब्द शोधुन ते व्यवहारात रूढ करण्या साठी निरंतर काम करणारी शिक्षण तज्ञ संस्था असली पाहीजे व नवनवे आलेले परकीय नामांना समर्पक असे पर्यायी नाव संज्ञा देऊन (शोधुन) व ती मराठी भाषा तज्ञान कडुन त्यांची संमती घेऊन ती त्रयमासीकातुन प्रसिद्ध केली पाहकजे, जी पुढे मराठी शब्दकोशात दर वर्षी सामील करून आदयावत केल्या मुळे मराठी चे अस्तित्व पुढील काळात आबाधीत रहाण्यास मदत होईल. नाहीतर समजाव की मराठी भाषा ही पुढील पाच पन्नास वर्षात लयाला जाणार.
नमस्कार, मधुरा आणि समीरा,तुमचे मनापासून आभार, मी गेली पस्तीस वर्षे मराठी विषय शिकवत आहे.म्हणजे मला मराठी भाषा शिकवायला खूपच आवडते.छ.महाराज आणि सावरकर ही आपली दैवते आहेत.त्यात माझा छोटासाच खारीचा वाटा.तुम्ही अशीच माहित देत जा म्हणजे आम्हाला देखील नवनवीन शब्दांची ओळख होईल. 🙏🙏🙏🙌🙌👌👍
उपक्रम फारच आवडला. आपल्या मातृभाषेला राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देण्यासाठी आपणच वेगवेगळ्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले पाहिजे. दुरध्वनी व वर्तमान पत्र हे उत्तम माध्यम आहे. ह्यातून आपण असा प्रयत्न करुया.🙏😊
खूप छान माहिती व सादरीकरण! आपल्याच क्षेत्राशी संबंधित शब्द, clickbait ला टिचकी प्रलोभन, spoiler alert ला रुचीनाश/ रुचिभंजन (आपला खारीचा वाटा) जपानी भाषेत दरवर्षी शेकडो नवीन शब्दांची भर पडते, व त्यातील अव्वल शब्दांना नामांकन मिळते, सरकार, समाज प्रोत्साहन देतं
नमस्कार, अतिशय स्तुत्य आणि समर्पक विषय हाती घेतल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन. सहज, सुंदर आणि मनाला भिडेल अशी विषयाची मांडणी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकणारे विषय हाती घेल्यास फार चांगले होईल.
सावरकरांबद्दल दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏼 तुमच्या संभाषणात दोन परकीय शब्द आलेत... खास आणि गुलाम... त्यांचे मराठीत प्रतिशब्द अनुक्रमे विशेष आणि दास... 🙏🏼😌
अप्रतीम उपक्रम😊🙏 मधुरा ताई, समीरा ताई खूप रंजक पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती पोहोचवली आहे. मला खात्री आहे की तरुण मंडळी अधिकाधिक या वाटचालीत सहभागी होतील😊♥️
Now I will also apply these words in my Bengali Language 😊 I alo want to make Bengali language free from English, Perso Arabic and Hindi influence । দারুণ লাগলো আপনাদের ভিডিওটা দেখে
कार्यक्रमाचे नाव इनक्रेडेबल मराठी का ठेवले आहे याचा खुलासा आधीच्या भागांमध्ये केलेला आहे आणि एका भागा साठी आपण मालिकेचे नाव बदलत नाही त्यामुळे शीर्षक बदललेलं नाही. इनक्रेडेबल ला मराठी शब्द काय आहे हे माहिती आहे तो नवीन बनवायची गरज नाही मग तरीही इनक्रेडिबल का वापरला आहे आणि अतुलनीय का नाही याचे उत्तर तुम्हाला आधीच्या भागांमध्ये मिळेल त्यामुळे आधीचे भागही पहावे
सावरकरांवर मालिका पाहायला निश्चित आवडेल...कारण चित्रपटाला वेळेच्या मर्यादा असतात त्यामुळे सगळे काही दाखवता येत नाही..पण मालिकेत ते दाखवले तर त्यांचे हे पैलू ही दाखवता येतील...आपण कराल का प्रयत्न..जशी लोकमान्य टिळकांची मालिका गाजली तसेच ही पण सर्वदूर पोचेल.. शिवाय आपला प्रयत्न स्तुत्य आहे तरीही सावरकर असे तुकड्या तुकड्यात समजणे कठीण जाते
तुम्ही दोघांनी अत्यंत महत्वाचा असा विषय हाती घेतला आहे. तुमचे मनापासून आभार! हा विषय थांबवू नका. दरोरोज किमान २० शब्दांचे मराठी पर्याय तुम्ही सांगितले, तर तो सर्वोत्कृष्ठ उपक्रम होईल. कारण तुम्ही दोघी आम्हा सर्वांना तुमच्या कार्यामुळे आवडता. तुम्हाला सर्वच ओळखतात. तुमचा चांगला प्रभाव सर्वांवर आहे. कारण उपक्रम कोण राबवत आहे ? याचाही परिणाम जनतेवर होत असतो. म्हणून ही विनंती केली. धन्यवाद!
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. तसेच सावरकरांचा हा मराठी शब्दकोष कुठे मिळेल हे ही सांगावे ❤❤
Savarkar ji the great 🙏🙏🙏
आपण खूप सारे उर्दू अरबी फारसी शब्द नकळत वापरतो
मी असे खूप शब्द सांगु शकतो
व्वा!! खूपच स्तुत्य उपक्रम आहे... मधुरा आणि समीरा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🎉🎉🎉
लोकमान्य टिळकांनी लिहीलेल्या
गीतारहस्य ह्या ग्रंथात फक्त मराठी
भाषेचा वापर केला आहे.जवळजवळ
१२०० पानांचा हा ग्रंथ आहे, ह्यावरून मराठी भाषेचे वैभव लक्षात
येईल.
खूप छान उपक्रम 👌🏻👌🏻👌🏻पण इनक्रेडिबल बदलता येईल नक्की 😊
छान प्रयोग......अभिनंदन 🚩🚩🚩
प्रयत्न स्तुत्य आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खूप प्रतिशब्द दिलेले आहेत. काही शब्द मात्र प्रत्यक्षात आणता येत नाहीत. STATION अग्निरथ विश्रामधाम . SIGNAL -अग्निरथ गमनागमनदर्शक लोहताम्रपट्टी. आपण जे अवघड व्रत म्हणालात त्याला त्यांनी " असिधाराव्रत " असे नाव दिलेले आहे. असो. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा माणूस पुन्हा आपल्या देशाला मिळो, जसे मोदीजी आहेत तसे, हीच ईशचरणी प्रार्थना ।।। धन्यवाद ।।।
सावरकरांबद्दल जेवड सांगेल तेवढे कमी... खूप छान प्रयत्न केला...👌
स्वातंत्र्यवीर यांचा हा पैलू दाखवून दिल्या बद्दल हार्दिक धन्यवाद.... 🙏
छान episode होता. लिंक download करून पुस्तक मिळाले, त्या बद्दल मी आभारी आहे🙏🏾. माझ्या सारखे , जे उत्तर भारतात राहिले आणि मराठी शी संपर्क कमी होत गेला त्यांच्या साठी ही माहिती व पुस्तक रोचक आहे. असेच कार्यक्रम करत रहा.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!👏💯💐🙏🚩
Incredible ला मराठीत आश्चर्यकारक, अविश्वसनीय असे शब्द आहेत.
सावरकरांविषयी इतकी वेगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मधुरा....
अंदाजपत्रक साठी सावरकरांनी दिलेला प्रतिशब्द तर खूप सुन्दर आहे
अर्थसंकल्प
वकील या शब्दासाठी - विधिज्ञ हा सुन्दर प्रतिशब्द ,
सावरकर हे जगातील एकमेव क्रांत्रीकारक सूर्य होते की जे महाकवी, साहित्यिक, समाजसुधारक, नाटककार, लेखक, प्रभावशली वक्ते,दूरधूष्टी लाभलेला नेता … किती वेगवेगळया विषयांत प्रभाव, निपुणता ,आपले द्यान सढळ देण्याची वृती..शतःश नमन
खूप छान..... अलौकिक मराठी असं नाव ठेवावे ही विनंती
अनन्यसाधारण.
खूप छान आहे कार्यक्रम, ताई तुम्ही दोघी कुंकू लावले असते तर अजून सुंदर दिसाल. ❤
आजच वीर सावरकरांची जयंती आहे. आणि छान माहिती सांगितलीत. धन्यवाद 👏👏
माउली खूप सुंदर काम करत आहात नवीन पिढी ला खूप गरज आहे या गोष्टी ची
❤😊
मराठीत लिहीतो, मराठी बोलतो. माय मराठीवर प्रेम आहे. तुमचे सर्व भाग ऐकतो. छान असतात, आवडतात. धन्यवाद आणि शुभेच्छा. 🙏
सर्व भाषांचा ऊगम मुळातच ॐह्या एकाच अक्षराने झालेला आहे, आपला भारत देश मुळातच वसुदेव कुटुंब अर्थात सर्व विश्वाला कुटुंब मानणारा आहे, भाषा आपले विचार व्यक्त करण्याचे साधन आहे, जर आपले विचार व्यक्त करताना जर इतर भाषेचे शब्द येतात तर कृपया त्याचे कोणीही अवडंबर करु नये ,नाहीतर मन बोझड होईल, आपल्या मनाला हल्क ठेवा व निरोगी रहा अस आम्हास मनापासून वाटते 🕉❤️🙏
अतिशय सुंदर, अभिनंदन
आपली मराठी भाषा किती सोपी सुंदर आणि समृद्ध आहे ! जय मराठी !!
खूप खूप छान. माहितीपूर्ण व्हिडिओ
तुम्ही मला तमिळ किंवा कन्ंनड लोक दाखवा जे त्यांची भाषा अस्खलित बोलू शकत नाहीत. हिन्दी बोलणारी किंवा बोलणारा सुदधा अस्खलित बोलू शकत नाहीत. पण मराठी माणूस असा बहुदा एकमेव असेल जो “मला मराठी नीट येत नाही” ह्याचाच अभिमान बाळगतो.
६.१५
गुलाम शब्द आपका नाही
दास म्हणू शकता
🙏🙏🙏
भुकटी ऐवजी पावडर इतका रुढ झाला आहे की भुकटी हा शब्द लोक विसरले आहेत
पूड असाही शब्द वापरता येतो.
(दक्षिणेत - तमिऴ भाषेत 'पूड'ला 'पोडी' म्हणतात. )
सुंठ पूड वेखंड पूड पण त्रिफळा चूर्ण असा वापर आहे तो अगदी सहज रुळलेला आहे
उत्तम प्रयत्न. मात्र "टेलिव्हिजन"साठी सावरकरांनी बहुधा दूरचित्रवाणी हा शब्द सुचवला होता. कृपया तपासून पाहा.
हो...
समीरा ताई चे सूत्रसंचालन नेहमी छान असते. मला आवडते. मधुराताई तू मराठी भाषेचा प्रवास हा रंगमंचावर नृत्यनाट्य कार्यक्रम केला होतास.. तुझ्याबरोबर दोन सहकारी होते. तो कार्यक्रम मस्त होता.त्याचे नाव आठवत नाही.
Both my fav... God bless you both 🙏
स्पृहणीय उपक्रम
खुपच छान विचार मांडले आहेत...... आणि आप आपल्या घरातील मुलांना.... भाचे/भाची... ... पुतणे/पुतणी.... आणि नातवंडे यांनाही सांगा... म्हणायला. लावा....... धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त माहिती धन्यवाद मधुरा आणि समिरा
आज अगदी योग्य वेळी ही चर्चा. खूप खूप धन्यवाद.
प्रत्येक प्रांता नुसार, शहरा नुसार, आपल्या कड विपुल म्हणींचा वापर व्हायचा, आपल्या आज्जी आजोबांच्या तोंडी भरपूर म्हणी असायच्या, आपली पिढी त्या थोड्या प्रमाणात वापरते आहे.
मराठी म्हणी , पुढची पिढी विसरत चालली आहे. या विषयावर एक भाग कृपया बनवा 🙏
आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान हवा. प्रयत्न जाणीवपुर्वक केलाच पाहिजे. केल्याने होत राहील. जय शिवाजी, जय महाराष्ट्र.
छान छान माहिती देता . मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !शुद्ध मराठी भाषा ऐकाय ल कानाला खूप गोड वाटत.!
खूपच सुंदर आणि विचारपूर्वक कार्यक्रम आहे. विचारपूर्वक यासाठी,की थोरांचं मोठेपण आणि मराठी भाषेचे मोठेपण हातातून निसटत असताना योग्य वेळी कार्यक्रम/उपक्रम आणलात ताई!! धन्यवाद! इ. नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकातून स्वा. सावरकरांचे हे 'भाषाशुद्धी चळवळी' चे प्रतिशब्द शिकवताना आपला हा व्हिडीओ नक्कीच उपयोगी पडेल!
Incredible ला मराठीत शब्द असेलच.❤
कार्यक्रम हवाहवासा वाटणारा. 🙏
'Incredible'ला मराठी पर्यायी शब्द असेलच!?
अमूल्य
Incredible अविश्वसनीय
अद्भुत
अतुल्य
गुगलने incredible चा मराठी अर्थ " अविश्वसनीय " असा दिला आहे. दुसरा अर्थ " आश्चर्यकारक " असा पण दिला आहे.
आपला उपक्रम स्तुत्य आहे आणि आवश्यक आहे. शुद्ध मराठी टंकलिखित करताना, भ्रमणध्वनीवर शब्दलेखन योग्य करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे शुद्ध मराठी बोलण्यासाठी मेंदू आणि जीभ यांचा एकमेकांशी ताळमेळ आवश्यक आहे.
मराठी ची खरी सेवा व समृद्धी करणाऱ्यान मधे वि. सावरकरांच आणि त्यांची कमी आज फार जाणत आहे . खर तर मराठी नवनवे शब्द शोधुन ते व्यवहारात रूढ करण्या साठी निरंतर काम करणारी शिक्षण तज्ञ संस्था असली पाहीजे व नवनवे आलेले परकीय नामांना समर्पक असे पर्यायी नाव संज्ञा देऊन (शोधुन) व ती मराठी भाषा तज्ञान कडुन त्यांची संमती घेऊन ती त्रयमासीकातुन प्रसिद्ध केली पाहकजे, जी पुढे मराठी शब्दकोशात दर वर्षी सामील करून आदयावत केल्या मुळे मराठी चे अस्तित्व पुढील काळात आबाधीत रहाण्यास मदत होईल. नाहीतर समजाव की मराठी भाषा ही पुढील पाच पन्नास वर्षात लयाला जाणार.
तुमच्या कार्यक्रमाच्या नावातच
भाषेची सरमिसळ कां बरं केलीत ?
कार्यक्रम स्तुत्य आहे , नवीन पिढीसाठी फारच उपयुक्त !! धन्यवाद !!
नमस्कार, मधुरा आणि समीरा,तुमचे मनापासून आभार, मी गेली पस्तीस वर्षे मराठी विषय शिकवत आहे.म्हणजे मला मराठी भाषा शिकवायला खूपच आवडते.छ.महाराज आणि सावरकर ही आपली दैवते आहेत.त्यात माझा छोटासाच खारीचा वाटा.तुम्ही अशीच माहित देत जा म्हणजे आम्हाला देखील नवनवीन शब्दांची ओळख होईल. 🙏🙏🙏🙌🙌👌👍
धन्यवाद ..🙏 आपण तर मराठी भाषेचा आदर निर्माण करणारी माहिती देत आहात..
अतिशय स्तुत्य उपक्रम...
अति सुंदर उपक्रम... विषशतः स्वात्यंत्रवीर वि दा सावरकरांचा आणि महाराजांचा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद आणि कौतुक.
उपक्रम फारच आवडला. आपल्या मातृभाषेला राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देण्यासाठी आपणच वेगवेगळ्या माध्यमातून अविरत प्रयत्न केले पाहिजे. दुरध्वनी व वर्तमान पत्र हे उत्तम माध्यम आहे. ह्यातून आपण असा प्रयत्न करुया.🙏😊
खूप छान माहिती व सादरीकरण! आपल्याच क्षेत्राशी संबंधित शब्द, clickbait ला टिचकी प्रलोभन, spoiler alert ला रुचीनाश/ रुचिभंजन (आपला खारीचा वाटा) जपानी भाषेत दरवर्षी शेकडो नवीन शब्दांची भर पडते, व त्यातील अव्वल शब्दांना नामांकन मिळते, सरकार, समाज प्रोत्साहन देतं
अतुल्य मराठी 🙏
खूप छान उपक्रम !
काही त्रुटी सुधारल्यास कार्यक्रमाचा स्तर अधिक उंचावेल - जसे ऱ्हस्व-दीर्घांबद्दल काळजी.
उदा. *त्रिमितिपट* असे हवे, त्रिमीतीपट असे नको.
Incredible tribute to Swatantryaveer Savarkar
खुप च सुरेख.....आणि धन्यवाद......
उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय
नमस्कार,
अतिशय स्तुत्य आणि समर्पक विषय हाती घेतल्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन. सहज, सुंदर आणि मनाला भिडेल अशी विषयाची मांडणी.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याच्या इतर पैलूंवर प्रकाश टाकणारे विषय हाती घेल्यास फार चांगले होईल.
उत्तम विषय सुंदर भाषा
निवडणुकी चा निकाल - हे उदाहरण फार प्रासंगिक होते!😊
स्तुत्य उपक्रम राबवित आहेत धन्यवाद
पुस्तकासाठी धन्यवाद 🙏
अप्रतीम उपक्रम
Khoop chaan vatala pahun. 🙏🏻
त्रिमितीपट होता का सावरकर यांच्या वेळेस ? आणि Incredible च्या जागी अविश्वसनीय हा शब्द वापरावा. बाकी सर्व काही सुंदर.
Like, share, subscribe साठी मराठी प्रतिशब्द हवेत
पसंती, वाटप, सदस्यत्व ?
छान विषय मांडलात 👍🙏
नक्कीच प्रयत्न करू
👏🏻👍🏻
खूप छान उपक्रम
chaan mahiti. please keep it up!
Vande matram
मधुरा खूप छान..... ❤
sunder episode 🥰🥰🥰🥰
वा:! खूप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद!
सुंदर 💐🙏🏻
छान उपक्रम आहे 🎉🎉😊
khup chaan
खूप सुरेख !
❤
I love you😘😘 madhura
तू खूप सुंदर आहेस❤❤
खूप छान उपक्रम आपल्याला खूप शुभेच्छा
Aurobindo famously wrote that ‘a people who lose their language lose their soul’
खूपच छान मुद्देसूद माहिती... सावरकरांचे विचार मराठीशब्दाचा वेध
एक चांगला उपक्रम! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Incredible ह्याला पर्यायी मराठी शब्द आहे अविश्वसनीय अथवा
अविश्वासार्ह.
Sundar prayatn
सावरकरांबद्दल दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏼
तुमच्या संभाषणात दोन परकीय शब्द आलेत... खास आणि गुलाम... त्यांचे मराठीत प्रतिशब्द अनुक्रमे विशेष आणि दास... 🙏🏼😌
खुप सुंदर आणि मुद्देसूद समजावून सांगितले ❤️🙏🙏😊
Nice information....
अप्रतीम उपक्रम😊🙏 मधुरा ताई, समीरा ताई खूप रंजक पद्धतीने तुम्ही ही सगळी माहिती पोहोचवली आहे. मला खात्री आहे की तरुण मंडळी अधिकाधिक या वाटचालीत सहभागी होतील😊♥️
"भाषा शुद्धीची लिंक "असा उल्लेख आहे मधुरा वेलणकरांचा..
Link - दुवा
Now I will also apply these words in my Bengali Language 😊
I alo want to make Bengali language free from English, Perso Arabic and Hindi influence
।
দারুণ লাগলো আপনাদের ভিডিওটা দেখে
खूप छान
अतिशय स्तुत्य उपक्रम..
दोघींना मनःपूर्वक शुभेच्छा ..
आणि हार्दिक अभिनंदन..❤❤
अतुलनीय-अमृतमय मराठी। उत्तुंग सावरकर॥🙏🏽🙏🏽🙏🏽
स्तुत्य कार्यक्रम . इनक्रेडिबल बदल लत तर उत्तम
कार्यक्रमाचे नाव इनक्रेडेबल मराठी का ठेवले आहे याचा खुलासा आधीच्या भागांमध्ये केलेला आहे आणि एका भागा साठी आपण मालिकेचे नाव बदलत नाही त्यामुळे शीर्षक बदललेलं नाही.
इनक्रेडेबल ला मराठी शब्द काय आहे हे माहिती आहे तो नवीन बनवायची गरज नाही मग तरीही इनक्रेडिबल का वापरला आहे आणि अतुलनीय का नाही याचे उत्तर तुम्हाला आधीच्या भागांमध्ये मिळेल त्यामुळे आधीचे भागही पहावे
छान 🙏 आपणास भविष्यात मोठे यश प्राप्त होईल.शुभेच्छा💐