Vishalgad Atikraman: मशिदीचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला, MIM चा मोर्चाचा इशारा, नेमकं काय घडतंय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #Vishalgad #SambhajiRajeChhatrapati
    यंदा १३ जुलैपासूनच विशाळगडावर पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला होता, गडावर कुणालाही सोडलं जात नव्हतं, ज्याचं कारण होतं एक आंदोलन. १४ जुलैला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात विशाळगडावरचं अतिक्रमण हटवावं यासाठी आंदोलन करण्यात आलं. हजारो शिवभक्त किल्ल्याजवळ पोहोचले. या आंदोलनादरम्यान पायथ्याजवळच्या गजापूर गावात तोडफोडही झाली. काही तरुण मशिदीवर चढल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर १५ जुलैपासून शासनाकडून अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु झालं, आंदोलनकर्ते युवक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी पत्र लिहीत तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला.
    त्यानंतर १६ जुलैला शाहू छत्रपती आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाची पाहणी केली, तर त्याआधी १५ तारखेला संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधल्या राजकीय नेत्यांवर आरोप केले. पण या सगळ्यात विशाळगडावरचं नेमकं काय अतिक्रमण हटवण्यात येतंय ? विशाळगडावर काय घडतंय ? आणि या सगळ्या वादात कोल्हापूरच्या राजकारणात काय घडतंय ? कुठल्या राजकीय नेत्यानं काय भूमिका घेतली आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 447