ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणात आवक सुरूच.. उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #ujani_water_level #Ujanidamupdate #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणात आवक सुरूच.. उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ | Hello Baliraja
    आज शनिवार १३ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात आत्तापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जूलै महिन्यात घाट माथा तसेच धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळं उजनीत संथ गतीनं आवक येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.
    आज शनिवार सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, सद्या उजनी धरणामध्ये २ हजार ८२० क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ३ हजार ५४८ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४५.३३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस १८.३२ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३४.२० टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии •