सिंधुदुर्ग मधील अपरिचित किल्ला आणि तेथील शिव कालीन शिल्पे! खारेपाटण किल्ला । 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • खारेपाटण मधील पहाण्याची ठिकाणे :
    खारेपाटण गावातील छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत. खारेपाटण गावातून किल्ल्यावर असलेल्या शाळेकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मातीत गाढले गेलेले बुरुज व तटबंदी दिसते. बालेकिल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे, ते शिवाजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराजवळील विहिरीतून एक भुयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील ‘‘घोडेपथार’’ या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते.. याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’ ,उध्वस्त वास्तूंचे चौथरे इ. गोष्टी पाहायला मिळतात.
    इतिहास :
    इ.सनाच्या ८व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात(तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्वम्मियराने(इ.स ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारून राजधानी बसविली. इ.स १६६० मध्ये छ. शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.
    छ. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करून तो जिंकून घेतला. इ.स १८५० मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात घनघोर युद्ध झाले. यात हा किल्ला उद्ध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला.
    पोहोचण्याच्या वाटा :
    मुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा व रत्‍नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण गाव आहे. कोकण रेल्वेने गेल्यास राजापूर व नांदगाव या स्टेशनांपासून अंदाजे २५ कि.मी वर खारेपाटण आहे.
    मुंबई - गोवा महामार्गावरून खारेपाटण गावात जाणाऱ्या रस्त्याने सरळ गेल्यावर, प्रथम एसटीस्टॅड व पुढे बाजारपेठ लागते. बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायऱ्यांची वाट खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते. ही शाळा खारेपाटण किल्ल्यातच आहे.

Комментарии • 1

  • @Bhatkebua
    @Bhatkebua 7 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🚩