आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • आत्याचा पाहुणचार 😍 | आत्याच्या गावी जाण्यासाठी केलेला जंगलातला प्रवास | Konkan Vlog कोकणामध्ये सणासुदीला माहेरवाशीनीला माघारी (मांगारी) जाण्याची प्रथा आहे. आम्ही सुद्धा माझ्या आत्याला म्हणजे माझ्या आकाला दरवर्षी माघारी जात असतो. माझ्या आत्याचे गाव मंडणगड तालुक्यातील रानवली हे गाव आहे. रानवली हे गाव रानात वसलेले आहे. अतिशय निसर्गरम्य अशा रानवली गावात घरे पण कमी आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर असे गाव आहे. आत्याच्या गावी प्रांजु आणि आई सोबत होत्या. आम्हाला जंगलातून प्रवास करूनn1n21 आत्याच्या गावी पोहचायचे होते. वाटेत पाऊस पण खूप आला. रस्त्याला पाणीच पाणी झाले होते आणि वारा सुद्धा वाहत होता. शेवटी आम्ही आत्याच्या गावी पोहोचलो. आत्याने अतिशय मायेने आमचा पाहुणचार केला.
    #AtyachaPahunchar #आत्याचापाहुणचार #KonkanVlog #sforsatish
    कोकणी माणसे प्रेमाची कशी भुकेली असतात हे तुम्हाला या व्हिडीओ मधून दिसून येईल. आत्याच्या घरी जेवून आम्ही तिचे गाव सुद्धा फिरलो. संध्याकाळी निघायच्या वेळेस कोरा चहा पिऊन आम्ही आमच्या गावी पुन्हा येण्यासाठी निघालो. परतीचा प्रवास सुद्धा मजेशीर होता. पाऊस खूप होता. प्रांजुला येताना उचलून आणावे लागले कारण वाट निसरडी होती. तिला चालायला जमत नव्हते. आत्याने आम्हाला एक केळीचे रोप लावण्यासाठी दिले. एकंदर आत्याच्या गावचा जंगलातला प्रवास मजेशीर तर होताच ओण आठवणीत राहील असाच होता. शेवटी काय आठवणीच राहतात ना !
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या बहुमूल्य कमेंट करायला विसरू नका.
    फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 756