किल्ल्यांच गाव अंबवडे बुद्रुक🚩आदर्श उपक्रम | साताऱ्याचा अभिमान|Village of Forts

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • *किल्ल्यांच गाव अंबवडे बु .
    एका ठिकाणी परांडा, कलावंतीन दुर्ग, राजगड, कंक्राळा, रामशेज, पारगड, सरसगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, तिकोणा ,अजिंक्यतारा, प्रतापगड , पद्मदुर्ग, शिवनेरी, वैराटगड, लोहगड, सिंहगड, दातेगड, इ किल्ले पाहायचेत? मग तर चला सातारा तालुक्यातील सज्जनगड च्या शेजारी असलेले अंबवडे बुद्रुकमध्ये इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले पाहण्यास मिळतीलच, त्याबरोबर त्याचा इतिहास ही ऐकायला मिळेल, हिरकणी ची कड्यावरून उतरतानाची बालमावळ्यानी बसवलेली नाटिका सुद्धा बघायला मिळेल तसेच तब्बल 40 किल्ल्यांची प्रतिकृती सादर करण्याची किमया येथील बामावळ्यांनी साकारली आहे.
    दिवाळी म्हटलं की रांगोळी कंदील, फटाके ,फराळ अशा सर्व गोष्टीबरोबर आणखी एक वैशिष्ट म्हणजे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या स्मार्टफोन युगात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, सातारा तालुक्यातील अंबवडे बु गावमध्ये ही परंपरा आजही सुरू आहे. नव्हे तर तिला व्यापक स्वरूप आले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील लोक गर्दी करीत असतात, त्यामुळे गावाला ऐन दिवाळीत यात्रेचे स्वरूप येत आहे..
    गावात दरवर्षी साधारण 40 ते 50 किल्ले ते ही मोठ्या प्रतिकृतीचे म्हणजे किती तर १ ते २ गुठे तसेच पूर्ण शेतात एवढया मोठ्या आकारात किल्ले
    उभारले जातात. किल्ला करताना किवा गडकोट किल्ला उभा करताना तो एखाद्या गड दुर्गासारखा हुबेहूब व्हावा असा अट्टाहास नसतो मात्र तो किल्ला उभा करण्यापाठीमागची भावना मात्र राजगडला टक्कर देईल माझा बनवलेला दुर्ग अशी असते. किल्ला बनवताना मुलं कमीत कमी खर्च करत असतात, म्हणजे तटबंदी बनवताना माती, शेण राख, भुसा चा वापर करून केलेले आहे. तर सैनिक, घर ,मंदिर पुष्टयाची बनवलेली आहेत शिवनेरी, वैराटगड, राजगड, विशाळगड, पन्हाळा, रायगड, अजिंक्यतारा, सजनगड यांसारख्या डोंगरी किल्ल्यांबरोबरच पद्मदुर्ग सारखे सागरी किल्ले देखील हुबेहूब साकारले आहेत. तसेच किल्ल्यांच्या देखाव्या बरोबरच त्या किल्ल्याची माहिती व इतिहास किमान 10 मिनट बाल मावळे सांगतात प्रत्येक ठिकाणी सामाजिक संदेश ही प्रदर्शित केला आहे
    जय शिवराय 🚩
    #shivajimaharaj #satara #maharashtra #history #viral #viralvideo #forts
    #shivajimaharaj #trending #subscribe

Комментарии • 12