ही पद्धत वापरुन झटपट बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत कट वडा | kat vada recipe | vada rassa recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ★ Please take a moment to like and subscribe -
    / @ashwinisrecipe
    ✦ visit Facebook page - www.facebook.c...
    ✦Instagram - ...
    ✦For business inquiries please email us on
    ashwnireceipee@gmail.com
    ✦stainless steel kadhai
    amzn.to/3XkoNj9
    ✦Cast iron kadhai
    amzn.to/3JRRXCT
    ☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙
    ही पद्धत वापरुन झटपट बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत कट वडा | kat vada recipe | vada rassa recipe
    कट साठी लागणारे वाटणाचे साहित्य ➢
    •तेल अर्धा टेबलस्पून
    •कांदा एक
    •आलं लसूण एक टेबलस्पून
    •धने एक टेबलस्पून
    •जिरे अर्धा टेबलस्पून
    •लवंग तीन चार
    •काळीमिरी चार-पाच
    •चक्रीफुल एक
    •दालचिनी एक तुकडा
    •हिरवी वेलची एक
    •तमालपत्र एक
    •दगडफूल
    •खोबर अर्धी वाटी
    •कोथिंबीर
    कट बनवण्यासाठी ➤
    •तेल
    • कांदा लसूण चटणी
    •वाटण
    •पाणी
    •मीठ
    वड्यासाठी लागणार साहित्य ➤
    ठेचा बनवण्यासाठी
    •हिरवी मिरची ५-६
    •आलं
    •लसूण १०-१२ पाकळ्या
    •कोथिंबीर
    •धने एक चमचा
    •जिरे अर्धा चमचा
    •कढीपत्ता
    •उकडलेले बटाटे १ किलो
    •तेल १ टेबलस्पून
    •हळद अर्धा टिस्पून
    •मोहरी एक टिस्पून
    •कढीपत्ता
    •मीठ चवीनुसार
    वड्यासाठी लागणारे पीठ ➤
    •चना डाळीचे पीठ - दोन कप
    •मीठ चवीनुसार
    •ओवा एक टीस्पून
    •पाणी
    •खाण्याचा सोडा चिमूटभर
    •तळण्यासाठी तेल
    कृती
    सर्वप्रथम कट बनवण्यासाठी गॅस वरती एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये अर्धा टेबलस्पून तेल घालून एक उभा चिरलेला कांदा घाला व तो थोडासा सोनेरी रंगावरती येईपर्यंत परतून घ्या कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आलं लसूण घाला सोबतच काही खडे मसाले घाला ,यामध्ये लवंग,दालचिनी ,काळी मिरी, चक्रीफुल ,वेलची धने व जिरे ही घाला.यामध्ये किसून घेतलेल सुख खोबरं घालून हे सगळं व्यवस्थित परतून घ्या हे सगळं चांगलं परतून झालं की गॅसची फ्लेम बंद करा व हे थंड होण्यासाठी ठेवा . हे मसाले व्यवस्थित थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये थोडी कोथिंबीर घाला गरजेप्रमाणे पाणी घालून याचं छान वाटण तयार करून घ्या. आता कट बनवण्यासाठी गॅस वरती एक कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल घाला . तेल गरम झालं की यामध्ये तिखट घाला व थोडसं परतून घ्या तयार केलेलं वाटण घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परता यामध्ये पाणी घाला , चवीनुसार मीठ घाला मोठ्या फ्लेम वरती एक उकळी येऊ द्या व नंतर गॅसची फ्लेम मंद करा व त्याला छान कट येईपर्यंत होऊ द्या.
    आता वडे बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घ्या, त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं, लसूण कोथिंबीर धने, जिरे व थोडासा कढीपत्ता घालून पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्या. एका कढईमध्ये गॅस वरती तेल गरम करायला ठेवा तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घाला मोहरी चांगली तडतडू द्या मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घाला तयार करून घेतलेला हिरवी मिरची लसूण चा ठेचा घाला व परतून घ्या यामध्ये थोडी हळद घाला उकडून घेतलेलं बटाटा घाला चवीनुसार मीठ घाला व चांगलं परतून याची भाजी तयार करून घ्या तयार केलेली भाजी एका ताटामध्ये काढून थंड व्हायला ठेवा .
    भाजी थंड होते तोपर्यंत एका बाऊलमध्ये चना डाळीचे पीठ घ्या त्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार करा यामध्ये मीठ व थोडासा ओवा घालून मिक्स करा हे पीठ दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवा . तोपर्यंत थंड झालेल्या भाजीचे वडे तयार करून घ्या आता जे तयार करून घेतलेलं चणाडाळीचे पीठ आहे त्यामध्ये थोडासा सोडा घालून मिक्स करा तयार केलेले बटाट्याच्या भाजीचे वडे त्यामध्ये बुडवून व्यवस्थित गरम तेलामध्ये हे वडे तळून घ्या . तयार केलेला कट घेऊन त्यामध्ये गरमागरम वडे सर्व्ह करा.
    ❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡❡
    Other Recipes
    खमंग,पौष्टिक जवसाची चटणी व शेंगदाणा चटणी peanut chutney,flaxseed chutney | flaxseed recipes |chutney
    • खमंग,पौष्टिक जवसाची चट...
    ७-८ दिवस टिकणारी लाल भोपळ्याची पुरी / घारगे | Lal Bhoplyachya Purya | Lal Bhoplyache Gharge
    • ७-८ दिवस टिकणारी लाल भ...
    पालक पुरी/ पाणी न वापरता बनवा 3-4 दिवस टिकणारी टम्म फुगलेली बटाटा पालक पुरी /Palak Puri Recipe
    • पालक पुरी/ पाणी न वापर...
    सुरळीची वडी | जास्त भांड्याचा पसारा न करता कढईत बनवा सोप्या पद्धतीने Suralichi Vadi /khandvi recipe
    • सुरळीची वडी | जास्त भा...
    #katvada #vadapav #MarathiRecipes #MaharashtrianCuisine #AuthenticMarathi #MarathiDelicacies #TraditionalRecipes #FoodFromMaharashtra
    #MaharashtraFoodCulture
    #SpicyMarathiFood

Комментарии • 37