‘दादा माणूस’ Dada Manus - उषा नाईक आता दादांच्या विरोधात बोलण्याचं कारण काय असावं ? एपिसोड 83

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‘दादा माणूस’ Dada Manus
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
    संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

Комментарии • 70

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 23 дня назад +2

    दादा कोंडके हे अतिशय चांगले कलाकार होते त्यांची इच्छा माझी पुरी करा हे नाटक मी खूप वेळेला भरत नाट्य मंदिरात जाऊन पाहिलं आहे

  • @Bob-qj4wq
    @Bob-qj4wq 5 месяцев назад +7

    मी माझ्या आयुष्यातील थेटर मध्ये बघितलेला पहिला चित्रपट दादांचा पांडू हवालदार होता. मला दादांचे सिनेमे खूप आवडतात खास करुन अंजनाबाई सोबतचे चित्रपट तर खुपच मस्त

  • @anilmutyal352
    @anilmutyal352 Месяц назад +3

    फार छान माहिती दिली अशीच माहिती देत राहावे

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  Месяц назад

      धन्यवाद बघत राहा मायाजाल चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा

  • @milindpatil495
    @milindpatil495 5 месяцев назад +7

    दादा कोंडके म्हणजे खरंच एक महान व्यक्तिमत्त्व

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 5 месяцев назад +11

    वास्तविक विवेचन केले आहे दादा फार महान कलाकार होते पण तेवढेच साधे होते त्यांना राजकारण करायची आवश्यकता नव्हती गेलेल्या माणसावर माघारी आरोप करणे सोपे असते पण संस्कृतीपणाचे लक्षणं नाही.

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 16 дней назад

      व्यावसायिक जीवनात अस कराव लागत

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 16 дней назад +1

    दादा यांची व्यावसायिक आयुष्यात दादागिरीच होती आणि का असू नये.त्यांचे व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हिंदी आणि मराठीतील चित्रपट व्यावसायिकांकडून झाला.दादा जर साधे भोळे राहिले असते तर सोंगाड्यानंतरच त्यांना संपवल असत.

  • @vishwaskoli7379
    @vishwaskoli7379 5 месяцев назад +22

    उषा नाईक या चांगल्या नृत्यांगना आहेत हे मान्यच आहे ! पण दादा कोंडके यांच्यासारख्या चतुरस्त्र आणि अष्टपैलू महान कलाकारावर त्यांनी टिका करावी इतकी त्यांची अभिनेत्री म्हणून अवकात नाही !
    उगीच कोणीही उठून सुर्याकडे पाहून थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये ! तुमची थुंकी तुमच्याच चेहऱ्यावर पडेल !
    मराठी सिनेमातील प्रस्थापितांच्या विरोधाला मोडून काढीत यशाचे उतुंग शिखर गाठणारे एकलव्य आहेत दादा कोंडके !
    अनिताजी मी आपल्या मतांशी पुर्ण सहमत आहे - उषा नाईकानी ज्या त्या वेळी आपली मते प्रदर्शित करायला हवी होती !

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 5 месяцев назад

      आपण उषा नाईक यांची पूर्ण मुलाखत पाहिली का? त्यांनी दादांवर कसलेही आरोप केले नाही. त्यांनी फक्त असं सांगितलं की, दादांना असं वाटत होतं संबंधित पुरस्कार हा उषा चव्हाण यांना मिळावा. आणि सर्व पत्रकारांचं असं म्हणणं होत कि हा पुरस्कार उषा नाईक यांना मिळाला.. दादांनी आपले राजकीय वजन वापरून ( दादांचे राजकीय वजन होतं हे कोणीही अमान्य करणार नाही ) हा पुरस्कार उषा चव्हाण यांना द्यायला भाग पाडले.. पत्रकारांनी आम्ही बहिष्कार टाकू असं सांगितलं.. त्यामुळे आयोजकांनी विशेष अभिनेत्री म्हणून उषा नाईक यांना पुरस्कार दिला.. असा सर्व तो प्रसंग आहे.. आणि आपण असं म्हणता ही उषा नाईक तेव्हाच का नाही बोलल्या? उषा नाईक यांचे नुकतंच करिअर सुरू झाले होते. अशाप्रकारे वाद घालून त्यांना आपल्या करिअरवर परिणाम घडू द्यायचा नव्हता.. त्यामुळे त्या गप्प बसल्या. त्यांच्या मनात दादांविषयी राग असता तर त्यांनी येऊ का घरात चित्रपट केला नसता..

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 16 дней назад

      😊

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 23 дня назад +1

    एवढ्या महान कलाकारावर ते हयात नसताना आरोप करणे उपकाराची जाणीव न ठेवणं असं आहे

  • @yogg.5373
    @yogg.5373 2 месяца назад +3

    तुमचे खूप आभार या सर्व माहिती साठी 🙏🙏 दादा सारखं व्यक्तित्व. न भूतो न भविष्यती. आहे मी आपल्याशी सहमत आहे की दादा च्या प्रती खूप दिग्दर्शक आणि निर्माते इर्षा करायचे.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад +1

      धन्यवाद. मायाजाल ही आमची नवी सिरिज पण बघा. नक्की आवडेल.

    • @yogg.5373
      @yogg.5373 2 месяца назад

      @@anittapadhyeAPP नक्किच 🙏

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 5 месяцев назад +9

    उषा नाईक ह्या अभिनेत्री वाटतच नाही

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 5 месяцев назад +4

    इतक्या म्हातारापणी उषा नाईक यांना आपण महान असल्याचा समज कसा झाला?

  • @shrutijadhav5716
    @shrutijadhav5716 2 месяца назад +2

    Madam Ravindra mahajani baddal aikayla khup awdel plz. Tyanchya karkirdi baddal jarur sangaw. Amhi atur ahot. Amchya gharat sarwancha awdata kalakar. Ani majya sarw maitrinincha awdta kalakar mhanje Ravidra mahajani.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад +1

      Nakki , pls subscribe channel, like it and share it. Thanks

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад +1

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://ruclips.net/video/1qTk-NUxgQg/видео.html

  • @ankushage5933
    @ankushage5933 22 дня назад

    आपण आतीशय सुंदर आशी माहीती दीली दादा कोड़ेक बदल

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  21 день назад

      dhanyavad, baghat raha anittapadhyeproduction youtube channel

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 5 месяцев назад +18

    हो मी बागितली आहे उषा नाईक यांची मुलाखत. ते आरोप करतात पण दादा कशाला करतील विरोध. उलट दादा कडून ते आणि बरेचं कलाकार अभिनय कसा कसा हे शिकले. ते सांगत नाही. दादा हे कोणता ही चित्रपट बनवताना खूप विचार करून बनवत होतें. अभिनय कसा असावा. संगीत, गाणी, कथा या साऱ्या गोष्टी चा विचार करून चित्रपट बनवत असे. दादा कडून नवीन कलाकाराने खूप काही शिकण्या सारखं आहे.😊

    • @BhushanMusicPlatform8482
      @BhushanMusicPlatform8482 5 месяцев назад

      बरोबर

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 5 месяцев назад

      आपण उषा नाईक यांची पूर्ण मुलाखत पाहिली का? त्यांनी दादांवर कसलेही आरोप केले नाही. त्यांनी फक्त असं सांगितलं की, दादांना असं वाटत होतं संबंधित पुरस्कार हा उषा चव्हाण यांना मिळावा. आणि सर्व पत्रकारांचं असं म्हणणं होत कि हा पुरस्कार उषा नाईक यांना मिळाला.. दादांनी आपले राजकीय वजन वापरून ( दादांचे राजकीय वजन होतं हे कोणीही अमान्य करणार नाही ) हा पुरस्कार उषा चव्हाण यांना द्यायला भाग पाडले.. पत्रकारांनी आम्ही बहिष्कार टाकू असं सांगितलं.. त्यामुळे आयोजकांनी विशेष अभिनेत्री म्हणून उषा नाईक यांना पुरस्कार दिला.. असा सर्व तो प्रसंग आहे.. आणि आपण असं म्हणता ही उषा नाईक तेव्हाच का नाही बोलल्या? उषा नाईक यांचे नुकतंच करिअर सुरू झाले होते. अशाप्रकारे वाद घालून त्यांना आपल्या करिअरवर परिणाम घडू द्यायचा नव्हता.. त्यामुळे त्या गप्प बसल्या. त्यांच्या मनात दादांविषयी राग असता तर त्यांनी येऊ का घरात चित्रपट केला नसता..

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 16 дней назад

      जळत होती ती बाई तिला घेतल नाही म्हणून

  • @dattamandale76
    @dattamandale76 5 месяцев назад +4

    दादांची खरी बाजू मंडल्याबद्दल
    धन्यावाद

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat2972 5 месяцев назад +2

    मराठी माणसांना जपणारे दादा होते

  • @DhanshreeShete
    @DhanshreeShete 5 месяцев назад +6

    अनिता जी , आपण किती भाग्यवान आहात का तब्बल ११ महिने तुम्हाला दादांचा सहवास लाभला

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 5 месяцев назад +2

      मुळात अनिता दिदिंचा स्वभाव ही चांगला असेल.
      म्हणून सलग 11महिने दादा आणि अनिता दीदी एकमेकांना वेळ देऊ शकले.

    • @rohinikulkarni5571
      @rohinikulkarni5571 5 месяцев назад

      😊Anita didi kon ahet dadanche relatives ahet ka

    • @DhanshreeShete
      @DhanshreeShete 5 месяцев назад

      @@rohinikulkarni5571 अनिताजी यांनी दादांच्या जीवनावर एकटा जीव हे पुस्तक केलेले आहे त्यांना दादांनी मुलाखत दिलेले आहे

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 5 месяцев назад +3

    बरोबर आहे

  • @krishnababar3861
    @krishnababar3861 3 месяца назад +2

    Dada Is Good Man❤😅😂😅😊

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 5 месяцев назад +1

    Dada mahnje pure soul ❤❤❤❤❤

  • @Dmb738
    @Dmb738 5 месяцев назад +2

    Dada कोंडके यांच्या शेवटचा चित्रपट "जरा धीर धरा " या अधुऱ्या चित्रपटाबद्दल सांगा ताई please 🙏🙏🙏🙏🙏

  • @babanmeanssanjaytalekar2676
    @babanmeanssanjaytalekar2676 5 месяцев назад +2

    ❤❤तुम्हि म्हनता ते खरं आहे

  • @vinodkulkarni949
    @vinodkulkarni949 4 дня назад +1

    हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आता बोलून काय उपयोग? ती व्यक्ती आता खुलासा करू शकत नसते.जिवंत असताना का बोलला नाहीस?

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  3 дня назад

      धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा शेअर करा बघत राहा मायाजाल

  • @vinodshelke3338
    @vinodshelke3338 5 месяцев назад +2

    दादा कोंडके यांच्या भाषेत काय होलसेल बाई आहे ही 😅😊 असे उषा नाईक बद्दल बोलले असतिल.अशा लोकांना दादा समोर बोलायची हिम्मत नव्हती तर बोंबलत बसून काय फालतुगिरी चाललीय असे मला म्हणायचे आहे सो धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 5 месяцев назад +1

    मी या विषयाबद्दल मागे एका व्हिडिओ मध्ये कमेंट केली होती,त्यावर व्हिडिओ बनवल्या बद्दल आभार....दादांनी आपल्या पश्चात आपली बऱ्यापैकी मिळकत आपल्या सहकलाकार आणि स्टाप ला देऊन टाकली होती,असं असताना एखाद्या पुरस्काराबद्दल दादा राजकारण करतील हे पटत नाही.....उषा नाईक ना एवढीच जर आपल्या अभिनयाबद्दल खात्री होती तर त्यांनी इतर निर्मात्या दिग्दर्शका बरोबर कामे करून स्वतःची उंची वाढवायला पाहिजे होती..

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 5 месяцев назад

      आपण उषा नाईक यांची पूर्ण मुलाखत पाहिली का? त्यांनी दादांवर कसलेही आरोप केले नाही. त्यांनी फक्त असं सांगितलं की, दादांना असं वाटत होतं संबंधित पुरस्कार हा उषा चव्हाण यांना मिळावा. आणि सर्व पत्रकारांचं असं म्हणणं होत कि हा पुरस्कार उषा नाईक यांना मिळाला.. दादांनी आपले राजकीय वजन वापरून ( दादांचे राजकीय वजन होतं हे कोणीही अमान्य करणार नाही ) हा पुरस्कार उषा चव्हाण यांना द्यायला भाग पाडले.. पत्रकारांनी आम्ही बहिष्कार टाकू असं सांगितलं.. त्यामुळे आयोजकांनी विशेष अभिनेत्री म्हणून उषा नाईक यांना पुरस्कार दिला.. असा सर्व तो प्रसंग आहे.. आणि आपण असं म्हणता ही उषा नाईक तेव्हाच का नाही बोलल्या? उषा नाईक यांचे नुकतंच करिअर सुरू झाले होते. अशाप्रकारे वाद घालून त्यांना आपल्या करिअरवर परिणाम घडू द्यायचा नव्हता.. त्यामुळे त्या गप्प बसल्या. त्यांच्या मनात दादांविषयी राग असता तर त्यांनी येऊ का घरात चित्रपट केला नसता..

  • @jayakamble762
    @jayakamble762 4 месяца назад +2

    Usha Naik mala kadi aavadlich nahi

  • @shodhnews
    @shodhnews 5 месяцев назад +1

    तुम्ही खूप संयमाने बोलला ...
    खरं तर -----

  • @vasantchavan5702
    @vasantchavan5702 5 месяцев назад +2

    खुप नशिबवान आहात तुम्ही..

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 5 месяцев назад +1

    Namaste madam...😊

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 5 месяцев назад +2

    PATAT TUMCHE MAHNANE SHABDAT VISWARATHATA ZADKATE

  • @tejashreepawar8262
    @tejashreepawar8262 5 месяцев назад +1

    Madam Barobar Boltat👌

  • @sandip.rakte19rakte52
    @sandip.rakte19rakte52 5 месяцев назад +1

    Aarun saranaeek badala sanga khup aabhar

  • @kailashsalokhe8500
    @kailashsalokhe8500 5 месяцев назад +2

    अनिता मॅडम फार छान बोलतात, उषा नाईक यांनी गेलेल्या माणसाबद्दल आरोप करणे चुकीचे आहेत.
    दादा असते तर ईट का जवाब पत्थर से दिया
    होता.
    आणि एवढाच राग होता तर दादा बरोबर फिल्म मध्ये काम का केलेत.

  • @satishvhanmane5935
    @satishvhanmane5935 5 месяцев назад +1

    दादांच्या लग्नाची काय कथा आहे ?आणि पुस्तकात लिहिल्याप्रमाणे उषा चव्हाण या त्यांच्या बरोबर काम नंतर नंतर करायला नकार का दिला?

  • @bapuraut
    @bapuraut 5 месяцев назад +4

    उषा नाईक ही सामान्य वकुबाची नटी होती. ( अभिनेत्री नव्हे.)
    इतके चित्रपट तिला मिळाले तरी कसे ? 😅

  • @ramchandraambekar5183
    @ramchandraambekar5183 5 месяцев назад +1

    अनिता ताई एकटा जीव पुस्तक मिळेल का मी आपणास खूप वेळा कॉमेट्स करून विचारले पण आपण काहीच उत्तर देत नाहीत महा न कलाकार चे जीवन चरित्र आपल्या जवळ असावे ही इच्छा आहे

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  5 месяцев назад +1

      anitaapadhyeproduction@gmail.com यावर ईमेल पाठवणे. यापुर्वीही २ वेळा ईमेल करायचा मेसेज पाठवला आहे. धन्यवाद

  • @शशिकांतमहामुनी
    @शशिकांतमहामुनी 5 месяцев назад

    उपकाराची परतफेड केली पाहिजे चांगलं माणसाला नावे, ठेवून वा,वा, मिळवायचे

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 4 месяца назад +1

    Usha naik boarch eatte

  • @amitbansode5925
    @amitbansode5925 3 месяца назад +2

    Mala adhi survatila vatayche ya Tai fkt dadan chya changlya gosti sangtat pan tase nahiye je ahe tech tya sangtat🎉🎉❤❤

  • @vishnuchavan583
    @vishnuchavan583 3 месяца назад

    ताई दादा व उषा चव्हाण यांच लग्न झाल होत का।किंवा त्यांच एकमेकांवर प्रेम होत का

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw 5 месяцев назад +1

    ताई, येऊ का घरात या चित्रपटाचा किस्सा पुर्ण वाटत नाही. मध्येच तुम्ही उषा नाईक यांच्या नव्या वादा बाबत बोलायला लागल्या. कदाचित editing मधे काही गफलत झाली असावी. दादाची बाजू आपण माडली.

  • @rutujajadye8608
    @rutujajadye8608 5 месяцев назад +3

    ऊषा नाईक खूप किंचाळून बोलत असते.चढऊतार अजिबात नाहित अॅक्टिंग मधे सगळ artificial वाटत.आत्ता सुध्धा तुझेच गित गात आहे मधे पण तसच acting आहे .सारख ओरडल्या सारख बोलत असते.मला ती आजिबात आवडत नाही.भांडल्यासारख बोलत असते.

  • @Vijaymakeupartist1975
    @Vijaymakeupartist1975 5 месяцев назад

    Agadi barobar mi pan tyancha interview pahila pan mala jast negative watala tyancha interview.
    Asha kale, Usha chavan सारख्या महान अभिनेत्री जेंव्हा interview detat तेंव्हा त्या नेहमी positive बोलतात film industry बद्दल,pan Usha Naik यांनी तर फक्त इंडस्ट्री निगेटिव्ह आणि मी positive कशी एवढाच पाढा वाचला.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://ruclips.net/video/1qTk-NUxgQg/видео.html

  • @Bob-qj4wq
    @Bob-qj4wq 5 месяцев назад +1

    मी माझ्या आयुष्यातील थेटर मध्ये बघितलेला पहिला चित्रपट दादांचा पांडू हवालदार होता. मला दादांचे सिनेमे खूप आवडतात खास करुन अंजनाबाई सोबतचे चित्रपट तर खुपच मस्त

    • @dilipnaikwad7490
      @dilipnaikwad7490 4 месяца назад

      दादाचे सर्व चित्रपट मी पाहिले खुप छान आहेत