गुरुमाऊली श्री संत शंकर बाबा महाराज आरती🙏🌸 | श्री संत शंकर महाराज आश्रम श्री क्षेत्र पिंपळखुटा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • आरती शंकर बाबा । दिव्य स्वरुपाची प्रभा ।।
    दिपविले नवखंड । प्रकाशली सारी आभा ।।धृ.।।
    पंचप्राण ओवाळीता । नुरले द्वैत भाव चित्ता ।।
    अखंड ध्यास तुझा । कोणी न होय परता ।।१।।
    ध्यानी ध्याता साक्षी माझा । तूची देही विदेही ।।
    नादबिंदू जागवोनीया । तुझे अंतरंग पाही ।।२।।
    चिन्मय रुप तुझे । ध्यानी दर्शन दावीले ।।
    जागविले मजलागी । दावी कृपेची पाऊले ।।३।।
    अनुभवी गुरु माझा । मन एकांताशी बोले ।।
    अंतरंगी पाही आता । स्वानंदाची पाऊले ||४||
    सोहं मंत्र जागविता । अनुभव सिध्द झाले ।।
    गुरु शिष्य एक भेटी । जीव शिव ऐक्य झाले ।।५।।
    साक्षात्कार तयापूढे । ध्यानी मनी आदीरुपा ।।
    ज्योतीची निजज्योती । साक्ष साक्षी ब्रम्हरुपा ।।६।।
    अनुभवी गुरु ऐसा । जगी जागवे स्वरुपा । दास म्हणे याची छंदे । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा ||७||
    आरती शंकर बाबा ।.....
    #shankarmaharaj #pimpalkhuta #amravati #varkarisamprday #alandidevachi

Комментарии • 8