खेळ रंगला पैठणीचा: अभिज्ञा भावेच्या उपस्थितीत पाषाणमध्ये महिलांचा भव्य मेळावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • 📍 ज्ञानदीप मंगल कार्यालय, पाषाण
    अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने पाषाण येथे आयोजित करण्यात आलेल्या 'खेळ रंगला पैठणीचा' या महिलांच्या मेळाव्याने स्थानिक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना एकत्र आणून, त्यांना मनोरंजनाची संधी देणे आणि एक विशेष अनुभव देणे होता.
    त्याचबरोबर अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय यांनी उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणित केला.
    कार्यक्रमाच्या दरम्यान, सामाजिक जबाबदारीचे पालन करत, बालेवाडी परिसरातील दिव्यांग सहकारी श्री. प्रमोद लहाने यांना हॅंडीकॅप बाईक भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली, ज्यामुळे या कार्यक्रमाने एक सामाजिक संदेश देखील दिला.
    तसेच, या प्रसंगी प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या,पहिल्या क्रमांकाचे बक्षीस TVS Scooty Zest सौ. अयोध्या कदम यांना प्रदान करण्यात आले. दुसरे बक्षीस सॅमसंग LED TV सौ. कल्पना संजय मुरगूडकर, तिसरे बक्षीस LG फ्रिज सौ. जनाबाई शामू थोपे, चौथे बक्षीस Godrej वॉशिंग मशीन सौ. रुक्साना पाशान आणि पाचवे बक्षीस फिलिप्स मिक्सर सौ. रेणुकाताई निर्मल यांना देण्यात आले.
    कार्यक्रमास कोथरूड परिसरातील सर्व माता भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

Комментарии •