ज्यांची पुण्याई पाठीशी त्यांचाच इतिहास का विकृत केला जातोय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 789

  • @surendrajadhav1047
    @surendrajadhav1047 2 года назад +38

    ऐतिहासिक सत्यता सोडून केवळ स्वतःचा गल्ला भरणाऱ्या कलम बहाद्दर लोकांना कायद्याने शिक्षा व्हायला हवी नायतर कोणीही बाजार बुणगे येतील आणि आमच्या राजाच्या तेजस्वी इतिहासाची मोडतोड करतील तर यासाठी कठोर शासन असायला हवे. भोसले सर खूप थोर कार्य आपण करत आहात.🙏🙏

  • @maheshshevate9950
    @maheshshevate9950 2 года назад +55

    अशा लोकांना असचं कुणीतरी ठणकावून सत्य सांगणारं हवं होतं.ते काम सर आपण चोखपणे पार पाडत आहात.मनापासुन धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 2 года назад +84

    खऱ्या इतिहासाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद या अशा खोटा इतिहास निर्माण करणाऱ्या किंवा चित्रपट निर्माण करणाऱ्याला धिक्कार असो जय भवानी जय शिवाजी

  • @kedardeshpande6448
    @kedardeshpande6448 2 года назад +97

    भोसले सर, प्रथम स्मसत देशपांडे यांच्या वतीने आपल्याला शतशः धन्यवाद.
    ज्वलंत आणि जाज्वल्य सत्य परिस्थिती आपण सांगीतली नाहीतर सत्य माहीत नसल्याने आम्ही देशपांडे खूप खजील झालो असतो. आत्ता आम्हाला अभिमान वाटतो देशपांडे असल्याचा.
    इतिहासीक चित्रपट बनवतांना इतिहासातील अजरामर व्यक्तीरेखाना अशा खोटारडा संवादा मुळे कुठे गालबोट लागणार नाही व या व्यक्तीमत्वाची उंची कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे मला वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ईतरञ घ्यावे पण इतिहास जसाआहे तसाच मांडावा असे मला वाटते.

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 2 года назад

      अहो सुरुवातीला जात पात होती शिवरायांच्या कृपेने सगळे एक झाले।
      बाजीप्रभूंच शिवप्रेम दिसतंय चित्रपटात कोणताही एन्याय झालेला नाही

    • @mihirkarkhanis2563
      @mihirkarkhanis2563 11 месяцев назад

      Deshpande hei ek post/rank ahe je brahman ani ckp hyna deli hoti....😅..

  • @dppatil1743
    @dppatil1743 Год назад +6

    सर,
    आपले इतिहासाचे ज्ञान खुप चांगले आहे.
    आमचे डोळे उघडल्या बद्धल धन्यवाद 🙏🏽
    जय शिवराय 🙏🏽

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 2 года назад +40

    प्रवीण भोसले सर तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास कळतो...

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 2 года назад +95

    आजकाल कुणीही उठतो आणि काहीही मसाला भरून शिवकालावर चित्रपट तयार करतो. याकरिता आता शासनानेच संहिता तयार करायला हवी...☝🚩

  • @ravipradhan4770
    @ravipradhan4770 2 года назад +11

    शेवटी हे सिनेमावाले महाराज आणि त्यांच्या साथीदारांचा उपयोग गल्ला जमवण्यासाठीच करणार आणि त्यासाठी इतिहासाची तोडमोड करणार.
    सुबोध भावे you too

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 года назад +32

    धन्यवाद सर, तुम्हीं तुमची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व परखडपणे निभावलीत. तुमच्या सारख्या ईतिहास संशोधका कडून हिच अपेक्षा होती.

  • @maheshghare1719
    @maheshghare1719 2 года назад +57

    पुराव्यांनुसार आपण केलेले विवेचन उल्लेखनीय आहे व चुका करणार्यांना त्याची शिक्षा मिळायलाच हवी. जय शिवराय 🚩🚩

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 2 года назад +1

      आपण दोनचार जणांनी मराठीचा मान राखून इतिहासातील खाणा खुणा आम्हा इंग्लिश ना समजणाऱ्या वाचकांना सांगितल्या त्या बद्दल आपणास नमस्कार.
      हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था असणाऱ्या जनतेचा विषय असूनही अनेक
      इंग्लिश बांधवानी त्यांच्या आवडीच्या भाषेत तो मांडलाय,आम्हाला तो सिनेमा पहाणे शक्य नाही पण, व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक इंग्लिश जाणकारांनी तो मराठी भाषेत लिहिला असता तर आम्हाला थोडी जास्त माहिती कळाली असती.
      असो
      🙏🙏

  • @pravinsanap539
    @pravinsanap539 2 года назад +17

    सर्व मुद्दे अगदी योग्य आहेत... लोकांनी असे पिक्चर बघू नये असं माझं वैयक्तिक मत आहे कारण असे पिक्चर चालले तर अशा कुप्रथा पुढेही चालू राहील आणि पुढच्या पिढीला खरा इतिहास कधीच कळणार नाही... इतिहास हा अभ्यासाचा विषय आहे मनोरंजनाचा नाही हे या धंदेवाईक लोकांना पण कळणार नाही त्याशिवाय

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 года назад +16

    मा .प्रवीण भोसले सर,तुमचा इतिहासाचा अभ्यास योग्य आहे,तुम्ही माहिती अभ्यास करून देत असता, ज्यांनी असे चित्रपट तयार केले,त्यांना च मूळचा इतिहास माहीत नसतो , आणि महत्वाचे म्हणजे सेन्सॉर बोर्डाने मान्यता कोणत्या आधारावर दिली ,त्यांनाच विचारणा करणे जरुरीचे आहे.

  • @Prof.pavanjadhav
    @Prof.pavanjadhav 2 года назад +12

    जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा पासुनच मनात खद खद होत होती। कुठे तरी बोलावे अस वाटत होतं परंतु अतिशय अभ्यास पूर्ण आपन बोललात। समाधान वाटल। जय शिवराय

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      कशाला बघितला तो चित्रपट. फालतू मांजरेकर

  • @dadasanap1779
    @dadasanap1779 Год назад +2

    आपण अत्यंत प्रभावी पणे खरा इतिहास शोधून मांडत आहात, धन्यवाद !, हे कार्य असेच चालू ठेवा.

  • @yogeshsawale5620
    @yogeshsawale5620 2 года назад +34

    प्रविण सर,
    अचूक विश्लेषण करून, वास्तव पुरावे सादर करून, खराखुरा इतिहास सकलजनांना उपलब्ध करून देण्याचे आपले कार्य प्रशंसनीय आहे. या कार्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त आपले सदैव आभारी आहोत.

    • @singingilove2226
      @singingilove2226 2 года назад

      Do u think that Shiv devotees are only in Maharashtra??These words of you pinch yaar

    • @tsgaagam6558
      @tsgaagam6558 Год назад

      Thank you sir

  • @vijaybokare9187
    @vijaybokare9187 Год назад +6

    बरोबर आहे सर आपल्या इतिहासावर चित्रपट निघत आहेत आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण इतिहासाची तोडमोड न करता खरा इतिहास दाखवायला पाहिजे शेवटी जय भवानी जय शिवाजी🙏❤️

  • @balakrishnapradhan5696
    @balakrishnapradhan5696 6 месяцев назад +1

    इतिहास जसा घडला तसाच मांडला गेला पाहिजे . आजच्या काळांत तर तुमच्या सारखी अभ्यासपूर्ण व प्रामाणिकपणे इतिहास निर्भयपणे लोकांसमोर आणू शकणारी माणसे दुर्मिळ होऊ लागली आहेत .

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 года назад +5

    सर,चित्रपट प्रदर्शित करणारे लोक व निर्माते यांनाच चांगला धडा शिकवावा लागेल व त्याचीच भलावण करून आपणास किती इतिहास माहित आहेत असे समजणाऱ्यांना पण समज द्यावी लागेल असे वाटते
    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 2 года назад +14

    भोसले सर खरच तुम्ही फार छान सर्व उलगडा केला त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच
    आजा इतिहास सर्व ज्याला जसा वाटेल तसा सागितला जातो एवढ खर आहे
    तुम्हाला खरच आमचा नमस्कार सर
    🙏🙏🙏👌👌👌

    • @dnyandeopurane2011
      @dnyandeopurane2011 2 года назад

      देशपांडे यानी चित्रपटात महाराजांचे भांड्वल केले आहे.पैसे कमवण्यासाठी सगळ केलय.

  • @bhalchandraranade7392
    @bhalchandraranade7392 Год назад +1

    धन्यवाद. हा विषय मांडला जाणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 2 года назад +32

    ऐतिहासिक चित्रपट बनविण्याआधी आपल्यासारख्या तज्ज्ञ इतिहासकारांशी चित्रपट निर्मात्यांनी चर्चा करायला हवी होती!...यापुढील काळात तरी ही सुधारणा व्हावी...

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 2 года назад +8

    धन्यवाद आज आपल्या मुळे आज आपल्या मुळे सत्य टिकून आहे.

  • @suhassgholap
    @suhassgholap Год назад +3

    महोदय,
    आपण जे खरा इतिहास मांडण्याचे अग्निदिव्य मांडले आहे.. त्यासाठी नमन 🙏🏻

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 10 месяцев назад +1

    धन्यवाद भोसले साहेब तुम्ही पुराव्यानिशी विडीओ बनवून इतिहास सांगतात तेच कोणी महापुरुषांच्या तोंडी काही ऐक संभाषण देऊन महापुरुषांचा अवमान करतात यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे हर हर महादेव

  • @maheshsatpute9576
    @maheshsatpute9576 Год назад +1

    चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार नाही मिळाला तर चालेल परंतु खोटा इतिहास दाखवण्याची काही गरज नाही असं मला वाटतं दुसरं म्हणजे तुम्ही दहा वर्षे इतिहास गडांची माहिती नकाशा असेल काही शिलालेख पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवले आहे खरंच खूप छान आणि जिवतोडुन तुम्ही सर्व महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशात हा पोहचतो आहे हे फार महत्त्वाचे बहुमुल्य आपण कार्य करत आहात खुप खुप धन्यवाद तुम्हाला माझ्या कडून 🙏🙏🙏

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 2 года назад +16

    आपण बोललात ते खरोखर खर आहे. आपला समाज इतिहास वाचत नाही. म्हणून काही लोक चुकीचा इतिहास सांगत आहे. हे आम्हास आपल्या बोलण्याहून कळते. जय शिवराय जय शंभुराजे

    • @somnathkhilare5039
      @somnathkhilare5039 2 года назад

      आजवर विक्रुत इतिहास सांगणारे ब्राह्मणी लोकच आहेत...ते आम्हाला आमच्या महापुरूषांच्या नावाने भावनिक करतात आणि आपला स्वार्थ साधतात..किती हास्यास्पद गोष्ट आहे की आपल्याला ते लोक मानसिक गुलाम किती सहज बनवतात...
      हे लोक आपल्या फायद्यासाठी त्यांचा खोटारडेपणावर चालणारा धार्मिक प्रोपगंडा चालवतात हेच कुणाला समजत नाही...

  • @jamirinamdar4222
    @jamirinamdar4222 2 года назад +2

    गुरुवर्य आपण माझ्याही मनात असलेल्या शंकेचं निरसन केलंत. मी ही कथा पावनखिंड या कादंबरी मध्ये वाचली होती. पण आपण अगदी पुराव्या सह सर्व शंका च निरसन केलंत त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आपलं अमूल्य मार्गदर्शन आणि अभ्यासपूर्ण ज्ञान आम्हाला असंच मिळतं राहो हिच इच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @narayangomase8901
    @narayangomase8901 Год назад +2

    अगदी खरोखरच अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत तुम्ही त्याबद्दल अभिनंदन.

  • @profanandrdeshpande1175
    @profanandrdeshpande1175 Год назад +1

    फारच अभ्यासपूर्वक केलेले हे पृथक्करण आहे.मनोरंजन आणि ईतिहास याचा योग्य तो संगम सिनेमात असावा.

  • @madhavashtekar9261
    @madhavashtekar9261 2 года назад +2

    आपण खरे सडेतोड सरदारच वाटता,तुमचा अभ्यास,नेमकेशब्द,मुद्देसूदपणा,समाजाला समजावून वास्तवाचा आरसा दाखवण्याचे कसब आश्चर्यकारकच आहे,असे मराठमोळे यांचीच महाराष्ट्राला आज गरज आहे. जय महाराष्ट्र, जयशिवराय.मान्यवर _नमस्कार.

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 11 месяцев назад +1

    वैयक्तिक मतापेक्षा इतिहास महत्वाचा.आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar1967 3 месяца назад +1

    प्रवीण सर मराठी शिवप्रेमी तुमची साथ कधी देतील. राजकीय पक्षाचा मोर्चा असेल तर लाखो सामील होतील. पण खऱ्या शिवप्रेमीला कोणी साथ देत नाही हेच मराठ्यांचे पर्यायाने हिंदूंचे दुर्दैव म्हणावे..

  • @sampatpisal7487
    @sampatpisal7487 Год назад +1

    अशा प्रकारच्या विकृत स्वरूपाच्या इतिहासाच्या सादरीकरणाला सेन्सॉर बोर्ड कसे प्रमाणपत्र देते, आपल्या देशाच्या घटनात्मक तरतुदींचा गैर फायदा असे लोक घेत असे उद्योग करतात. त्याला पायबंद बसेल अशा नविन तरतुदी करण्यात आल्या पाहिजेत.
    आपल्या संशोधनात्मक कार्यास सहस्त्र प्रणाम 🙏

  • @arunasane5690
    @arunasane5690 2 года назад +1

    आपण केलेले परिक्षण परखड आणि अभ्यास पूर्ण आहे . ऐतिहासिक सिनेमा करणारे जे आहेत त्यांनी नीट अभ्यास करण्याची गरज आहे सामान्य माणूस हा मेंढरा सारखा असतो जे समोर दिसत त्यावर विश्वास ठेवतो तेंव्हा
    सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे.

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 2 года назад +10

    अश्या चुका नेहमी होत असतील तर भविष्यात कोणीही विश्वास ठेवणार नाहीत ....

  • @ashokbhide4603
    @ashokbhide4603 2 года назад +2

    आपण खोट्या इतिहासाची चीरफाड केली खुप खुप धन्यवाद

  • @sudhiragashe4420
    @sudhiragashe4420 2 года назад +5

    अगदी योग्य कान उघाडणी केलीत.... धन्यवाद

  • @absabs4343
    @absabs4343 2 года назад +3

    इतिहास हा विषयच मुळात खूप कठीण.तो कुणीही कसाही आपल्याला पाहिजे तसा वाकविला.तसे गणित,विज्ञान वगैरे विषय वकविता येत नाहीत.त्यामुळे मूळ इतिहास कोणता याविषयी पण शंकाच निर्माण होतात.अलीकडे शरद पवार आणि राज ठाकरे पण इतिहास सांगतात.त्यांना पाहिजे तसा.धन्यवाद भोसले साहेब.

  • @ManikChoudhari-he2rc
    @ManikChoudhari-he2rc Год назад +1

    हा videos बगीतल्यावर खरच ती क्लिप डिलीट केली पाहीजे सर तुमी आतिशय उत्कृष्ट मागणी केली❤❤❤❤🎉जय शिवराय

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b Год назад +3

    Thanks Sir. Usually we common people do not know details of history. You are very right to point out the errors of this cinematic liberty. They are interested in making money. Respect you Sir for making us understand the reality.🙏🙏🙏

  • @nandakumarpatil3080
    @nandakumarpatil3080 Год назад +1

    अभ्यासपूर्ण विवेचन आवडले. मतितार्थ लक्षात घ्यायला हवा.. आपल्या भावना आणि त्यामागची तळमळ कळली. आपला इतिहास कुठल्याही मसाल्याशिवाय जाज्वल्य च आहे. महाराज आणि त्यांचे वेगवेगळे सेनापती हे महानच. त्यावेळी महाराज जात आणि धर्मावरून माणसाची निवड नव्हते करत, कर्तुत्व हा एकच निकष होता. पण आज काही लोक आपला मोठेपणा सांगताना जात आणि धर्म वारंवार मधे आणतात कारण त्यांच्याजवळ स्वताःच असं काही नसतंच.. असो तो एक वेगळाच विषय आहे. तुमचे विशेष आभार वरील माहिती साठी...

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 2 года назад +4

    धन्यवाद साहेब हि बाब चीत्रपट पाहील्यावर लगेचच लक्षात आले खुप अचुक वेध घेतलाय या तुच्छ मावळ्याचा आपणास मानाचा मुजरा

  • @sameerapte6603
    @sameerapte6603 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर... खूप छान कारण मीमांसा केली तुम्ही.. इतिहास ही सगळ्यात लवचिक गोष्ट झालेली आहे. स्वतःच्या फायदयासाठी कोणीही हवा तसा वाकवतोय. ९५% लोकांना तो माहीत नसतो हीच फार मोठी खंत आहे..

  • @kishorajadhav9718
    @kishorajadhav9718 Год назад +1

    शिवचरीत्र आणि बाजी प्रभुंची स्वाॅमीनिष्टा मळीन करना=या चित्रपटास प्रदर्शना आगोदर विरोध झाला पाहीजे. वखोटा इतिहास दाखवणा=यावर कडक कारवाई झाली पाहिजे. || जय महाराष्ट्र ||

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 2 года назад +9

    खुप खुप अभिनंदन आपले महोदय, चांगले
    ऐतिहासिक स्पष्टीकरण केले आहे आपण.

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 2 года назад +5

    भोसले साहेब ईतिहास ची इतकी चोख माहिती हिंदू सनातनी हिताची अमुल्य ठेव आहे आणि देशहिताला संरक्षित करनारी आहे या कार्या साठी देव आपणास उदंड आयुष्य देओ हि ईश्वर चरणी साष्टांग नमन

    • @chaganmore554
      @chaganmore554 2 года назад

      हिंदू सनातनी हिताची नाही तर देशहिताची देशाच्या संस्कृतीची आणि भावी पिढीच्या हिताची सनातनी हा शब्दप्रयोग केल्यानंतर त्याच्यात कर्मठपणा आला जे कर्मठ होते ते समाजाची लबाडी करीत होते

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 года назад +3

    या सिनेमावाल्याला इतिहासाचे ज्ञान नाही.कोणिहि उठतो आणि शिवरायांवर चित्रपट काढतो.तूम्ही केलेली टिका इतिहासाला धरुन आहे.धन्यवाद साहेब,जय शिवराय जय शंभुराजे.

  • @sandeepambavanekar9438
    @sandeepambavanekar9438 2 года назад +4

    धन्यवाद सर
    खर तर दुर्दैव आहे आपलंच कारण छ. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असले भरपूर चित्रपट निर्माण होत आहेत. यातले काही खरच सुंदर व भव्य दिव्य बनले आहेत पण काही फक्त पैसे कमवायचे साधन व भडकपणा असलेले बनत आहेत.
    थोडक्यात मूळ कथा न बदलता काही केलं तरच छ. शिवाजी महाराज यांचे विचार पुढील पिढीला मार्गदर्शक ठरतील.

  • @vinoddeshpande9293
    @vinoddeshpande9293 2 года назад +3

    तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य च आहे आणि
    ज्या वेळी ऐतिहासिक चित्रपट बनवतात त्या वेळेला ज्या कुणी ऐतिहासिक व्यक्ति वर माणसावर चित्रपट बनवल्या जातो त्याच्याविषयीची माहिती असणाऱ्या इतिहासकारा बरोबर ही मंडळी जी चित्रपट बनवणारी आहे ती त्यांना त्यामध्ये सामील का करून घेत नाही किंवा त्यांची इतिहासामध्ये काय स्थिती होती हे जाणून का घेत नाही आणि महत्त्वाचं की जर समजा आपण इतिहासावर सिनेमा करतो आहे तर इतिहासकाराला बरोबर घेऊनच तो चित्रपट करावा आणि पुराव्या सकट करावा जेणेकरून तुमच्यासारखे किंवा माझ्यासारख्यांनी कोणीही त्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये असं मला वाटतं बोलण्यालाएक खूप काही आहे पण कॉमेंट्स मध्ये मी एवढेच लिहू शकतो एवढेच सांगू शकतो

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +15

    Absolutely true logical rational and scientific
    Thanks 🙏
    Fully agreed
    I have read the book
    Paavan Khind
    Similar history is written

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 2 года назад +2

    खरतर हा सिनेमा मी आणि माझे कुटुंब बघायला जाणार होतो , पण असत्य घटना या चित्रपटात दाखवली असल्याचे कळल्यामुळे आता हा सिनेमा बघायला जाणार नाही .

  • @pradnya1228
    @pradnya1228 2 года назад +1

    Khar ahe, satyach vipryas hots ksms naye, hi tyvar kam karnarya mansschi jabbadari ahe.

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 2 года назад +13

    होय सर, मला देखील हेच वाटत होतं....हल्ली फक्त हुल्लडबाजी चालते....इतिहासाशी ह्या लोकांना काही देणे घेणे नसते....Thanks Sir
    आपण अतिशय logically उत्तर दिलं....
    मला देखील हे सिनेमा अजिबात आवडला नाही.
    जय शिवराय 🙏

  • @aishwarybandal176
    @aishwarybandal176 2 года назад +8

    खरा इतिहास तुम्ही मांडत आहात खूप खुप धन्यवाद सर 🙏

  • @amitddhanrajjanrao7104
    @amitddhanrajjanrao7104 2 года назад +3

    अत्यंत मार्मिक पणे आणि मुद्देसूद रीतीने आणि सभ्य भाषेत खरा इतिहास सांगितला सर. तुमचा व्हिडिओ चित्रपट निर्मात्या पर्यंत पोहोचवा आणि तो बदल घडून यावा ही सदिच्छा

    • @manojkapse1271
      @manojkapse1271 2 года назад

      निर्माते तसे करणार नाहीत, ते फारतर चित्रपट च्या सुरुवातीला एक लाईन टाकतील "निर्माते निर्देशक यातील घटना व पात्र पूर्णतः ऐतिहासिक असल्याचा दावा करीत नाहीत " बस झाले, यावर उपाय कोर्टात केस टाकून खोटा भाग काढून टाकल्या शिवाय चित्रपट प्रदर्शीत होता कामा नये,

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya 2 года назад +2

    धन्यवाद साहेब

  • @ishwaraglave9475
    @ishwaraglave9475 Год назад +1

    खुप छान..अभ्यासपूर्ण विश्लेषण सर

  • @dhirajdeshmukh5281
    @dhirajdeshmukh5281 2 года назад +23

    सर ख़रा इतिहास मांडल्या बद्दल आभार 🚩🚩

  • @deepakarnikar3271
    @deepakarnikar3271 Год назад +1

    Khup changla aabhyas aahe sir tumcha

  • @babannatu5900
    @babannatu5900 Год назад +1

    धन्यवाद काका जय शिवराय हरहर महादेव

  • @nitinbagkar1435
    @nitinbagkar1435 2 года назад +7

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी बघितला सिनेमा .वेळ व पैसे वाया गेल्यामुळे डोळ्यात पाणी आले....भालीजी पेंढारकरांचेच सिनेमे ऊत्तम होते

  • @swapnabhoi2665
    @swapnabhoi2665 2 года назад +1

    अगदी खर आहे सर तुमचे इतिहासात घडलेले काही प्रसंग आपण आम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत उलगडून दाखवले त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

  • @Rvsaysss
    @Rvsaysss 2 года назад +9

    मला पडलेला प्रश्न अगदीच बरोबर होता. धन्यवाद सर🙏🙌🏾

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 2 года назад +2

    तुम्ही मोलाचं काम करत आहात. जय शिवाजी राजे ! जय बाजी प्रभू !

  • @naadaumeuphonicskedardighe6336
    @naadaumeuphonicskedardighe6336 Год назад +1

    Saaheb, dhanyavaad. Aaple kartavya ani itihaasache sarva mudde mannaala bhaavle. Love❤ your channel. 🙏😍👏👏👌

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap 2 года назад +4

    खरंय सर 🙏 खरा इतिहास सांगितल्या बददल धन्यवाद !

  • @sumitraingale3188
    @sumitraingale3188 Год назад +1

    संयमित भाषेत माहिती दिलीत,की जी आताच्या घडीला खूप महत्त्वाची आहे.👌👌

  • @vikastiwari302
    @vikastiwari302 2 года назад +1

    Sir great great information 👍
    Many thanks 💓
    Jai shivray

  • @meerakale9864
    @meerakale9864 2 года назад +4

    भोसले सर आम्ही परवा तो चित्रपट नातीसह पाहीला.तुम्ही सांगितले ते मुद्दे अगदी रास्त आहेत.तुमचे अभिनंदन करते.असा चुकीचा इतिहास चित्रपट माध्यामाद्वारे दाखवणे हा निंदनीय प्रकार आहे.सेन्सारबोर्डाने थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. . पुढील पिढी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाते त्यांना चुकीच्या इतिहास दाखवून त्यांची दिशाभूल करणे गैर आहे...चित्रपटावर बहिष्कार घातला पाहिजे.

  • @amudesai6793
    @amudesai6793 2 года назад +4

    धन्यवाद सर आपल्या सारख्या लोकांमुळे कानउघडणी होते आणि जे खरं आहे ते प्रखर पणे मांडताय

  • @rahulmestry8320
    @rahulmestry8320 2 года назад +9

    खूप चांगल्याप्रकारे आपण पुरावे सादर केलेत 🙏🏻😇

  • @amolchavan9782
    @amolchavan9782 2 года назад +23

    Khoop khoop aabhar sir. I am big fan of you and your work of Maratha history.

  • @mangeshjadhav9757
    @mangeshjadhav9757 2 года назад +1

    पूर्ण पणे सहमत आहोत सर...खूप खूप धन्यवाद आपण सत्य समोर आणून बहुसंख्य शिवरायांच्या अनुयायांना शिक्षित केले..

  • @dasshelke5500
    @dasshelke5500 Год назад +1

    🚩 मराठा भूषण श्री भोसले, अतिशय सुंदर माहिती दिलीत 🙏 🚩

  • @santoshshelke5924
    @santoshshelke5924 2 года назад +5

    भोसले सरांनी सबळ पुरव्यानिशी दर्शविलेला विरोध... अतिशय महत्वाचा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी यात बदल व्हायला हवा...

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 Год назад +1

    खरी व सत्य माहिती दिली दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashwin572
    @ashwin572 2 года назад +1

    साहेब अश्या खोट्या गोष्टी सांगणाऱ्याना फाशी द्यायला पाहिजे.
    तुमचे काम खूप चांगले आहे धन्यवाद

  • @pradeepnimbalkar217
    @pradeepnimbalkar217 Год назад +1

    Sir.I am with you I appreciate Thanks Regards ........
    .Pradeep Nimbalkar Nanded

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 года назад +7

    सर नमस्कार अगदी बरोबर
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @शिवराष्ट्र-घ1ष
    @शिवराष्ट्र-घ1ष 2 года назад +4

    100% खरा इतिहास खरा आहे आपण सांगितलेला

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 2 года назад +41

    Hats off for beautiful and studied analysis for bringing out real history. Wish the film producer and director would take appropriate lesson .

    • @konkannews5665
      @konkannews5665 2 года назад

      अतिशय महत्वाचे मुद्देसूर विचार मांडल्या साठी आभार, पौराणीक कथा व इतिहासावर कोणतेही चित्रपट अथवा कार्टून बनविताना संदर्भ सोडून किंवा कथेला धार येण्यासाठी आपल्या डोक्यातील किंवा आत्ताचे प्रचलीत उडाण टप्पू संवाद कथा नकांच्या तोंडी मारण्यावर बंदी आणली पाहीजे
      आजच्या तरुणाईच वाचन कमी झाल आहे व जे गुगल, यु ट्युब वर आहे ते सत्य मानन्यात काहीजण धन्यता मानतात व चूकीच्या कथाना नकळत प्रचलीत करण्यात आपला सहयोग
      देत आहेत

  • @niranjantamboskar7788
    @niranjantamboskar7788 2 года назад +4

    तुम्ही दिलेले दाखले हे निःशब्द करणारे आहेत. संकेस कुठेही वाव उरत नाही. तुमच्या अध्ययनास आमची मानाचा मुजरा.

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +10

    you are a gem of maratha history. 100% unbiased. no dirty politics. keep up the good work. jai shree raam. i think the sentence, "if you are planning to attack morrow, better come today" is also associated with chandra rao more of jawali to his reply to maharaj.

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 2 года назад +5

    खरं आहे सर,
    आपण चांगली कान उघाडणी केली या कलम कसायांची.

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 2 года назад +3

    सर आपण अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला.आपल्या अनेक महापुरुषांचे इतिहास या लोकांनी विकृत केले.

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 2 года назад +6

    फारच छान काम केले साहेब आपण ,
    खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🚩🚩🚩

  • @maheshwagholikar5908
    @maheshwagholikar5908 2 года назад +3

    Tumchya dhadsa baddal dhanyavaad.

  • @ravipradhan4770
    @ravipradhan4770 2 года назад +3

    सर आपण सगितल्या प्रमाणे जर तो संवाद आणि प्रसंग कापला तरच आम्ही हा सिनेमा पाहू.
    जय शिवराय आणि त्यांचे सर्व सहकारी

  • @flyingdoctor22
    @flyingdoctor22 Год назад +5

    Thank you sir for enlightening all of us! In the excitement of making a movie, film makers are abusing cinematographic liberty! Very unfortunate. We don’t want next generation to grow up learning our glorious history by watching such movies! That’s why contributions from experts like you are invaluable!🙏🏻

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 2 года назад +2

    Khup chan explain kelat Saheb
    Jay ShivRay Jay Maharashtra

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 года назад +9

    सुंदर सर... योग्य विश्लेषण.... योग्य बोलता आपण सर 👌👌👍👍👍

  • @harishranaware0
    @harishranaware0 7 месяцев назад +1

    इतिहासची विटंबना करणारे समाज द्रोही शिक्षेस पात्र का असु नयेत हे थांबले पाहिजे, कायदा कड़क करुण आशांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 2 года назад +1

    अतिशय वस्तुनिष्ठ विवेचन सर.
    छत्रपति शिवराय महाराज व त्यांचे शिलेदार यांवर बेतलेला कोणताही चित्रपट सेंन्सॅार बोर्डाने आधी आपल्या सारखे जाणकार व ईतीहासकारांकडून तपासून मगच त्याला प्रदर्शित करायला मान्यता दिली पाहीजे.

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 2 года назад +1

    आपण सांगितलेले अत्यंत खरे आणि सप्रं सत्य आहे.

  • @baluayare1836
    @baluayare1836 2 года назад +1

    खरा इतिहास आम्हाला सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद सर

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 2 года назад +4

    खूप खूप आभार आपण योग्य पद्धतीने विश्लेषण केल्याबद्दल सर माझा एक प्रश्न आहे आपणास आम्ही सर्वच शिवभक्त एका भिमा मध्ये आहे छत्रपतींची समाधी कोणी शोधून काढली व पहिली शिवजयंती कोणी सुरुवात केली याबद्दल माहिती आपण द्यावी जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩

  • @mansaramsonawane6882
    @mansaramsonawane6882 2 года назад +2

    सर मी आपल्याशी १००%सहमत आहे.काही खोट्या इतिहासतज्ञानी जाणीव पुर्वक महान व्यक्तीमत्वांची प्रछन्न बदनामी केल्याची खुप उदाहरणे आहेत.मोहीत्याची मंजुळा..थोरातांची कमळा.. अनारकली..मोगल ई आझम इत्यादी..

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @haripawar1105
    @haripawar1105 Год назад +1

    Thanks sir, very good👍

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 Год назад +1

    जय शिवराय..