स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बुद्धिवाद | प्रा. शेषराव मोरे | द पोस्टमन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 117

  • @sagarshinde6858
    @sagarshinde6858 5 лет назад +18

    सावरकरांचे विचार समजून घ्यायचे तर हे भाषण नक्की ऐकले पाहिजे असे आहे. धन्यवाद, द पोस्टमन.

  • @umeshmuley1649
    @umeshmuley1649 Год назад +1

    धन्यवाद सर .. दृष्टे सावरकर🙏🙏

  • @chetanoturkar2254
    @chetanoturkar2254 5 лет назад +8

    Thanks for uploading. Please upload more Sheshrao More sir’s speeches.

  • @prabhakarjoshi7634
    @prabhakarjoshi7634 8 месяцев назад

    वीर सावरकर ... नतमस्तक !
    धन्यवाद मोरे सर !

  • @ravimitkari3357
    @ravimitkari3357 4 года назад +2

    खुपच सुंदर व्याख्यान डाॅ.मोरे सर

  • @bhagwatkolhe7394
    @bhagwatkolhe7394 5 лет назад +18

    मला आज खरे वीर सावरकर कळाले..... धन्यवाद सर

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge5742 5 лет назад +12

    शेषराव मोरे तुमचा अभ्यासाला तोड नाही

    • @sumedh6211
      @sumedh6211 4 года назад +3

      अगदी बरोबर साहेब🙏🙏

  • @ddkp2950
    @ddkp2950 4 года назад +3

    सुन्दर

  • @gulamsamdani7638
    @gulamsamdani7638 4 года назад +10

    मी, गुलाम समदानी, RSS कडून चालवली जात असलेली शाळा,समता विद्यालय उस्मान नगर ,जि.नांदेड या शाळेत शिकून शालांत परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तेथे 8 वी ते 10 वी या कालावधीत मी सावरकरांचे समग्र वांग्मय वाचले आहे.त्यावेळी मला फार कांही समजत नव्हते,तरीपण इस्लाम आणि प्रेषित मुहंम्मदां विषयी असलेल्या आस्थेमुळे,मी यांच्या विरोधी कांही सापडते का हे फार काळजीपूर्वक पाहत होतो पण तेव्हा मला असे कांही मिळाले नाही. नंतर शासकीय नोकरीत पुण्याला असतांना भव्य शासकीय ग्रंथालयात हा खजीना मी पुन्हा शोधून काढला तेंव्हा त्यांचे राजकीय विचार ,बेड्या तोडणे,सहा सोनेरी पाने इ.मला अभ्यासता आले. आश्चर्य हे की निवृत्तीच्या वयात पण मला त्यांच्या लिखाणात इस्लाम विरोध ,प्रेषितांवरील टीका पाहावयास मिळाली नाही.
    ते एक न्यायनिष्ठुर व्यक्तिमत्तव होते.त्यांनी राजकीय दृष्ट्या हिंदूंना एक होण्याचे आवाहन केले की 24% मुसलमानांना 50% राखीव जागा देणे हा हिंदूंवर अन्याय आहे ! यात काय चुकीचे होते? त्यांनी हिंदूंना वैज्ञानिक दृष्टीकोण स्वीकारण्यास सांगितले आणि पारंपारिक हिंदू धर्म सोडण्यास सांगितले यामुळे कर्मठ हिंदूंनी त्यांना मनापासून स्वीकारले नाही.
    हिंदूंचे ऐक्य खरे म्हणजे इतिहासात पाहायला न मिळालेली बाब आहे.राजस्थानात,पानीपत मध्ये आणि सर्वत्र, हिंदूंचा पराभव, त्यांच्यातील ऐक्याच्या अभावामुळे झालेला आहे.इतिहासाची पुनरावृत्ती होत असते !म्हणून सावरकरांनां पण हिंदू ऐक्य साधण्यात अपयश आले.धर्म बाजूला ठेवून नास्तिक झाल्यास,भयंकर पोकळी आणि अराजकता निर्माण होते. म्हणून हिंदू धर्म टाकाउ झाला असेल तर तो सोडून नवीन धर्म स्वीकारण्याचा धाडसी निर्णय जो पर्यंत हिंदू समाज घेत नाही तो पर्यंत कितीही सावरकर जन्मले तरी हा समाज सुधारणार नांही !

    • @nageshlonikar3234
      @nageshlonikar3234 3 года назад

      हो सर तुमचे बरोबर आहे, पन तुम्हाला वाटत असेल तरी ती पोकळी इस्लाम धर्म भरून काढू शकत नाही

    • @rajpalvimalbaibapusaheb9988
      @rajpalvimalbaibapusaheb9988 3 года назад +1

      समदानी साहेब,
      स्वातंत्र्य चळवळीदरम्यान जनता सावरकरांऐवजी गांधींच्या मागे का गेली? कारण सावरकरांनी सामान्य जनतेच्या उपजीविकेच्या/आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. भारतीयांचे पारंपरिक व्यवसाय, गावगाड्याची व्यवस्था (बलुतेदारी पद्धत) उद्ध्वस्त होत असताना सैरभैर झालेल्या जनतेला त्यांच्याच भाषेत बोलणारा, पारंपारिक व्यवसायांचं समर्थन करणारा नेता हवा होता, तो त्यांना गांधींच्या रूपात मिळाला. हिंदू धर्म विषमतेचं समर्थन करतो म्हणून अनेकांनी त्यावर टीका केली आहे. त्यात प्रामुख्याने आंबेडकर आणि सावरकर यांचा समावेश होतो. खेदाची बाब ही की, तंत्रशास्त्रावर आधारित समतेचं तत्त्वज्ञान मानणारा हिंदू धर्म आणि विषमतेचं समर्थन करणारा, भिन्न तत्त्वज्ञान/कर्मकांड/धर्मग्रंथ असणारा वैदिक धर्म या दोन्ही धर्मांना एक मानल्यामुळे इतिहासलेखनात प्रचंड चुका झाल्या आहेत. इतिहासाचं आकलनच चुकीच्या समजुतींवर आधारित असताना कृतींवर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक होतं. जणू काय वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारल्याने हिंदू धर्म गर्तेतून बाहेर येईल. (वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगू नये असं माझं म्हणणं नाही परंतु तो काही एकमेव उपाय नव्हे.) समतेचं मूल्य केवळ तात्त्विक पातळीवर असणं परंतु व्यावहारिक पातळीवर नसणं, द्वेषावर आधारलेल्या अस्मिता हीदेखील हिंदू धर्मियांसमोरील आव्हानं आहेत. ज्यांच्यावर केवळ वैज्ञानिक दृष्टीकोन हे उत्तर असू शकत नाही. हिंदू धर्म जातिव्यवस्थेतील भेदभावाचं समर्थन करतो हादेखील एक मोठा गैरसमज आहे. मूळात वर्णव्यवस्था (उतरंडीची वैदिक धर्मातील व्यवस्था) आणि जातिव्यवस्था (हिंदू धर्मातील व्यवस्था) एक नसून वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. त्या दोघांना एक मानत हिंदूंचा इतिहास वैदिक साहित्यात शोधला गेला. इतर देशांत सहजी विजय मिळवणाऱ्या इस्लामला ५०० वर्षे प्रयत्न करूनही भारतात संपूर्णपणे हातपाय पसरता आले नाहीत हा इस्लामचा एकप्रकारे पराभव नाही का? हिंदूंमध्ये ऐक्यभावना का निर्माण होऊ शकली नाही, याचं कारण हिंदू आर्थिक अरिष्टात आणि वैदिक धर्मवर्चस्वाच्या दुष्टचक्रात सापडले. हिंदू धर्म टाकाऊ झाला असेल तर...हे आपले विधान योग्य नाही. हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान समतेचा पुरस्कार करणाऱ्या तंत्रशास्त्रावर आधारित आहे, नेमकी ही बाब सावरकर/आंबेडकरांनी दुर्लक्षित केलेली आहे आणि आज त्यांचीच हिंदू धर्माविषयीची गैरसमजातून आलेली विधानं उद्धृत करून अनेकजण आणखीन गैरसमज वाढवत आहेत. आपला प्रतिसाददेखील अशाच गैरसमजावर आधारलेला दिसतोय म्हणून हा खुलासा केला.
      Have a great time!

    • @milindkale69
      @milindkale69 3 года назад

      नविन धर्म तो कोणता?

  • @rajpalvimalbaibapusaheb9988
    @rajpalvimalbaibapusaheb9988 3 года назад +1

    (भाग ३)
    कोणतीही गोष्ट सामान्य म्हणून पाहिली तरच खुलासा देता येतो, अनन्य (unique) म्हणून पाहिली तर खुलासा देता येत नाही. व्यक्ती ही अनन्य असल्याने सावरकर, सावरकर म्हणूनच का जन्माला आले, अमुक एक अपघात माझ्याच वाट्याला का आला यासारख्या प्रश्नांना विज्ञान/संविधान/कायदे उत्तरे देऊ शकणार नाही. विशिष्ट परिस्थितीत कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय हा प्रश्न विज्ञान सोडवू शकत नाही. परंतु, अशा प्रश्नांची उत्तरे माणसाला हवी असतात. ती माणसाची अत्यावश्यक निकड असते. अशावेळी धर्म त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. ही उत्तरं तर्कशुद्ध की तर्कदुष्ट हा प्रश्नच नसतो कारण आधार (सुकूुन) मिळवण्यासाठी आपण पुरावे तपासत नाही. मनाची अस्वस्थता घालवणे ह्याला तेथे प्राधान्य मिळतं. विज्ञानाची दुसरी मर्यादा म्हणजे नैतिक पेच, मूल्यांचे प्राधान्यक्रम, प्रयोजनाचे प्रश्न विज्ञान सोडवू शकत नाही अशावेळी धर्म अवतरित होतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आणि विभिन्न प्रकारच्या परिस्थितीतून जगताना मानवी शरीरात/मानसिकतेत अनेक अविभाज्य बदल झाले आहेत. Hyperactive agency detection, Folk psychology, Placebo effect, Default pathway, Biases and heuristics, God helmet, Decoupled cognition या घटकांमुळे/घटनांमुळे धर्म निर्माण होण्यास/टिकून राहण्यास हातभार लागला आहे. माणूस आहे तोवर धर्म राहणारच. म्हणून धर्मातील बाबी विज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायला हव्यात किंवा धर्मग्रंथ कालबाह्य झाले आहेत अशी टाळ्याखाऊ विधानं आकर्षक वाटली तरी त्यांचा वास्तवाशी संबंध नसतो. धर्मग्रंथावर आधारित समाजव्यवस्था असावी, असा अर्थ मला अभिप्रेत नसून धर्मातील अनेक बाबी मानवी जीवनाला आधार देतात त्या अर्थाने धर्म आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरतात. धर्म (प्रयोजनमीमांसेचा/मानसिक आधार मिळवून देण्याचा प्रांत) आणि विज्ञान (कारणमीमांसेचा प्रांत) या सर्वस्वी वेगळ्या बाबी आहेत, त्यांची कार्यक्षेत्रं वेगवेगळी आहेत ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
    सावरकरांनी धर्माचे निसर्गधर्म (निसर्गनियम), तत्त्वज्ञान, रिलिजन (परलोक महत्त्वाचा मानणारा), मनुष्यधर्म (समाज कल्याणासाठी धारणा करतो तो) असे ४ अर्थ दिले आहेत. एकाच शब्दाचे विविध अर्थ प्रतिपादित करणे म्हणजे वैचारिक आट्यापाट्या खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे होय. ज्यांना सोयी-सोयीने, परिस्थितीनुसार भूमिका घ्यायच्या असतात त्यांच्यासाठी अशी मांडणी म्हणजे एक प्रकारे पर्वणीच असते. धर्म आणि हिंदू या शब्दांबाबतीत उगाच नाही भारतात इतका गोंधळ निर्माण झाला आहे. वैचारिक लिखाणात इतकी सैलसर मांडणी प्रश्न सोडवत नसते तर वाढवून ठेवत असते. धर्म हा धर्माचं तत्त्वज्ञान, समाजव्यवस्थेतेबाबतचे विचार, कर्मकांड, संकेत, परंपरा, सण-उत्सव, पारलौकिकाविषयीचे विचार या सर्वांनी मिळून बनलेला असतो. सर्व धर्मात परलोकाविषयीचे विचार, धर्माचं तत्त्वज्ञान आढळतं. हे घटक म्हणजे धर्माचे अविभाज्य अंग आहेत. केवळ हात/डोके म्हणजे शरीर नव्हे, शरीरात आणखीही अवयव (घटक) असतात. निसर्गनियम, कर्तव्य म्हणजे धर्म नव्हे. सर्वांना धर्म म्हणणं ही काय चांगली मांडणी म्हणता येणार नाही. वैदिक धर्माहून वेगळा, प्राचीन आणि मोठा प्रवाह शैव धर्माचा होता. परंतु, सावरकरांचं विवेचनच वेद आणि आर्यराष्ट्रापासून सुरू होतं आणि सर्व प्रवाहांमध्ये एकत्व शोधण्याचा ते प्रयत्न करतात. सर्व प्रवाहांमध्ये एकता नव्हे तर सर्व प्रवाहांशी सहजता ही खरी भारतीयता आहे. त्यामुळेच इतके वैविध्य हा देश पचवू शकला आणि टिकला. सावरकरांनी मांडलेल्या इतिहासाची नीट चिकित्सा न करताच प्रा. मोरे 'सावरकरांची बुद्धिनिष्ठ मांडणी' म्हणून गौरव करत आहेत. वास्तविक ती बुद्धिनिष्ठ नसून अनैतिहासिक आणि भावनिक मांडणी आहे.
    (क्रमशः)

  • @RohitSharma-mi8gt
    @RohitSharma-mi8gt 5 лет назад +4

    As great as his reformist views were, his freedom fight has almost been ignored

  • @thekdtalk3591
    @thekdtalk3591 Месяц назад

    Ram Ram

  • @mrunalkale4663
    @mrunalkale4663 3 года назад +1

    Salute to THE GREAT VEER SAVARKAR

  • @padmakarahirrao1194
    @padmakarahirrao1194 10 месяцев назад

    Calender prajwalant ?

  • @rajpalvimalbaibapusaheb9988
    @rajpalvimalbaibapusaheb9988 4 года назад +2

    (भाग २)
    व्यक्तीस्थापित धर्मांच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन समाजात सर्व धर्म हे लोकधर्म (समाजस्थापित/पेगन) असल्याने त्या-त्या प्रदेशाचे/जमातीचे नाव हेच त्या धर्माचेही नाव असे. वैदिक भारतात येईपर्यंत हिंदूंना आपल्या धर्माला नाव देण्याची आवश्यकता भासली नव्हती. ते आपल्या धर्मासाठी पारंपारिक नाव वापरत होते. पुढे इतर धर्मांच्या आगमनामुळे आगमिक धर्मियांनी (हिंदूंनी) तंत्रग्रंथांमधून स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायला सुरूवात केली. 'मेरूतंत्र' या ग्रंथात 'हिंदू' हे नाव धर्मवाचक या अर्थाने येते. जे वैदिक/बौद्ध/जैन नाहीत, प्रतिमा/मूर्तीपूजा मानतात ते हिंदू. म्हणजेच सावरकरांच्या काळातदेखील हिंदू हा शब्द धर्म या अर्थाने वापरला जात होता म्हणून तर 'हिंदुत्व' ग्रंथात सावरकरांना हिंदुत्व हे हिंदू धर्माहून निराळं आहे याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. ज्या धर्मेतिहासाच्या साह्याने सावरकरांनी हिंदुत्व ही संकल्पना रचली आहे तो इतिहास अचूक आहे का, हा खरा प्रश्न आहे. सावरकर अभ्यासकांनी हा इतिहास तपासून पाहिलेला नाही, असं खेदाने म्हणावं लागतं. हिंदुत्व ही संकल्पना राजकीय आहे हा निष्कर्ष त्यांच्यासाठी पुरेसा असतो. एका धर्मवाचक संज्ञेचा वापर करून त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही असं म्हणायचं शिवाय जे स्वतःला हिंदू म्हणवत नाहीत अशा वैदिक/जैन/बौद्ध/शीख धर्मियांना हिंदू म्हणून संबोधायचं यामुळे गोंधळ वाढणार नाही तर आणखीन काय वेगळं होईल? खरं तर सावरकरांविषयी इतके गैरसमज निर्माण होण्यास त्यांचं गोंधळग्रस्त लेखन अधिक कारणीभूत आहे. सावरकरांनी हिंदू या धार्मिक संज्ञेऐवजी एखादी धर्मबाह्य संज्ञा वापरली असती तर हिंदू शब्दाबाबत एवढे गैरसमज निर्माण झाले नसते. याविषयी सावरकर अभ्यासकांनी विचार केला पाहिजे.
    हिंदुत्व या ग्रंथात (पृष्ठ क्र. ६८) सावरकर लिहितात की, "ज्याला सिंधुस्थान हे केवळ पितृभूच वाटते असे नव्हे; तर पुण्यभूही वाटते तो हिंदू. हिंदुत्वाची पहिली दोन लक्षणे राष्ट्र आणि जाती पितृभू शब्दाने व्यक्त होते तर तिसरे लक्षण संस्कृती पुण्यभू शब्दाने व्यक्त होते." सिद्धांत मांडताना शब्दांचा सैल वापर केल्यास अनेक गोंधळ निर्माण होतात. वाटणे आणि असणे यामध्ये प्रचंड अंतर आहे. एखाद्या पारशी धर्मियाला सिंधुस्थान पितृभू/पुण्यभू 'वाटत' असेल तर तो सावरकरांच्या वरील व्याख्येनुसार हिंदू असू शकतो. वास्तवात त्याची/तिची पुण्यभू सिंधुस्थानबाहेर आहे. अशावेळी असणं आणि वाटणं यापैकी नेमका कोणता शब्द ग्राह्य धरायचा? व्याख्या एवढ्या संदिग्ध (ambiguous) असून चालत नाही. एकच शब्द भिन्न भिन्न संकल्पनांसाठी अथवा वेगवेगळे शब्द एकाच संकल्पनेसाठी वापरल्याने अर्थामध्ये नेमकेपणा राहत नाही. सिद्धांत मांडणाऱ्याने तर याविषयी विशेष सावधगिरी बाळगायला हवी. सावरकरांच्या लेखनात अशा अनेक निसरड्या जागा दाखवून देता येतील. मुसलमान स्वतःला एक राष्ट्र मानतात याला प्रतिक्रिया म्हणून उरलेल्यांचं एक राष्ट्र होण्यासाठी ना इतिहास समान होता ना संस्कृती. जैन/बौद्ध/शीख/हिंदू हे धर्म भारतात जन्मले असले तरीही ते स्वतः वेगवेगळ्या प्रवाहांचं प्रतिनिधित्व करत होते. पुन्हा राष्ट्र ही आजची आधुनिक कल्पना प्राचीन भारताला (आर्यराष्ट्र म्हणून) लागू होऊ शकत नव्हती. त्यामुळे सावरकरांच्या 'हिंदू' आणि 'हिंदुत्व' या संकल्पनांचा ऐतिहासिक पायाच कच्चा होता/आहे.
    (क्रमशः)

    • @himanshukale301
      @himanshukale301 4 года назад +2

      तुम्ही अजून पूर्ण सावरकर वाचलेले दिसत नाही.... ज्याला तुम्ही धार्मिक हिंदू म्हणता त्याला मुळात सावरकर वैदिक किंवा सनातनी म्हणायचे .स्वतःच्या अचूक व्याख्येनुसार कसे दिशाभूल होईल...?? सावरकरांनी हिंदूराष्ट्रदर्शन या पुस्तकात हे लिहीलंय..की हिंदू आणि शीख हिंदू जैन हा चूकीचा शब्दप्रयोग टाळा... हिंदू महासभेत कार्यरत असताना ते पंजाब सकट सर्वत्र फिरले शीखही होते महासभेत म्हणजे अर्थात ते हिंदूसंघटक होते सनातनधर्म किंवा वैदिक हिंदूधर्म संघटक नव्हते.... राहिला प्रश्न बाकीच्यांचा तर सावरकरांनी हे हिंदूराष्ट्रदर्शन मध्येच लिहिलंय की उदा. चीनी लोकांची पुण्यभू भारत आहे पण पितृभू नाही म्हणून ते हिंदू नावाला पूर्ण पात्र होत नाही...किंवा तुमच्यानुसार युरोपीय मनुष्य धर्मांतर होऊन हिंदूधर्मात आला तरी त्याची पितृभू हिंदुस्थान नाही त्यामुळे तो वैदिक/सनातन धर्मीय होऊ शकतो पण पूर्ण हिंदू नाही..... यात पूर्ण तर्क आहे मुद्दाम वगळणे नाही...त्यानुसारच अफगाणीस्तान मध्ये अफगाणी तसेच हिंदुस्थान मध्ये "हिंदू" ना की सनातनी किंवा वैदिक.....

    • @rajpalvimalbaibapusaheb9988
      @rajpalvimalbaibapusaheb9988 4 года назад +1

      @@himanshukale301
      हिमांशूजी,
      १.सावरकरांनी हिंदू लोकांची व्याख्या केली आहे, धर्माची नव्हे हे मत मान्य केलं तरीही सावरकरांमुळे हिंदू धर्माबाबत जो गोंधळ निर्माण झाला तो अद्याप कायम आहे. सावरकरांच्या व्याख्येनुसार वैदिकांना (सनातन धर्माला) हिंदूच्या व्याख्येत समाविष्ट करता येणार नाही. कारण आसिंधुसिंधुपर्यंता या निकषानुसार अफगाणिस्तान देश 'हिंदू'च्या कक्षेबाहेर जातो आणि वैदिक धर्माची जन्मभूमी (पुण्यभू) दक्षिण अफगाणिस्तान आहे.
      २.सावरकरांनी हिंदू ही संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी वैदिक धर्म आणि संस्कृतीचा आधार घेतला आहे. वैदिकांच्या संकल्पना वापरून हिंदूंची मांडणी करणे म्हणजे कुराणाच्या साहाय्याने हिंदूंचा इतिहास मांडण्यासारखं आहे. त्यामुळे हिंदू आणि हिंदुत्वाविषयीची मांडणी स्वातंत्र्यपूर्व काळासाठीसुद्धा गैरलागू होती.
      ३.प्रा. मोरेंनीच आपल्या मुलाखतीत म्हटलंय की, सावरकरांच्या हिंदू संकल्पनेचे औचित्य आता संपले आहे. आता त्या व्याख्येऐवजी दुसरी व्याख्या बनवायला हवी. वैदिक आणि हिंदू हे एकच धर्म नाहीत तर वेगवेगळे धर्म आहेत. ही बाब सावरकरांनी ध्यानात घेतलेली नाही त्यामुळे त्यांचं धर्म/संस्कृती/जात इ. विषयीचं आकलन चुकलेलं आहे. हिंदू धर्मातील धर्मांतराचा मुद्दा जातिव्यवस्थेमुळे अतिशय गुंतागुंतीचा बनतो.
      ४.हिंदू ही प्रादेशिक/भौगोलिक संकल्पना नाही तर धार्मिक संकल्पना आहे आणि हे सावरकरांनादेखील ठाऊक होतं म्हणून तर 'हिंदुत्व' पुस्तकात हिंदुत्व हे हिंदू धर्माहून निराळं आहे हे त्यांना स्पष्ट करावं लागलंय. हिंदू या धार्मिक संज्ञेऐवजी त्यांनी एखादी धर्मबाह्य संज्ञा वापरावयास हवी होती. हिंदू संकल्पनेविषयी एवढा गोंधळ निर्माण झालाच नसता.
      Have a great time!

    • @himanshukale301
      @himanshukale301 4 года назад +1

      @@rajpalvimalbaibapusaheb9988 तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी समजतंय का😂😂😂 वैदिक म्हणजेच आज आपण ज्याला हिंदूधर्म म्हणतो तोच सनातन धर्म .वैदिक असा वेगळा धर्म कुठून निर्माण केलात ...वैदिक म्हणजे वेद पुरेपूर मानणारे. सावरकरांनी बंधन नाही घातलंय कुठेही...सिंधू नदी पासून याचा अर्थ असं नाही होत की सिंधू नदीच्या पलिकडच्या काठाचा आसपासचा मुलूख वगळला पाहिजे😂. अर्थात अफगाणीस्तान, सिंधूनदी,पेशावर असा मुलूख साधारण मानववस्ती होती आणि हिंदुत्व ग्रंथात सांगितल्या प्रमाणे सिंधू वरून हिंदू नाव आले....नंतर भारतीय संस्कृती,आध्यात्म, यालाही हिंदूधर्म नाव पडले आणि हिंदुत्व हे एकीकरण आहे हे पहिले लक्षात घेतले पाहिजे...अनेक भारतीय धर्मीय व बाठलेले हिंदू हे सर्व हिंदुत्वाच्या नात्याने एक यायला पाहिजे....एकदा सावरकरांना एकाने प्रश्न विचारला की आपलं अंतिम ध्येय काय आहे त्यावर तात्याराव उत्तरले जसे हिंदूस्थानात हिंदू तसेच प्रत्येक देशातून सर्व लोक एकत्र आले की अंतिम मानवता राष्ट्र निर्माण करायचे .....पण हे ही त्यांनी सांगीतले आहे ते विसरून चालणार नाही की जो पर्यंत अहिंदू हे माणूसकी हाच एक धर्म मानत नाही तो पर्यंत हिदूंनी हि तसे करण्याचा भोळाभाबडा पणा करू नये.....

    • @rajpalvimalbaibapusaheb9988
      @rajpalvimalbaibapusaheb9988 4 года назад +1

      @@himanshukale301
      हिमांशूजी,
      हिंदू संकल्पनेत सिंधू नदीच्या पश्चिम तीरापलिकडे असलेल्या भागाचा समावेश होतो, हे मलाही माहिती आहे. माझं म्हणणं हे आहे की, त्यात अफगाणिस्तानचा समावेश होऊ शकणार नाही कारण १९१९ साली अफगाणिस्तान ब्रिटिश भारतापासून स्वतंत्र झाला होता. तो काही अखंड भारताचा भाग नव्हता. सावरकरांनी हिंदुत्वाची संकल्पना १९२३ साली मांडली होती. आता बंधन घातलं नव्हतं म्हणजे सिंधू नदीच्या पश्चिमेकडील पार इराण इराक सिरीयापर्यंतचा भाग अखंड भारताचा हिस्सा मानायचा काय? सावरकर सार्वभौम आणि स्वतंत्र देशाला भारताचा हिस्सा मानत होते का? मानत असतील तसा स्पष्ट उल्लेख का केला नाही? सावरकर खरोखर अफगाणिस्तानला अखंड भारताचा भाग मानत असतील तर मग त्यांची हिंदुत्वाविषयक मांडणी वास्तववादी नाही, असं म्हणावं लागेल. अखंड भारत म्हणजे ब्रिटिशांनी एकत्र केलेला भारत. याच भारताची १९४७ साली फाळणी झाली. यात ५६५ संस्थानेदेखील नव्हते.
      २.हिंदू आणि वैदिक हे दोन वेगवेगळे धर्म आहेत. हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान तांत्रिक विधी, सुफलनता आणि कृषी संस्कृतीतून निर्माण झालं आहे तर वैदिक धर्माचं तत्त्वज्ञान भटक्या पशुपालन करणाऱ्यांच्या संस्कृतीतून निर्माण झाले आहे. हिंदू धर्माचं पूर्वीचं नाव शैव/आगमिक धर्म असं होतं तर वैदिक धर्माला यज्ञधर्म/सनातन धर्म या नावांनीही ओळखतात. विस्तृत अभ्यासासाठी खालील ग्रंथ वाचा.
      १.हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास-संजय सोनवणी
      २.मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती-डॉ. सुधाकर देशमुख
      ३.Insight into hinduism-R. N. Dandekar
      ४.प्राज्ञप्रबोध-श्री. मा. भावे
      ५.Origines of vedic religion & Indus ghaggar civilization-Sanjay Sonawani
      ६.History of tantrik religion-N. N. Bhattacharya
      हिंदू आणि वैदिक धर्माला एक मानण्यामुळे सावरकर आणि इतरांचं जातिव्यवस्थेच्या प्रश्नाचं आकलन चुकलं. भारताचा इतिहास वेदकाळापासून नव्हे तर त्याही पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्कृतीपासून सुरू होतो.
      ३.सावरकरांच्या हेतूंबद्दल मी शंका घेत नाहीये. सावरकरांची माहिती आणि दिशा चुकलेली होती, एवढाच माझा मुद्दा आहे. मी जे काय लिहिलंय ते पूर्ण शुद्धीनिशी आणि समजून-उमजून लिहिलंय. वरील पुस्तकातील मांडणीचं सप्रमाण खंडन करून दाखवा आणि माझी हवी तितकी टर उडवा.
      चर्चा केल्याबद्दल धन्यवाद!

    • @himanshukale301
      @himanshukale301 4 года назад +1

      @@rajpalvimalbaibapusaheb9988 चुकलं ?? 😂काहीही चुकलेलं नाहीये.....मुळात धर्माचा संबंधच नाहीये इथे..... अखंड भारतात काही थोडा अफगाणही होता आणि जरी नसेल तरी सिंधू नदी अखंड हिंदुस्थानातच होती.... त्यामुळे हे धर्म वगैरे बंधन पडायचा आधीपासून हिंदुत्व हा इतिहास आहे......

  • @sachindeshpande1
    @sachindeshpande1 4 года назад +3

    अजुन पुढचे ४०० वर्षे आपल्याला सावरकर समजणार नाहित.
    एकदम १०० टक्के पटण्यासारखे आहे.

  • @ajaykunte9504
    @ajaykunte9504 Год назад

    Are bap re bjp Ani hindu wadi sanghtane mule .... savakaranache kiti chukiche chitra tayar jhale ahe ..

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 3 года назад

    Savarkarjis 1 mistake . We can understand that upto 1910 savarkarji misunderstood 1857 as 1st war of Independence when in reality it was Jihad to bring back the Moghul rule. But later in his life when he must have understood his mistake then why did he never apologise for misunderstanding the 1857 war & misguiding the revolutionary.

  • @RRDARGAD
    @RRDARGAD 10 месяцев назад

    Speaker defines Buddhiwaad as questioning religion; thus Marx becomes most Buddhiwaadi! Einstein was also Buddhiwaadi. However he believed in Spinoza's God, not in Bible's god. No doubt, Savarkar was a Buddhiwaadi (rationalist) but slipped at times due to his obsession with Hinduism. He set a separate temple for Dalits instead of asking for admitting them in all Hindu temples. Temple was named Patit-Pawan, implying that the devotees to it are the Patit who will become Pawan by worship at this temple. This was not rationalism.

  • @yogeshbelsare7474
    @yogeshbelsare7474 5 лет назад +5

    बहुसंख्य मराठी माणूस हा नेहमीच सावरकरांना आदर्श महापुरुष मानत आला आहे तो नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा कायम राहिला आहे हे भाषण हिंदीत करता आले तर सावरकर त्यांनाही चांगल्या पद्धतीने कळतील काही लोकांना ते कधीच कळू शकत नाही सावरकर समजायला एकतर त्या पातळीची बुद्धिमत्ता हवी किवा ती नसेलतर निष्ठा हवी सावरकरांना भारतरत्न नको त्याच्यामुळे कितीतरी भारतरत्न झाले आहेत

  • @MuktChintan
    @MuktChintan 5 лет назад +2

    व्वा, वैचारिक

  • @rahulkeney5354
    @rahulkeney5354 5 лет назад +1

    धर्म क्रमांक 4 विज्ञानाने सिद्ध केला आहे का?

    • @sachindeshpande1
      @sachindeshpande1 4 года назад +3

      एक मेकांशी कसे वागावे हे विज्ञानाने सिद्ध कसे करणार. तुम्हाला सावरकर पटणार नाहित.

  • @rajpalvimalbaibapusaheb9988
    @rajpalvimalbaibapusaheb9988 5 лет назад +5

    (भाग १)
    सर्व भागातील प्रतिसाद वाचताना दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात.
    १.प्रस्तुत विवेचन समग्र सावरकर वाङ्मयाची चिकित्सा नसून सावरकरांच्या प्रमुख विचारसूत्रांची आणि प्रा. शेषराव मोरेंनी दिलेल्या व्याख्यानाची/त्यांनी इतर ठिकाणी मांडलेल्या भूमिकेची चिकित्सा आहे.
    २.विवेचनाचा हेतू कुणाचीही बदनामी करणे/कमी लेखणे असा नसून मतभेद व्यक्त करणे, हा आहे.
    हिंदू असणं म्हणजे काय त्याचे निकष सांगताना सावरकर प्रदेश, जात (एका रक्ताने जोडणं) आणि संस्कृती नुसार हिंदू एक ठरतात, असं मत मांडतात. राम/कृष्ण/महावीर आपलेच आहेत, आपला इतिहास एकच आहे अशी विधानं त्यांनी केली आहेत. आता ज्ञात कोणत्याही मानवी समूहाचा एकच एक इतिहास असू शकत नाही. एकाच ऐतिहासिक व्यक्तीविषयी सर्वांना सारखाच अभिमान/आदर वाटेल असंही नाही. एकरक्ती असणं म्हणजे बंधू असणं असा अर्थ जरी घेतला तरी इतिहासकालीन राज्यांमधील एकमेकांविषयीच्या बेफिकिरीमुळे बंधुत्वाची भावना निर्माण होऊ शकली नाही. 53:27 मिनिटाला हिंदू कधीच एक नव्हते, असं प्रा. मोरे स्वतःच म्हणत आहेत. भारतीय संविधान कसे बनले याविषयी भाषण देताना ते म्हणतात की, हिंदू एकसंध होते म्हणून भारताची घटना एकसंध बनली. लोकप्रवर्तित धर्मात प्रदेशनिहाय इतके वैविध्य असते की त्यात गाभ्यातील तत्त्वज्ञान वगळता एकसंधपणा/एकसुरीपणा असत नाही. वेगवेगळे पंथ, त्यांच्या अभिमानाचे बिंदू, वंद्य पुरूष हे सारेच भिन्न असते आणि त्याबाबतीत स्वातंत्र्यही असते. पुन्हा हिंदूंवर ओढवलेले आर्थिक अरिष्ट व त्याचे परिणाम, वैदिकांनी हिंदू धर्मात केलेली घुसखोरी या घटनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूविषयक इतिहासाचं आकलनच चुकलं. या चुकीच्या आकलनावरच सावरकरांनी इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो इतिहास वास्तव नसून चुकीचा आहे. या चुकीच्या इतिहासातून निर्माण झालेल्या चुकीच्या समजुतीतून अद्याप आपण बाहेर यायला तयार नाही.
    (क्रमशः)

    • @ChavraSuarez
      @ChavraSuarez 5 лет назад

      ruclips.net/video/b_VMDfxuzqQ/видео.html

    • @rajpalvimalbaibapusaheb9988
      @rajpalvimalbaibapusaheb9988 5 лет назад +1

      @@ChavraSuarez
      आपण निर्देशित केलेला ध्वनीचित्रमुद्रित भाग (video) माझ्या अत्यंत आवडत्या व्हिडीओजपैकी एक आहे. त्यातील तर्कशुद्ध मांडणीशी मी पूर्णपणे सहमत आहे. पण सावरकरांची हिंदू धर्माविषयीची मांडणी आणि हिंदुत्व अत्यंत गोंधळग्रस्त आहे. सावरकर आणि त्यांचे अनुयायी हिंदू, हिंदूराष्ट्र, हिंदुत्व याबाबतीत मांडणी करताना दिग्भ्रमित आणि शब्दच्छल करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करत नाहीत. सावरकर 'हिंदू' हा शब्द राष्ट्रासंबंधी प्रादेशिक अर्थाने घेतात तर हिंदूंचं संघटन करतेवेळी धार्मिक अर्थाने घेतात. यात सरळसरळ वैचारिक अप्रामाणिकपणा आहे. सावरकरांच्या लिखाणात ऐतिहासिकता, वस्तूनिष्ठपणा, अकादमिक शिस्त याऐवजी पूर्वग्रहदूषितपणा, व्यक्तीनिष्ठता, भावनिकता अधिक डोकावते. सावरकरांचे हिंदुत्व, सहा सोनेरी पाने, १८५७चे स्वातंत्र्यसमर हे ग्रंथ त्यासाठीचा पुरावा आहे. मी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाचं वरील व्हिडीओ (आपण निर्देशित केलेला व्हिडीओ) खंडन करत नाही. खरं तर आपण पाठवलेल्या व्हिडिओबाबत आपलं मत व उद्देश आणि मी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा काय आणि कितपत संबंध आहे, हे सर्वप्रथम आपण स्पष्ट करायला हवे.

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 5 лет назад +4

      भाऊ प्रश्न पडणे खूप वाचन करणे ही एक खूप चांगली आणि जीवंतपणाची निशाणी आहे पण त्याचबरोबर अतिविचार हाच अविचाराकडे पण नेऊ शकतो त्यामुळे महापुरुषांच्या चरित्रातून कामाची प्रेरणा घेऊन लगेच कुठल्याही एका सामाजिक, विधायक कामात जोडले जाणे महत्वाचे असते, शब्द/ संज्ञा/ आणि प्रश्नांमध्येच जर मन रमले तर कृती करण्याची ऊर्जा आणि वेळ दोन्ही निघून गेलेली असते. सगळ्या ईझम पेक्षा activism हाच मोठा असतो, कर्म ही धर्म हैं! भाऊ लवकरच Join RSS चा फॉर्म भर ऑनलाइन. शुभेच्छा!
      अमेय 9921229083

    • @rajpalvimalbaibapusaheb9988
      @rajpalvimalbaibapusaheb9988 5 лет назад +1

      @@ameyshirolkar5468
      कोणत्याही कृतीला विचारांचा पाया असतो आणि विचार तथ्य, तर्क आणि व्यवहार्यता या निकषांवर आधारित हवा. प्रा. शेषराव मोरेंनी आपलं जीवन इतिहास संशोधन आणि जनप्रबोधन यासाठी वाहून घेतले आहे. या कार्यालादेखील सामाजिक तसेच विधायक कार्य म्हणतात. भारतीय समाजाचं स्वतःच्याच प्रश्नांचं आकलन दोषपूर्ण आहे त्यामुळेच विधायक मार्ग अजूनही सापडत नाहीये. उदा.. जातिव्यवस्थेची निर्मिती, हिंदू आणि वैदिक या दोन धर्मांना एक मानल्याने निर्माण झालेले सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न इ. अशावेळी संशोधन, चिकित्सा या मार्गांचा अवलंब करणे म्हणजे केवळ विचारांमध्ये रमणे नसते तर तेदेखील विधायक कार्यच असते. मूळात विधायक कार्य म्हणजे ज्या कार्याचा हेतू प्रामाणिक आहे, त्याला सत्य व विवेकी विचारांचे अधिष्ठान आहे, सर्वांचे हित ज्यात सामावले आहे, ते विधायक कार्य होय. बौद्धिक कार्य, ऐतिहासिक आणि इतर क्षेत्रातील संशोधन हेदेखील कर्मच आहे, activism आहे. महापुरूषांच्या विचारांची चिकित्सा न करता त्यांचे देव्हारे बनविण्यात धन्यता मानणारा आपला देश आहे. चिकित्सा करताच जेथे अनेकांच्या भावना दुखावतात अशा समाजात ना विचारस्वातंत्र्य असते ना नवनिर्मितीची ऊर्जा.
      प्रतिक्रिया आणि सदिच्छांबद्दल धन्यवाद!

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 5 лет назад +2

      जगातील सर्वात जुन्या संस्कृतीत आणि असंख्य महापुरुषांच्या कर्मभूमीत 21 व्या शतकात एका विचारी आणि अभ्यासू तरुणाला एकही विधायक पर्याय सापडू नये हे म्हणणे धाडसी आणि दुर्दैवीपण आहे. संशोधन तर जीवनाचा अविभाज्य भागच आहे फक्त ते करताना आपण laws, principles, theroms लाच जर पुन्हा पुन्हा hypothesis मानून चिकित्सा करत राहिलो तर ते आपलाच म्हणजेच एका भारतीय तरुणाचा पण वेळ आणि ऊर्जा गुंतवून ठेवते. या सर्व चिकित्सा आणि विचार पू डॉ हेडगेवारांनी यापूर्वीच करून देशप्रेमी चारित्र्य संपन्न व्यक्ती घडविण्यासाठी रा स्व संघाचे शाखातंत्र जे सर्वेषाम अविरोधेन (कोणाचाही विरोध न करणारे) आहे आपल्या समोर ठेवले आहे, आणि जे मागील चार पिढ्यांनी time tested केले आहे, ही गोष्ट फक्त अनुभवून यातील एका आयामाचा भाग बनुनच समजून घेता येईल. त्या नंतरच कुठल्या गोष्टी अजूनही चिकित्सा करण्यासाठी शिल्लक आहेत यांचा प्राधान्यक्रम ठरविणे योग्य होईल. जे काम सकारात्मक आहे ते संघकामच आहे पण अशी सर्व चांगली कामे (अभ्यास, विचार, संशोधने) आणि सज्जन शक्ती जोपर्यंत एका धाग्याने इतरांशी जोडली जात नाही तोपर्यंत ती परिपूर्णपण होत नाही. कळावे. धन्यवाद, शुभेच्छा!

  • @jayramsawant7778
    @jayramsawant7778 Год назад

    Sawerkarakutumbaawadedeshasatibalidandelenai

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 2 года назад

    संपूर्ण बकवास.

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 4 года назад

    🤣🤣🤣🤣🤣

  • @parivartan7959
    @parivartan7959 5 лет назад

    मग नेमकं फाळणी गांधींनी केली की सावरकरांनी

    • @94211884
      @94211884 5 лет назад +2

      गांधीनी

    • @sagarshinde6858
      @sagarshinde6858 5 лет назад +2

      इस्लाम

    • @mukeshchavan3923
      @mukeshchavan3923 5 лет назад

      ruclips.net/video/h83bWkDeSNc/видео.html

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 5 лет назад +6

      ......दोघांनीही नाही, confuse, आळशी, भित्र्या, असंघटित, बेशिस्त काफरांनी (हिंदूंनी) ती करवून घेतली....

    • @gauravparadkar4564
      @gauravparadkar4564 5 лет назад +1

      Jinnah

  • @Anshul.Sharma.983
    @Anshul.Sharma.983 4 года назад

    काय मूर्ख माणूस आहे....