शेवगा शेतीत शेवग्याला नेहमी चांगला बाजारभाव मिळेल, असे काम करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • शेवग्याच्या शेंगाला दररोज चांगला बाजारभाव मिळावा असे प्रत्येकाला वाटते पण तसे होत नाही, चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी काय करावे हे मी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे, प्रत्येक व्हिडीओमध्ये माझे अनुभव व ज्ञान देण्याचा प्रयत्न असतो, हाही व्हिडीओ तसाच आहे, हा व्हिडीओ सर्व शेवगा शेतकरी बांधवांना लाखमोलाचा ठरेल याची मला पूर्ण खात्री आहे,
    मला खात्री आहे आपणास माझं काम आवडलं असेल, मी शेती करत असताना दररोज नवनवे प्रयोग करतो व त्याचे रिझल्ट चांगले मिळाले नंतर आपल्या समोर घेऊन येतो, शेवगा शेती सोपी आहे याची मी आपणास खात्री देतो, वसंत शेवगा शेती करत असताना आपणास लागवडीपासून उत्पादन काळात पूर्ण मोफत मार्गदर्शन मिळेल, माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला उत्पादन किती याबाबत नक्कीच शंका नसावी, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी अशी वसंत शेवगा शेती आहे, शेवगा शेतीसाठी आपण आता योग्य ठिकाणी आलात व त्यास मी पूर्ण पात्र राहील याची देखील खात्री देतो धन्यवाद !
    वसंत शेवगा शेती
    संजय गायकवाड
    मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
    मो. नं. - ९२८४२६६०११
    Maharashtra 415306
    maps.app.goo.g...
    १) "वसंत शेवगा बियाणे"
    • Shevga biyane / शेवगा ...
    नैसर्गिक शेवगा बियाणे !
    निरोगी झाडावर निवड पद्धतीने विकसित केलेले वसंत शेवगा बियाणे !
    मध्यम लांब शेंग !
    हिरवीगार शेंग व सर्वाधिक चकाकी !
    मोफत मार्गदर्शन !
    यशस्वी शेवगा शेती !
    उत्तम संघटन !
    वसंत शेवगा शेती
    शेवगा बियाणे
    वाण : वसंत
    किंमत :
    २५०० रू किलो, 1kg (दोन एकर)
    १२५० रू अर्धा किलो 500gm(१एकर)
    ७०० रू पाव किलो 250gm(अर्धा एकर)
    सोबत खालील सर्व सुविधा मोफत
    कुरिअर सेवा (संपूर्ण भारतात)
    माहिती पुस्तक (शेवगा शेती एक वरदान)
    ट्रायकोडर्मा (बीजप्रक्रिया करणेस)
    मार्गदर्शन (पूर्णवेळ लागवड ते उत्पादन)
    २) "नवीन शेवगा लागवड"
    • नवीन शेवगा लागवड,
    नवीन शेवगा लागवड केली, इतर पिकांच्या तुलनेत शेवगा लागवड फार सोपी, कमी खर्चाची तसेच सहज व चांगले उत्पादन देणारी असते,
    ३) "नोव्हेंबरमध्ये उत्पादन घेण्यासाठी छाटणी, नवीन हंगामाची तयारी"
    • शेवगा छाटणी, नोव्हेंबर...
    नोव्हेंबरच्या शेवटी उत्पादन घेण्यासाठी ऑगस्टच्या शेवटी खरड छाटणी घ्यावी, सप्टेंबरमध्ये पंजा छाटणी व सप्टेंबरच्या शेवटी हलकी छाटणी करावी जेणेकरून पावसाळी दिड महिना हा वाढीसाठी योग्य राहील व पाऊस थांबला की बहार अवस्था सुरू होईल म्हणजे तेजीमध्ये किमान दोन महिने चांगला बाजारभाव मिळेल
    ४) "शेवगा छाटणीनंतर पाच आठवड्याची स्थिती"
    • शेवगा छाटणीनंतर पाच आठ...
    खरड छाटणीनंतर दिड महिना वाढीची अवस्था असते, त्यानंतर बहार अवस्था सुरू होते,
    ५) "शेवगा शेंगा तोडणीची लगबग सुरू"
    • शेवगा शेंगा तोडणीची लग...
    शेवगा शेंगा तोडणी म्हटले की खूप तयारी करावी लागते, पूर्वतयारी चांगली केली तर वेळ आणि पैशाची बचत होते, शिवाय तोडणी सोपी होते
    ६) "शेवगा शेतकरी ते थेट ग्राहक विक्री"
    • शेवगा, शेतकरी ते थेट ग...
    वर्षातून एकदा उन्हाळी दोन महिने शेवगा बाजारभाव कमी राहतात व आपले उत्पादन दरम्यान चांगले येते पण फार चांगले पैसे बनत नाहीत मग आपण उत्पादन किमान सहा महिने टिकवून ठेवले तर चांगले पैसे होतात मात्र बदलते वातावरण पाहिले तर अवघड आहे तरीही मी या वर्षी मागील अडीच महिन्यापासून दररोज उत्पादन घेतले आहे व पुढील पाच महिने घेणार आहे, इथून पुढच्या काळात "शेतकरी ते थेट ग्राहक विक्री" सुरू केली आहे, यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल व ग्राहकांना स्वस्त शेंगा मिळतील
    ७) "सदाबहार वसंत बहार"
    • सदाबहार ! वसंत शेवगा ब...
    शेवगा शेती करत असताना बहार अवस्था हा सर्वात महत्वाचा काळ असतो, योग्य वेळी बहार सुरू होणे व फुलगळ न होऊ देता अधिक उत्पादन तयार करणे फार महत्वाचे आहे, या व्हिडीओ मध्ये शब्दांकित माहिती दिली आहे
    ८) "शेवगा शेती म्हणजे मधमाशीसाठी मधुबन"
    • शेवगा बहार आणि मधमाशी
    मधमाशी ही मित्रकीटक आहे, मधमाशीशिवाय उत्पादन अवघड आहे, शेवगा शेतीसुद्धा अपवाद नाही, मधमाशीसाठी आपली शेती 'मधूबन'कशी बनवावी हे सांगणारा एक छोटा प्रयत्न !
    ९) "शेवगा शेती आंतरपीक कोथिंबीर"
    • शेवगा शेती आंतरपीक कोथ...
    शेवगा शेती म्हटले की संपूर्ण रान सावलीने झाकून येते त्यामुळे आंतरपीक म्हणून उन्हाळी कोथिंबीर लागवड करून आपण चांगले पैसे मिळवू शकतो, उन्हाळी कोथिंबीर म्हटले की जास्त उन्हामुळे येत नाही मात्र शेवगा शेती मध्ये नैसर्गिक झाडांची सावली तयार असते त्यामुळे कोथिंबीर लागवड शक्य आहे शिवाय उन्हाळ्यात कोथिंबीरचे दर तेजीत असतात आणि कोथिंबीर लागवडीमुळे शेवगा पिकांची वाढ व उत्पादन देखील चांगले मिळते, संपूर्ण रानातून मुळांना अन्न मिळते, मी मागील चार वर्षांपासून कोथिंबीर लागवड करतो व चांगले उत्पादन देखील घेतो आहे,
    १०) "एकरी तीस टन उत्पादन"
    • शेवगा शेती, एकरी ३० टन...
    सर्वाधिक उत्पादन घेताना चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते, चांगले व अधिक उत्पादन अगदी सहज शक्य आहे, कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणजेच वसंत शेवगा शेती,
    ११) "शेवगा लागवड ते उत्पादन केलेला प्रवास"
    • शेवगा लागवड ते उत्पादन...
    शेवगा शेती करताना राणाची मेहनत, ठिबक सिंचन, लागवड पद्धत, शेंडा खुडणी, खत नियोजन, किड नियंत्रण, आंतरपीक, बेड पद्धत अशी सर्व माहिती या व्हिडीओ द्वारे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे
    १२) "रात्री पाहिलेली शेवगा शेती"
    • रात्री पाहिलेली शेवगा ...
    आपण शेतकरी शेतीचं बरीचशी काम दिवसा करतो, मग ती खतनियोजन, पाणीनियोजन, शेंडा खुडणे, फवारणी, खुरपणी वगैरे वगैरे, आणि रात्री लाईट असेल तर पाणी सुरू करून घरी थांबतो मात्र आपण कष्ट करून उभं केलेलं पीक रात्री कधी पहिलंय का ? नाही ना मग हा व्हिडिओ पहा एक सर्वोत्तम शेवगा शेतीचे दर्शन होईल व हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होईल ! ही नुसती चित्रफीत नसून बरेच काही लेखणीतुन देत आहे,

Комментарии • 12

  • @महिलाशेवगाशेती

    शेवगा शेतीतील बारकावे जे कोणी सांगत नाही ते फक्त इथे सांगितले जातात, आपले खूप खूप आभारी आहे, अजून कोणता विषय घेऊन येणार याची नेहमीच उत्सुकता असते

  • @vaishalijagtap5736
    @vaishalijagtap5736 Год назад +2

    खूपच उपयोगी माहिती share केली आहे मार्केटंगसाठी कसा पाठवायचा आणि आपलं केलेले वजन आणि पत्तीवरील वजन कमी येते का

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  Год назад

      हो वजनामध्ये तूट येते, म्हणून 200 ग्रॅम वजन जास्त असावे व नंतर गोणी भिजवावी, असे केल्यास वजनात तूट येत नाही

  • @savanthv9891
    @savanthv9891 2 года назад +2

    Very good job. Good Information thank you. God bless u & your family

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद सर, तुमचे अभिप्राय मला अजून चांगले काम करण्याची व ते लवकर तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी प्रोसाहन देतात

    • @dineshsurvase4458
      @dineshsurvase4458 2 года назад +1

      छान माहिती मिळाली

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +1

      @@dineshsurvase4458 धन्यवाद

    • @suhaspatil3357
      @suhaspatil3357 2 года назад +1

      पाणी फाउंडेशन च्या गट शेती प्रशिक्षणास तुमचे अनुभव शेतकऱ्यानं फार मोलाचे आहेत नक्की या प्रशिक्षण सुरू आहे

    • @Vasant_Shevga_Sheti_
      @Vasant_Shevga_Sheti_  2 года назад +2

      @@suhaspatil3357 धन्यवाद, येतो सर

  • @avinashkuklare5916
    @avinashkuklare5916 2 года назад +2

    Sar biyane bhetel ka