या आंधळ्या कारभारामागे नेमके कारण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 фев 2024
  • चित्रपट-मालिकांमधून शिवरायांची- शंभूराजांची भूमिका करणारे नट एक मोठी आणि गंभीर चूक करीत आहेत. यामुळे शिवशंभूंचे चुकीचे रुप सर्व इतिहासप्रेमींमधे, शिवरायभक्तांमधे प्रचलित होते आहे.हे आंधळे अनुकरण अजून किती काळ पाहायचे?
    एखाद्या शालेय विद्यार्थ्यालासुध्दा सहज कळेल अशी ही चूक कोणती? यामुळे शिवराय आणि शंभूराजांचे मूळ अस्सल रुप कसे विद्रूप होऊन बिघडवले जात आहे? शिवराय आणि शंभूराजांचे खरे रुप कसे आहे?
    सादर आहे आपल्या जिव्हाळ्याचा, महत्वाचा पण अजूनही दुर्लक्षित राहिलेला विषय!शिवरायांच्या अस्सल रूपाची विद्रूप नक्कल करणारे झिपरे नट. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #Shivray #Shambhuraje #OriginalPortraits

Комментарии • 560

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment 4 месяца назад +50

    सर मी या गोष्टी कडे लक्ष दिले होते .तेव्हा कमेंट केली होती पण मला लोकांनी खूप ट्रोल केले होते .तुम्ही हा विषय मांडला .खूप खूप धन्यवाद सर.

  • @eyeblinkshotphotographyand2090
    @eyeblinkshotphotographyand2090 4 месяца назад +41

    Fakt hiroch nahi. मुले पण दाढी ani चंद्रकोर लाऊन स्वतःला शिवरायांचे भक्त समजतात, पण विचार मात्र ek सुधा शिवरायां सारखे नाहीत. दिसण्याचे अनुकरण करतात,विचारांचे नाही.

    • @Bhumi_gamer976
      @Bhumi_gamer976 4 месяца назад

      तुझ्या घरचे खातात का

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 4 месяца назад +49

    सर आपला शिवरायांचा व शंभू राजांच्या संपूर्ण पुऱ्याव्यानिशी माहिती व मांडनी खुप सुंदर असते अशिच आम्हाला इतीहासा विषई माहिती देत जावे ही नंब्र पुर्वक विनंती धन्यवाद सर

  • @bpcsmkj
    @bpcsmkj 4 месяца назад +170

    अगदी बरोबर आहे सर, मला कधीही शिवकाळत असल्याचा अनुभव चित्रपट बघितल्यानी कधीच मिळाला नाही, तो अनुभव मिळतो तो खरा इतिहास वाचून आणि शिवराय व शंभूराजे ह्यांचे सूत्र खऱ्या रूपाने, खऱ्या अर्थाने आत्महसात करूनच, त्यांच्या गडकोटांना भेट देऊन, असच आपल्या बहुजन समाजात जागृती केल्याचं मनापासून धन्यवाद सर, जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म🚩🙏

    • @user-pq4ep3zd3j
      @user-pq4ep3zd3j 4 месяца назад +5

      Sanatan hindu dharm

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d 4 месяца назад

      ​@@user-pq4ep3zd3j ghal tuzya ...chyat😂😂

    • @ashu1854
      @ashu1854 4 месяца назад +4

      एस धम्मो सानंतनो ❤

    • @DattaramMiruke
      @DattaramMiruke 4 месяца назад +3

      RSS and Cobra Brahmins' doing

    • @spsarolkar
      @spsarolkar 4 месяца назад +3

      Namo buddhay

  • @knowledge-4-u
    @knowledge-4-u 4 месяца назад +20

    सगळ्यात विद्रूप तो अमोल कोल्हे दिसतो आणी आहे पण , तो शिवरायांची भूमिका करता करता स्वताला महाराज समजायला लागलाय !

    • @djinnn4038
      @djinnn4038 4 месяца назад +4

      To hindu virodhi ahe mhanun avhad sarkhya lokan barobar Jain basla ahe

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 4 месяца назад +4

      अगदी बरोबर

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 4 месяца назад +25

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मला आवडलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत आणि सूर्यकांत मांढरे!

    • @sangeetaghaisas3186
      @sangeetaghaisas3186 4 месяца назад +3

      Well said...100 % right u are...
      Shri चंद्रकांत यांच्याशिवाय आम्हाला शिवराय म्हणुन कोणीच आवडले nahi इतक्या वर्षांत

    • @sanketmate4571
      @sanketmate4571 4 месяца назад +1

      1000% khare Aahe baki sagale bakwas WA nakli

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 4 месяца назад +51

    खूप महत्त्वाचा विषय स्पष्टपणे पुराव्यानिशी व परखड शब्दात मांडल्याबद्दल आपले खूप आभार प्रवीण सर.. जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 4 месяца назад +3

      *_"" छत्रपती शिवाजी महाराज ""_** यांचा विजय असो.*
      *_" छत्रपती संभाजी महाराज "_** यांचा विजय असो.*
      *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

    • @sandeepdeshmukh9818
      @sandeepdeshmukh9818 4 месяца назад

      Ha Manus Marathi Hitihas damage karat ahe .. frtek video planning ne kela ahe .. ha Chatrapati Shivaji Maharaj n che apaman karat ahe ...

    • @sanskarmore8937
      @sanskarmore8937 4 месяца назад

      Kasa kela apman​@@sandeepdeshmukh9818

  • @digambarsutah
    @digambarsutah 4 месяца назад +54

    व्वाsss. फार छान.
    बर झाल एका ज्वलंत प्रश्नाला तोंड फोडले.
    मी माझ्या सर्व मित्राना कळविले आहे कमअस्सल आणि नकली रूपातील महाराज किंवा शंभू महाराज ह्यांचे चित्रपट /मालिका बघू नका.
    माझ्या सर्व ग्रुपवर समाईक केले.आजची आपली भाषा जी पोटतिडीकेतून निघाली, त्या अस्सल पणाला प्रणाम

    • @Shivangi-jx8ko
      @Shivangi-jx8ko 4 месяца назад +1

      mg tyancha itihas kasa kalnar ?? vachat basayla tr time nahi , chatrapati sambhaji maharajancha itihas ha serial mulech jast janana mahit zala

    • @adnyapatil442
      @adnyapatil442 4 месяца назад

      ​@@Shivangi-jx8ko वाचत बसायला वेळ नाही म्हणून तर हे दुखणं आहे, स्वतः वाचलं तर मालिकेतील सिनेमॅटिक लिबर्टी मधून होणारी फसवणूक होणार च नाही

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 4 месяца назад

      हा खुप मोठा ज्वलंत प्रश्न आहे, इतिहासात जगनार्या औलादी 😂😂😂😂😂

  • @MangeshMane-yk5lx
    @MangeshMane-yk5lx 4 месяца назад +59

    शिवाजी महाराजांवर आधारीत आशा प्रकारच्या बिनबुडाचे चित्रपट आणि मालिकांचा बहिष्कार करावा . तरच चित्रपट निर्मात्यांची डोके जागेवर येईल.

    • @sandeepdeshmukh9818
      @sandeepdeshmukh9818 4 месяца назад +1

      Are Raja yache Video paha ... Ha Shivaji Maharaj n che charitravar attack karat ahe ... Aplyala madhe bhandan lavat ahe .. yala Kesan che tension ahe ... Pan je sangayala paheje te sangat nahi

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 4 месяца назад +25

    सर तुमच्यामुळे महाराज समजण्यास मदत झाली...❤ जय शिवराय...

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 4 месяца назад +33

    खुप बारकाव्यांसह माहिती दिलीत धन्यवाद
    एवढा बारकावा सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते.

  • @dilipbhave8942
    @dilipbhave8942 3 месяца назад +1

    अगदी खरें आहे. यावर सेन्साॅरने कडक कारवाई करावी. त्यांचे प्रमाणपत्र मागे घ्यावे. तसेच या वाहिन्यांना दिलेली परवानगी रद्द करावी.

  • @swatidesai6420
    @swatidesai6420 4 месяца назад +35

    अगदी बरोबर बोललात सर.खूप दिवस मनात असलेली गोष्ट तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 प्रचंड दु:ख होते ह्यांच्या बेशरम, निर्लज्जपणाचे.पैशाच्या हव्यासापोटी हे काहीही करतात.शिवराय, शंभू राजे, जिजाऊ साहेब ही आमची दैवतं आहेत हे ते विसरतात आणि आमच्या भावनांशी खेळतात. तुम्ही अगदी योग्य शब्दांत त्यांचा समाचार घेतलात म्हणून खूप समाधान झाले. त्रिवार धन्यवाद 🙏

  • @SafarMarathi
    @SafarMarathi 4 месяца назад +12

    अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात सर 👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @itz_medriedrumble4117
    @itz_medriedrumble4117 4 месяца назад +14

    खुप सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती!!!. हिंदू दैवतांबद्दल सुध्धा या तथाकथित कलाप्रेमी सिनेमा वाल्यांनी बट्टयाबोल केला आहे।

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 4 месяца назад +17

    👌👍अगदी खरे बोललात. ऐतीहासिक पिक्चर बनवतांना आधी जर हे डायरेक्टर, कला निर्देशक, मेकअप आर्टिस्ट सर्व गोष्टिंचा मुळ ऐतीहासिक संदर्भानुसार अभ्यास करत नसतील तर त्यांना मुर्ख आणी बेजबाबदार म्हणावे लागेल.

  • @AnandShidture
    @AnandShidture 4 месяца назад +15

    प्रविण सर 🙏 काय महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला👌👌👌👌

  • @GauravSonsale1674
    @GauravSonsale1674 4 месяца назад +11

    सरांनी सालपटच काढली एकदम ! शब्दांनी धुलाई 💪🙏🙏🙏

  • @prabhakarapte5812
    @prabhakarapte5812 4 месяца назад +20

    आपण फार महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिली आहे. शिवरायांचे अस्सल रूप दिसतच नाही. नक्कल असते.याचाविचार कलाकाराने करायलाच हवा.

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf 4 месяца назад +9

    खरी भूमिका सादर केली ती श्री चंद्रकांत मांढरे सरानी आणि दिग्दर्शन भालजी पेंढारकरांचे,भोसले सर आपल्याला काय वाटते

  • @dattatraypatil7195
    @dattatraypatil7195 4 месяца назад +26

    सर माहिती खुपच छान दिलीत सर छत्रपती सभाजी महाराजाना पकडुन देण्यासाठी फितुरी कोणी केली याबद्दल माहिती द्या

  • @dipakbhadale7961
    @dipakbhadale7961 4 месяца назад +3

    सर तुमच्याकडून इतिहासाची खूप उत्तम पद्धतीने चांगली माहिती मिळत आहे,आणि आपला इतिहासात जिज्ञासापूर्वक चिकित्सा करून आमच्या हातामध्ये मिळत आहे,त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो

  • @dhirajnimbalkar8632
    @dhirajnimbalkar8632 4 месяца назад +19

    खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिली सर... शिवशंभूंचा एवढा बारीक विचार कोणीही करत नाही. तरी आमच्यासारखे स्वतःला (दिखाऊ) शिवभक्त म्हणवतात. खर तर शिवशंभूंना समजून घेताना त्यांचे वास्तववादी रुप मांडणे आवश्यक आहे. ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतात. त्याबद्दल आपले खूप खूप आभार...

  • @dayanandnadkarni207
    @dayanandnadkarni207 4 месяца назад +8

    *तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय महत्वाचा विषय तुम्ही घेऊन सगळ्या तथाकथित कलाकार आणी मराठी निर्मात्यांचे पीतळ आणी अल्पबुद्धी सगळ्या जनतेसमोर मांडल्या बद्दल. खरे तर ह्या लोकाना कलाकार म्हणणे पण गैर वाटते. हे लोक केवळ पोटभरु नाचे आहेत. आजपर्यंतच्या कोणत्याही मराठी चित्रपटात किंवा नाटकात शिवराय किंवा शंभुराजांचे दर्शन झाल्याचा कधी भास पण झाला नाही. दोघाही प्रथम दोन छत्रपतींची जाणीवपूर्वक विकृत प्रतिमा सादर करणाऱ्या ह्या नाचांचा धिक्कार. हे लोक दोन्हीही छत्रपतींचा केवळ पोटभरण्यासाठीच वापर करुन स्वतःचा गल्ला भर करत आहेत.* 😊😊

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v 4 месяца назад +13

    अगदी बरोबर बोललात सर 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩 श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @user-nf7us9pd8p
    @user-nf7us9pd8p 4 месяца назад +16

    सर आम्ही पूर्णपणे तुमच्या विचाराशि सहमत आहोत!
    जय भवानी जय शिवाजी!

  • @abhijeetudawant378
    @abhijeetudawant378 4 месяца назад +10

    अगदी खरे आहे प्रविण सर, मला सुद्धा हा प्रश्न नेहमीच पडायचा आणि मनस्ताप व्हायचा. खूप चान्गला विषय तुम्ही घेतला आणि त्या वर प्रकाश टाकला.

  • @sudhakarraojadhav397
    @sudhakarraojadhav397 4 месяца назад +3

    शासनाच्या निर्देशनास अनुण देण्यात यावे आणि या पुढे असा प्रकारे चित्रीकरण करणाऱ्यावर भादवि नुसार कार्यवाही करण्यात यावी .

  • @gauravpatilofficials
    @gauravpatilofficials 4 месяца назад +22

    सर आपण खूप सुंदर आमच्या शिवरायांच्या आणि sambhuraje ch विचार घरा घरा कर्तुत्व आत्मसात केले ❤ जय शिवराय जय शंभू राजे 🚩 🧡

  • @kshatrapavan
    @kshatrapavan 4 месяца назад +3

    उत्तम विडियो बनवलात आपण!
    माझ्या मते आधुनिक काळातील शिवछत्रपतिंच्या या बिघडलेल्या रूपाचे कारण म्हणजे त्यांच्या गालांवर येणारे लांब कल्ले म्हणजे नेमके काय हे न समजणे. या लांब कल्ल्यांमुळे त्यांचे सगळेच केस लांब असावेत असा गैरसमज पसरला असावा. वास्तविक या केसांच्या कल्ल्यांना संस्कृतात "काकपक्ष" असे म्हणतात. काकपक्ष हे क्षत्रियांमध्ये सौंदर्य आणि क्षात्रतेजाचे द्योतक होते. श्रीराम, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याही हे काकपक्ष होते असे वर्णन रामायणात आणि हरिवंशात येते. मथुरा येथील श्रीकृष्णाच्या एका गुप्तकालीन मूर्तीतही हे लांब काकपक्ष स्पष्टपणे दिसतात. त्यात काकपक्ष आणि शेंडीच्या ठिकाणी जूट वगळता अन्यत्र बारीक केस दिसतात.
    शिवछत्रपति आणि शंभुछत्रपतिंची मंदीलाशिवाय चित्रे उपलब्ध नाही. पण उपरोक्त माहिती, धार्मिक प्रथा आणि तत्कालीन इतर क्षत्रिय समाजांतील प्रथांवरून त्याविषयी अंदाज लावता येतात. त्यामुळे पुढील माहिती हे अंदाज असून १००% दावे नाहीत हे लक्षात असू द्यावे.
    तर, शिवछत्रपतिंना काकपक्ष होते हे नक्की. त्या काळी सर्वच हिंदू पुरुषांमध्ये जावळानंतर शिखा (शेंडी) राखण्याची पद्धत होती. क्षत्रियांत केसांचा जूट (बुचडा) बांधत. त्यामुळे महाराज डोक्यावर कानांच्या वर काकपक्ष आणि मध्यभागी शिखाजूट ठेऊन उरलेले केस काढून टाकत असावेत असे वाटते.
    शंभुछत्रपतिंची चित्र पाहिले तर त्यांचे काकपक्ष दिसत नाहीत आणि मानेवरचे केस मला तरी वरच्या दिशेला विंचरून मंदीलाच्या आत घट्ट ताणल्यासारखे दिसत आहेत. आताच्या काळात शिख लोक असे केस वरच्या दिशेला ताणून घट्ट बांधतात. त्याचप्रमाणे शंभुराजांच्या समकालीन राजा जयसिंहाचा पुत्र राजा रामसिंह याचे संध्या करते वेळेसचे मंदील न घातलेले एक चित्र उपलब्ध आहे. त्यात राजा रामसिंहाने सर्व केसांचा एकत्र करून घट्ट जूट बांधलेला दिसतो. शंभुराजांच्या मंदीलाखाली लांब केसांचा असाच टापटीपपणे बांधलेला जूट असण्याची शक्यता आहे. तरी, केस लांब असोत वा बारीक, मानेवर झुपऱ्या रुळत नसत एवढे नक्की.

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 4 месяца назад +6

    तुम्ही एखादा चित्रपट काढा आणि एक आदर्श निर्माण करा.
    ज्यांनी चित्रपट काढले त्यांनी महाराजांविषयी प्रेम व आदर असल्यानेच त्या कलाकृती निर्माण केल्या आणि प्रेक्षकसुद्धा त्यामुळे भारावून गेले.
    त्यावेळी हे सल्ले दिले असते तर ते योग्य ठरलं असतं. केवळ केस लांब /बारीक दाखवल्याने महाराजांविषयीचा आदर व भक्ती कमी होत नाही. उलट त्यांच्यावर काढलेल्या चित्रपट/मालिकांमुळे अधिकाधिक लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास पोचतो.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 4 месяца назад +10

    खरोखरच आज काळाचे चित्रपट, series मधील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पाहून जीवाचा संताप होतो...आपल्या वंदनीय देवाची विटंबना करताना ह्याना लाज कशी वाटत नाही😢

  • @dayaharne972
    @dayaharne972 4 месяца назад +5

    सर, मी एक चित्रकार आहे. मी एका प्रकाशनासाठी शिवाजी महाराजांचे चित्र काढत होतो, मी सुद्धा मान्यवर केस काढले होते पण तुमचा व्हिडिओ बघून मला चूक लक्षात आली आणि मग मी ते मानेवरचे केस काढून टाकले आणि मानेवरचे केस काढून टाकल्यामुळे पहिल्यापेक्षा आता शिवाजी महाराजांचे तेजस्वी रूप दिसत आहे. चूक लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @user-bu8hr7ge3m
    @user-bu8hr7ge3m 4 месяца назад +10

    खूप अभ्यासू स्पष्टीकरण सर मनापासून प्रणाम सर 🙏

  • @makaranddeshpande6525
    @makaranddeshpande6525 4 месяца назад +13

    सर जी आपण अतिशय ज्वलंत विषयाला वाचा फोडली हे उत्तम. ज्याप्रमाणे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे रूप, वेशभूषा अस्सल असावी त्याचप्रमाणे चित्रपटात, मालिकात दाखवला जाणारा इतिहास तेवढाच अस्सल असावा. कोणत्याही बऱ्या वाईट विचारधारेला पुढे दामटण्यासाठी व खोटी नाट्यनिर्मिती करण्यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार तसेच यू ट्यूबर्स कार्यरत असतात आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाना, प्रसंगाना वेठीस धरतात व अंध प्रेक्षकांना, श्रोत्यांना तो भेसळयुक्त इतिहास व प्रसंग व वेशभूषा अस्सल वाटू लागतो. आपण श्री शिवाजी महाराजांपासून ते श्री बाजीराव पेशवे यांच्या पर्यंत काढलेल्या मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेले खोटे प्रसंग, हिडीस नाचगाणी यावर प्रकाश टाकावा अन्यथा नवीन पिढीला अशा अनेक खोट्या गोष्टी खऱ्या वाटू लागतील.

  • @dnyaneshwarjadhaw8406
    @dnyaneshwarjadhaw8406 4 месяца назад +2

    होय, अगदी बरोबर, आपल्या कडून जेंव्हा जेंव्हा ईतिहास समजतो, त्या वेळेसच खर काय ते समजते, खरच खूप छान विश्लेषण करता तुम्ही, पुराव्यानिशी दिलेली माहीती मुळे खरा शिव शंभू ईतिहास मिळतो आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार व धन्यवाद 🎉🎉, जय शिवराय, जय महाराष्ट्रधर्म 🎉

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 4 месяца назад +10

    सर अगदी बरोबर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @praveenrajaram3939
    @praveenrajaram3939 4 месяца назад +7

    अगदी बरोबर, शिवरायांचा इतिहास मोडू पाहणाऱ्या मूर्ख सिनेमा मेकरस चा पूर्ण खर्च वाया जाणार आहे, जय शिवराय 🙏

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 4 месяца назад +6

    नमस्कार प्रविण भोसले सर! खुप महत्वाचा विषय घेऊन डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड ❤❤

  • @balraj4141
    @balraj4141 4 месяца назад +12

    मराठी जुना पिक्चर आहे सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज हा चित्रपट पहा जय शिवाजी जय भवानी 🙏🏻

  • @pramodwaghmare4030
    @pramodwaghmare4030 4 месяца назад +3

    अतिशय योग्य मुद्दा आणि विषय मांडला त्याबद्दल अभिनंदन !!
    केवळ सिनेमा किंवा मालिकाच नाही तर अशी बरीचशी छायाचित्रं देखील आहेत. या सर्व बाबतीत एक काटेकोर नियमावली असने गरजेचे आहे जेणेकरून वारंवार कळत नकळत होणार्‍या विकृती करणाला आळा बसेल.

  • @user-lr7sd3me1j
    @user-lr7sd3me1j 4 месяца назад +11

    15 20 30 40 वर्षाचे असताना खूप छान दिसायचे शब्दात सांगता येत नाही. 🙏👑जय शिवराय 🧡⚔️🚩

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 4 месяца назад +36

    What an observation Sirjee!!!Hats off to you. Tumhala 100 tofancha Salam 😊

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 4 месяца назад +9

    जय महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹🙏 वंदे मातरम 🚩🚩🙏

  • @kaps178
    @kaps178 4 месяца назад +4

    चिन्मय मांडलेकर तर अजिबात महाराज वाटत नाही पण त्याची हाउस काय भागातच नाही... सगळ्या लांजेकरांच्या चित्रपटात तोच महाराजांची भूमिका करतो..

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 4 месяца назад +9

    खरोखरच सर आपला अभ्यास चांगला आहे
    रामदास स्वामी व छत्रपती शिवराय यांच्या संबंधातील काल, संबंध, तसेच रामदास खरोखरच छत्रपती शिवाजीराजे यांचे गुरू होते काय याविषयी माहिती द्यावी ही विनंती

    • @sunildesai4958
      @sunildesai4958 4 месяца назад +1

      सबूत नाही पण श्रद्धा आहे आणि त्यात काही वाईट नाही 😊

    • @nitinpawar5206
      @nitinpawar5206 4 месяца назад +2

      Tumhi jar Datt sampradayala manat asal tar dattatrayanche dusre avtar sripadsri vallhab yanchya charitramadhe spastpane samartha Ramdas he shivaji maharajanche guru assa spast ullekha alela ahe

    • @vinodburhade5093
      @vinodburhade5093 4 месяца назад +4

      खुद्द रामदासांनी 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांना, आज पर्यंत आपली भेट झाली नाहि याबद्दल दुःख असल्याचे पत्र लिहिले आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली झाला. मतितार्थ.. छत्रपतीं शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा आपसात काहीहि संबंध नाहि.

    • @ashokatkare3597
      @ashokatkare3597 4 месяца назад +4

      रामदास गुरु नव्हता, माँ जिजाऊ ह्याच शिवरायांच्या गुरु.

    • @sunsaxz
      @sunsaxz 4 месяца назад +2

      ​@@ashokatkare3597अस संभाजी ब्रिगेड वाले बोलतात

  • @AmolPathak-ru8cm
    @AmolPathak-ru8cm 4 месяца назад +1

    खूपच महत्वाचा मुद्दा मांडलाय आपण भोसले साहेब..सरकार ने एक समिति नेमून आपल्या मनाप्रमाणे इतिहासाची मोडतोड करणार्‍या आणि छत्रपती शिवरायांसारख्या अत्यंत थोर अश्या महापुरुषांच्या प्रतिमेला इजा पोहोचविणार्या दिग्दर्शकांवर कडक कारवाई केली पाहिजे.

  • @shahajishinde3993
    @shahajishinde3993 4 месяца назад +13

    Digpal lanjekar yani सुभेदार वा shivarayancha chava ya chitrap. Chitrapatat राज्यांच्या मानेवर कमी केस आहेत.
    बहुतेक त्यांनी तुमचा व्हिडिओ बघितला असेल ❤.
    जय शिवराय 🚩

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 4 месяца назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @Ad_iana_nt
    @Ad_iana_nt 4 месяца назад +1

    खूपच महत्त्वपूर्ण गोष्टमांडली तुम्ही... खूप खूप धन्यवाद... इतिहास चुकीचा दर्शवणे अतिशय गंभीर बाब आहे... लोकांनी यावर बोललं पाहिजे

  • @srsawant123
    @srsawant123 4 месяца назад +2

    Hats off to you sir. They produce movies in lots and they do not adhere to the smallest details.

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 4 месяца назад +4

    सर तुम्ही छान परखडपणे सत्य मांडलेत त्या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏

  • @yogeshjagtap497
    @yogeshjagtap497 4 месяца назад +1

    अगदी बरोबर आहे सर,
    आपण सर माळी समाजातील इतिहासातील वीरांबद्दल पूर्ण व्हिडिओ बनवणार आहात, त्याची उत्सुकता आहे।

  • @akashkulsange3912
    @akashkulsange3912 4 месяца назад +3

    दिगपाल लांजेवार यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर चे पिच्चर अतिशय सुंदर बनवण्यात आले आहेत

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 месяца назад +6

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ . करेक्ट आहे.सर

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 4 месяца назад +6

    🚩🚩*जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म 🚩🚩

  • @harishbaet6222
    @harishbaet6222 4 месяца назад +5

    आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. ही गोष्ट 15-20 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आली होती माझ्या काही मित्रांच्या निदर्शनास आणून दिले होते.त्या वेळी आता सारखी प्रसिद्धी माध्यमे नसल्याने माझे मत मला व्यक्त करता आले नाही.लहानपणी जे चित्रपट पाहिले त्यात च॑द्रका॑त ; सुर्य काऺत यांचें केसही लाऺब होते.आताच्या टिव्ही मालिका मी याच कारणामुळे पाहिल्या नाहीत.आपल्याला धन्यवाद!!

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 месяца назад +5

    आभार अभिनंदन धन्यवाद हरहरमहादेव

  • @yogeshpatil3674
    @yogeshpatil3674 4 месяца назад +2

    खूपच भारी वाटलं सर.... खूप भारी आणि मनातल्या विषयाला हात घातलात आपण.... जय शिवराय 🚩🚩

  • @manoharrananavare5022
    @manoharrananavare5022 4 месяца назад +5

    मांडणी खूप छान,आतातरी कळेल अस वाटतंय ,

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 месяца назад +3

    खूप सुंदर आणि खरी माहिती जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @Gnessh5567
    @Gnessh5567 4 месяца назад +1

    बरोबर आहे सर तुमचे मत. जुने शिवाजी महाराजांचे चित्रपट पाहिले व त्यातील चंद्रकांत मांडरे यांना पाहिले कि असं वाटायचं कि हेच शिवाजी महाराज आहेत. आता काय उठ सुठ कोणीही उटतय आणि महाराज होऊ पहातय.

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 4 месяца назад +6

    खूप छान माहिती...

  • @bwpproflalitkhairnar7462
    @bwpproflalitkhairnar7462 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर माहिती आपण आम्हा सर्वांना करून दिली व सर्वांना जाणीव जरी करून दिली...👍 ग्रेट सर

  • @shivyadav1488
    @shivyadav1488 4 месяца назад +1

    तुमचे खूप खूप आभार .. खूप छान विषय मांडले आहेत तुम्ही....❤❤❤

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 4 месяца назад +1

    खूपच महत्त्व चे छत्रपतीच्या विषयी मांडला आपण सर महाराजांची कोणालाच सर येणार नाही हे निश्चित ❤

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 4 месяца назад +7

    फारच मस्त धुतले पिक्चर वाल्यांना.

  • @mithunwaikar2007
    @mithunwaikar2007 4 месяца назад +4

    Maharajanbaddal aslele tumche nirikshan ekdum barobar ahe

  • @mohan1795
    @mohan1795 4 месяца назад +2

    चांगला विषय घेतला.. भाऊसाहेब! 🙏

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 4 месяца назад +10

    शिवराय किंवा शंभुराजांचे चित्रे बघितले तर त्यांची शरिरयष्टी सुद्धा किती धिप्पाड दिसते आणि नट कसे किरकोळ दाखवून महाराजांना कमी लेखनाचा कायम प्रयत्न केला जात आहे

    • @pghadage
      @pghadage 4 месяца назад +1

      Hona kharay...Pot sutlele actors ghetat... Chhatrapati Shivaji Maharaj aani Sambhaji Maharaj fit hote ekdam...Marathi actors na kalayla pahije jyanchi apan Bhumika sakartoy te kon aahet kashe distat te...nusta costume ani makeup kela ki zala hyanch

  • @digvijay3993
    @digvijay3993 4 месяца назад +2

    सर तुमची माहिती खूप छान आहे तुम्ही अगदी लहान बरकाव्याचा अभ्यास आहे तुमच्यासारक्या व्यक्तीनेच ऐतिहासिक चित्रपट करायला हवा जेणेकरून नव्या पिढीला खर बघायला भेटेल

  • @manojshedge602
    @manojshedge602 4 месяца назад +6

    धन्यवाद सर खूप उपयुक्त माहिती दिली.

    • @jeevankad5694
      @jeevankad5694 4 месяца назад

      अगदी बरोबर आहे

  • @anjaneyaproductions6691
    @anjaneyaproductions6691 4 месяца назад +1

    हे अगदी खरं बोललात सर, चित्रपटसृष्टीत अक्षरशः स्पर्धा सुरू आहे...

  • @himmatpatil9560
    @himmatpatil9560 4 месяца назад +1

    अगदी बरोबर सर जय शिवराय

  • @rajendrasinhmohite2171
    @rajendrasinhmohite2171 4 месяца назад +3

    Sir,
    I totally agreed with u.
    These acyors are only afyer money.
    Censor board should take action.
    Bravo.

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr 3 месяца назад +1

    खरी चित्र मुघल आणि राजस्थानी शैलीची आहेत असं वाटतं छत्रपतींचा पेहराव पण कसा होता हे पण सविस्तर माहिती द्यावी सर 🎉

  • @kadamaj97
    @kadamaj97 4 месяца назад +2

    15:11 महाराजांचा इतिहास स्वतःच खंबीर आहे....इतिहासाचा हवा तसा बदल करून वापर केला जात आहे ही दु्दैवाची बाब आहे....महाराज चित्रपटातून नाही तर ऐतिहासिक पुस्तकात वाचून कळतात....जय शिवराय 🚩🙏🏻

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 4 месяца назад +1

    चित्रपट बनवणारे कधीच कोणाचेच अभ्यास करत नाहीत, म्हणून राग येतो😠😠

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 4 месяца назад +3

    महत्वाचा मुद्दा मी पण नेहमी यावर विरोध करत आलोय,हर हर महादेव चित्रपटात सुबोध भावे यांनी कमी केस ठेवल्याचे आढळते

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 4 месяца назад

    आपले मत अतिशय परखड विचार मांडले आहेत खुप छान. सत्य नेहमी सत्यच राहत.

  • @vishnupanchal2706
    @vishnupanchal2706 4 месяца назад +1

    सर हा विषय खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे.त्यावर सगळ्यांनी विचार करायला हवा

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 4 месяца назад +4

    अशा मुळे शिवरायांवर चित्रपट येणे बंद होईल चित्रपट पुर्णपणे खरे नसतात त्यांना ऐतिहासिक दस्तावेज कोणी मानत नाही पण लोक तर चित्रपट च बघतात ना की कादंबरी बखर शिवचरित्र वाचतात😢

  • @supriyadivekar9804
    @supriyadivekar9804 4 месяца назад +2

    जुने मराठी छत्रपती शिवरायांचे चित्रपटकार भालजी पेंढारक यांच्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी अणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका
    सूर्यकांत अणि चंद्रकांत मांढरे हे बंधू साकारायचे त्यांची ती श्रीमंत मराठी भाषा, कॉस्चूम, अभिनय, उभे राहण्याची पद्धत, अदब, करारी पणा ह्या सगळ्याचा हल्लीच्या कलाकारांनी नीट अभ्यास करावा. त्यासाठी भालजी पेंढारकरांचे शिवकालीन चित्रपट पाहणे आवश्यक आहे.
    सूर्यकांत अणि चंद्रकांत मांढरे यांच्याशिवाय आम्हाला कोणतेच कलाकार छत्रपती शिवाजी महाराजां च्या भूमिकेत आवडत नाहीत.

  • @user-bl9nu7tq1g
    @user-bl9nu7tq1g 4 месяца назад +1

    मस्तच विषय विचार करायला लावणारा व्हिडीओ 🙏🚩जय शिवराय दादा

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 4 месяца назад +17

    महेश मांजरेकर कोणाचाही अपमान करत असतो

  • @vilaspatil2495
    @vilaspatil2495 4 месяца назад +2

    बरोबर आहे सर,यातले बरेचसे नट दारू पितात हे त्यांच्या चेहर्‍यावरून दिले.

  • @drawingroom2082
    @drawingroom2082 3 месяца назад +1

    अगदी अचूक माहिती

  • @HarisonFort61
    @HarisonFort61 3 месяца назад +1

    सर आपण नक्कीच अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करत असता...

  • @lahuv.66
    @lahuv.66 4 месяца назад +4

    प्रविण भोसले सर, अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाला आपण तोंड फोडले आहे. आपल्या शिवजागृतीमुळे शिवरायांच्या खऱ्या ईतिहासाची मराठी जनांना ओळख होईल व शिवरायांची दैदीप्यमान शिवशाही महाराष्ट्रात अवतरेल.

  • @hindumaratha2019
    @hindumaratha2019 4 месяца назад +1

    किती बारीक निरीक्षण केले तुम्ही. खूप छान. ❤️🙏

  • @mithunwaikar2007
    @mithunwaikar2007 4 месяца назад +4

    Ekdum barobar ahe Sir

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 4 месяца назад +2

    योग्य विश्लेषण सर 👌

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 4 месяца назад +3

    फार उशीर झालाय सर व्हिडिओ टाकायला हे सगळे झिपरे घराघरात पोहोचले आहेत आता एक च उपाय या सगळ्या ना बालाजी ला पाठवला तर बरं होईल. दुसरं काही तर म्हणणार होतो परंतु माझ्या राजांचा अपमान होतोय.

  • @motiramgondhali2365
    @motiramgondhali2365 4 месяца назад +1

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे
    सर खूप खुप महत्वा मुद्दा मांडला तुम्ही
    हे चित्रपट निर्माते व कलाकार यांनी
    महाराजांची व शंभूराजाची विटंबना
    केली म्हणून यांच्यावर कारवाई का होऊ नये

  • @kaustubhbagkar1357
    @kaustubhbagkar1357 4 месяца назад +3

    छत्रपती शिवाजी नावाचा भालजी पेंढारकरांचा मी पाहिलेला खरा चित्रपट, एकदा पहा.श्री चंद्रकांतजींनी महाराजांची भूमिका चोख बजावली.❤

  • @ramkrishnagumbade4435
    @ramkrishnagumbade4435 4 месяца назад +2

    मी आपल्या वक्तव्याशी सहमत आहे सर.
    सर्व दिग्दर्शक व कलाकरांच्या वतीने माफी magto

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 4 месяца назад +3

    नेहमी प्रमाणे उत्तम माहीती.. 🙏🏻

  • @rupeshkalsekar3279
    @rupeshkalsekar3279 4 месяца назад +2

    मूळ मुद्दा राहिला, शिवरायांची दाढी

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 4 месяца назад +4

    Chan sangitale tumhi
    Pan jitke maharajanche chitrapat baghitale tyani tya kalatalye spandane Shakti yanchi prachitiaudha diliye
    Pavankhind
    Sher Shivraj
    Shirayancha Chava
    Chatrapati Sambhaji
    Itke Sundar Gaganala bhednarya Shaktichi gatha sangitli ahe

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 4 месяца назад +4

    चित्रपट निर्माते दिग्दर्शक कुठल्याही इतिहास संशोधक यांची मदत न घेता आपल्याला खूप काही माहिती आहे असं समजत व्यक्तिरेखा साकारत आहेत याबद्दल प्रत्यक्ष पूजनीय बाबा साहेब पुरंदरे यांनी सूध्दा खंत व्यक्त केली होती आपण हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणलाय त्या बद्दल धन्यवाद.तोही पुरावे सादर करून.